मदत हवी आहे.

भावना कल्लोळ's picture
भावना कल्लोळ in काथ्याकूट
13 Dec 2016 - 6:03 pm
गाभा: 

गेले काही महिने मिपावर जास्त येणे झाले नाही त्यामुळे खूप काही मिसले आहे वाचायला. आता वाखु नजरेखालुन काढत असताना निनाद यांचा स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन धागा वाचत होते आणि मग अचानक लक्षात आले कि ज्यामुळे मी एवढे दिवस चिंतीत आहे त्यांचे सोलुशन मिपाबंधु नक्की देऊ शकतील आणि आपली एक जाहिरात हि होऊन जाईल. तर मिपाकर हो स्वतःचा काही तरी एक व्यवसाय असावा बस हे एक इवलेसे स्वप्न किती वर्ष झाले स्वस्थ बसु देत नव्हते, करूया करूया याला मुहूर्त येत नव्हता. पण या वर्षीच्या मे महिन्यात खूप उलाढाली करून स्वतःचे एक छोटेखानी चार पायी हातगाडीवर चाइनीसच्या गाडीचा श्री गणेशा माझ्या गिरगावच्या घरच्या गल्लीच्या नाक्यावर सुरु केला आहे. बी एम सी, स्थानिक नगरसेवक यांच्याशी नडुन टिकुन गेले ८ महिने टुकुर टुकुर आमचा खाद्य उद्योग सुरु आहे. माऊथ पब्लिसिटी मुळे कासव गती ने का होईना पण आमचे पाऊल पुढे जात आहे. पण मला सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वीज. माझ्या दुकानावर पुरेशी लाईट उपलब्ध नसल्याने दुकान प्रथमदर्शी दिसून येत नाही. तश्या चार्जिंग वाल्या लाईट आणल्या आहेत पण त्या जास्तीत जास्त अर्धा तासा पेक्षा जास्त जिवंत राहत नाही पूर्ण दिवस चार्जे करून सुद्धा. तर मला असे काही हवे आहे जे माझ्या दुकानाला पुरेसा उजेड आणि थोडीसी सजावट जसे लाईटीची माळ वैगेरे जेणेकरून दुरूनही लोकांना अंदाज येईल. तर स्वस्त आणि टिकाऊ असा काही तोडगा असेल तर मिपाबंधु आणि भगिनींनी द्यावा ... त्यांना इ मिसळचा नैवद्य देईन. तसेच अजून एक व्यवसाय कल्पना डोक्यात पिंगा घालत आहे पण त्या साठी भांडवल अपेक्षित आहे, सरकारच्या लोन मुद्रा या योजने बद्दल काही ठाऊक असल्यास मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

अरे वा! स्वतंत्र व्यवसायासाठी अभिनंदन! काही माहिती नाही, तरी काही समजल्यास कळवतो.

भावना, मनापासून अभिनंदन! खूप छान बातमी!
मलाही काही माहिती नाही, काही समजल्यास नक्की कळवीन.

रेवती's picture

13 Dec 2016 - 6:37 pm | रेवती

अभिनंदन भावना!
तुझ्या दुकानात वीज आहे ना? मग सध्यापुरते असे वाटतेय की रंगीत दिव्यांच्या माळा आणल्यास निदान लक्ष तरी वेधले जाईल का? किंवा रंगीत नको पण नुसत्या पिवळ्या दिव्यांच्या माळा आणल्यास डेकोरेशन व उजेड पडणे असे काही?

माझ्या दुकानावर पुरेशी लाईट उपलब्ध नसल्याने दुकान प्रथमदर्शी दिसून येत नाही. तश्या चार्जिंग वाल्या लाईट आणल्या आहेत पण त्या जास्तीत जास्त अर्धा तासा पेक्षा जास्त जिवंत राहत नाही पूर्ण दिवस चार्जे करून सुद्धा. तर मला असे काही हवे आहे जे माझ्या दुकानाला पुरेसा उजेड

छोटे सोलार पॅनेल वगैरे बसवता येईल का? गाडीच्या टपावर?

अमर विश्वास's picture

13 Dec 2016 - 6:54 pm | अमर विश्वास

स्वतंत्र व्यवसाय सुरु केल्याबद्दल अभिनंदन ...

विजेसाठी आम्ही एक उपाय केला होता..

गाडीच्या मागे असलेल्या एका छोट्या जनरल स्टोर्स मधुन वीज घ्यायचो व त्याला वीजबिलाचे पैसे द्यायचो.

मालक खरंच चांगला होता. त्याने सहकार्य केले .

बिल किती द्यायचे ते ठरवण्यासाठी दोन पद्धतींचा आधार घेतला होता :
१. टोटल किती वॅटचे दिवे लावणार (चांगल्या अर्थाने :) )आणि किती काळासाठी ... आम्ही इंजिनीरिंगचे विद्यार्थी होतो. ..

२. दुसरा म्हणजे दुकानांचे आधीचे व नंतरचे वीजबिल यातला फरक.

किमान वर्षभर तरी ही योजना उत्तम चालली.

कारची बॅटरी वापरणे हा पण एक पर्याय आहे. पण पहिला पर्याय जास्त सुटसुटीत आहे ..

व्यवसायासाठी शुभेच्छा

अमर विश्वास's picture

13 Dec 2016 - 6:59 pm | अमर विश्वास

कारच्या बॅटरी ऐवजी इन्व्हर्टर ला वापरतात त्या बॅटरी पण वापरता येतील. अजून डिटेल्स हवे असल्यास सांगावे.

भावना कल्लोळ's picture

13 Dec 2016 - 7:15 pm | भावना कल्लोळ

माझी गाडी जिथे लागते तिथे जवळपास दुकान नाही आहे, एक पाणी प्याऊ आहे त्याला या बाबत विचारणा केली होती पण त्याने नकार दिला, रस्त्याच्या पलीकडे असलेल्या दुकानातुन वीज घेता येईल पण त्यासाठी भन्नाट डोक्याचा वायरमन हवा, तुम्ही सुचवलेल्या इन्व्हर्टर बॅटरी बद्दल अजून जाणून घ्यायला आवडेल. @ रेवक्का आणि यशो .. अग भाजीवाले वापरतात तशी रेकडी आहे माझी त्यावर कसलेही छत नाही आहे त्यामुळे सोलर पॅनल नाही लागू शकत. अशी हि माझी गाडीची वेळ संध्याकाळी ७ ते ११. ३० आहे.

संदीप डांगे's picture

13 Dec 2016 - 7:52 pm | संदीप डांगे

गेल्या उन्हाळ्यात मी आइस्क्रीमची ढकलगाडी घेतली होती चालवायला, अर्थात माणूस ठेवला होता. त्यावेळी हाच प्रश्न उपस्थित झाला होता. माझ्या ओळखीच्या इलेक्ट्रिशियनकडे चौकशी केली तेव्हा त्याने बॅटरीचाच पर्याय दिला होता. किमान चार तास चालेल अशी उत्तम दर्जाची ब्रॅण्डेड बॅटरी व एलएडी दिव्यांची माळ असा सर्व जामानिमा करायचा खर्च सुमारे २ हजारपर्यंत गेला. बॅटरी चांगली घ्यावी, टिकते खूपवेळ. तुमच्या ओळखीच्या इलेक्ट्रीशियनला विचारुन बघा, तो सिस्टीम तयार करुन देईल.

पिलीयन रायडर's picture

13 Dec 2016 - 8:47 pm | पिलीयन रायडर

बॅटरी तर चांगला पर्याय आहेच. पण एलीडीच्या माळा लावशील त्या जरा डॉक्यालिटी करुन लाव. म्हणजे गाडीला छप्पर नाही ना तुझ्या? मग उलट चांगलय. छप्पराच्या जागी ह्या माळा लाव. किंवा लोक बसतात तिथे असा मांडव कर माळांचा डोक्यावर. अशाने मस्त फील येतो. किंवा माळा एखाद्या आकारात लाव, जसे की बाण किंवा एखादे अक्षर किंवा एकच सलग माळ फिरवुन काही तरी एक शब्द (खालच्या चित्रात आहे तसा)

LED

माळा लावणारच आहेस तर त्याचा उपयोग लक्ष वेधायला कर. पण त्या नुसत्या सरळसोट लावुन नाही, तर उलट तुझ्या गाडीची खुण म्हणुन.

मिचकणार्‍या माळा घेऊन बाण वगैरे लावता येईल. त्याने ही मस्त वाटेल, पण सतत पहाणार्‍याला जरा इरिटेटींग होऊ शकतं.

आनंदी गोपाळ's picture

13 Dec 2016 - 9:11 pm | आनंदी गोपाळ

कार बॅटरी हा पर्याय डोक्यात येतो आहे. अनेक गाडीवाल्यांकडे पाहिली आहे.

व्यवसायासाठी उत्तमोत्तम शुभेच्छा. डांगे साहेबांनी दिलेला उपाय सर्वोत्तम आहे.

साहना's picture

14 Dec 2016 - 3:37 am | साहना

मी माझ्या गच्चीवर night-club सारखी सजावट केली होती विना वीज. त्यातून मला थोडी माहिती आहे. सजावटीचा मूळ उद्देश पत्ते खेळण्यासाठी आणि अन्न ग्रहण करण्यासाठी सुमारे ३-४ तास उजेड असावा अशी होती. तुम्ही काही फोटो टाकले तर मी तुम्हाला जास्त चांगला सल्ला देऊ शकेन.

ह्यासाठी लागणारे साहित्य :

१. जमिनीच्या कडेला concealed पद्धतीने ५०५० LED स्ट्रिप्स टोटल २० फूट. ह्यातून उजेड जास्त पडत नसला तरी रोषणाई आकर्षक वाटते आणि लक्षवेधक ठरते. ह्याला रिमोट असतो आणि रंग वगैरे बदलले जाऊ शकतात. हि स्ट्रीप वॉटर प्रूफ सुद्धा असतेल किंमत साधारण १००० रूपात प्रति दहा फूट. कुणी विदेशांतून येत असेल तर अगदी स्वस्तांत मिळेल. हि स्ट्रीप तुम्ही तुमच्या हातगाडीच्या छप्पराला आंत लावू शकता आणि पाहिजे असेल तर रिमोट वापरून ऍनिमेट सुद्दा करू शकता. म्हणजे जास्त लोक आकर्षित होतील.
http://bit.ly/2gIB3IY

२. तुम्हाला जर फार प्रकाश हवा असेल तर केरोसीन वाला पेट्रोलमास दिवा तुमच्यासाठी चांगला ठरून शकेल. आम्ही हा कॅम्पिंग साठी वापरतो (आम्ही प्रोपेन वापरतो). भारतांत हे दिवे त्यामानाने खूप लोकप्रिय आहेत. ह्या उजेडाला इतर कीटक आकर्षित होऊ शकतात हि एक वाईट बाजू आहे पण उजेडाच्या बाबतीत जबर आहे. भारतांत किती किंमत आहे ठाऊक नाही. ह्याची वात सतत खराब होत असते असे म्हणतात.

३. विजेचे दिवे पाहिजे असतील तर फक्त LED वापरावे. कमी वीज लागते, उजेड जास्त चांगला असतो आणि कीटक आकर्षित होत नाही (रंग योग्य असेल तर).
हा दिवा मी वापरला आहे. ६ तास सहज चांगला उजेड देऊ शकतो. ह्याला ६ AA बॅटरी लागतात. recharge होणाऱ्या बॅटरी घेतल्या तर खर्च विशेष येणार नाही.
http://amzn.to/2hqkxhX

४. जेवणाच्या धंद्यांत टी लॅम्प फार आकर्षक आहेत असा माझा अनुभव आहे. हे स्वस्त आणि मस्त असतात. छोट्या घड्याळाच्या बेटरी वर कितीतरी तास चालू शकतात. उजेड कमी. तुमच्या गाडीच्या बाजूला तुम्ही छोटी टेबल वगैरे ठेवली असेल तर तिथे चांगली वाटतील.
http://bit.ly/2gy09qx

५. closet लॅम्प
विना २२०v फक्त बॅटरीवर चालणारे हे एक प्रकारचे दिवे आहेत. ५ aa बॅटरीवर १० तास चालू शकतात. किंमत ~ ८०० रूपये. तुम्ही तुमच्या गाड्याच्या छपराला आतून लावू शकता.

पावर सोर्स:
- माझ्या मते आकर्षणासाठीच्या रोषणाई साठी साधारणतः AAA रिचार्जेबल बेटरी चालतील. खर्च सुमारे २ हजार रुपये प्रति वर्ष.
- पेट्रोल मास हा भरपूर उजेडासाठी चांगला पर्याय वाटतो. खर्च अंदाजे २००० ते ३००० एक वेळी आणि सुमारे १ लिटर केरोसीन प्रति दिवस.
- कीटकाना मारण्यासाठी वेगळा दिवा घ्या.

भावना कल्लोळ's picture

14 Dec 2016 - 2:33 pm | भावना कल्लोळ

साहना तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

धाडसाचे ,मिपावर लिहिण्याचे कौतुक आहे.
चाइनिज गाडी चालवता तर या चाइनिज दिव्याला नाही म्हणणार नाही याची खात्री आहे.

असले हेडलँप दोनशेला मिळतात. चार घ्या. लख्ख पांढरा उजेड सहा तास पडेल. दीड तासात चार्ज होतो. कसेही टांगता येतील,परतताना काढून आणता येतील.

भावना कल्लोळ's picture

14 Dec 2016 - 2:30 pm | भावना कल्लोळ

हे असे लॅम्प कुठे मिळतील ?

लोहार चाळ मध्ये सहज मिळतील. फक्त फोटो तेवढे घेऊन जा..

कंजूस's picture

14 Dec 2016 - 6:57 pm | कंजूस

रस्त्यावर मोबाइल कवर ,हेडफोन्स,बॅटय्रा,घड्याळे विकणाय्रांच्या लाइनितच असतात हे विकणारे.ठाण्यात घंटाळी कॅार्नरजवळ ग्रेट आउटडॅार्सचे दुकान आहे त्यांचेकडे ट्रेकर लोकांचे दिवे आहुत (७००-८००रु)

भाते's picture

14 Dec 2016 - 3:39 pm | भाते

तसे बाकीच्यांनी सल्ले दिले आहेतच पण या क्षेत्रातले विलासराव आणि पेठकर काका यावर जास्त प्रकाश टाकु शकतील.

मिपाकरांसाठी एक कल्पना - एखाद्या विकांताला संध्याकाळी आपण इथे एक खादाडी कट्टा केला तर! प्रत्यक्ष जागा आणि आजुबाजुचा परिसर पाहुन आपल्याला नक्की सुचना / सल्ले देणे सोपे जाईल. ज्या मिपाकरांना कट्टयाला यायला जमणार नाही त्यांच्यासाठी कट्टा वृत्तांतामध्ये व्यवस्थित फोटो टाकले तर तेसुध्दा मदत करू शकतील.

अजया's picture

14 Dec 2016 - 4:04 pm | अजया

भावनासाठी कायपण!

भावना कल्लोळ's picture

14 Dec 2016 - 4:41 pm | भावना कल्लोळ

सहर्ष स्वागत ... पण नॉनव्हेज खाणाऱ्यांची पंचायत होईल, शुद्ध शाकाहारी आहे ना .. थँक्स अंजु ताई.

अजया's picture

14 Dec 2016 - 4:04 pm | अजया

भावनासाठी कायपण!

भावना कल्लोळ's picture

14 Dec 2016 - 4:43 pm | भावना कल्लोळ

सर्वं मिपाकरांचे आभार ..

स्नेह_म's picture

14 Dec 2016 - 5:11 pm | स्नेह_म

गाडी कुठे लावता, पत्ता कळेल का ? एकदा जरुरू भेट देऊ

भावना कल्लोळ's picture

14 Dec 2016 - 5:22 pm | भावना कल्लोळ

हेरंब चाइनीस कॉर्नर
८ वि खेतवाडी, मेन रोड,
पितळे मंदिरा समोर, गिरगाव, मुंबई -४.
वेळ - ७.३० ते ११. ३०
मी तिथे १० पर्यंत असते मग दीर आणि सासरे असतात.

कधी आलो मुंबईला तर नक्कीच भेट देईन.

मनिमौ's picture

14 Dec 2016 - 7:12 pm | मनिमौ

अभिनंदन . सोलर कंदील चा एक पर्याय तु पाहु शकते