दिड दिवस सुर्य....!!!

चिऊताई's picture
चिऊताई in काथ्याकूट
30 Sep 2008 - 12:47 am
गाभा: 

मी असे ऐकले आहे कि १७ ऑ़क्टोबर २००८ रोजी सुर्य ३६ तास म्हणजे दिड दिवस आकशात दिसणार आहे, हे खर आहे का?

प्रतिक्रिया

धनंजय's picture

30 Sep 2008 - 1:27 am | धनंजय

फक्त भारतात नाही. सूर्याचा हा विशेष व्यवहार बघण्यासाठी विमानातून त्याचा पाठलाग करावा लागणार.
(नाहीतर अंटार्क्टिका मध्ये गेले तरीही चालेल. ही गंमत एका जागी स्थिर राहून दिसू शकेल.)

खादाड_बोका's picture

30 Sep 2008 - 1:37 am | खादाड_बोका

तात्या आज काल मिपावर काय होवुन राहीले. येवढ्या चांगल्या वेब-साईटवर काय हे बावळटा सारखे प्रश्न विचारतात लोक ?
आधी त्या नाडीवाल्यानी टाळक फिरवल, आणि आता हे प्रश्न विचारुन सगळ्यांना(मिपाकरांना) काय मुर्ख समजतात काय हो हे?
शाळेत जाणार शेंबड्या मुलालाही कळतो की विषवव्रुत्तावर दिवस/रात्र जवळपास बारा तासाची असते ? पण ह्यांना कशी नाही कळत बॉ..?? ~X(

मला तर स्वप्नातही भुक लागते....

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 7:39 am | विसोबा खेचर

तात्या आज काल मिपावर काय होवुन राहीले. येवढ्या चांगल्या वेब-साईटवर काय हे बावळटा सारखे प्रश्न विचारतात लोक ?
आधी त्या नाडीवाल्यानी टाळक फिरवल, आणि आता हे प्रश्न विचारुन सगळ्यांना(मिपाकरांना) काय मुर्ख समजतात काय हो हे?

अरे किती भडकशील? :)

अरे लिहू देत रे कुणाला काय लिहायचंय ते. शेवटी ही मिसळ आहे. अनेक प्रकारचं लेखन करणार्‍या अनेकांचं इथं स्वागत आहे. फारच झालं तर व्यवस्थापकीय अधिकारांचा वापर करू... :)

तात्या.

टारझन's picture

30 Sep 2008 - 1:48 am | टारझन

१. हा लेख वाचुन मला पु.लं ची आठवण झाली...
२. अप्रतिम लिहीले आहे... सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकही दम नं घेता वाचलं
३. भरपुर माहिती देणारा लेख.
४. क्रमशः लिहायचं विसरलात का ?
५. पु.ले.शु.
६. सरसकट विधाने न करता आणि स्त्री-पुरूष समानता यांचा विचार करून अत्यंत विचारपुर्वक लिहीलेला लेख, त्याबद्दल अभिनंदन
७. या वर्षीचा बेस्ट संपादकीय द्यावा असा लेख.
८. आम्हाला आता माफ करा.

एकदा मी पण पाठलाग केला सुर्याचा... विमाना घेउन पळत होतो .. पण वाटेत सिग्नल लागला आणि विमानाला डिस्क ब्रेक दाबुन जागीच थांबावं लागलं .. सुर्य मात्र सिग्नल तोडून पळाला

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

विसोबा खेचर's picture

30 Sep 2008 - 7:39 am | विसोबा खेचर

टारझनराव,

तुमचा प्रतिसाद आवडला... :)

तात्या.

सूर्य's picture

30 Sep 2008 - 7:58 pm | सूर्य

एकदा मी पण पाठलाग केला सुर्याचा... विमाना घेउन पळत होतो .. पण वाटेत सिग्नल लागला आणि विमानाला डिस्क ब्रेक दाबुन जागीच थांबावं लागलं .. सुर्य मात्र सिग्नल तोडून पळाला

नाही रे.. मी कधीच सिग्नल तोडत नाही ;)

आपला
- (एक सहस्त्रांश) सूर्य

झकासराव's picture

30 Sep 2008 - 8:26 am | झकासराव

मी असे ऐकले आहे कि १७ ऑ़क्टोबर २००८ रोजी सुर्य ३६ तास म्हणजे दिड दिवस आकशात दिसणार आहे, हे खर आहे का?>>>>>>>>
अलिकडेच अशा टाईपचीच एक मेल येवुन गेली.
क्षणभर गोंधळलो. पण लक्षात आल की अस जर होणारच असेल तर त्यासाठी तेवढ स्पेसिफिक कारण हव.
तस तर एकही घडलेल नाहिये किंवा घडणार आहे असही कुठे डिक्लेअर झालेल नाहि.
म्हणजेच ही मेल तेवढीच बोगस जेवढी एखाद्या देवाच्या फोटोसहीत काहि बाहि धमकी सहीत येणारी मेल.
अशा मेल ना आम्ही शिफ्ट डीलीटची वाट दाखवत असतो. ह्या मेलला देखील तशीच वाट दाखवली.
अवांतर : देवाच्या नावाने धमकीच्या मेल पाठवण्यार्‍या लोकांची आम्हाला कीव येते बॉ.
आम्ही त्यातील देवाचे छान छान फोटु बघतो. त्या देवाला नमस्कार करतो आणि माफी देखील मागतो अशा मेल पाठवणार्‍याच्या नावाने.
आणि मग डीलिट करतो. :)
अशा मेल करणार्‍याना एवढे चांगले फोटु कुठुन मिळतात हा मात्र आमच्या मनातील प्रश्न कायम आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

जैनाचं कार्ट's picture

30 Sep 2008 - 9:30 am | जैनाचं कार्ट (not verified)

अशा मेल करणार्‍याना एवढे चांगले फोटु कुठुन मिळतात हा मात्र आमच्या मनातील प्रश्न कायम आहे.

हाच विचार मी देखील खुप दिवस केला... उत्तर सापडले नाही बॉ !

पण फोटो मस्त येत असत त्यामध्ये ह्या बद्दल सहमत.

बाकी फालतू दुवा जरी नसला तरी अत्यंत माहीती पुर्ण देखील नाही आहे राव...

लेख लिहताना कमीत कमी तीन मुद्दे हाती घ्या व लिहा !

मुख्य बातमी / गाभा
तुम्हाला माहीती कोठून क कशी प्राप्त झाली
त्यावर तुम्ही किती संशोधन केले (गुगलद्वारा) व तुमचे स्वतःचे मत काय !

मस्त लेख जमतो.. प्रयत्न करुन पहा !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2008 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लोकहो, हा लेख चिऊताईंनी मौजमजा या सदरात टाकला आहे हे तुम्ही पाहिलंत का?

चिऊताई, एकाद बाटली वाईन प्यायली ना की दीड दिवस सूर्यच काय त्याबरोबर तारेही दिसतील! ते नको असतील तर काय हवं त्याचा विचार करा, ते सगळं दिसेल!

अदिती

जैनाचं कार्ट's picture

30 Sep 2008 - 10:02 am | जैनाचं कार्ट (not verified)

एकाद बाटली वाईन प्यायली ना की दीड दिवस सूर्यच काय त्याबरोबर तारेही दिसतील!

=))

यमे , अनुभवाचे बोल दिसत आहेत !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2008 - 10:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> यमे , अनुभवाचे बोल दिसत आहेत !
तुम्हाला काय वाटतं? ;-)
माहिती नसल्याशिवाय बोलणं शोभत नाही शास्त्रीय दृष्टीकोन असणार्‍या लोकांना! :-D

(अवांतरः पोटापाण्यासाठी मी सूर्य, ग्रह आणि आपल्या आकाशगंगेतल्या तार्‍यांकडे पहात नाही. मी पोटापाण्यासाठी आपल्या आकाशगंगेबाहेरच्या दीर्घिकांकडे वर्षातून फारतर दोनदा बघते.)

सुनील's picture

30 Sep 2008 - 11:11 am | सुनील

धनंजय, टारझन आणि अदिती यांचे प्रतिसाद आवडले.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.