शंकर अभ्यंकर यांचे संत विद्यापीठ

अभिजित - १'s picture
अभिजित - १ in काथ्याकूट
24 Nov 2016 - 1:51 pm
गाभा: 

साधारण जुलै ऑगस्ट २०१२ मध्ये दादर येथे शंकर अभ्यंकर यांचे व्याख्यान होते. मी गेलो होतो. अतिशय सुंदर झाले. विवेकांनद वर होतं. तिथे त्यांनी सांगितले. ते संत विद्यापीठ स्थापन करत आहेत. जिथे संत साहित्याचा अभ्यास होईल. आणि बारावी नंतर BA , बी . कॉम सारखेच संत साहित्य वर पण मुले शिकतील . आणि हे शिकून नोकऱ्या पण त्यांना मिळतीलच असा विश्वास त्यांनी दाखवला.
याच्या बांधणी करता त्यांना लोकांकडून मोठ्या प्रमाणात मदत अपेक्षित होती. आणि काही लोकांनी दिलीही. एका जोडप्याने एक लाख रु दिले. छोट्या मोठ्या रकमा तर बऱ्याच लोकांनी दिल्या. मी पण यथाशक्ती मदत दिलीच. काही पुस्तके आणि CD विकत पण घेतले.
पण आज ४ वर्ष उलटली तरी याचे पुढे काय झाले ते नक्की कळत नाही. हे लोणावळा जवळ होणार होते / आहे. पण आत्ता हे काम कुठं पर्यंत पोचले आहे ?
कारण हे खूप चांगले काम असून याची प्रसिद्धी व्हावी आणि मोठ्या प्रमाणात मदत मिळून हे काम लवकर पूर्ण व्हावे. हीच इच्छा.

http://www.loksatta.com/pune-news/first-saint-university-will-take-shape...
अभ्यंकर म्हणाले, ‘‘लोणावळ्याजवळील तेहतीस एकर जागेत या विद्यापीठाचे बांधकाम करण्याचा प्रतिष्ठानचा मनोदय असून त्यासाठीची मान्यता संस्थेला नुकतीच मिळाली आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.’’

प्रतिक्रिया

सखी-माऊली's picture

24 Nov 2016 - 2:26 pm | सखी-माऊली

आदित्य प्रतिष्ठान च्या वेबसाईट्वर आपणास अधिक माहिती मिळू शकेल

अभिजित - १'s picture

25 Nov 2016 - 8:10 pm | अभिजित - १

तिथे काहीच माहिती नाही. म्हणजे uodates नाहीत. काही जुने फोटो आहेत. पण इतक्या लोकांनी पैसे दिले, गेल्या ४ वर्षात काम कुठे पोचले आहे काही समजत नाही. मुळात काम सुरु झाले आहे का हीच शंका वाटतेय आता ..

प्रचेतस's picture

24 Nov 2016 - 6:11 pm | प्रचेतस

शंकर अभ्यंकर म्हणजे कोण?
त्यांच्याबद्दल अधिक माहिती येऊ द्यात.

अभिजित - १'s picture

25 Nov 2016 - 8:11 pm | अभिजित - १

youtube वर बघा ...

वरुण मोहिते's picture

24 Nov 2016 - 8:07 pm | वरुण मोहिते

खूप उत्तुंग व्यक्तिमत्व आहे . बरेच वर्षांपासून त्यांचं संत विद्यापीठासाठी कार्य चालू आहे लवकर होवो हि इच्छा

अत्रन्गि पाउस's picture

24 Nov 2016 - 8:45 pm | अत्रन्गि पाउस

एका कार्यक्रमात हे ऐकले होते १०० कोटींचा प्रोजेक्त वगैरे ऐकून मी हि यथाशक्ती मदत दिली पण नंतर हा विषय आत्ताच ऐकलं ....
हे व्हायला हवेच पण थोडी पारदर्शकता हवी ..

पण हिंदु धर्माचा कैवार घेतानाची त्यांची काहि प्रवचने ऐकली आहेत, व त्यात अनावष्यक मुस्लीम द्वेष पेरलेला बघितला आहे. त्यामुळे हा महाराजांबद्दल आपलं मत फार काहि चांगलं नाहि.

अत्यंत उत्तम वक्तृत्व कला अंगी असणारे एक गृहस्थ . आधी शाळा शिक्षक .. मग संत चरित्रात बस्तान ..मध्यमवर्गीय ( जास्त करून ब्राह्मण वर्गामध्ये... आता 60 च्या वरील वयाच्या) अत्यंत लोकप्रिय . हुशार मार्केटिंग ...विद्यावचस्पती या शब्दाचा खुबीने वापर . बऱ्याच वर्षांपूर्वी बाबासाहेब पुरंदर्यांच्या एका कार्यक्रमपूर्वी cative audiance समोर स्वतःच्या खंडकाव्याचे वाचन ..sportsweek मध्ये क्रिकेट विषयक अत्यंत पांचट लिखाण ..जे लोकप्रियतेअभावी सोडून दिले असावे. संत साहित्यात शिरल्यानंतर झपाट्याने भाग्योदय. बाकी अध्यात्मिक कार्य किंवा विद्यापीठ याबद्दल कल्पना नाही. फार लिहीलं का मी ?

असंका's picture

26 Nov 2016 - 4:24 pm | असंका

फार लिहीलं का मी ?

कशाशी तुलना करताय त्यावर उत्तर अवलंबून आहे...

अत्रुप्त आत्मा's picture

26 Nov 2016 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा

प्र कटन सुरू... .

आमच्या अभिनव निर्माण प्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांनी यांची एकदा मुलाखत घेतली होती.. त्यावरून "सदर इसमास इस्लाममधले काहिही कळत नसून वैदिक धर्माची प्रचारकी थाटाची माहिती आहे..व सदर इसम हा सनातनी (वैदिक)हिंन्दू आहे " इतकाच निष्कर्ष निघाला होता.
तत्पूर्वी आंम्ही यांच्या मनुस्म्रुतीत आहे तरी काय? भाग १ व २, अश्या प्रवचनांच्या क्यासेटी ऐकल्या होत्या.
याखेरीज ५वर्षांमागे, पत्रकार भवन , नवी पेठ(पुणे) येथे सदर इसम व नरेंद्र दाभोलकर यांच्यात देव, हिंदू धर्म, आधुनिकता असे म्याटर असलेल्या विषयात जाहलेला वादविवाद आंम्ही ऐकला होता. ज्यात हे शंकर अभ्यंकर सपशेल हरले होते.

प्र कटन समाप्त!

सहमत :इथे नवीन असल्याने फार स्पष्ट लिहिले नव्हते . सर्वच Ph.D. झालेली मंडळी हि विद्यावाचस्पती असतात , याची जाणीव नसलेली मंडळी त्या शब्दामुळे भुलून जातात .सर्व अध्यात्मिक गुरुं प्रमाणे यांचीही मार्केटिंग टेक्निकस अत्यंत इंटरेस्टींग आहेत.

आत्मबंध व बापट दादांचे आभार,

वरुण मोहिते's picture

26 Nov 2016 - 10:18 pm | वरुण मोहिते

सगळेच पीएचडी असलेले विद्यावाचस्पती.. अहो काय बोलताय??? पैसे वैग्रे नाही पण कधी एखादं व्याख्यान आवडला त्यात काय ?? तुम्ही केलीत का लाखोंची मदत का राम राम यांनी आभार मानले ते करणार होते . रिलॅक्स . सगळीकडे कशाला धुरळा उडवा . नाही जमलं नाही आवडलं काही ओक्के .

वरून शेठ , पुणे विद्यापीठातून Ph. D. झालेल्या कोणाचंही डिग्री सर्टिफिकीट बघा , मराठीत पदवी च नाव विद्या वाचस्पती असतंय ......

Ram ram's picture

27 Nov 2016 - 6:29 am | Ram ram

आता बोला वरून भाऊ

वरुण मोहिते's picture

27 Nov 2016 - 10:53 am | वरुण मोहिते

सर्टीफिकेट वर असणं वेगळं आणि वक्तृत्व कला असणं वेगळं. बाकी पुणे विद्यापीठाचं माहित नव्हतं

वक्तृत्व चांगले असणं वेगळं ( ते आधीच मान्य केलंय) आणि तुम्हाला आणि इतर बऱ्याच लोकांना ते काहीतरी वेगळं , खास आहे असं वाटतंच ना .. पण जोपर्यंत गंडणारी लोकं आहेत तो पर्यंत .... चालायचेच ..आणि सर हुश्शार आहेतच

बाकी गोष्टींबद्दल कल्पना नाही पण,

उद्धव ठाकरेंच्या "पहावा विठ्ठल" या पुस्तकाच्या प्रस्तावनेत यांचाही एक लेख आहे, त्यात तीन चार ठिकाणी केलेला "मा. उद्धवजी" असा उल्लेख खटकला.