सायकोपॅथीला मराठीत काय म्हणतात मला माहित नाही.सायकोपॅथी हे एक उत्क्रांत झालेलं स्वभाववैशिष्ठ्य आहे.काय आहे सायकोपॅथी? आपला त्याच्याशी काय संबंध आहे?
सायकोपॅथ हा अश्या लोकांचा समूह आहे ज्यांना आपल्यासारखा conscience नसतो,conscience म्हणजे moral sense of right and wrong.नैतिकदृष्ट्या काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे ठरवण्याची सामान्य माणसामध्ये क्षमता असते ,ती क्षमता सायकोपॅथीक व्यक्तीकडे नसते.असे लोक प्रामुख्याने गुन्हेगारी वृत्तीचे असतात.एका अंदाजानुसार यांची एकुण टक्केवारी लोकसंख्येच्या ४% एवढी आहे.४% हा आकडा जरी कमी वाटत असला तरी यांचे जे बर्डन समाजावर पडलेले आहे ते फार मोठे आहे.बहुतांश गुन्हेगार हे सायकोपॅथ असतात,७५% टक्के इतके.पण हे एवढ्यावरच थांबत नाही.सायकोपॅथ इतरही अनेक क्षेत्रात आघाडीवर असतात.जगभरातले हुकुमशहा,अनेक मोठ्या कॉर्पोरेशन्सचे CEO ,मिलीटरी पर्सनल्स ,पोलिस दलातील व्यक्ती ,इतकेच काय काही वैज्ञानिकही सायकोपॅथ या प्रकारात मोडतात .भीतीची कमतरता हे सायकोपॅथ लोकांचे मुळ लक्षण आहे.fear conditioning, म्हणजेच एखाद्या नकारात्मक घटनेचा संबंध भीतीशी जोडणे व त्यानुसार व्यवहार करणे ही सामान्य माणसाची उपजत क्षमता सायकोपॅथ्समध्ये नसते.त्यामुळे सायकोपॅथ्सना कशाचेही बंधन वाटत नाही.ते बर्याचदा त्यांना उत्तेजित करतील असे व्यवहार करत असतात.lower arousal हा सायकोपॅथीक व्यक्तीचा आणखी एक गुणविशेष.
सायकोपॅथी चा अभ्यास अनेक वर्ष चालू आहे.पैकी रॉबर्ट हेअर हे त्यातील तज्ञ समजले जातात.तीन दशकाहूनही अधिक काळ त्यांनी या स्वभावाच्या लोकांचा अभ्यास करुन एक प्रश्नावली तयार केली आहे. Hare psychopathy checklist revised ही ती प्रश्नवली आहे.
https://www.wikipedia.org/wiki/Psychopathy_Checklist
त्यांचे without conscience हे पुस्तक या क्षेत्रातले उत्तम पुस्तक व अभ्यासग्रंथ म्हणून ओळखले जाते.
सायकोपॅथ आणि सामन्य व्यक्ती यांच्या मेंदूत मुलतः फरक असतो हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे.आपल्याला नियंत्रणात ठेवणारा,विचारशक्ती देणारा मेंदूचा अग्रभाग( prefrontal cortex) ,हा भाग सायकोपॅथीक व्यक्तीमध्ये फार कमी उत्तेजीत असतो,सामान्य माणसांमध्ये मात्र हा भाग बर्यापैकि उत्तेजीत अवस्थेत असतो.जास्त उत्तेजना म्हणजे या भागाचा जास्त वापर असे गणीत आहे.
(आंतरजालावरुन साभार)
सायकोपॅथ हे मुळातच या बाबतीत कमी उत्तेजीत असतात.मेंदूतील मुलभुत फरकामुळे त्यांची अनेक स्वभाववैशिष्ठ्ये असतात .ती कोणती ते बघूयात.
१. भीतीचा अभाव- सायकोपॅथ हे अत्यंत धाडसी असतात.त्यांच्यात भीतीचा खूप अभाव असतो.त्यामुळे असामाजिक आणि बेकायदेशीर व्यवहार करताना त्यांना कसलीच भीती वाटत नाही.
२. आपल्या वागण्या बोलण्यातून एखादे सावज टिपणे .स्वतःच्या फायद्यासाठी त्याच्याशी चांगले वागण्याचे नाटक करणे.असे नाटक करण्यात सायकोपॅथ तरबेज असतात.इंग्रजीत याला superficial charm असे म्हणतात.
३.स्वतः विषयी असलेल्या अवास्तव कल्पना हे यांचे महत्वाचे लक्षण आहे.,सायकोपॅथीक व्यक्ती स्वतःच्या गरजा पुर्ण करण्याला महत्व देते.स्वतःचा वाढवलेला मोठेपणा ,फक्त स्वतःच्याच गरजा महत्वाच्या समजणे हे गूण आढळतात.
४. आक्रमकपणा(impulsivity)- सायकोपॅथ हे अत्यंत आक्रमक असतात.थोड्याश्या provocation मुळेही ते मारामारिपासून ते खूनापर्यंत कोणतीही गोष्ट लिलया करु शकतात.poor self control असणे ,आपल्या कृत्यातून होणार्या परिणामांची पर्वा न करणे .
५.उत्तेजना देणारे व्यवहार करणे- सायकोपॅथीक व्यक्ती त्यांना उत्तेजना देईल असे वर्तन करतात.सामान्य माणसाला जोखमीच्या ,risky वाटतील अश्या गोष्टी ते सहजतेने करत असतात. वेगात वाहन चालवणे,सार्वजनिक ठीकाणी असभ्य व बेकायदेशीर व्यवहार करणे ,स्त्रीयांचि छेड काढणे इत्यादी प्रकार ते लिलया करत असतात.
६.खोटं बोलणे- स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलणे इतरांना फसवणे .
७.दयेचा आणि अपराधीपणाचा अभाव(lack of remorse and guilt)- सायकोपॅथ्सना कुणाविषयी कसलीही दयाभावना नसते,सामान्य व्यक्तीला असलेले दया ,करुणा हे भावबंध त्यांच्यात नसतात.
दुसर्या व्यक्तीला दिलेल्या त्रासाचा त्यांना कसलाही गिल्ट नसतो.
८.स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्यावर अवलंबून राहणे हे सायकोपॅथ्सचे आणखी एक लक्षण,इंग्रजीत ज्याला parasitic living म्हणतात,असे आयुष्य जगणे .स्वतःच्या भविष्याविषयी कोणतेही प्लॅनिंग नसणे.
९.अनेक लैंगिक जोडीदार असणे .promiscuous sexual behavior.काही तज्ञांच्यामते सायकोपॅथी ही उत्क्रांतीतून जन्माला आलेली reproductive strategy आहे.अनेक जोडीदारांशी बळजबरीने संबंध ठेवणे व आपला वंश वाढवणे यासाठी उत्क्रातीत या स्वभाववैशिष्ठ्याचा फायदा झाला असावा.व हा स्वभावविशेष बळावला असावा.त्यामुळेच बहुतांश बलात्कारी सायकोपॅथ म्हणून सहज क्वालीफाय होतात.
१०.विस्तृत गुन्हेगारीकरण- सायकोपॅथ अनेक प्रकारच्या गुन्हांमध्ये गुंतलेले असू शकतात.दरोडा,बलात्कार ,खून यासारखे ब्लू कॉलर गुन्हे ते करतच असतात.त्याच बरोबर फ्रॉड,आर्थिक गुन्हे असे व्हाइट कॉलर गुन्हे ही करत असतात.
मला सायकोपॅथी विषयी जी माहीती आहे ती इथे सोप्या शब्दात मांडली आहे.माझ्या व्यक्तीगत आयुष्यतही मी अनेक सायकोपॅथना जवळूण बघितले आहे.त्याविषयीही लेखात लिहिले आहे.आंतरजालावरुनही बरीच माहीती घेतली आहे.चित्र आंतरजालावरुन घेतले आहे.धन्यवाद.
प्रतिक्रिया
26 Dec 2016 - 1:51 pm | संदीप डांगे
छान लेख. असं काही लिहित जा. पुलेशु!
26 Dec 2016 - 2:22 pm | श्रीगुरुजी
आपल्या सर्वांनाच एक प्रसिद्ध सायकोपॅथ माहिती आहेत.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
२१ व्या शतकातील अवतारी महापुरूष श्री श्री १००८ अरविंदस्वामी केजरीवाल महाराज यांनी डिसेंबर २०१५ मध्येच चिवचिवाट करून "Modiji is a coward and psychopath" असे प्रशस्तीपत्रक दिले होते.
26 Dec 2016 - 2:39 pm | बोका-ए-आझम
पण भीतीचा अभाव हे काही पटलं नाही.
26 Dec 2016 - 4:54 pm | संजय पाटिल
ऊलट यांना इतरांन्पेक्षा जास्त भिती वाटत असावी, पण ती झाकण्यासाठी हे असे वागत असावेत...
26 Dec 2016 - 5:45 pm | आनन्दा
मला बरोबर वाटते.. पकडले जाण्याची/ अपयश येण्याची भीती हीच बर्याच वेळेस माणसाला गुन्हे करण्यापासून रोखत असते.
पण धाडस आणि सायकोपॅथ यामधली सीमारेषा फार पुसट असावी असे वाटतेय.
26 Dec 2016 - 6:46 pm | कंजूस
चंबळखोय्रातले ठग कोणत्या प्रकारात येतील?
27 Dec 2016 - 12:17 am | स्पार्टाकस
बहुतेक सर्व सिरीयल किलर्स हे सायकोपाथ असतात. काही ना काही कारणाने त्यांची मनोवृत्ती तशी होते. रामन राघव, टेड बुंडी, जॉन वॅन गेसी ही चटकन आठवणारी उदाहरणं. जॅक द रिपर पकडला गेला नसला तरी तो सायकोपाथ असावा याबद्दल कोणतीच शंका नाही.
आणखीन एक आठवणारं उदाहरण म्हणजे कार्ला फे टकर! माणसं मारताना लैंगिक समाधान - Orgasam - मिळत होतं असं तिने कबूल केलं होतं.
27 Dec 2016 - 2:26 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
स्पार्टा,जॅक द रिपर एक स्त्री होते असे म्हणतात.स्त्रीया ही सायकोपॅथ आसू शकतात.
28 Dec 2016 - 10:15 am | बोका-ए-आझम
अगदी आपल्या देशातही आहेत. अंजनाबाई गावित आणि तिच्या सीमा आणि रेणुका या दोन मुलींनी कोथरूड भागात अनेक लहान मुलांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली. त्यांना स्वतःला त्याच वयाची मुलं असूनही. वेश्याव्यवसाय करणारी आणि आपल्या गि-हाइकांची हत्या करणारी आयलीन वर्नोस ही अजून एक. तिच्यावर तर Monster सारखा चित्रपट बनला आणि चार्लीझ थेराॅनला त्या भूमिकेसाठी Oscar मिळालं.
28 Dec 2016 - 10:19 am | पुंबा
मुलांचे मॄतदेह पिशवीत घालून या बायका टॉकीजला जाऊन चित्रपट बघायच्या, इतक्या निर्ढावलेल्या होत्या त्या..
29 Dec 2016 - 12:26 am | स्पार्टाकस
जॅक द रिपर नेमका कोण होता हे वादातीतरित्या अद्यापतरी सिद्धं झालेलं नाही. डीएनए तंत्राने दोन वेगवेगळ्या व्यक्ती जॅक द रिपर असल्याचाही दावा करण्यात आलेला आहे.
27 Dec 2016 - 1:03 am | गामा पैलवान
लोकहो,
हा लेख वाचून एक गहन प्रश्न पडलाय : बायकोच्या मुठीत राहणाऱ्या नवऱ्यास बायकोपाथ म्हणावं का?
आ.न.,
-गा.पै.
27 Dec 2016 - 5:47 pm | मराठी कथालेखक
सायकोपॅथना विपरित परिणामांची/प्रतिक्रियांची (पकडले जाणे , शिक्षा होणे, नाचक्की होणे ई) भिती नसते म्हणजे नेमकं काय ?
१) असं काही (म्हणजे विपरीत परिणाम) होतील असंच त्यांना मुळात वाटत नाही का ? की
२) विपरीत परिणाम सहन करण्याची त्यांची तयारी असते ? की
३) विपरीत परिणामांना ते विपरीत मानत नाहीत, त्याचाही आनंद घेतात.
म्हणजे वरील एक उदाहरण घेतले की एक सायकोपॅथ स्त्रियांची छेड काढतोय तर याचा अर्थ त्याला असे वाटते का
१) आपल्याला यासाठी कुणी शि़क्षा करणारच नाही (म्हणजे कुणी जाब विचारला तर आरोप नाकारु, पळून जावू ई). की
२) झाली काही शिक्षा तर सहन करु, की
३) पडला चार लोकांकडून मार तर मजाच येईल की अजून... (अधिक उत्तेजना ?)
27 Dec 2016 - 8:32 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
कथालेखक,सायकोपॅथना भीती वाटतच नसते,फुल ब्लोन सायकोपॅथ तर सिरीयल किलर असतात.मी सांगितले तसे मॉरल सेन्सच नसतो,मग कुठलही कृत्य ते जस्टीफाय करतात,अगदी बलात्कार आणि खूनही.
निर्भया केसमध्ये जी डॉक्युमेंट्री बनवली गेली त्यात मुकेश सिंग हा बलात्कारी चक्क बायका रात्रीच्या बाहेर फिरतात म्हणून आम्ही बलात्कार केला असे विदाउट् गिल्ट म्हणाला होता.यावरुन यांच्या मानसिकतेचा अंदाज यायला हरकत नाही.
27 Dec 2016 - 8:38 pm | Ram ram
टफी बदल गया है।180 अंशात प्रवास चालू झाला,छान ,पुलेशु,।
28 Dec 2016 - 2:13 pm | गामा पैलवान
Ram ram,
काय म्हणता, टफि सुधारले? मग मीसुद्धा ही माझ्या प्रतिभेची सुधारित आवृत्ती सादर करतो.
सतत इतरांच्या गोष्टी चोरून ऐकणारा सायकोपाथ = ऐकोपाथ
सतत खाखा सुटलेला बकासुर सायकोपाथ = खायकोपाथ
सतत नकारघंटा वाजवणारा सायकोपाथ = नायकोपाथ
सतत गाणी गाणारा सायकोपाथ = गायकोपाथ
सतत चहा ढोसणारा सायकोपाथ = चायकोपाथ
उन्हाने रंग काळवंडण्याच्या अनाठायी भीतीमुळे सतत सावलीत वावरणारा सायकोपाथ = छायकोपाथ
सतत टाय नीट करणारा सायकोपाथ = टायकोपाथ
सतत थायलंडास जाणारा सायकोपाथ = थायकोपाथ
सतत बायकोच्या मार्गावर चालणारा सायकोपाथ = बायकोपाथ
सतत भाईगिरी दाखवणारा सायकोपाथ = भायकोपाथ (वा भाईकोपाथ)
सतत माहेरी पळणारी सायकोपाथ = मायकोपाथ (हिंदी संज्ञा)
सतत इतरांची लायकी काढणारा पण स्वत:ची लायकी विसरणारा सायकोपाथ = लायकोपाथ
सतत शाई उडवणारा किंवा उडवून घेणारा सायकोपाथ = शाईकोपाथ ( = केजरीवाल)
आणि अंतिमोत्कृष्ट म्हणजे [माझ्यासारखी ;-)] प्रतिभा जागृत झालेला सायकोपाथ = प्रतिभायकोपाथ (*१)
आ.न.,
-गा.पै.
टीप : *१ याचा भायकोपाथाशी घनिष्ट संबंध असावसं वाटतं. अधिक संशोधनाची जरुरी आहे.
28 Dec 2016 - 1:27 pm | डायवर
- अचानक राग अनावर होणे अन त्या क्षणिक रागाच्या भरात (in the heat of moment ) एखाद्याकडून खून होणे , हे "सायकोपॅथ" असण्याचे लक्षण आहे का ? कारण बरेच गुन्हेगार हे रागाच्या भरात जबरी मारहाण करतात व त्यातून खून होतो . जसे कि जमिनीचे वाद , ऑनर किलिंग इत्यादी .
- किंवा याच्या अगदी उलट थंड डोक्याने एखाद्याचा कायमचा काटा काढणारा (cold blooded murderer ) "सायकोपॅथ" म्हणावा ? उदा. इंग्लिश सीरिअल मधील मुख्य कथानायक " Dexter "
28 Dec 2016 - 2:09 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अचानक राग अनावर होणे अन त्या क्षणिक रागाच्या भरात
(in the heat of moment ) एखाद्याकडून खून होणे , हे
"सायकोपॅथ" असण्याचे लक्षण आहे का ? कारण बरेच गुन्हेगार हे
रागाच्या भरात जबरी मारहाण करतात व त्यातून खून होतो .
जसे कि जमिनीचे वाद , ऑनर किलिंग इत्यादी>>>>>>>>>> हॉट हेडेड क्रिमिनल्स् व सायकोपाथ यांच्यात फरक आहे.पण ते बर्याचदा काही गुण शेअर करतात.antisocial personality disorder ही ब्रॉडर टर्म त्यासाठी वापरली जाते.
28 Dec 2016 - 2:31 pm | हतोळकरांचा प्रसाद
छान लेख! निठारी हत्याकांडातील आरोपी पण याच सदरात मोडत असतील बहुदा!
30 Dec 2016 - 12:47 pm | जाबाली
असल्या व्यक्ती फक्त खुनी, चोर किंवा अनैतिक कामे करणाऱ्या असतील असे वाटत नाही. अत्यंत सामान्य व्यक्ती मध्ये सुद्धा असे गुण असू शकतात. त्यावरती अंकुश लावता येणे हे महत्वाचे आहे असे वाटते. लहानपणापासून मेंदू मध्ये काही गोष्टी hardwire केल्या जातात, म्हणजे ज्या वातावरणात वाढतो ते वातावरण आयुष्याला दिशा देणारे ठरते. एखाद्या छोट्या पण चुकीच्या गोष्टी मध्ये यश मिळाले आणि ते तसे पुढे मिळत राहिले तरी सुद्धा या प्रवृत्ती मध्ये वाढ होते आणि ती बळावते. आपल्या ईथे लाच घेणारे, देणारे, छोटे मोठे घोटाळे करणारे, राजकारणी, सुट्टे नाहीत म्हणून चॉकलेट गोळ्या देणारे (सगळे म्हणत नाहीये मी) सुद्धा सायकोपाथ म्हणायला हवेत. स्वतःला बॉम्ब मध्ये उडवून घेणारे सुद्धा आणि पार्किंग च्या जागेवरून भांडण करणारे सुद्धा. मध्ये कुठे तरी सोसायटी च्या पार्किंग वरून कोणी तरी कोणाच्या डोक्यात ......... असा वाचण्यात आला. आपल्यात आजून पशु चा अंश शिल्लक आहे हे विसरता कामा नये !