प्रेरणा
पुरुष बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. गेली काही वर्षं मी आजुबाजुला बघतो की बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की पुरुषांना आपलं मर्दानी सौंदर्य सिद्ध केल्याचा फील येतो.
१. बायका दाढी करत नाही, मग करा त्यांचे अनुकरण. हल्ली बेफिकिरीत दाढी वाढवून पुरुष स्वतःला बायकांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' देत असतात. आता राहुल गांधी बरा दिसतो हाच एक त्याचा प्लस पॉइंट होता. पण नाही, बायकांची नक्कल करता करता त्याने तेवढंही गमावलं.
२. बायका भरजरी कपडे वापरतात. मग पुरुषही त्यांचं अनुकरण करतात. शोभत नसेल तरीही लग्नसमारंभात भरजरी शेरवानी घालताना सर्रास दिसतात. बायकांना अशा जरीदार कपड्यानी शोभा येते. पुरुषांची ती 'शेर'वानी अगदी बकरीवानी दिसते. पण नाही, बायका करतात, तर आम्हीही करणार, हा अट्टाहास कशासाठी?
३. बायका अंगप्रदर्शन करतात, ते त्यांना जमतंही. पण बाजारत सगळं अंग झाकणारे कपड्यांचे ढीग असतानाही पुरुषांना आपली छाती, त्यांवरचे केस, आणि सहा नाही तरी दोनतीन पॅक आहेत असा समज करून सुटलेली पोटं दाखवायची असतात. या पुढेही जाऊन काही मर्दुटले पीकेसारखे फोटोही टाकतात,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला ताबडतोब अनफॉलो करून टाकतात.
४. स्वयंपाक करणं हा खास बायकी प्रांत. पण घुसघोरी करणार नाही ते पुरुष कसले? आई, बहीण,आणि बायको यांना बकरी बनवून स्वयंपाकघरात शेजारी उभं केलं जातं. इतर वेळी इतर वेळी तांत्रिक बाबतीत पुढे असणारे पुरुष मात्र इथे गडबडतात. हळद टाकायला सांगितलं की मोहरी टाकतात आणि मोहरी टाकायला सांगितलं की हिंग टाकतात. आणि वर यांना तयार मसाला नको असतो, घरच्याघरीच वाटणघाटण करायची असते. मग दूध उकळायला लागल्यावर गॅस बंद करायचा सुचत नाही. आणि उतू जायला लागलं की नुसते बघत बसतात. अरे काय वेडेपणा आहे हा? मिपावर आणि फेसबुकवर फोटो टाकण्याची मात्र हौस.
५.गॉसिप ही खास बायकांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल पुरुषांनीही त्यात प्राविण्य मिळवलं आहे. इतकं की एखाद्या बाईशी फेसबुकवर ओळख झाल्यावर 'J1 झालं का?' असले लेम मेसेज टाकून बघतात.
जरुर बायकांची कॉपी करा, त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका. कॉपी अशी करा की बघणारी बघत राहिली पाहिजे. आणि खूप जणी बघताहेत म्हणून फसू नका. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत 'हा काय चक्रमपणा चालू आहे?' असे भाव दिसत नाहीत ना, याची खात्री करून घ्या.
तर पुरुषांनो, बायकांची कॉपी करणं म्हणजे आपण मेट्रोसेक्श्युअल झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रं तयार करा. बायकांना बेंचमार्क ठरवून भलतंच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या, after all, women are women.
(दुर्दैवाने विडंबन करताना भाषेचं सुडंबन करावं लागलेलं आहे. कारण मुळातल्या तीनचारशे शब्दांच्या लेखात पन्नाससाठ चुका ठेवून देणं हे फारच हिणवल्यासारखं वाटेल असा संशय आला.)
प्रतिक्रिया
20 Nov 2016 - 9:30 pm | टवाळ कार्टा
=))
21 Nov 2016 - 12:04 am | पीके
म्हणजे कसे?
21 Nov 2016 - 12:09 am | पीके
संपादक मंडळि, इकडे लक्ष द्या, या सारख्या वैयक्तीक विडंबन करणारे धागे उडवावेत..
21 Nov 2016 - 12:13 am | पीके
अन्यथा प्रस्तूत लेखकावर अमच्याकडून वैयक्तीक बहिष्कार घालण्यात येइल ..
21 Nov 2016 - 6:37 am | सच्चिदानंद
अरे पीके हो का ? रेफरेन्स तो समझो भइया.
21 Nov 2016 - 7:41 am | पीके
ज्योक (पीजे) तो समझो भाइ.,
20 Nov 2016 - 9:32 pm | अगोचर
खुसखुशित लेख. आवडला.
(मी पयला हा म्हयला की पुरुष मिपाकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न आहे हे माहित नाही)
20 Nov 2016 - 9:43 pm | अनुप ढेरे
हा हा हा! जमलय! शेरवानी-बकरीवानी वाचून फिस्स्कन हसलो.
20 Nov 2016 - 9:52 pm | अजया
:)
20 Nov 2016 - 9:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
=)) =))
20 Nov 2016 - 9:55 pm | पिलीयन रायडर
=))
20 Nov 2016 - 11:15 pm | मारवा
काही लोक कचरा बिनकामाचा समजतात त्याकडे दुर्लक्ष करतात
मात्र काही लोक कचर्यापासुनही नवनिर्मीती करुन दाखवतात
आयुष्याने लेमन दिलं तर त्यापासुन लेमनेड बनवा व त्याहीपुढे जाऊन ज्याला आयुष्याने व्होडका दिलेली आहे असा नशिबवान शोधुन त्याच्यासंगे पार्टी करा असा महत्वाकांक्षेचा सकारात्मक विचारांचा उन्माद चढलेले वेडेच जग बदलतात !
तात्पर्य कुठलाच कचरा टाकावु नसतो त्यात अनेक शक्यता दडलेल्या असतात हवी केवळ एक प्रतिभा !!
आणि श्रद्धा !!!
सक्सेसफुल पिपल डोंट क्लीन द गारबेज !!!!!!!!!!!!!!!!!!
दे रीसायकल इट डिफ्रंटली !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
लेखक- शिव व्हीलेज
सत्यमेव जयते
सेकंड सीझन
21 Nov 2016 - 4:37 am | रुपी
हा हा.. मस्त!
'J1 झालं का?' >> =))
21 Nov 2016 - 5:14 am | कंजूस
लेख ( विडंबन )गंडलाय हे मान्य केलंच आहे आणखी काही सांगायला नको शैलीबद्दल.
मुद्दांचा विदा कमी पडून घाइघाइने अनुमान काढलय.
#दाढी फार वाढते ,कंटाळा येतो म्हणून करत नाहीत.
#समारंभातले जेवण,स्वयंपाक पुरुषच करतात.झटपट उरकतात आणि सोवळ्याचं टेस्टींग करायला परवानगी नाही.
#विनोदी कार्यक्रम स्त्रीवेषभुषेमुळे आणखीनच विनोदी होतात,टिआरपी वाढतो.शिनुमात मोठे खणखणीत आवाजाचे नट सोडले तर सर्वांनी बायकी कपडेपट ( वार्ड्रोब )ठेवलाय. त्यांच्या बायकांच्या (१)साड्या न वापरण्याचा पुरुषिपणा जपताहेत हेही नसे थोडके.
21 Nov 2016 - 2:01 pm | पाटीलभाऊ
सहमत.
21 Nov 2016 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा
घासूगुर्जींच्या खास शैलीतले आम इडंबन. ! ;)
21 Nov 2016 - 10:14 am | वरुण मोहिते
जमलय मस्त!!!!!
21 Nov 2016 - 10:54 am | अप्पा जोगळेकर
घासू गुर्जींनी फिलॉसॉफरशी बरोबरी करुन उगाच स्वतःला स्टेप डाऊन करुन घेणेच पटत नाही. असो.
21 Nov 2016 - 12:19 pm | मराठी कथालेखक
आई, बायको, बहीण यांची 'बकरी' आवडली :)
21 Nov 2016 - 3:04 pm | पद्माक्षी
मूळ धागा आणि विडंबन दोन्ही एकसारखेच गंडलय.