आपले बालपण आपले वर्तमान आणि भविष्य ठरवते.आपल्या बऱ्या-वाईट वागणुकीची बीजे आपल्या लहानपणात असतात.मुलांचा भावनिक विकास खूप महत्वाचा असूनही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.यावर मते अपेक्षित आहेत.
आजकाल स्पर्धा प्रचंड आहे.आपलं मूल पुढे जावं असं प्रत्येक पालकाला वाटतं.त्यासाठी जमेल ते प्रयत्नही होतात.पण हार्ड स्कील्स सोबत सॉफ्ट स्कील्सच्या विकासाकडे तितकासा फोकस असत नाही. बहुतेक घरांत एकच मूल असतं.त्याला नकाराची सवय सहसा लागत नाही.उद्धटपणा,हट्टीपणा दिसल्यावर पालक चिंतीत होतात.पुर्वी एकत्र कुटुंबामुळे, वाडा, गल्ली, मोहल्ला अशा युनिट्समुळे वेगवेगळे बरे वाईट संस्कार होऊन लोकांचे व्यक्तिमत्व हे बहुरंगी, बहुढंगी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकेल असे होत असे.जागतिकिकरण, दृकश्राव्य माध्यमे, दूरसंचार माध्यमे यांच्या अतिरेकाने हे सारे झपाट्याने हरवले.अशा वेळी भावनिक विकास या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं.कारण माणसाच्या सगळ्या गोष्टींचा बेस शेवटी भावनाच असतात.दुर्दैवाने आजकाल यशाची मोजमापं बदललीत.लहान असताना परीक्षेतले यश आणि मोठं झाल्यावर पैसा कमावण्यालं यश यालाच महत्व दिलं जातं.संस्कार म्हणा,सवयी म्हणा,मूल्ये म्हणा,याचा मूळ पाया लहानपणातच घातला जातो.पण त्याकडेच दुर्लक्ष होताना दिसतं.
जागतिक ख्यातीच्या बालमानसोपचार तज्ञाने लिहीलेलं हे पुस्तक. लहानपणी जर मुलांना धक्का बसेल अशी घटना घडली तर मुलांच्या व्यक्तिमवावर काय परीणाम होतो यावरील हे पुस्तक. अमेरीकेतील बाल आणि युवा गुन्हेगारीचे विश्लेषण.
भावनिक बुद्धीमत्ता केंद्रस्थानी ठेऊन बालसंगोपन समजावून सांगणारे सुंदर पुस्तक
३. आनंदयात्रा संगोपनाची - डॉ. लता काटदरे
मराठीतील बालसंगोपन या विषयावरील निवडक पुस्तकांपैकी एक. हेच पुस्तक इंग्रजीत Growing Together या नावाने उपलब्ध आहे.
आणि आत्ता शेवटचे मराठीतील बालसंगोपन विषयावरील सर्वकालिक उत्तम पुस्तक

प्रतिक्रिया
13 Nov 2016 - 7:45 pm | माम्लेदारचा पन्खा
तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते ध्वनित होत नाही त्यामुळे मतंही उथळ मांडली जाण्याची शक्यता आहे
20 Nov 2016 - 8:42 pm | वृंदा१
आजकाल स्पर्धा प्रचंड आहे.आपलं मूल पुढे जावं असं प्रत्येक पालकाला वाटतं.त्यासाठी जमेल ते प्रयत्नही होतात.पण हार्ड स्कील्स सोबत सॉफ्ट स्कील्सच्या विकासाकडे तितकासा फोकस असत नाही. बहुतेक घरांत एकच मूल असतं.त्याला नकाराची सवय सहसा लागत नाही.उद्धटपणा,हट्टीपणा दिसल्यावर पालक चिंतीत होतात.पुर्वी एकत्र कुटुंबामुळे, वाडा, गल्ली, मोहल्ला अशा युनिट्समुळे वेगवेगळे बरे वाईट संस्कार होऊन लोकांचे व्यक्तिमत्व हे बहुरंगी, बहुढंगी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊ शकेल असे होत असे.जागतिकिकरण, दृकश्राव्य माध्यमे, दूरसंचार माध्यमे यांच्या अतिरेकाने हे सारे झपाट्याने हरवले.अशा वेळी भावनिक विकास या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं.कारण माणसाच्या सगळ्या गोष्टींचा बेस शेवटी भावनाच असतात.दुर्दैवाने आजकाल यशाची मोजमापं बदललीत.लहान असताना परीक्षेतले यश आणि मोठं झाल्यावर पैसा कमावण्यालं यश यालाच महत्व दिलं जातं.संस्कार म्हणा,सवयी म्हणा,मूल्ये म्हणा,याचा मूळ पाया लहानपणातच घातला जातो.पण त्याकडेच दुर्लक्ष होताना दिसतं.
13 Nov 2016 - 9:07 pm | एस
मतांचं करणार काय?
14 Nov 2016 - 1:25 am | सतिश गावडे
तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे हे लक्षात येत नाही. जर तुम्हाला सल्ला हवा असेल तर मी या विषयावरची काही उत्तम पुस्तकं सुचवू शकेन.
१. Emotional Intelligence: Why It Can Matter More Than IQ - Daniel Goleman
भावनिक बुद्धीमत्ता या विषयावरील हे क्लासिक पुस्तक.
२. The Boy Who Was Raised as a Dog - Bruce Perry
जागतिक ख्यातीच्या बालमानसोपचार तज्ञाने लिहीलेलं हे पुस्तक. लहानपणी जर मुलांना धक्का बसेल अशी घटना घडली तर मुलांच्या व्यक्तिमवावर काय परीणाम होतो यावरील हे पुस्तक. अमेरीकेतील बाल आणि युवा गुन्हेगारीचे विश्लेषण.
३. Raising An Emotionally Intelligent Child - John Gottman
डॅनियल गोलमनच्या भावनिक बुद्धीमत्ता या सांकल्पनेवर आधारीत भावनिकदृष्ट्या बुद्धीमान मुलं कशी घडवावीत यावरचं सुंदर पुस्तक.
ही झाली अमेरिकन लेखकांनी अमेरिकन बालसंगोपनाला अनूसरुन लिहीलेली पुस्तकं.
आता आपल्या मराठमोळ्या लेखकांनी लिहीलेली या विषयावरची अतिशय सुंदर पुस्तकं:
१. विवेकी पालकत्व - डॉ. अंजली जोशी
विवेकनिष्ठ भावनिक वर्तणुक उपचारपद्धतीवर आधारीत (REBT - rational emotive behaviour therapy) या पद्धतीवर आधारीत बालसंगोपनासंबंधी सुंदर पुस्तक.
२. जावे भावनांच्या गावा - डॉ. संदीप केळकर
भावनिक बुद्धीमत्ता केंद्रस्थानी ठेऊन बालसंगोपन समजावून सांगणारे सुंदर पुस्तक
३. आनंदयात्रा संगोपनाची - डॉ. लता काटदरे
मराठीतील बालसंगोपन या विषयावरील निवडक पुस्तकांपैकी एक. हेच पुस्तक इंग्रजीत Growing Together या नावाने उपलब्ध आहे.
आणि आत्ता शेवटचे मराठीतील बालसंगोपन विषयावरील सर्वकालिक उत्तम पुस्तक
४. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती - डॉ. ह. वि. सरदेसाई
बालसंगोपनावरील बरंचसं पारंपारीक पद्धतीचं पण तरीही वैज्ञानिक तथ्यापासून फारकत न घेणारं मराठीतील एक जुनं आणि तरीही सुंदर पुस्तक.
20 Nov 2016 - 8:41 pm | वृंदा१
धन्यवाद.पुस्तकं मिळवायचा प्रयत्न करते.
14 Nov 2016 - 1:47 am | चित्रगुप्त
कशावर मते अपेक्षित आहेत हे कळले नाही. दोन ओळींचा धागा काढण्याऐवजी मुळात धागाकर्त्याची जी काही मते असतील, ती मांडली गेली पाहिजेत आधी.
20 Nov 2016 - 8:40 pm | वृंदा१
मी मिसळपाववर नवीन आहे.प्लीज अशाच उपयुक्त सुचना कराव्यात.
20 Nov 2016 - 8:39 pm | वृंदा१