ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे.
एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत.
नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव.
खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो.
लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११).
बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते.
शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या).
आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२.
माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण :
दाखला क्रं १ :
एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का?
बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा.
एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे.
दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई.
नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल.
बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन.
बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते)
शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच.
थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे)
कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
प्रतिक्रिया
19 Nov 2016 - 11:34 pm | पैसा
हे साफ चूक आहे. बँकेच्या लोकांनी सांगितले का? तक्रार कर.
ज्या बँकेत खातं आहे तिथे आपला पॅन नंबर, आधार कार्ड सगळे केवायसी साठी आधीच दिलेले असते आणि ते बँकेच्या रेकॉर्डवर कायमचे असते. पॅन कार्ड अकाउंटच्या रेकॉर्डवर असल्यामुळे जास्त पैसे भरणार्याना ट्रॅक करणे इन्कम टॅक्स वाल्याना सोपे आहे. चेक फक्त पैसे काढायचे असतील तर आवश्यक आहे. एरवी पासबुक असले तर ठीक नाहीतर बँक अकाउंट नंबर तोंडपाठ असल्यास काहीच प्रॉब्लेम नाही.
पैसे बदलणारे बँकेचे कस्टमर असतीलच असे नाही. त्यामुळे त्याना ओळख पटवणारे डॉक्युमेंट मागितले आहे. खातेदारांचे पॅनकार्ड बँकांच्या रेकॉर्डवर असल्याने कितीही पैसे खात्यात भरले तरी इनकम टॅक्सवाले सहज ट्रॅक करू शकतील. यामुळेच खात्यात पैसे भरायला लिमिट घालून दिलेली नाही.
माझ्या अंदाजाप्रमाणे बदली झालेल्या नोटांच्या बाबतीत आधार कार्ड आणि पॅन कार्ड रिपोर्ट केले जाईल आणि शेवट सगळा डेटा गोळा झाला की कोणी बरेचदा येऊन चार चार हजार रोज बदलले असतील तरी तेही ट्रॅक होईल.
19 Nov 2016 - 11:41 pm | श्रीगुरुजी
जुन्या ५००/१००० च्या नोटा खात्यात भरण्यासाठी deposit slip व one ID proof (Aadhaar Card or PAN Card or Passport or Voter Card) असणे आवश्यक आहे.
19 Nov 2016 - 11:49 pm | पैसा
फक्त पासबुक पुरेसे आहे. फोटो असलेले पासबुक सुद्धा ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य असते. खातेदाराने स्वतः पैसे भरले आहेत हे कन्फर्म करण्यापुरताच ओळखीचा पुरावा हवा. तेही आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रसंग आहे म्हणून. एरवी बँकेत पैसे भरताना अकाउंट नंबर आणि नाव बरोबर आहे एवढेच फक्त बघितले जाते. कोणी पैसे भरले याने काही फरक पडत नाही.
स्वतः खातेदाराने पैसे भरलेत हे आता एवढ्यासाठीच कन्फर्म करत असावेत की उद्या पकडले गेल्यास माझ्या अकाउंटला मी पैसे भरले नाहीत, कोणीतरी बेनामी भरलेत म्हणून रडारड करता येऊ नये.
20 Nov 2016 - 12:17 am | एस
अर्थात हे मला माहीत आहे. पण बँकेत आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन्ही लागतील आणि शिवाय चेकही लागेल असे सांगितले. डिपॉझिट करायला चेक कशाला पाहिजे असे विचारले तर म्हणे तसे आदेश आहेत. कुठलेही एक मान्यताप्राप्त ओळखपत्र असेल तरी चालेल खरं तर. रक्कमही अशी काही फार मोठी नव्हती की पॅन कार्डच हवे. पण पॅन आणि आधार ही दोन्ही कागदपत्रे (आणि हीच दोन कागदपत्रे) हवीत म्हणे. तक्रार करायला हवी. उलट बँक ऑफ महाराष्ट्र असे काही मागत नाही. तिथे फक्त पॅन कार्ड दिले तरी पैसे जमा करून घेतात असे कळले. आता गेलो की कागदपत्रांची आख्खी फाइल, फोटो, चेकबुक, रेशनकार्ड, इ. इ. ओरिजिनल आणि फोटोकॉपीसकट सगळंच नेणार आहे. उगाच कोण्या अतिशहाण्यामुळे आपलं काम नको अडायला. :-|
20 Nov 2016 - 12:23 am | संदीप डांगे
हो, आज मी बँकेत गेलो तेव्हा हेच झाले, चेक ने पैसे काढले तेव्हा फक्त आधार नुसते दाखवलं, पण पैसे भरताना मात्र त्याचीच झेरॉक्स दिली सोबत. तुमच्या खात्यात कोणीही येऊन पैसा भरून जाऊ नये म्हणून ती तरतूद योग्य... असे बँक कर्मचाऱ्याने सांगितले
पैसाताई, नक्की खरं काय?
20 Nov 2016 - 7:42 am | पैसा
कोणीही येऊन तिसर्याच्या खात्यात पैसे भरू नये म्हणून स्वतः ग्राहक आला होता हे कन्फर्म करण्यासाठी काहीतरी ओळख हवी. कारण हेच की इन्कम टॅक्सवाल्यानी उद्या पकडले तर सुटून जायला रस्ता राहू नये. पण बँकेच्या लोकांनी हे सगळे न करता पे इन स्लिपवर ग्राहकाची सही घेणे पुरेसे आहे. सही नसेल तर मात्र पॅनकार्ड वगैरे घेऊनही काही उपयोग नाही. सरकारी बँकात काम करणारे लोक अजून काही प्रमाणात तरी अनुभवी आहेत त्यामुळे जरा रॅशनली विचार करतात. एच डी एफ सी आयसीआयसीआय वगैरेनी तापुरती नोकर भरती केल्याचे ऐकले. या नवीन पोराना काही ट्रेनिंग वगैरे दिलेले असणे शक्यच नाही. किंवा ओळख कशासाठी आणि कोणती पुरे याचेही काही तारतम्याने विचार करून ते वागणे शक्य नाही. त्यांचा यात दोष नाही.
19 Nov 2016 - 8:03 pm | प्रसाद_१९८२
५०० व १००० च्या नोटा बंदीवर, सर्वसामन्य जनतेच्या काही संमिश्र प्रतिक्रिया.
19 Nov 2016 - 8:33 pm | यशोधरा
सोमवारी जाणार आहे बँकेत पुन्हा, जाऊन आल्यावर सांगते अनुभव काय आहे.
21 Nov 2016 - 1:28 pm | यशोधरा
कॉसमॉस बॅंकेत जाऊन ६०००/- कॅश ५००/- च्या नोटांमध्ये होती ती भरली.
५,०००/- काढले त्यात २००० च्या २ नोटा व १०० च्या १० नोटा मिळाल्या.
एकूण ३५ मिनिटे वेळ.
बॅ़ंकेत गर्दी नव्हती पण बॅंक ओसही पडली नव्हती. ग्राहक व कर्मचारी शांतपणे काम करतना दिसले. एक ग्राहक दुकानदार २०००/- च्या नोटा घेत नाहीत म्हणून चिडले होते, व सगळ्या १००/- च्याच नोटा द्या म्हणून ओरडत होते. त्यांना समजावण्याचा कर्मचार्यांनी प्रयत्न केल्यावर त्यांनी हातातील कागदाचा बोळा करुन कर्मचारी स्त्रीच्या अंगावर फेकला. त्यांनी शांतपणे उचलून कचर्याच्या पेटीत टाकला व पुढील ग्राहकाकडे वळल्या. थोड्या वेळाने तेच गृहस्थ पुन्हा आले व व्यवहार करुन गेले.
एक २०००/- नोट घेऊन ग्रोसरी खरेदी केली, उरलेले सुट्टे मिळाले. १०० च्या नोटा.
शनिपाराकडे रस्त्यावरची भाजीवाले गायब आहेत. रिक्षावाल्यांचा धंदा नेहमीपेक्षा मंदा झाल्याने ते नको इतके सौजन्य दाखव्त आहेत, जे अनुभवायची सवय नाही, मग बावचळल्यासारखे होते!
22 Nov 2016 - 1:27 pm | पिशी अबोली
आज मला अक्षरश: दोन मिनिटात पैसे मिळाले कॅनरा बँक, मॉडेल कॉलनीमधून. पण नोटा फक्त 2000 च्या.आज इथले लोकपण निवांत होते. माझं पासबुक त्यांच्या प्रिंटिंग मशीनमधे अडकलं तर 2 बँक चे लोक आणि एक कस्टमर अशा तिघांनी काढून दिलं.. :D
23 Nov 2016 - 10:10 pm | सामान्य वाचक
म्हणजे 8 नोव्हेंबर नंतर पहिल्यांदा atm मधून पैसे काढले
एरवीपेक्षा बरीच रांग होती, पण तरी 35 मिन मध्ये पैसे मिळाले
100 च्या 20 नोटा
आता महिना पंधरा दिवस काही प्रॉब्लेम नाही
तसेही पूर्वीपासूनच कार्ड व्यवहार करत असल्याने फार फरक पडला नाही
24 Nov 2016 - 10:52 pm | संदीप डांगे
महत्त्वाची बातमी: आता आजपासून म्हणजे २४ तारखेच्या रात्रीपासून १००० व ५०० च्या नोटांची अदलाबदल बंद होणार आहे. आता फक्त अकाउंटमधे नोटा भरण्याची मुभा आहे.
http://timesofindia.indiatimes.com/india/Demonetisation-tightens-No-more...
25 Nov 2016 - 3:57 pm | श्रीगुरुजी
काल ३ वेगवेगळ्या ठिकाणाहून खरेदी केली. एका दुकानात फक्त ९० रूपये, दुसर्यात फक्त २३२ रूपये व तिसर्या ठिकाणी ३३० रूपये बिल झाले. तीनही ठिकाणी डेबिट कार्ड वापरले.
25 Nov 2016 - 8:42 pm | अभिजित - १
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/demonetization-pm-modi-sla...
जबरदस्ती का ? पेटीम ला आम्ही का म्हणून पैसे भरायचे ?
25 Nov 2016 - 9:11 pm | संदीप डांगे
बहुतेक पंतप्रधान आपण देशातल्या फक्त 17 टक्के लोकांचे पंतप्रधान आहोत असा विचार करत असावेत, :)
25 Nov 2016 - 9:53 pm | अभिजित - १
पेटीम मध्ये चीन ची ४५% भागीदारी आहे. थोडक्यात आपला पैसा चिनी लोकांना मिळणार. हे चालते वाटते ?
25 Nov 2016 - 10:21 pm | स्रुजा
यात काय चूकीचं आहे पण? आज सगळे व्यवहार कॅशलेस होऊ शकतात.. जर त्याचं महत्त्व अधोरेखित करायचा प्रयत्न केला या निमित्ताने तर चुकलं काय? एरवी आपण बिग बास्केट, तुमच्याच मित्राची ती ठाण्याची सर्व्हिस , अमेझॉन , फ्लिपकार्ट अशा घरबसल्या मिळणार्या गोष्टींचं कौतुक करतो. जिथे तिथे काळा बरोबर चाललं पाहिजे असा एक सैद्धांतिक तरी प्रत्येकाचा आग्रह असतो . मग कॅशलेस मध्ये उगाच विरोध का? आणि हा प्रश्न मी कुठल्याही अजेंड्याशिवाय , खरंच दुसरी बाजू जाणुन घेण्यासाठी विचारते आहे. मला विचार करुन देखील या त्यांच्या सल्ल्यात काय वाईट आहे हे कळत नाहीये.
25 Nov 2016 - 10:24 pm | अभिजित - १
जबरदस्ती चुकीची आहे.
25 Nov 2016 - 10:34 pm | स्रुजा
पण जबरदस्ती कुठे आहे? कॅशलेस ला प्रोत्साहन देतायेत ते. वेगवेगळ्या मार्गांनी प्रत्येक सरकार काही "बेस्ट प्रॅक्टिसेस" अंमलात आणायचा प्रयत्न करतात. विविध मार्गांनी एखाद्या धोरणाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. जाहिराती करतात, करांवर सूट देतात. इन्फ्रास्ट्रक्चर बाँड्स लोकप्रिय करायचे होते तेंव्हा ते टॅक्स स्लॅब मध्ये आणले होते. ती ती धोरणं एकदा प्रस्थापित झाली की त्याचे फायदे/ तोटे दिसू लागतात. पण तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या परिने ते अशा काही योजना आणणार च जेणेकरुन त्या धोरणाकडे किंवा नियमाकडे लोकं आपोआप वळतील.
कॅशलेस चा एकमेव धोका आहे तो म्हणजे हॅकिंग, सायबर हल्ले. पण त्या साठी देखील सगळ्या बँकांचे नियम असतात, आपण आपल्या व्यवहारांच्या किंमतीवर मर्यादा ठरवु शकतो. आणि तसं सुरक्षित काहीच नाही. उलट जेवढं मला माहिती आहे त्यावरुन तरी कॅशलेस मध्ये जास्त फायदे आहेत.
25 Nov 2016 - 10:43 pm | अभिजित - १
पैसे का येत नाहीत अजून. आजच वाचले कि ५०० च्या नोटा आहेत बँक कडे. पण तोंडी सूचना आहेत कि त्या बाहेर काढू नका. अजून हि ATM बंद आहेत. जिथे पैसे आहेत तिथे लाईन आहेत मोठ्या. थोडक्यात लोकांनी कंटाळून पेटीम वापरा .. नाहीतर दुसरे कोणतेही online wallet वापरा हि सरकारची इच्छा दिसते.
तुमची माहिती चुकीची आहे. क्रेडिट कार्ड सगळ्यात सेफ आहे. you can always dispute wrong charges. And why should we pay 1% paytm charges ? to load paytm a/c .
25 Nov 2016 - 10:57 pm | स्रुजा
मला पेटीएम बद्दल काही माहिती नाही . ते एक अॅप आहे एवढंच ऐकुन आहे. त्यांचा गेटवे कोणता वगैरे अजिबातच माहिती नाही. बहुधा गेल्या काही वर्षातच ती प्रचलित झाली आहे. त्यामुळे त्या १% बद्दल माझ्याकडे काही मुद्दा नाहीये. १% न घेणे हेच योग्य हे मान्य आहे.
क्रेडिट कार्ड मध्ये तुम्ही डिस्प्युट करु शकता हे जरी बरोबर असलं तरी मुद्दा हा आहे की आपण ते निदान टाळू शकतो. मग ते वापरा , कॅशलेस राहा म्हणण्यावर विरोध का? आपल्याकडे कार्ड मशिनवर टॅप करता येतात का कार्ड्स? इथे आम्हाला बँकांच्या सूचना आहेत की टॅपवर मर्यादा ठेवा- दिवसाचे १०० $ वगैरे. कारण या प्रकारच्या ट्रँझॅक्शन्स मध्ये गल्लत होऊ शकते. त्या संदर्भात मी लिहीलं होतं की अशा काही शक्यता असल्या तरी आपण आपल्या व्यवहाराच्या मर्यादा सेट करुन ते टाळु शकतो.
आणि अशी काही मोठी स्किम असेल बँकांची आणि सरकारची की लोकांना पैसे असुन द्यायचे नाहीत हे मला तरी पटत नाही.
26 Nov 2016 - 12:50 pm | अभिजित - १
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/new-500-rup...
Maharashtra Times | Updated: Nov 23, 2016, 11:55 PM IST
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सर्वांनाच केवळ प्रतीक्षा असलेल्या नव्हे, तर तातडीची गरज बनलेल्या पाचशे रुपयांच्या नव्या नोटा पुण्यातील बहुसंख्य बँकांच्या ‘करन्सी चेस्ट’मध्ये पोहोचल्या आहेत; मात्र या नोटा नागरिकांना वितरित करू नयेत, असा तोंडी आदेश असल्यानेच या नोटा ‘करन्सी चेस्ट’मधून बाहेर पडलेल्या नाहीत. या नोटा वितरित होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
तुम्ही कुठे राहत माहित नाही. पण इथे रांगा आहेत ATM बाहेर. खूप ठिकाणी ATM बंद असतात पैसे नसल्या मुळे. आजचा मटा वाचा. सगळी कडे online व्यवहार करा असा धोशा आहे. लोकांना पैसे ना पुरवता त्यांच्यावर हि अघोषित जबरदस्तीच आहे.
26 Nov 2016 - 12:59 pm | विशुमित
हडपसर मधील SBI बँकेच्या ATM समोर गेले ४ दिवस १०० मीटर लाईन आहे. सुट्ट्या पैश्या अभावी बाहेर गावातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे खूप हाल होत आहेत.
27 Nov 2016 - 12:49 pm | अभिजित - १
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/less-cash-first-cashless-s...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा 'कॅशलेस' होण्याचा आग्रह धरला आहे. आधी 'लेस-कॅश' आणि नंतर 'कॅशलेस सोसायटी' अशी आपली वाटचाल असायला हवी. त्यासाठी मोठा कालावधी लागणार असला तरी रोखीशिवाय आर्थिक व्यवहार करण्यास प्राधान्य देऊन आपण त्यादिशेने पावलं टाकली पाहिजेत, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
27 Nov 2016 - 12:58 pm | अभिजित - १
बाकी कॅशलेस होऊन करप्शन कमी कसे होणार हे समजत नाही. मी समजा एखादा खाबू बाबू आहे, माझ्याकडे पास करायला फाईल आली आहे. मी सांगितले कि ५० हजार टाक तरच पास करतो. समोरचा माणूस ते उभे करणारच. जे आत्ता पर्यन्त चालेल आहे तेच पुढे चालणार .. काल गोलेचा म्हणून एक माणूस पकडला गेला मुंबई विमानतळावर. २ कोटीचे सोने आणि दोन हजाराच्या नोटमध्ये ७ लक्ष रु फक्त. याच्या कडे कसे आले पैसे.
http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=17766677
27 Nov 2016 - 8:05 pm | स्रुजा
वाचतीये, देते उत्तर थोड्या वेळात.
25 Nov 2016 - 10:41 pm | संदीप डांगे
सल्ल्यात कुठे काय वाईट आहे? सल्ला कुठेच चुकलेला नाही फक्त 'व्हॉट्सप कसे शिकलो तसे कॅशलेस शिका' हा उपदेश कोणाला लागू होतो? जे वॉट्सप वापरतायत त्यांना कॅशलेसकडे जायला मुळातच काही समस्या नाहीये, ते आनंदाने जात आहेत हे आपण रोजच्या जीवनात अनेकांना बघत आहोत, बघू शकतो. पण पंतप्रधान ज्यांना गरज नाही त्यांना हा उपदेश देत आहेत असे वाटत तर नाही ना?
ज्यांना गरज आहे (म्हणजे जे मुख्यतः रोखीने व्यवहार करतात) त्यांना हा उपदेश देऊन उपयोग नाही कारण प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेलच असे नाही.
नोटाबंदी अचानक (गुप्तता वगैरे) समजू शकतो पण हे कॅशलेस मध्येच, अचानक का ह्याचा काय उत्तर मिळत नाहीये.
25 Nov 2016 - 10:49 pm | स्रुजा
संदीप भाऊ, हल्ली प्रत्येकाकडे व्हॉट्सअॅप असतंच. फक्त १७ % लोकांकडे असतं ते असं म्हणायचंय का तुम्हाला? आपल्याकडे मोबाईल्स ची व्याप्ती आणि मार्केट किती आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आमच्याकडे आमची कार धुवायला, शेजारच्या बिल्डींग मध्ये काम करणार मजुर यायचा, त्याच्या ही कडे ४ वर्षांपूर्वी व्हॉट्सअॅप होतं ! हल्ली तर कुठल्याही बजेट मध्ये स्मार्ट फोन्स येतातच. जवळ जवळ प्रत्येक जण व्हॉट्सॅप शी कनेक्टेड असतोच. म्हणुन ते उदाहरण प्रत्येकाला पटेल असं आहे. मला वाटतं त्यांचा रोख होता तो तंत्रज्ञानाला बिचकुन कॅशलेसला विरोध होणे, यावर. हे फार अवघड नाही, व्हॉट्सअॅप पण कधी काळी नवीन होतं, आता सगळे शिकलेच ना मग हे पण शिकुन घ्या, असा त्यांचा मुद्दा आहे असं मला वाटलं.
तुम्ही म्हणताय ती वाय- फाय/ डेटा प्लान्स ची सुविधा. ती सगळ्यांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध नसते हे बरोबर आहे. पण त्याची मागणी वाढली तर सर्व्हिस प्रोव्हायडर्स मार्केटमध्ये स्पर्धेत उतरतील्च. जिओ का काय आहे तो नवीन डेटा प्लान, त्यांनी सुरुवात केली आहेच.
26 Nov 2016 - 12:32 am | संदीप डांगे
सृजातै, आकडे असे आहेत.
१. स्मार्टफोनधारकः भारतात स्मार्टफोनधारकांची संख्या २२ कोटी आहे. स्मार्टफोन वापरुन व्यवहार करु शकण्याच्या वयातले लोक सुमारे ९० कोटी आहेत. (१४-१६ पर्यंत वयाची लोकं गाळून - हल्ली तर ह्यापेक्षा कमी वयात मुलांकडे स्मार्टफोन देण्याचं चलन आहे). एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ही २२ कोटी जनता केवळ १७ टक्के आहे तर १८+ लोकसंख्येच्या प्रमाणात २५ टक्के आहे. म्हणजे अजून ७५ % जनता स्मार्टफोनशिवाय आहे. शहरांमधे ही घनता जास्त आहे हे आपणा सर्वांना अनुभवातून कळतेच आहे, याचाच अर्थ निमशहरी व गावाखेड्यात याची घनता कमी असणार. एकूण शहरी लोकसंख्या (५ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शंभर शहरं आहेत भारतात) सुमारे ४० कोटी आहे. ह्यात १८+ लोकसंख्या मोजली तर ती सुमारे २८ कोटी असेल.
२. बॅन्किंग नेटवर्कः एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ५५ कोटी लोकांकडे बॅन्क आकाउंट आहे, २०१३ मधे ४० कोटी व जनधन योजनेत उघडलेली १२.५ कोटी. ह्यात बहुतांश अकाउंट्स फक्त सरकारी योजनेचा लाभ वळता करण्यासाठी वापरली जातात. बॅन्केतून पैसे काढणे व भरणे इतकाच उद्देश असतो. बॅन्केतून व्यवहार बहुतांश जनतेला माहिती नाहीत कारण ह्यातली सुमारे ४० टक्के अकाउंट्स निष्क्रिय अवस्थेत आहेत. तुमच्या-माझ्यासारखे सुशिक्षित लोक जितक्या वैविध्यपूर्ण रितीने बॅन्केचा वापर करु शकतो तेवढा किमान अकाउंट्स असलेले ६० टक्के लोक करत नसावेत. इथे लोकशिक्षणाची गरज आहेच. आपल्या देशात शौचालय बांधा व वापरा यावर लोकशिक्षण करावे लागते तिथे बॅन्किंग बद्दल तर चांगभलं आहे. डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड चेकबुक्स इत्यादीचा अॅक्सेस व वापर ह्या अकाउंट होल्डरपैकी किती लोकांकडे असेल ठावूक नाही.
३. मोबाईल इन्टरनेट नेटवर्क: ह्या बातमी नुसार २०१६ च्या अंतापर्यंत २.५ लाख ग्रामपंचायतींना इन्टरनेटने जोडणे अपेक्षित आहे. हे काम कुठवर आलंय याबद्दल अधिक माहिती काढायला लागेल. ह्या बातमीनुसार ग्रामीण भागापैकी केवळ ९% भागाला व्यवस्थित इन्टरनेट अॅक्सेस आहे. तर एकूण देशात २३% आहे.
४. विजेची उपलब्धता.: देशातल्या सुमारे ३० कोटी लोकांना वीजच उपलब्ध नाहीये.
वरील आकडे लक्षात घेता सर्व १०० टक्के जनतेला कॅशलेस होणे आज आत्ता ताबडतोब शक्यच नाही. कॅशलेस होण्यास माझा अजिबात विरोध नाही पण तसे इन्फ्रा नसतांना अपेक्षा करणे अवाजवी आहे हे माझे सुरुवातीपासूनचे मत आहे (ह्यात कोणतेही राजकिय कारण नाही). वरील सर्व कारणे असली तरीही (म्हणजे इन्फ्रालेस असतांना) हातात कॅश असेल तर लोकांना व्यवहार करायला काहीच अडथळा येत नाही. खिशातून काढले, दिले लगेच हातात. कन्विनियन्स इज द की. पण कॅशलेस म्हटले तर आपल्याला वरची सर्व कारणे १०० टक्के सुरळित करावी लागतीलच, त्यात १ टक्काही सूट नको. कोणाचेही १ टक्काही व्यवहार वीज, इन्टरनेट, मोबाइल, बॅन्किंग, दळणवळण याशिवाय अडायला नकोत.
अशी दिव्य परिस्थिती असतांना जसे 'व्हॉट्सप शिकलात तसे कॅशलेस शिका' म्हणणे ग्राउंड रिअॅलिटी लक्षात न घेता म्हणणे अति वाटले. इन्फ्रा तयार नसतांना सर्वांनाच कॅशलेसकडे रेटणे ही जबरदस्तीच आहे. आधी पाया मग कळस असा मार्ग असतो. इथे उलट चालले आहे असे वाटते. शहरी भागात पाया भक्कम झालेला आहे त्यामुळे कळस बांधणे आपल्याला 'किस झाड की पत्ती' असे वाटते. सर्वच ठिकाणी ती परिस्थिती नाही. त्यामुळे ती उत्तम परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी अधिकाधिक वेगाने प्रयत्न व्हायला हवेत.
बरेचसे प्रगत देश कॅशलेस असल्याचे दाखले दिले जातात, ते कॅशलेस असल्यामुळे प्रगत नाहीत तर प्रगत असल्यामुळे कॅशलेस आहेत हे कोणी लक्षात घेत नाही.
26 Nov 2016 - 9:11 am | स्रुजा
सगळ्यात प्रथम, मला वाटते आपण व्हॉअॅ चा आलेला संदर्भ हा "नवीन तंत्रज्ञान शिकणे आपण नेहमीच करत असतो , हे देखील करु" एवढ्यापुरताच असावा. ते केवळ एक सर्वज्ञात उदाहरण म्हणुन वापरलं गेलं असावं.
शहरी आणि निम्नशहरी भागात, जिथे कॅशलेस व्यवहार सहज शक्य आहेत तिथे ही बरीच जनता खास करुन आज ५० शीच्या पुढे असलेली, तसं करायला बिचकतात. सुरक्षिततेबद्दल गैरसमज, तंत्रज्ञानाबद्दल अनास्था, जुन्या पद्धतींचं वळण पड्लेलं कशाला बदला असे सोयीस्कर विचार अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. म्हणजेच कॅशलेस न होण्यामागे काही भागांत सुविधांचा अभाव हे कारण नसुन, गैरसमज आणि मेंटल ब्लॉकस आहेत. ते बदलायला हवंय.
आता, आकडेवारी कडे वळुयात. या साईट प्रमाणे, पुढील ४ वर्षांत भारतातल्या स्मार्ट फोन वापरणार्यांचं प्रमाण हे दुपटीपेक्षा जास्त म्हणजे जवळ जवळ ४७ कोटी होणार आहे. अर्थातच हा अंदाज आहे पण तो जर प्रमाण मानायचा ठरवला तर जवळ जवळ ४० % जनता या ना त्या फोनवर इंटरनेट शी कनेक्टेड असणार आहे.
आत्ता इन्फ्रा नाही हे तर सरळच दिसतंय पण कुठेतरी सुरुवात ही करावीच लागणार. मुंगीच्या पावलांनी आता सुरुवात केली तर पुढील काही वर्षात सगळ्यांना सहजगत्या कळतील असे फायदे दिसू लागतील. मुळातच एवढ्या मोठ्या आणि इतक्या प्रचंड प्रमाणात विभागलेल्या जनसंख्येसमोर कोण्तीही नवीन गोष्ट ठेवताना त्याचे लॉजिस्टिकल चॅलेंजेस तितक्याच मोठ्या प्रमाणात असणार आहेत. पण सुरुवात ही कधीतरी व्हायलाच हवी एवढाच माझा मुद्दा आहे.
चेन्नई मधे पूर आला, ओला का उबर नी होडीसेवा सुरु केली होती. बदलत्या परिस्थितीमध्ये फटाफट सोयी सुविधा निर्माण करुन देणे आपल्याकडच्या व्यावसायिकांना चांगले साधते आणि त्या सोयींचा लाभ घेणारे पण बरेच असतात. इंटरनेट आणि इतर इन्फ्रा च्या बाबतीत पण तसं होण्याची शक्यता निदान शहरी आणि निम्नशहरी भागांमध्ये बरीच आहे.
ग्रामीण भागात जिथे वीजदेखील पोहोचली नाही अशा ठिकाणी होणारे व्यवहार पुढील काही वर्षं , निदान एखादं दशक तरी असेच चालू राहणार हे तर स्प्ष्ट आहे पण आत्ता सुरुवता केली तर कधी तरी ती १० वर्षं संपतील आणि तिथे ही हे लोण पोहोचेल. याच गतीने या सुधारणा होणार, त्याला काही इलाज नाही.
बाकी गुगल आणि सरकारच्या पुढाकाराने काही शे स्टेशन्स आता वायफाय सुविधा देणार आहेत असं मध्ये चालू होतं. ते एक प्रायोगिक तत्वावर सुरु करुन कदाचित पुढे मागे त्याची व्याप्ती वाढवता येईल. अनंत शक्यता निदान तयार होतायेत, एक एक शक्यता अजुन काही गोष्टींसाठी निमित्तमात्र ठरेल. त्यासाठी का होईना आणि मर्यादित परिघात का असेना पण ही एक चांगली सुरुवात आहे.
शिवाय "अचानक" आणि "ताबडतोब" असा आग्रह मला काही त्या बातमीत किंवा भाषणात जाणवला नाही. जबरदस्ती ही नाहीच आहे ही. रोख रक्कम बंद झालेली नाहीचे, त्यामुळे ज्यांना पायाभुत सुविधाच उपलब्ध नाहीत अशांसाठी जुना, रोख रकमेचा मार्ग आहेच .
26 Nov 2016 - 12:09 pm | पैसा
आता अधिक वाचते आहे तसे स्मार्टफोन किंवा डेटा प्लॅन नसताना #९९ सेर्व्हिसवर केवळ एसेमेस वर पेमेंट्स करता येतात असे दिसते. http://www.npci.org.in/Product-Overview-NUUP.aspx
https://www.syndicatebank.in/downloads/MFT-Aadhar.pdf
http://www.npci.org.in/documents/FAQs-NUUP.pdf
26 Nov 2016 - 12:33 pm | संदीप डांगे
हो, हे एसेमेसने पेमेंट बद्दल मागेच बोललो होतो, पण त्याबद्दल कुणीच (इथेच असं नाही, जनरल सगळीकडेच) बोलताना दिसलं नाही, सगळे पेटीयमच्याच गोष्टी करतायत.
26 Nov 2016 - 12:47 pm | पैसा
प्रचार प्रसार यात बँका खूप कमी पडल्यात. त्यातून विशेष उत्पन्न मिळण्यासारखे नाही हे कारण असावे. आमच्या बँकेचे क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल अॅप लाँच झाले तसे निदान सगळ्या स्टाफला घ्या घ्या म्हणून सांगितले होते. पण ही #९९ सर्व्हिस आधी सुरू झालेली असून त्याबद्दल कोणाला माहिती नाही हे धक्कादायक आहे.
26 Nov 2016 - 12:57 pm | पैसा
*९९# वापरून बॅलन्स चेक केला.
26 Nov 2016 - 2:00 pm | jp_pankaj
*९९# चा वापर कमी असण्याचे कारण याचा पासवर्ड जनरेट करण्यासाठी ( मनी ट्रान्संफर वापरण्यासाठी )
बँकेच मोबाईल अॅप डावुनलोडवाव लागत.जे स्मार्टफोन खेरीज शक्य माही.
आणी ही सेवा वापरणे फु़कट नाही.
*९९# = १ रु.
बँकेचा कोड टाकणे = १ रु.
बेलेंस चा कोड टाकणे - १ रु.
शिवाय या साठी तुमचा मोबाईल नंबर बँ खात्याशी सलग्न हवा,लोक जिथे दर महिण्याला नवी स्कीम आली म्हणुन मोबाईल्चे सिमकार्ड बदलतात तिथे ही सेवा राबवणे आवघड आहे.
(*९९*४२#) जेपी
26 Nov 2016 - 2:01 pm | jp_pankaj
जे स्मार्टफोन खेरीज शक्य माही.
शक्य नाही असे वाचावे.
26 Nov 2016 - 2:17 pm | पैसा
एम पिन पण तिथेच जनरेट होतो. मी आता बॅलन्स चेक केला तो USSD वरून. एसेमेस चे पैसे कट झाले नाहीत. तसे पाहिले तर काहीच संपूर्ण फुकट नसते. जिथे इंटरनेट उपलब्ध नाही किंवा स्मार्टफोन नाही तिथेही कॅशलेस साठी हा एक पर्याय आहे हे नक्की.
26 Nov 2016 - 2:43 pm | jp_pankaj
एम पिन पण तिथेच जनरेट होतो. मी आता बॅलन्स चेक केला तो USSD वरून. एसेमेस चे पैसे कट झाले नाहीत. तसे पाहिले तर काहीच संपूर्ण फुकट नसते. जिथे इंटरनेट उपलब्ध नाही किंवा स्मार्टफोन नाही तिथेही कॅशलेस साठी हा एक पर्याय आहे हे नक्की.
हे बहुतेक मोबाईल सर्व्हीस प्रोवायडर वर अवलंबुन असाव.
शिल्लक तपासणे आणी रक्कम पाठवणे या सठी वेगळा पिन लागतो.
अवांतर -(कुनलातरी पयशे पाठवुन बघा, माझ्या सारख्या गरीबाला पाठवलत तर दुवा देऊ, =))}
26 Nov 2016 - 2:58 pm | पैसा
तुझा एमेमायडी आणि नम्बर पाठव मला. आताच प्रयोग करते. किती पैसे पाठवलेत हे मात्र कोणाला सांगायचं नाही हां.
26 Nov 2016 - 1:22 pm | हतोळकरांचा प्रसाद
बरेच लोक चर्चा करताना कॅशलेस आणि पेटीएम यात गल्लत करत आहेत. पेटीएमचं नाव सारखं येण्याचं कारण ते प्रसिद्ध झालं आहे आणि शिवाय वापरायला खूप सोप्पं आहे. कॅशलेस = मोबाईल वॉलेट्स (पेटीएम, ऑक्सिजन, एअरटेल मनी, ऍक्टिव्ह अकाउंट इ.), डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट गेटवेज, ऑनलाईन बँकिंग इ.
25 Nov 2016 - 9:57 pm | हतोळकरांचा प्रसाद
बातमी वाचली, त्यात पेटीएम लिहिलेलं आढळलं नाही कुठे.
25 Nov 2016 - 10:22 pm | अभिजित - १
त्याचे काय आहे मोदी , भाजप , संघ इत्यादी लोक वेगवेगळ्या मार्गानी भारतीय जनतेचे मेंढरू हाकत आहेत. RSS सारखी संस्था पेटीम कार्यशाळा आयोजित करत आहे. मोदी फक्त पेटीम चे नाव घेत नाहीत.
one whatsapp message I received. You can check with your friends in Dombivali ..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
डोंबिवली शहर – बाजीप्रभु नगर
आयोजित
सेमिनार:- प्लास्टिक मनी आणि पे टिएम् कार्यशाळा
शुक्रवार २५.११.२०१६ रात्री :- ९.३० बजे स्थान :- सर्वेश सभागृह, ताई पिंगळे चौक, डोंबिवली पूर्व
सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश :-
१. प्लास्टिक मनी / इ मनी ट्रान्स्फर म्हणजे काय आणि त्याला प्रोत्साहन का द्यायला हवे, या बद्धल माहिती.
२. हे व्यवहार कसे होतात? यासाठी किती प्रकारची अप्लिकेशन उपलब्ध आहेत याचे अभ्यासपूर्ण विवेचन.
३. दैनंदिन जीवनात ज्यांच्याशी व्यवहार होतो त्यांना यासाठी प्रोत्साहन देणे आणि जास्तीत जास्त व्यवहार इ मनी / प्लास्टिक मनी चा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याविषयी.
४. उदाहरण म्हणून पे टीएम नावाच्या अप्लिकेशनचा वापर सर्वांना शिकविणे. (Practical करून घेणे)
26 Nov 2016 - 11:48 am | jp_pankaj
26 Nov 2016 - 12:02 pm | संदीप डांगे
http://www.loksatta.com/anyatha-news/currency-decision-in-america-1348367/
26 Nov 2016 - 1:06 pm | हतोळकरांचा प्रसाद
दिवसेंदिवस लोकसत्ताचा अभ्यास कमी होतोय आणि द्वेषयुक्त लिखाण वाढतंय! भारत-अमेरिका आणि भारत-स्वीडन तुलना! सगळंच अगम्य आहे! चालायचंच!
26 Nov 2016 - 1:11 pm | संदीप डांगे
लेखातल्या विचारांचा (अभ्यास कमी वगैरे) प्रतिवाद करू शकाल काय? कुठे व काय अभ्यास कमी पडला ते सांगितले तर आभारी राहीन!
(कुबेर सर्वज्ञ आहेत हे मी मानत नाही पण आपल्याला जे पटत नाही ते पुराव्यानिशी खोडावे असं साधारण मानल्या जातं)
26 Nov 2016 - 1:58 pm | हतोळकरांचा प्रसाद
जरूर करतो, थोडा वेळ लागेल. बाकी "पण आपल्याला जे पटत नाही ते पुराव्यानिशी खोडावे असं साधारण मानल्या जातं" हे तेवडं झ्याक बोलला बगा तुमी!
26 Nov 2016 - 7:07 pm | माहितगार
संदीपराव कुबेरांच्या लेखाला मोरेसर किंवा मिल्टन अधिक चांगले उत्तर देऊ शकतील. मी माझ्या परीने प्रयत्न करतो. काही काळाकरता मोदींच्या अंमलबजावणीतल्या यशापयशाला बाजूला ठेवा. आधी दवंडी पिटवून पूर्व सूचना देऊन चलन निर्मुल्यन/ बदल नवी गोष्ट नाही. चलन निर्मुल्यन/ बदल अचानक करावयचे का सावकाश सांगून दोन्ही पर्याय अस्तीत्वात असतात पर्यायाची निवड साध्य काय आहे त्यावर अवलंबून असेल किंवा कसे ?
मी देशाचा अर्थ सल्लागार आहे, माझ्या देशाची अर्थव्यवस्था डेफिसीट मध्ये आहे आणि चलनफुगवटा आणि महागाईचे ते एक महत्वाचे कारण आहे; -त्या शिवाय व्याजाचे दर अधिक आहेत की ज्यामुळे वस्तुवरील उत्पादन खर्च स्पर्धात्मक राहीलेला नाही, देशातंतर्गत उत्पादन खर्च अधिक आहे म्हणून वस्तु आयात होत आहेत संमांतर अर्थव्यवस्थेच्या भरवशावर खपत आहेत पण मॅन्युफॅक्चरींग होत नसल्यामुळे बेकारी आहे बेकार लोक रस्त्यावर आंदोलनासाठी उतरत आहेत; मी काहीच अॅक्शन नाही घेतली तर काही वर्षांनी महागाई स्पायरल होईलच रस्त्यावर उतरलेले लोक अधिक अराजकता माजवतील आणि अराजकाची स्थिती दीर्घकाळ राहणारी असू शकेल या भविष्य-चित्रा पासून मला देशाची सुटका करावयाची आहे.
जे लोक अलरेडी कर भरत आहेत त्यांच्या वरील कर मला अजून वाढवता येत नाहीत पण मला डेफिसीट तर भरून काढायचे आहे; माझ्या डोळ्या समोर कर न भरणारी प्रचंडमोठी समांतर अर्थव्यवस्था दिसते आहे, मी लोकांना आधी सांगून मोठ्या कालावधीची संधी देऊन चलन निर्मुल्यन करु शकतो खरे आहे पण मी तसे केले तर, एक समांतर अर्थ व्यवस्थेतला पैसा सोन्यात गुंतवला जाईल ज्यामुळे परकीय चलन गंगाजळीत घट होऊन अर्थ व्यवस्थेला अधिक मोठे भोक पडेल, दुसरे स्थावर मालमत्तेत पैसा गुंतवला जाईल लँडबँकेत अत्याधिक पैसा गुंतवला गेल्यामुळे -आठवा सत्यमच्या राजू ने काय केले होते- शेतजमिनींची उपलब्धता कमी होणार दुसरीकडे शेतजमिनींच्या किमती वाढून शेतकी उत्पादन खर्च वाढून भारतात पिकणारा शेतमाल किंमतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकणार नाहीत शिवाय घरांच्या किंमती सामान्य माणसाच्या अधिकच हाता बाहेर जातील पण काही केलेतरी पैसा वस्तु / शेती उत्पादनात समांतर अर्थव्यवस्थेतील पैसा अपेक्षीत प्रमाणात गुंतवला जाणार नाही; तेच मी धक्कातंत्र वापरले तर काळापैसा बँकेत जमा होईल /किंवा चलनात राहणार नाही मला त्यावर मोठा कर लावून डेफिसीट कमी करता येईल. जमल्यास व्याजाचे दर उतरवता येतील. जर पैसा कमी व्याज दराने वस्तु आणि शेतकी उत्पादनात लागला तर अर्थव्यवस्था अधिक सक्षमपणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेस तोंड देईल रोजगारही वाढेल.
चलन तात्पुरत्या काळासाठी कमी उपलब्ध झाल्यास मंदीचा धोका संभवतो पण मंदीचा धोका तात्पुरता असेल पण काही असे फायदे नक्कीच आहेत की ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने सावरता येईल.
आता अंमलबजावणीतील अडथळे आणि अडचणी कशा पद्धतीने हाताळल्या जातात; त्या शिवाय लोकांना वस्तु आणि शेतकी उत्पादनात पैसा लावण्यास आणि कष्ट करण्यास कसे उद्यूक्त करता यावर एकुण कार्यवाहीचे यश अवलंबून असावे. अंमलबजावणीतील अडथळे आणि अडचणी तात्पुरत्या एखाद दोन फारतर चार महिन्यांचा प्रश्न असतील. अधिक मोठे आणि अधिक गंभीर आव्हान भारतीय लोकांना वस्तु आणि शेतकी उत्पादनात पैसा लावण्यास आणि कष्ट करण्यास कसे उद्यूक्त कराल याचे आहे. नसता व्याजाचे दर कमी झालेकी परकीय उत्पादक आनंदाने येतील भारतीय बँकातील भांडवल वापरून उद्योग उभारतील - रोजगारही उपलब्ध होईल पण भांडवलावरील नफा आणि पर्यायाने मालकी परकीय उद्योजकांकडे जात राहील.
आता राजकीय बाजू
सरकारने अंमलबजावणीतील कमतरता मान्यकरून पाऊल मागे घेतले तरी राजकीय हाराकिरीच होणार त्यापेक्षा जे केलय त्याचे क्रेडीट घेण्यात शहाणपण असे समजून सरकारातील पक्ष पाय मागे घेण्याची शक्यता अत्यल्प असेल हे निश्चित. सरकारने जी स्टेप घ्यायची ती घेतली ती आता बदलली जाण्याची शक्यता कमी, तुम्ही त्या बद्दल वाद घालून सरकारचा निर्णय किती बदलला जाईल माहित नाही फार फारतर पुढच्या निवडणूकी मिपावरील ३० हजार वाचक सरकारच्या विरोधात मतदान करतील की ज्यामुळे एकुण निवडणूकीवर राजकारणावर शष्प फरक पडणार नाही.
आपण भारतीय वस्तु आणि शेतकी उत्पादनात पैसा लावण्यास आणि कष्ट करण्यास कसे उद्यूक्त होऊ हा चर्चांचा मुख्य विषय व्हावयास हवा तसे होऊ शकले नाही तर राजकारण होईल राजकीय पक्ष येतील जातील सामान्य जनतेचा भ्रम निरास झालेला असेल.
26 Nov 2016 - 8:45 pm | jp_pankaj
+1 प्रतिसाद आवडला.
कुबेरांचा लेख ,बघा तिकडे कसे चांगले आहे आणी आपल्याकडे कस चाललय',
या नेहमीच्या पठडीतला आहे.
27 Nov 2016 - 7:27 pm | हतोळकरांचा प्रसाद
अगदी हेच म्हणायचे होते मला! लेखात अभ्यास कमी पडलाय तो हा. सरळसरळ दोन देशांची तुलना करून हे बघा तिथे किती व्यवस्थित हाताळलं गेलं आणि इथे बघा कसा गोंधळ, या थाटणीचा लेख आहे. ६० लाख लोकसंख्येचा रेफरन्स देऊन सांगणे काय तर एवढ्या कमी जनतेची काळजी आहे म्हणून ५ वर्ष आधी कॅशलेसचा निर्णय सांगितला. ६० लाख लोक कसे आहेत, त्यांची आर्थिक साक्षरता काय आहे, तिथला कॅशलेस चा निर्णय वि. इथला निर्म्युलनाचा निर्णय, ६० लाख लोकांचं नियोजन वि. ७०-८० कोटी लोकांचं नियोजन वगैरे मुद्यांचा विचार न करता वाचकांचा बुद्धिभेद एवढा साधा विचार. कुमार केतकरांच्या मार्गदर्शनाखालीच हा लेख लिहिला गेल्यासारखं वाटलं.
27 Nov 2016 - 1:35 pm | संदीप डांगे
प्रतिसादाची नोंद घेतली आहे, उत्तर वेगळ्या ठिकाणी ह्याचा संदर्भ घेऊन देईन,
बाकी, इथल्या 30 किंवा 30 हजार वाचकांना प्रभावित करण्यासाठी मी इथे लिहीत नाही, मला जे वाटतं ते लिहितो. त्यामुळे निवडणुकीतील राजकारणावर शष्प काय किंवा हिमालयाएवढा काय, बदल माझ्या लिहिण्याने पडेल कि नाही याची काळजी मी करत नाही. तुम्हाला करावासा वाटला याचे कौतुक वाटले!
27 Nov 2016 - 7:12 pm | हतोळकरांचा प्रसाद
सहमत!
27 Nov 2016 - 2:09 pm | श्रीगुरुजी
कुबेरांच्या लेखातून -
कुबेरांना अमेरिकेची पुरेशी माहिती नाही. मॅक्डोनल्ड्स, बर्गर किंग इ. फास्ट फुड दुकानातून फक्त रोख रक्कमच स्वीकारली जाते. ते क्रेडीट कार्ड घेत नाहीत. अपार्टमेंटचे भाडे फक्त चेक्सनेच स्वीकारले जाते. तिथे क्रेडीट कार्ड किंवा रोख रक्कम स्वीकारत नाहीत. टपरी पद्धतीची छोटी दुकाने शहरात नसली तरी छोट्या गावात अल्प प्रमाणात असतात. ते फक्त रोख रक्कमच घेतात. काही ठिकाणी शनिवारी/रविवारी सकाळी जवळच्या गावातले शेतकरी स्वतःच्या गाड्यातून ताजी भाजी विकण्यास आणतात. ते फक्त रोख रक्कम घेतात. वर्तमानपत्रे दुकानातही मिळतात व व्हेंडिंग यंत्रातूनही मिळतात. व्हेंडिंग यंत्रातून वर्तमानपत्राबरोबरच, सॉफ्ट ड्रिंक्स्चे कॅन्स, किरकोळ खाद्यपदार्थ इ. मिळते व व्हेंडींग यंत्र फक्त रोख रक्कम स्वीकारते. तिथे क्रेडीट कार्ड किंवा चेक चालत नाही. अमेरिकेत बहुसंख्य ठिकाणी क्रेडीट कार्ड, चेक किंवा रोख रक्कम स्वीकारत असले तरी फक्त रोख किंवा फक्त चेक किंवा फक्त क्रेडिट कार्ड स्वीकारणारी बरीच ठिकाणे आहेत. एटीएम यंत्रे कानाकोपर्यात मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याने खिशात रोख पैसे नसले तरी फारसे अडत नाही. अमेरिका अजून पूर्ण स्वरूपात कॅशलेस झाली नसली तरी बर्याच प्रमाणात कॅशलेस झालेली आहे.
26 Nov 2016 - 3:55 pm | ओम शतानन्द
१) bank of Maharashtra -- DOMBIVLI EAST
cash deposit old notes Rs 2000/- Aadhar card original and photocopy,& cash withdrawal Rs.6000 (2000*2 + 100*20 ) total time for depositing cash -- 20 minutes
2) DNS bank main branch - withdrawal 2000/- (100*20) time 15 minutes no document rqd except passbook
3) NKGSB bank - withdrawal 4000 time10 min no document reqd except passbook
4) DNS BANK NEHRU MAIDAN BR - WITHDRAWAL DENIED pancard and aadhar card original and photocopy compulsory as per RBI , I had aadhaar copy and original and pan photocopy only. My account was KYC compliant , but still I was told to produce Pan card in original, I asked them that in other branch they never asked me for original PAN as my account is KYC, but I was told that not to argue and waste time here, would be better if ask such questions to RBI
26 Nov 2016 - 4:51 pm | अमर विश्वास
दोन दिवसांपूर्वी कोटक बँकेने (आमची सॅलरी अकाउंट्स या बँकेत आहेत ) आमच्या ऑफिसमध्ये येऊन रोख रक्कम वितरीत केली
प्रत्येकी २००० रुपये पहिल्या २०० जणांना .... हा त्यांची दुसरी वेळ .... पुढच्या आठवड्यातही असा एक्सटेंशन काउंटर चालवणार आहेत
26 Nov 2016 - 6:59 pm | शलभ
आमच्या ही ऑफीस मधे येणार आहेत.
26 Nov 2016 - 5:38 pm | सामान्य वाचक
1 नोट मिळाली
7 मिनिटे लागली
काळ icici च्या कॅश deposit atm मध्ये जुन्या नोटा भरल्या
वेळ 3 मिनिटे
26 Nov 2016 - 8:16 pm | संदीप डांगे
टाटा डोकोमो 500 च्या जुन्या नोटा स्वीकारून 600 चा टॉक टाईम देत आहेत. आज एसेमेस आला... हे कसे कायदेशीर?
27 Nov 2016 - 7:53 pm | हतोळकरांचा प्रसाद
नक्की काय कायदेशीर कसे विचारत आहात? फक्त ५०० घेऊन ६०० चा टॉकटाइम कि बंद नोटेतुन रिचार्ज? सेल्युलर ऑपेरेटर्स असोसिएशनने सरकारला विनंती केली होती कि टेलिकॉम् सेवेला गरजेची सेवा मानून बिएसएनएलप्रमाणे बाकीच्या कंपन्यांनादेखील बिलांसाठी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी द्यावी, सरकारने ती अंशतः मान्य करून प्रिपेडसाठी परवानगी दिली आहे. मला वैयक्तिकरित्या हा निर्णय पटला नाही पण बेकायदेशीर काय ते कळले नाही.
28 Nov 2016 - 12:02 am | संदीप डांगे
बंद नोटे बद्दल बोलतोय, आज नवा मेसेज 500 च्या जुन्या नोटेत 10 जीबी डेटा आणि 90 दिवस वैधता.
पण असा रिचार्ज करणाऱ्याचे आयडी माहिती बूथ वाल्याने गोळा करायची व सरकारला द्यायची,
30 Nov 2016 - 12:21 pm | हतोळकरांचा प्रसाद
बहुतेक तुमचा प्रतिसाद अर्धाच टंकला गेलाय. मलाहि कळले नाही नक्की काय योजना आहे ते. पण हा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय वाटला.
27 Nov 2016 - 12:26 pm | अभिजित - १
काळ डोंबिवली स्टेशन (वेस्ट ) वर ATM समोर १०० माणसे लाईन मध्ये उभी. संध्याकाळी ६ वाजता .. VT एन्ड ATM .
27 Nov 2016 - 1:56 pm | मदनबाण
हल्लीच... ३ तास लाइन मध्ये उभे राहुन पैसे काढले... ५०० च्या नोटा मिळवण्यासाठी आधी १५०० व नंतर १००० असे काढले, त्यामुळे सगळ्या ५०० च्या नोटा मिळाल्या. :)
लोकांचा पगार होण्याचा कालावधी जवळ आला असुन येत्या दिवसात एटीएम लोड वाढण्याची शक्यता दिसत आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Amazing Talent Video... :)
30 Nov 2016 - 11:48 am | विचित्रा
आज कामाच्या ठिकाणाच्या जवळ असणार्या 'महा' बँकेतून १५०० रु. चेकने काढण्याचा प्रयत्न केला.आमच्या छोट्या गावात दोन हजार सुटे मिळणं, फार खटपटीचं ठरतं, म्हणून हा उद्योग.
पण २५ मिनिटे रांगेत थांबल्यानंतर, पैसे फक्त हजारच्या पटीत काढता येतील, असं सांगून पाठवणी केली.
30 Nov 2016 - 12:00 pm | नाखु
बँकेत रोकड काढ्ण्याची मर्यादा सात हजारापर्यंत करण्यात आली होती (सुरुवातीला ४ हजारच होती)
र
काल सहा हजार काढले. सगळ्या २ हजाराच्या नोटा.
दुसर्यांदा लाईनतला नाखु
30 Nov 2016 - 12:28 pm | विशुमित
मेव्हण्याने लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली.
रु.१० च्या १०० नोटा
+
रु. १०० च्या १९० नोटा
------------------------
= रु.२०,०००
दिवाळीत चेस्टने अंगठी मागितली होती, त्याला जिव्हारी लागले बहुतेक, फकड्याने कहरच केला.
आता २ महिने काळजी नाही.
पण सासरवाडीच्या उपकाराच्या ओझ्या खाली दबलोय आता.
जय मोदी..!!
30 Nov 2016 - 12:34 pm | अनिरुद्ध.वैद्य
मध्ये १५ मिनिटांमध्ये काम झाले. मी निघालो तेव्हा, फार फार तर १० लोकं होती लाईनीत.
30 Nov 2016 - 1:08 pm | टवाळ कार्टा
मी पण हेच लिहायला आलेलो