गुप्तधनाचे रहस्य

jp_pankaj's picture
jp_pankaj in जनातलं, मनातलं
26 Nov 2016 - 2:37 pm

"आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ...हॅ हॅ हॅ..आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ हॅ.हॅ..हॅ.. "
"गपये.."
"आंऊऊऊऊऊऊऊऊ...हँ..हँ..हँ...
" आत गप्तो का ?. उगाच ओरडायला जनावरासारखा." पल्लवीने समोरील पटावरील एक प्याद उचलुन हातात पकडल्,पुढली चाल करायच्या आधी पार्थ कडे एक नजर टाकली.
"ताई ते तर आहेच जनावर्, डुकरासारखा लोळतय मगापासुन आणी आंऊऊऊऊऊऊऊऊऊऊ..... करतय." साक्षीने दोन्ही बाजुला लोंबणार्‍या वेण्याची टोक टाळ वाजवल्यासारख्या एकमेकावर आपटल्या.
" बहनजी हम आप की बडी इज्जत करते हे,लेकीन हमे डुक्कर मत कहो, भले गधा बोलो." पार्थ ने दोन्ही हाताची दुर्बीण करुन वरच्या छतावर रोखली.
" पार्ट्या, इथे मुलीत बसण्यापेक्षा बाहेर खेळायला का जात नाहीस ?"गोरीने एक प्याद उचलुन पुढे सरकावल

" इथ मुल आहेत कुठ खेळायला,आं...ऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ... सगळ्या भवान्याच ." पार्थ..

" आता थोबाडीत खाशील.."
"थोबाडीत खाणे से डर नही लगता तै..पर बोर होने से लगता है." पार्थ ने अजुन एक डायलॉग मारला.

"जा तात्या कडे जाऊन बस..गोष्ट सांगेल तुला."

"जाता हुं , पर माना मेंने जो तेरा क्यहना लेकीन तात्या की गोष्ट को सिरीयसली मत लेना."
*********
तासभर बुद्धिबळ खेळल्यावर, पोरींना पण बोर झाल.अश्या वेळेस पार्थ सारखा विनोदवीर आजुबाजुला नसल्या मुळे सगळेच अस्वस्थ झाले.
"ताई...ताई..." दोन्ही हाताने दोरीच्या उड्या मारल्या सारखे हावभाव करत पार्थ पळत आला.
" ताई..ताई.. तात्या.. तात्या.."
"काय झाल तात्याला.."
"तात्याला काही झाल नाही, पण गुप्तधन..गुप्तधन."
"काय बडबडतोयस..कसल गुप्तधन ?".
"गुप्तधन..गुप्तधन पाटलाचा पडक्या वाड्यात.!!"

(क्रमश.)

ज्योतिषविरंगुळा

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

26 Nov 2016 - 2:49 pm | संजय पाटिल

वाचतोय..
जरा मोठ्ठे भाग येउदेत..

सिरुसेरि's picture

26 Nov 2016 - 3:08 pm | सिरुसेरि

छान लिहिलय . पुभाप्र . "गुप्तधनाच्या शोधात तात्या आणी प्रिन्सदादा " हे शीर्षक सुचलं .
एक शंका - बुद्धीबळ एकूण कितीजण खेळत होते ? डबल्स मध्ये खेळत होते का ?

jp_pankaj's picture

26 Nov 2016 - 10:13 pm | jp_pankaj

बुद्धिबळ दोनच जण खेळत होते. पल्लवी आणी गौरी.
पार्थ-साक्षी दर्शक होते.
शिर्षक `'गुप्तधनाचे रहस्य' असे ठरवले आहे.

Rahul D's picture

26 Nov 2016 - 9:34 pm | Rahul D

छोटे जासूस

ज्योति अळवणी's picture

26 Nov 2016 - 11:48 pm | ज्योति अळवणी

मस्त... पुढचा भाग लवकर टाका

समीर वैद्य's picture

27 Nov 2016 - 3:08 am | समीर वैद्य

थोडे मोठे भाग आले तर अजून मजा येईल

पैसा's picture

27 Nov 2016 - 11:00 pm | पैसा

जरा मोठे भाग लिही जेप्या, नाहीतर तुझा सत्कार कसा करणार आम्ही?

टवाळ कार्टा's picture

28 Nov 2016 - 9:57 am | टवाळ कार्टा

जेप्याच्या आधीच्या आयडीचे काय झाले?

हा प्रश्न " मारुती कांबळे च काय झाल ?" याच्या इतकाच गहन आहे.;)

नाखु's picture

28 Nov 2016 - 11:25 am | नाखु

आपण फक्त "सामना" बघावा (राऊतांचा नाही).

वेचक वाचक ते वचक वाचक एक वैचारीक चळवळ

सस्नेह's picture

28 Nov 2016 - 12:22 pm | सस्नेह

छान छान कथा. पुभाप्र.