चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले

विदुषक's picture
विदुषक in काथ्याकूट
30 Sep 2008 - 12:04 pm
गाभा: 

आज सकाळी राजस्थान मधील मेहरागड च्या चमुन्डा मन्दीरात गर्दिच्या वेळी चेंगराचेंगरी होउन किमान ४० लोक मेले
काय चालले आहे हे ?
http://www.bbc.co.uk/hindi/regionalnews/story/2008/09/080930_stampede_ra...
मांढरदेवी , हिमाचल (ठिकाणाचे नाव विसरलो आता ) आणी आता हे नविन

१. लोक एखाद्या विशिष्ट दिवशिच अशी वेड्यासारखी गर्दी का करतात ?
२. देव असेलच तर सगली कडे प्रत्येक दिवशी असायला पाहीजे
३. ह्या चेंगराचेंगरी मागे काही घात्पात असु शकतो का ?
बॉम्ब फोडण्यापेक्शा हे खुपच सहजतेने जमु शकते

मित्रांनो तुमचे मत काय आहे ?

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

30 Sep 2008 - 12:06 pm | जैनाचं कार्ट (not verified)

भाऊ १०० च्या वर मेले !

अत्यंत वाईट बातमी !

देवा त्यांच्या आत्म्यास शांती देवो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

केवळ_विशेष's picture

30 Sep 2008 - 12:18 pm | केवळ_विशेष

१०३...सौ. रिडिफ वेबसाईट्...दु:खद घटना...

जैनाचं कार्ट's picture

30 Sep 2008 - 12:19 pm | जैनाचं कार्ट (not verified)

http://www.bbc.co.uk/hindi/regionalnews/story/2008/08/080803_naina_devi....

१४५ :(

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

विदुषक's picture

30 Sep 2008 - 12:32 pm | विदुषक

हे राम
क्रिकेट चा स्कोअर वाटू लगला आहे :(
मजेदार विदुषक

मिसंदीप's picture

30 Sep 2008 - 3:58 pm | मिसंदीप

आता तर आकडा १८० वर गेला आहे .. ईश्वर सर्व मृतात्म्यांना सद्गती देवो.

संदीप

विदुषक's picture

30 Sep 2008 - 5:34 pm | विदुषक

हे टळ्न्यासाठी काय करयला पहिजे ?
सगळी जबाबदारी माय्बाप सरकार वर टाकणे चुकिचे आहे ...

मजेदार विदुषक

प्रभाकर पेठकर's picture

30 Sep 2008 - 7:38 pm | प्रभाकर पेठकर

श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात फरक कसा आणि का करावा ह्या बद्दल अज्ञान.
'ईश्वर पुजा' म्हणजे मुर्ती पुजा नाही.
देव चराचरात वसलेला आहे. ही शिकवण आचार विचारात अंगीकारता आली पाहिजे. समाज प्रबोधन व्हावे.
एखाद्या विविक्षित दिवशी जमणार्‍या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सक्षम प्रशासनाने घेऊन अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना केल्या पाहिजेत.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसर्‍यांच्या अनुभवातून मागचा शहाणा झाला पाहिजे.

भास्कर केन्डे's picture

30 Sep 2008 - 11:17 pm | भास्कर केन्डे

आदरणीय श्री. प्रभाकर पंत,

'ईश्वर पुजा' म्हणजे मुर्ती पुजा नाही.
-- जे आपणास पटते तेच सर्वांनी करावे असे आपण लोकशाहीत म्हणू शकत नाही. तुम्हा आम्हाला मुर्तीपुजा पटत नसली तरी करोडो भारतीयांचा त्यावर विश्वास आहे. त्यामुळे मुर्तीपुजेला विरोध हा या प्रश्नावर तोडगा होऊ शकत नाही.

देव चराचरात वसलेला आहे. ही शिकवण आचार विचारात अंगीकारता आली पाहिजे. समाज प्रबोधन व्हावे.
--होय, परंतू यासाठी जो काळ जाईल त्यात अशा घटना घडतच जातील. त्यामुळे एखादा तात्काळ उपाय हवाच.

एखाद्या विविक्षित दिवशी जमणार्‍या भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सक्षम प्रशासनाने घेऊन अपघात टाळण्यासाठी प्रभावी उपाय योजना केल्या पाहिजेत.
--अगदी हेच ते उत्तर. पण कसे?
केंद्र व राज्य सरकारे मंदिरांचे करोडो रुपये दर वर्षी हडप्प करतात. कागदावर ते पैसे पुन्हा धर्माच्या (रिलिजिअस) कामांसाठी वापरले असे दाखवले गेले तरी ते मुख्यतः हज सबसिडी, मदरशांची परिस्थिती सुधारणे, अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांना मदत असे उधळले जातात. विषेशतः केरळ, आंध्र,प. बंगाल, महाराष्ट्र या लुटीत अघाडीवर आहेत. राजस्थानचे आकडे माझ्याकडे नाहीत.
ज्या मंदिरांमधून करोडो रुपयांची लूट सरकारे करतात तेथल्या मुलभूत सुविधांकडे मात्र पूर्ण डोळेझाक केली जाते. मंदिरांच्या जमिनी विकून मिळालेले पैसे तसेच रोकड मिळकत ही जर अशा धोकादायक पुरातन मंदिरांच्या जिर्णोद्धारात केली तर चेंगराचेंगरीने किड्यामुंग्या प्रमाणे मरणारे हिंदू भावीक मरणार नाहीत.

आपला,
(दु:खी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2008 - 10:51 am | विसोबा खेचर

चालायचंच! अश्या घटना भारतात नव्या नाहीत...

तात्या.