मागच्या गणेश चतुर्थीस मराठी ऑनलाईन होण्यास २० वर्षे होत आहेत, या निमीत्ताने मराठी माणसांचा ऑनलाईन मराठी सहभाग वाढावा या उद्देशाने कार्यशाळा घेऊन १ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७ मराठी पंधरवडा म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव मराठी विषयक एका मान्यवर संस्थेकडून आला आहे त्यास विकिमिडीया फाउंडेशनचे सि आय एस ए २ के कडून सहकार्य लाभण्याची शक्यता आहे. प्रस्तावांना अधिकृत मान्यता मिळताच संबंधीत संस्थेचे नाव येथे लगेच जाहीर करेन.
कार्यशाळा प्रस्ताव सर्वसाधारण पणे 'एडीट मराठी विकिपीडीया विथ एक्सपर्ट ऑर सेलीब्रिटी' अशा स्वरूपाचा असेल. 'एडीट मराठी विकिपीडीया विथ एक्सपर्ट ऑर सेलीब्रिटी' (याचा मराठी अनुवाद सुचवा)
खालील प्रकारचे प्रस्ताव हवेत
१) कार्यशाळा आयोजीत करवून घेण्यासाठी इंटरनेट आणि युनिकोड मराठी टायपींग करण्याजोग्या संगणकांनी/लॅपटॉप युक्त कॉम्प्युटर लॅब असावी/असेल.
२) आपण अथवा आपल्या परिचयात विषयतज्ञ किंवा कुणि सेलिब्रिटी ज्यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन ऑनलाईन लेखन सहभागींकडून करून घेण्यासाठी खासकरुन मराठी भाषेतील ऑनलाईन ज्ञानात/माहितीत फुल न फुलाची पाकळी भर पडावी हा उद्देश साध्य करून घेण्यास उत्सुक असाल तर विषयतज्ञ किंवा सेलिब्रिटी प्रस्ताव हवेत
३) आपल्याला ऑनलाईन मराठी समृद्ध करण्यात रस असेल तर महाराष्ट्रात विवीध ठिकाणी होणार्या कार्यशाळेत सहभाग घेता येईल.
(सहभागासाठी युनिकोडात मराठी टंकन येत असेल अथवा कार्यशाळेच्या तारखेच्या आधीच इंटरनेटवर युनिकोडात मराठी टायपिंग कसे करावे हे आपण अवगत करून घ्यावे असे अभिप्रेत आहे)
४) आपल्याला विकिपीडिया संपादनाचा अथवा ज्ञानकोशीय लेखनाचा अनुभव असेल तर अधिकाधिक कार्यशाळा घेता याव्यात म्हणून कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.
तज्ञ सेलिब्रिटी आणि विकिकार्यकर्ते यांच्या प्रवास आणि मानधनाची तजवीज करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे कार्यशाळेस शुल्क असू शकेल पण या बाबी अद्याप निश्चित व्हावयाच्या आहेत.
उपरोक्त पैकी कोणत्याही रोल मध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांनी आपापले नाव व मोबाईल नंबर / आणि अथवा प्रस्ताव व्यनि ने कळवावेत.
विवीध कार्यशाळा प्रस्ताव निश्चिती नंतर संपर्क क्रमांक पत्ते इत्यादीसहीत हा धागा लेख अद्ययावत करेनच.
"चलातर मराठी ऑनलाईन करूया"
सहभागासाठी आपणासर्वांचे आभार
प्रतिक्रिया
6 Dec 2016 - 9:44 pm | आदूबाळ
फक्त चार शब्दांचं शीर्षक?? कीप इट अप!
तुम्ही मिपावर काढलेल्या २७३ धाग्यांमध्ये शीर्षकांची सरासरी लांबी ७.४३ शब्द आहे. (कमाल लांबी २५ शब्द आणि किमान १ शब्द.)
(ट्रायल व्हर्जनमध्ये एवढंच मिळतं. हिस्टोग्रॅमसाठी निराळे पैसे पडतील.)
- आदू डेटावाला
7 Dec 2016 - 11:01 am | माहितगार
धागा विषयास अनुषंगाने अद्याप प्रतिसाद आलेले नसल्यामुळे शीर्षक अथवा धागा लेखात कै तर कमी जास्त आहे असे वाटत होतेच आणि समय सुचकतेने आपण डेटा दिलात या बद्दल धन्यवाद :) आत्तातरी ह्या मराठी लष्कराच्या भाकरी आहेत, म्हणून व्यक्तिशः ट्रायल व्हर्शन पुरे आहे. जास्त प्रतिसाद मिळण्यासाठी हिस्टोग्रॅम मागवायचा का ते त्या त्या संस्था ठरवतील.
7 Dec 2016 - 11:10 am | सस्नेह
=)))
खरंच माहितगार यांनी २७३ धागे काढलेत ?
कॉम्प्लिमेंटस !
6 Dec 2016 - 10:22 pm | कंजूस
-273 deg centigrade किमान तापमान असतं कोणत्याही वायुचं
7 Dec 2016 - 11:03 am | माहितगार
पण शीर्षक मायनस साईज मध्ये कसे द्यायचे ?