इंदोर भोपाळ परिसरात आय.टी क्षेत्रातील संधी बाबत माहीती/मदत हवी आहे.

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
2 Dec 2016 - 1:20 pm
गाभा: 

इंदोर भोपाळ परिसरात आय.टी क्षेत्रात काही संधी उपलब्ध आहेत का?
मध्यंतरी विप्रो/इन्फोसिस/टी.सी.एस वगैरेसारख्या मुख्य भारतीय कंपन्यांनी त्यांच्या आय.टी पार्क साठी जागा खरेदी केल्याबाबतची बातमी वाचण्यात आली होती.(साधारण दोन तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.). सध्या ह्याबाबतची एकुण परिस्थिती काय आहे ह्याबाबत कोणी काही सांगु शकेल काय?
मी सध्या बेंगलोरमध्ये राहतोय.
पत्नीसाठी मध्यप्रदेश स्टेट लेवल मधली एक चांगली जॉबऑफर आली आहे.
जर मध्यप्रदेशातच आय.टी साठी एखादी चांगली/बरी संधी माझ्यासाठीही उपलब्ध असेल तर तिकडेच स्थायिक (मायग्रेट :) ) होण्याचा विचार आहे.
कुणी मिपाकर ह्याबाबतीत काही मार्गदर्शन करु शकतील काय?

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

2 Dec 2016 - 3:48 pm | अमर विश्वास

Infy आणि TCS ने इंदूर ला मोठी जागा घेतली आहे व सध्या बांधकाम चालू आहे
माझ्या माहिती प्रमाणे प्रत्यक्ष काम (Operations) अजुन किमान १ वर्ष तरी सुरु होणार नाही

TCS ने recruitment process सुरु केली असे ऐकले . पण सिलेक्शन / जॉइनिंग / ट्रैनिंग होस्तवर १ वर्ष नक्की जाणार ...

तसेच भोपाळ ला कुठल्याही मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचे ऑफिस नाही .. त्यामुळे इथे शिफ्ट होणे अवघड दिसते