नारळाच्या वड्या

शाल्मली's picture
शाल्मली in पाककृती
30 Sep 2008 - 2:02 am

नारळाच्या वड्या

साहित्य :-
एका नारळाचा चव
जेवढा चव आहे तेवढी साखर
२ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून व साले काढून)
थोडी वेलची पूड
थोडी जायफळ पूड

एका ताटाला तूप लाऊन तयार ठेवावे.

कृती :-
बटाटे कुस्करुन एकजीव करुन घ्यावेत.
एका कढईमध्ये नारळाचा चव, साखर व कुस्करलेले बटाटे घेउन, मध्यम आचेवर ठेवावे. हे मिश्रण सतत ढवळावे.
मिश्रण आळत आले की (कढईच्या बाजूला साखर-साखर दिसायला लागली की योग्य वेळ आली आहे असे समजावे.)
गॅस बंद करुन मग त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड मिसळावी.
मिश्रण शेगडीवरुन खाली उतरवून पाच मिनिटे चांगले घोटावे.

तूप लावलेल्या ताटावर मिश्रण पसरवून वाटीने थापून घ्यावे. गरम असतानाच वड्या पाडाव्यात.

टिप्पणी : या वड्यांमध्ये बटाटा घातल्याने त्या खुसखुशीत होतात.

वडीचा आस्वाद घ्या :)

--शाल्मली

प्रतिक्रिया

रेवती's picture

30 Sep 2008 - 3:43 am | रेवती

नविन प्रकार आहे. नारळात आंब्याचा रस घालते. टोमॅटो रस घालतात असेही ऐकले आहे पण बटाटा घातल्याचे पहिल्यांदा ऐकते (पाहते) आहे! :)

रेवती

चित्रा's picture

30 Sep 2008 - 7:44 am | चित्रा

बटाटा घालून वड्या चांगल्या होतात - म्हणजे आकार राहतो.
मी तशा वड्या प्रकारात विशेष पडत नाही, पण खायला आवडतात. ;-)

लवंगी's picture

30 Sep 2008 - 5:55 am | लवंगी

छान दिसताहेत वड्या.. मी करीन या शनिवारी. मुलांना नक्की आवडातील.

शितल's picture

30 Sep 2008 - 6:22 am | शितल

बटाटा घातलेल्या नारळाच्या वड्या मी ही पहिल्यांदाच ऐकल्या.
पण नक्की करून पाहीन.
:)
अग पण त्या किती दिवस टिकतील.

शाल्मली's picture

30 Sep 2008 - 4:51 pm | शाल्मली

ह्या वड्या बाहेर २ ते ३ दिवस टिकतात. त्यानंतर मात्र फ्रिज मध्ये ठेवाव्यात.
कारण त्यानंतर नारळ खवट होण्याची शक्यता असते.

--शाल्मली.

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 6:48 am | विसोबा खेचर

बटाटा-नारळ वड्या आवडल्या... :)

आमची म्हातारी बटाटा न घालता दूध किंवा खवा घालते...

तात्या.

प्राजु's picture

30 Sep 2008 - 7:57 am | प्राजु

अशा बटाटा घातलेल्या वड्या मी एकदाच खाल्ल्या होत्या. सह्हीच लागतात.
माझ्या सासूबाई, या वड्यांमध्ये व्हेनिला इसेन्स.. कधी पिस्ता रंग.. कधी आंब्याचा रस, कधी बीटाचा रस.. तर कधी काजूची पूड करून घालून करतात. वड्या फारच सुंदर करतात..मी सहसा वड्या प्रकरामध्ये नाही पडले. मी खाण्याचं काम तेवढं नेटकेपणाने करते. ;)
या अशा प्रकारच्या वड्या करून पाहिन नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

30 Sep 2008 - 12:43 pm | स्वाती दिनेश

वड्या मस्त दिसत आहेत. पटकन उचलून एक तोंडात टाकाविशी वाटते आहे,:)
स्वाती

शाल्मली's picture

30 Sep 2008 - 1:39 pm | शाल्मली

पटकन उचलून एक तोंडात टाकाविशी वाटते आहे

चालेल. येताना तुझ्यासाठी घेऊन येते. अर्थात उरल्या तर.. कारण धनंजय रावांनी आधीच नंबर लाऊन ठेवला आहे. :)

--शाल्मली.

शाल्मली's picture

1 Oct 2008 - 3:19 pm | शाल्मली

आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल अनेक धन्यवाद ! :)

--शाल्मली