तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत्या वयाचा गिल्ट येतो का???

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
14 Dec 2016 - 8:57 pm
गाभा: 

आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपण कधी एकदाचे मोठे होतो असे सतत वाटत असते.लहानपणाची मजा जरी वेगळी असली तरी प्रत्येकाला मोठेपणाच्या एलाईट क्लबात सामिल व्हायचे असते.मी लहान असताना स्वतःला दाढीमिश्या काढून आपण मोठे झालो आहोत अशी स्वतःची समजुत करुन घ्यायचो.वडील म्हणायचे तुलाही येतील दाढी मिश्या,जरा कळ काढ .यथावकाशात मला भरघोस दाढीमिश्या आल्या.मी नवतरुण होतो.दाढी कोरणे ,मिश्या वाढवने असले प्रकार कॉलेजमध्ये करायचो.त्यावेळेस आमच्याकडे यझदी गाडी होती ,ती गावातून सुसाट पळवणे हा माझा छंद होता.
काही दिवसांपुर्वी मी आरश्यात बघत असताना लक्षात आले की आपले केस पांढरे व्हायला लागले आहेत.पुर्वीची दाढीची काळीभोर खुंट आता बरीच पांढरी पडायला लागली आहेत.तरी मी दाढी वाढवली.यथावकाश आजुबाजुचे माझे तरुण मित्र मला " ओ काका " अशी हाक मारुन चिडवायला लागले.ज्या षोडशा मला दादा म्हणायच्या त्या काका म्हंणायला लागल्या तेव्हा माझी झिंग उतरली.विचार करु लागलो ,आता आपण नवतरुण राहीलेलो नाही.आपण ३० नुकतेच पार केले आहे.त्यादिवशी नेहमीप्रमाणे मैदानावर चालायला गेलो.एक रनिंग करणारा मित्र भेटला ,त्याच्या बरोबर थोडे रनिंग करुन बघुयात म्हणून पळायला सुरवात केली.अवघ्या काही सेकंदात धाप लागायला लागली.हातानेच त्याला पुढे जायला सांगितले व तिथेच थांबलो.घरी येताना बाईक चालवत येत होतो,आजुबाजुने नवतरुणांच्या बाइक्स सुसाट जात होत्या ,मी बराच संथ चाल्वत होतो,दहा वर्षापुर्वीचा यझदीवरचा वेग मला आता भीती दाखवत होता.मला आठवायला लागले ते कॉलेजमधले दिवस ,१८,१९ वर्षांचा असताना अंगात असलेली रग,बेदरकारपणा कुठल्याकुठे उडून गेला होता.राहीले होते फक्त ७० किलोचे संथावलेले शरीर.वयाने त्याचे परिणाम दाखवायला सुरवात केली आहे.
अजुन मिडलाईफ यायला खुप वेळ आहे.पण त्याची आतापासुनच भीती वाटायला लागली आहे.साठीतले रोग आजकाल चाळीशीत आले आहेत.न जाणो आपल्यालाही चाळीशीतच डायबेटिस ,हार्ट् ब्लॉकेज असे काही जडले तर?
मग या वाढत्या वयाविषयी इतरांना काय वाटते ते विचारुन बघितले.सगळ्यांनी माझाच विचार परत माझ्यापाशी बोलुन दाखवला.मित्र ही तेच बोलत होते.साला आजकाल पुर्वीसारखा जल्लोष वाटत नाही कशात.
या वाढत्या वयाचा शाररीक ,आर्थिक , लैंगिक ,भावनिक सर्व् पातळ्यांवर परिणाम होतो.हळवेपणा वाढतो,होपलेसनेसही वाढत जातो.एखाद्या फटाका मुलीने दिलेले किलर लुक तितकीशी शिरशीरी आणत नाहीत ,जेव्हढि कॉलेजमध्ये यायची.शेतीच्या कामात मी नियमीत लक्ष घालत असल्याने तिथे अजुन वयाचा परिणाम तितपत जाणवत नाही.असो ,मी माझेच पुराण सांगत बसत नाही.तुम्हाला ,स्त्री पुरुष दोघांना माझे काही प्रश्न.
१. तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत असलेल्या वयाचा त्रास होतो का?
२.वाढत्या वयाचे काय शाररीक ,मानसिक,आर्थिक परिणाम होत आहेत.? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह.
३. वयाबरोबर सौंदर्य लोप पावत असे म्हणतात ,अदर सेक्सला तुम्ही कमी अपील होत जात आहात का? यावर उपाय काय ?
४.आपल्याला सुयोग्य आहाराने वय लपवता येते,आपण तरुण दिसतो हे कितपत खरे आहे?
५.ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार आहे ते मला समजले नाही,कुणी सोप्या शब्दात सांगितले तर आभारी राहीन.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

14 Dec 2016 - 9:02 pm | सामान्य वाचक

रहने दो, तुमसे ना हो पायेगा

मला माझ्या वाढलेल्या/वाढत्या वयाचा गिल्ट येतो का हे माहित नाही पण आताशा मिपावर येणाचा गिल्ट यायला लागलाय.
अमुक आयडी आता खुडूक झालायं असं काही नोटिफिकेशन देणारं फिचर मिपावर भविष्यात आणता येईल काय ?

कृप्या पर्सनळी घेऊ नये ही विन्ती.

आजचा अभ्यास : खुडूक होणे म्हणजे काय ?

माम्लेदारचा पन्खा's picture

14 Dec 2016 - 9:54 pm | माम्लेदारचा पन्खा

धाग्याची या विदारक परिस्थिती स्वत:अनुभवतो.....

आता आता मेंदू केवळ झटके ते देतो....

टफींचा नवीन धागा बघता मी लगेच गारठतो.....

आता कुठले सखोल धागे पुन्हा ते दिसती ?

आता नाही मिपाची समई...उरली निव्वळ उदबत्ती !

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 9:58 pm | संदीप डांगे

मूळ धागा न वाचता डायरेक्ट प्रतिसाद वाचायला आलो, ह्याचा मला अजिबात गिल्ट येत नाही!
तुम्हाला येतो काय? (प्रश्न वाचकांना आहे हेवेसांनल)

सुज्ञ's picture

14 Dec 2016 - 10:20 pm | सुज्ञ

सर्व गदारोळात आपले धागेच तेव्हडे आमच्यासाठी मनोरंजन हो :)

चित्रगुप्त's picture

14 Dec 2016 - 10:25 pm | चित्रगुप्त

टर्बोपंत, काही म्हणा तुमचे धागे विचार करायला लावणारे असतात. विशेषतः हा धागा प्रत्येकाला आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. यावर प्रांजळ प्रतिसाद येतील, अशी आशा आहे. मी माझे अनुभव लवकरच लिहेन.

एस's picture

14 Dec 2016 - 10:33 pm | एस

क्या से क्या हो गया
बेवफा तेरे प्यार में.

म.

यशोधरा's picture

14 Dec 2016 - 10:36 pm | यशोधरा

मैय्या मोरी, मैं नहीं माखन खायो

रुस्तम's picture

14 Dec 2016 - 11:19 pm | रुस्तम

यम्मा यम्मा यम्मा यम्मा
क्यया खुबसूरत समा

अनन्त अवधुत's picture

15 Dec 2016 - 12:04 am | अनन्त अवधुत

मेरी सुबहो को, तेरी शामों का,
मेरी शामों को, तेरे वादों का,
मेरी रातों को, तेरे ख्वाबो का,
मेरी निंदो को, तेरी बाहों का,

मेरे जज्बों को, तेरी चाहों का,
बहकी बहकी सी कुछ खताओं का,
खूबसूरत से कुछ गुनाहों का
इंतजार.. इंतजार...

अपने बादल का, अपनी बारिश का, अपने सावन का इंतजार,
अपनी धडकन का, अपनी सांसों का, अपने जीने का इंतजार..
तेरे आने का, तुझको पाने का, फिर ना जाने का इंतजार...

रुक जाना नही तू कभी हार के
काटों पे चल कर मिलेंगे साये बहार के

ओ राही, ओ राही
ओ राही, ओ राही

ओ राही, ओ राही
ओ राही, ओ राही

रेवती's picture

15 Dec 2016 - 12:20 am | रेवती

हम दिल दे चुके सनम,
तेरे हो गये हय हम,
तेरी कसम......

म येतय.

नावातकायआहे's picture

15 Dec 2016 - 7:13 am | नावातकायआहे

माँग के साथ तुम्हारा मैंने, मांग लिया संसार
दिल कहे दिलदार मिला, हम कहें हमें प्यार मिला
प्यार मिला हमें यार मिला, एक नया संसार मिला
आस मिली अरमान मिला
जीने का सामान मिला
मिल गया एक सहारा
माँग के साथ तुम्हारा ...

"र" येतोय

रेवती's picture

23 Dec 2016 - 7:17 pm | रेवती

रजनीगंधा जीवनी या
बहरुनी आली
मनमीत आला
तिच्या पाऊली

ल आलय.

काय मग मिपाकर्स, जेवण झाले का..? ;)

आमोद's picture

14 Dec 2016 - 11:17 pm | आमोद

आपले? काय जेवलात आज?

हाफ़ीसात जेवलो, पंजाबी भाज्या.

तुम्ही?

आमोद's picture

14 Dec 2016 - 11:40 pm | आमोद

मासे. सुरमइ आणि बोंबील. छान झालेले

आदूबाळ's picture

14 Dec 2016 - 11:52 pm | आदूबाळ

पोळी, कोशिंबीर आणि खर्डा.

कढीभात. थालिपीठं. बाजरीची भाकरी. पावट्याचा रस्सा. अजून एक भाजी होती. विसरलो.

पोळी, हिरव्या मुगाची उसळ.
पुन्हा भूक लागेलच तेंव्हा मुझे पसंद हय इसलिये गाजर का हलवा.

पिलीयन रायडर's picture

15 Dec 2016 - 12:26 am | पिलीयन रायडर

मी अबीरला पटकन गिळता यावा म्हणुन दलिया केला आहे आज भाज्या घालुन. :)

पण आता कशाला गाजराचा हलवा वगैरे सांगितलंस ग? परत भुक लागली.

तिखटामिठाच्या पुर्‍यांबद्दल बोलायला नको म्हणून गाजर का हलवा म्हणाले, नाहीतर खस्ता कचोर्‍याही पाच सात आहेत. स्वारी बरं का. चल भेंड्या खेळायला.

संदीप डांगे's picture

15 Dec 2016 - 1:32 am | संदीप डांगे

तुमचं पहिलं वाक्य तुफान विनोदी झालंय बरं का पिरातै! :))

पिलीयन रायडर's picture

15 Dec 2016 - 1:38 am | पिलीयन रायडर

=))

ओ तो आजारी आहे हो!!! म्हणुन...

पण माझा स्वयंपाकातला आनंद पहाता दुसर्‍या पद्धतीने घ्यायलाही माझी ना नाही!! मी आपलं पोळी-भाजी ऐवजी दलिया-भाज्या खाउ घालते. हिशोब तोच, फक्त काही जळायची / करपायची / बिघडायची शक्यता जराशी कमी!

संदीप डांगे's picture

23 Dec 2016 - 9:16 pm | संदीप डांगे

पण तुम्ही अबीरला का गिळताय? =))

सौजन्य- कॅप्टन.

सुबोध खरे's picture

15 Dec 2016 - 12:08 am | सुबोध खरे
सुबोध खरे's picture

15 Dec 2016 - 12:09 am | सुबोध खरे
बॅटमॅन's picture

15 Dec 2016 - 1:16 am | बॅटमॅन

ऑ अच्चं जालं तल

हे पोस्ट टाकणाऱ्या माणसाला कदाचित मदतीची गरज आहे.... हि इस फुल्ल टर्बो मोड

Grandma