लक्ष्मीचा भर्वसा धरी...

दासबोध.कॊम's picture
दासबोध.कॊम in काथ्याकूट
18 Nov 2016 - 1:23 pm
गाभा: 

आजही दासबोधातील सर्वाधिक लोकप्रीय समास आहे "मूर्ख लक्षण" समास!
हे केवळ विधान नाही तर, हे संगणकीय आकडेवारीवरून केलेले निरीक्षण आहे.
दासबोध.कॉम ही जगभरात दासबोधावर जितकी संकेतस्थळे आहेत त्यातील आजच्या दिनांकाला सर्वाधिक वाचले जाणारे संकेतस्थळ आहे. त्यातील सर्वाधिक वाचला जाणारा समास हा मूर्ख लक्षणांचा आहे!
त्यातील एकेका ओवीत समर्थ रामदास काय सांगतात हे वाचल्यावर कळते की आजही दासबोध कालबाह्य झालेला नाही!
उलट त्यातील उपदेशाची गरज अधीकच भासू लागलेली आहे!

समर्थ एके ठिकाणी म्हणतात, लक्ष्मीचा भर्वसा धरी । तो येक मूर्ख!

किती खरे आहे पहा ना! आज जेंव्हा अचानक सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद केल्या तेंव्हा हे लोकांना जाणवले!
तोवर सगळे "बदचलन" आपल्याच चलनमस्तीत होते!

मुळात नोट म्हणाजे काय हेच आम्ही जाणलेले नाही! ते पैसे नाहीत! धन नाही! मूल्य आहे!
सेल्फ़ सर्व्हीस काउंटर वर जसे टोकन देतात प्लास्टिकचे तितकीच तिची किम्मत! फ़क्त ते टोकन त्या दुकानापुरते चालते व नोट देशापुरती इतकेच! ती नोट म्हणाजे रिजर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नराने दिलेली तितक्या रकमेची फ़क्त हमी आहे! की बाबा रे या देशात आहेस तोवर हा कागद दाखविलास की इतके मूल्य तुला देऊ करू!
दुकानदार जसा कधीही पिवळी टोकने बाद करून नवी लाल टोकने आणु शकतो तसेच काहीसे या सरकारने केले! त्याने कुणाचे धन कमी नाही झाले! अर्थात हे जाहीर केलेल्या धनाबाबतच सत्य आहे!

पण गम्मत अशी वाटली की हा मूर्खलक्षण समास वाचताना इतकी म्हणजे इतकी उदाहरणॆ डोळ्यासमोर दिसू लागतात की जी आज आजूबाजूला घडताहेत! अगदी स्वत:पासून सांगतो, आपल्याच अनेक चुका यात उद्धृत केलेल्या आढळतात! आपल्याकडे पहातच हा समास लिहिलाय की काय असे वाटू लागते!

आता चलनबाद तर झालेले आहे, पैसा बदलून आणणे तर क्रमप्राप्त आहे, मग रांगेत थांबल्या थांबल्या मोबाईलवर हा मूर्खलक्षण समास चाळायला काय हरकत आहे?

http://www.dasbodh.com/2012/07/blog-post_282.html

हा समास वाचून तुम्हीच अशी अजून शेकडो उदाहरणे कमेंटमध्ये द्याल अशी खात्री आहे!

उदा. सांगे वडिलांची कीर्ती --> राहुल गांधी
समर्थावरी अहंता | अंतरीं मानी समता | सामर्थ्येंविण करी सत्ता | ---> केजरीवाल इ.इ.

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

18 Nov 2016 - 1:51 pm | सतिश गावडे

कसं आहे, काही वेळा तत्वज्ञान वाचायला छान वाटते. आपण काही साधू संत नाही. जोपर्यंत नोटरूपी कागदाच्या तुकड्यात बाजारात विकायला असलेल्या वस्तू आणि सेवा विकत घेण्याची क्षमता आहे तोपर्यंत लोक त्या लक्ष्मीचा भरवसा धरणारच.

आणि नोटा जरी चलनातून बाद झाल्या असल्या तरी त्या बदलून मिळणार आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

18 Nov 2016 - 2:18 pm | प्रसाद गोडबोले

अत्यंत सुरेख स्पष्टीकरण !

दासबोधात अत्यंत क्लिष्ट तत्वज्ञान अतिषय सोप्प्य शब्दात सांगितले आहे त्या मुळे दासबोध वाचायला मजा येते !

५००-१००० च्या नोटा हे केवळ एक उदाहरण झाले , समर्थांचा मुद्दा कि कोणताही देश सॉव्हरीन डिफॉल्ट डिक्लियर करु शकतो ! https://en.wikipedia.org/wiki/Sovereign_default
आजवरच्या सॉव्हरीन डिफॉल्ट क्रायसीस ची लिस्ट इथे पहायला मिळेल ! https://en.wikipedia.org/wiki/List_of_sovereign_debt_crises

ह्या http://www.usdebtclock.org/ इथे पाहिल्यास असे दिसत आहे की अमेरिकेचे फेडरल डेट लवकरच २० ट्रिलियन चा टप्पा क्रॉस करेल . कदाचित एक्स्ट्रीम केस मधे अमेरिकेचे सॉव्हरीन डेट क्रायसीस झाले तर केवळ डॉलराच नव्हे तर जवळपास जगातल्या सर्वच्या सर्व करन्स्या कागदाचे कपटे ठरतील !

"ह्यॅ असलं काही होत नसतं" असा विचार मनात आला होता माझ्याही तर २००८ साली लेहमन ब्रदर्स , बीयर स्टर्न वगैरे बँकामध्ये पैसा गुंतवलेल्यांचे अनुभव पाहुन डोळे उघडले !!

पैसा म्हणजे नक्की काय , त्याचे डायनॅमिक्स कसे चालते ह्याचया अधिक अभ्यासाकरिता बिटकॉईन्स - द एन्ड ऑफ मनी अ‍ॅज वी क्नो ही अतिषय माहीतीपुर्ण डॉक्युमेंटरी आहे.

लक्ष्मीचा भर्वसा धरी । तो येक मूर्ख! हेच खरे , द ऑन्ली थिंग्स दॅट हॅव रीयल व्यॅल्यु आर फूड & वॉटर !!

असो , आमचे आपले बामणी टनाटनी अर्थशास्त्रीय निरर्थक अत्मरंजन !!

दासबोध.कॊम's picture

21 Nov 2016 - 3:01 pm | दासबोध.कॊम

अप्रतिम माहिती बद्दल धन्यवाद!