नौपाडा पोलीस स्टेशन कडून हरिनिवास सर्कल कडे येतांना डावीकडे मुघल्स म्हणून नवीन रेस्त्र्रोन निघालाय ...मागच्या भोजनालयाचा अनुभव बर्यापैकी ताजा असतांना नवीन काही ट्राय करण्याचा उत्साह उणावलेला ...पण तरीहि गेलो ...
अजून सगळे नीट स्थिर स्थावर होतंय तिथे ...नवीन संसार मांडलेला कळतोय आणि बऱ्याच बाबी खटकायला सुरुवात होते न होते तोच मेनू कार्ड समोर आले ... एरवी पेक्षा किंचित महाग डिशेश वाटल्या पण भुके पोटी इतरत्र जायचे त्राण नव्हते तेव्हा .. १ चिकन राजस्थानी, एक पनीर अद्र्की धनिया, रोटी, जीरा रैस आणि दही इतके मागवले (तिघांसाठी)
आणि वाहवा ....
पुलंनी म्हटल्या प्रमाणे मुर्गी घासाघासाला दाद घेत गेली ...पनीर अप्रतिम ...आणि जीरा राईस सारखा यक्ष्ट्रा पण भाव खाऊन गेला ...
बिल ९७० अंमळ जास्त वाटले पण तरीही बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवीन चाखले आणि ते इतके उत्तम निघाले ....त्यांची पुण्यात शाखा आहे म्हणे क्याम्पात ...कोणतेही पंजाबी चवीचे पदार्थ इथे दिले जाणार नाहीत असे चालक ठासून सांगत होते ...
आहे तसे नीट राखले आणि शोर्ट कट्स मारले नाहीत तर भविष्यात खवैय्याना एक उत्तम पर्याय मिळेल ...
तस्मात पुढील कट्टा तिथे व्हावयास हरकत नाही ....
प्रतिक्रिया
12 Dec 2016 - 12:22 am | लालगरूड
पत्ता द्या
12 Dec 2016 - 7:48 am | अत्रन्गि पाउस
हॉटेल मुघल्स एम जी रोड नौपाडा पोलीस स्टेशन च्या बाजूला ठाणे ४००६०२
12 Dec 2016 - 1:07 am | टवाळ कार्टा
आमेन
12 Dec 2016 - 5:19 am | खटपट्या
काही फोटो टाकले असते तरी चालले असते...
12 Dec 2016 - 7:50 am | अत्रन्गि पाउस
अवस्थेत सुचले नाही...
पण कट्टा करू तेव्हा हि कसर भरून काढू ...
12 Dec 2016 - 5:52 am | कंजूस
//...कोणतेही पंजाबी चवीचे पदार्थ इथे दिले जाणार नाहीत असे चालक ठासून सांगत होते ...//
- अस्से आग्रही हवेत खानावळ मालक.
12 Dec 2016 - 11:02 am | बोका-ए-आझम
चांगलं आहे! असंच होत राहिलं तर २१ व्या शतकाच्या शेवटी ठाणे शहर बनेल नक्कीच!;)
12 Dec 2016 - 12:03 pm | अत्रन्गि पाउस
मामलेदार ची एक शाखा (काही महिन्यांपासून नवीन उघडलेली ) ह्या मुघल पासून हाकेच्या अंतरावर आहे
9 Jan 2017 - 9:23 am | औरंगजेब
ती मामलेदारची शाखा नाही. दुसरच कोणीतरी मामलेदार नावाने उघडल आहे.
12 Dec 2016 - 3:05 pm | वरुण मोहिते
टेस्ट चांगली आहे.. बाजूची माम्लेदारची शाखा इतकी काही खास नाही
अवांतर - मुलुंडला पण एक हॉटेल झालंय ग्रास अँड गॉसिप नावाचं . मामलेदार मिसळ , खोपोली वडापाव , गुरुकृपा सामोसा , आणि चौपाटी कुल्फी हि त्यांची स्पेशालिटी आहे . बाकी सॅन्डविच पिझ्झा मिल्कशेक पासून सगळंच मिळत . चांगला आहे ठिकाण .
12 Dec 2016 - 3:22 pm | मराठी_माणूस
मुलुंडला कुठे ?
8 Jan 2017 - 10:52 am | नमकिन
मुघलांचा पाहुणचार तलवारीनेच!
शिवशाहीत!
एक मराठा, लाख मराठा!