हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
13 Nov 2016 - 4:52 pm

आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार. लाखोंची रोज उलाढाल करणारे चांदनी चौक सदर बाजारातले अधिकांश व्यापारी आयकर इत्यादी भरत नाहित. (चांदनी चौक आणि सदर बाजार देशातील सर्वात मोठे थोक व्यापारचे केंद्र आहेत). बाकी देशात हि हीच परिस्थिती आहे, ९९ टक्के थोक आणि फुटकर व्यापारी आयकर भरत नाही किंवा अत्यंत कमी भरतात (मोठे मोठे शोरूम जिथे ई-मनी स्वीकारल्या जाते, मजबूरी में काही प्रमाणात कदाचित आयकर भरत असतील). आजच्या digital युगात इमानदार व्यापारीला रोख मध्ये आर्थिक व्यवहार करण्याची गरज नाही. हजार रुपयांच्या वरची खरीदारी ई-मनी द्वारा सहज होऊ शकते. यात चोरी आणि डकैतीची भीती हि नाही. तरीही आयकर इत्यादी सरकारी कर चुकविण्यासाठीच देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोखमध्ये होतात. याचा अर्थ एकच निघतो, आपल्या देशात अधिकांश लोक कर चोरी करतात.

देशात १४.६ लक्ष कोटी १००० आणि ५००च्या नोटा आहेत. त्यातले किमान ७-८ लक्ष कोटी रूपये आयकर इत्यादी सरकारी कर चुकवून जमा केलेला आहे. गेल्या ८ नोव्हेंबरला प्रधानमंत्री मोदीनी १०० अणि ५००च्या नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली. त्या क्षणापासून बातम्या ऐकतो, आहे, जुन्या नोटांचा वापर लोक संपती कर, विजेचे आणि इतर पाणीपट्टी, संपती कर इत्यादी थकित बिले भरण्यासाठी करत आहेत. सूरत असो वा ठाणे सर्व नगरपालिकांची तिजोरी भरत आहे.

मनात एक प्रश्न आला, आधी या लोकांनी बिले का नाही भरली. कारण स्पष्ट आहे, सरकारी बिले भरायची नसतात. सरकारी कर कधी द्यायचा नसतो. कधी न कधी राजनेता बिल माफी देतातच (दिल्लीत आमच्या इमानदार सरकारने ४-५ हजार कोटींची वीज आणि पाणीपट्टी माफ केली). आमच्या सारखे नियमित बिले भरणारे इमानदार मूर्ख बनले. आता नोटा रद्द झाल्या, रद्दी कागज सरकारच्या माथी मारून बिले भरणे म्हणजे एक प्रकारची कर माफीच. काल पर्यंत ३ लक्ष कोटी रुपयांचे चलन बँकांनी बदलून दिले तरीही हि मोठ्या मोठ्या रांगा संपत नाही आहे, कारण स्पष्ट आहे. बहुतेक गरीब जनतेचे निष्क्रिय जनधन खाते मोठ्या प्रमाणात जागे झाले आहेत. कमिशन घेऊन पैसा जमा करण्याचा खेळ सुरु झाला आहे. आधार कार्डचा उपयोग गरीब जनता, करबुडव्यांचे दररोज ४००० काळे रुपये (५०० रुपये कमिशन घेऊन) स्वच्छ करून देत आहेत. काही हि म्हणा गरिबांची काही कमाई तरी होत आहे. हि गोष्ट वेगळी ते अश्याप्रकारे या कर बुडव्यांना मदत करीत आहेत. छोटे- मध्यम व्यापारी आपला काळा पैसा कमिशन देऊन किंवा परिचितांना लाईनीत उभे करून पांढरा करून घेतील. बाकी ज्यांचा तिजोरीत भरगच्च काळा पैसा आहे. त्यांना सर्व पैसा काळ्याचा पांढरा करणे संभव नाही अशेच लोक अणि कंगाल झालेले नेता आरडाओरडा करीत आहे आणि नित नव्या अफवा पसरवितआहेत. (सध्या गादीवर नाहीत, पुन्हा भरगच्च पैसा मोठ्या प्रमाणात नवीन नोटांत गोळा करणे शक्य नाही). किमान २-३ लक्ष कोटी रुपय्या अग्नीत जाळणार किंवा गंगेत बुडणार हे निश्चितच.

आज सकाळीच एक ओळखीचा एक मित्र भेटला, तो म्हणाला पटाईतजी कुछ भी कहो मोदीजीने देश के लोगोंको अहसास करा ही दिया की वे सब चोर हैं आणि जोरात हसला. मला ही हसू आले. किती हि कटू असले तरी हेच आजचे सत्य आहे.

अर्थकारणआस्वाद

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

13 Nov 2016 - 5:08 pm | संदीप डांगे

(सध्या गादीवर नाहीत, पुन्हा भरगच्च पैसा मोठ्या प्रमाणात नवीन नोटांत गोळा करणे शक्य नाही)

>> हे एक वाक्य आपल्याला जाम आवडलं बॉ! :)

देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात

बाकी जाऊदे... देशात फक्त दीड कोटी लोक आयकर भरतात..? हा आकडा कसा मिळाला..?

या आकड्याविषयी शंका आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Nov 2016 - 11:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

यावर्षी जुलैमध्ये बहुतेक ५ कोटी रिटर्न्स फाईल झाले होते याचा अर्थ बहुतेक हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त असावं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 3:42 am | डॉ सुहास म्हात्रे

सगळेच रिटर्न्स कर भरण्यासाठी नसतात, त्यातले काही टीडीएस केलेला कर परताव्यासाठीही असतात. निव्वळ कर भरणारे रिटर्न्स किती असावेत हा आकडा केवळ करविभागच देऊ शकेल.

पद्माक्षी's picture

13 Nov 2016 - 11:21 pm | पद्माक्षी

http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Just-1-of-pop...

या लिंकनुसार १%. पण काल कुठल्यातरी टीव्ही वरील चर्चेत ३% ऐकले होते.

मारवा's picture

13 Nov 2016 - 6:24 pm | मारवा

आकडा आहे आसपास तरी संदर्भ चेक करतो

लेखाची

ची थीम मार्मिक
आहे

मारवा's picture

13 Nov 2016 - 6:33 pm | मारवा

CNBC 2014 15 tax payers in iNdia type करून गुगलुन बघा

संजय क्षीरसागर's picture

13 Nov 2016 - 6:39 pm | संजय क्षीरसागर

किमान २-३ लक्ष कोटी रुपय्या अग्नीत जाळणार किंवा गंगेत बुडणार हे निश्चितच.

साधारण १३.६० लक्ष कोटी रुपयांचा टर्न अराउंड आहे, पैकी ५ लाख कोटी पुन्हा चलनात येणार नाहीत असा अंदाज आहे.

चित्रगुप्त's picture

14 Nov 2016 - 1:00 am | चित्रगुप्त

५ लाख कोटी पुन्हा चलनात येणार नाहीत असा अंदाज आहे.

हे जे नष्ट केले गेलेले चलन असेल, ते नष्ट करण्यातून त्या त्या लोकांखेरीज अन्य लोकांना/देशाच्या अर्थव्यवस्थेला काय तोटा (वा फायदा) होईल यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 3:44 am | डॉ सुहास म्हात्रे

काळा पैसा नष्ट झाल्याने अर्थव्यवस्थेला जो सकारात्मक फायदा होतो त्याचा फायदा सर्व नागरिकांना मिळतो.

सुबोध खरे's picture

14 Nov 2016 - 10:37 am | सुबोध खरे

जितक्या नोटा छापल्या जातात तितके रिझर्व्ह बँकेचे जनतेला / सरकारला देणे लागते.
एक उदाहरण म्हणून सांगतो. आपण जर १०० लोकांना एक लाख रुपये घेऊन प्रोमिसरी नोट दिली तर आपल्याला एक कोटी रुपये देणे असते. समजा यातील सर्वच्या सर्व प्रोमिसरी नोट हरवल्या किंवा आगीत नष्ट आल्या तर आपल्याला एक रुपयाही देणे लागत नाही.
म्हणजेच जर १३ लाख कोटी नोटांपैकी ५ लाख कोटी रुपयाच्या नोटा जर काळया पैसे वाल्यानी रद्दीत टाकल्या किंवा जाळल्या तर रिझर्व्ह बँकेचे तेवढ्या पैशाने देणे(कर्ज कमी झाले) म्हणजेच सरकारला ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ झाल्यासारखे आहे. हा आकडा माझ्या समजुतीप्रमाणे एका वर्षाच्या वित्तीय तुटी(fiscal deficit) इतका आहे.

चौकटराजा's picture

13 Nov 2016 - 8:43 pm | चौकटराजा

जनरल प्रॅक्टेस करणारे डोक्टर , वकील व सी ए या तीन व्यावसायिकामधे काळा पैसा निर्माण करण्याचा कुणाला चान्स अधिक आहे व का.... ? हा प्रश्न हेटाई करण्याचा नसून केवळ शक्यता आजमावण्याचा आहे.

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2016 - 8:53 pm | श्रीगुरुजी

डॉक्टर्स. कारण वकील व सीए ची गरज तुलनेने कमी नागरिकांना असते व त्यांची फी देखील डॉक्टरांच्या तुलनेत कमी असते. डॉक्टरची गरज देशातील १००% नागरिकांना वेळोवेळी लागते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Nov 2016 - 6:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

बाबौ!!! डायरेक डॉक्टरांवर आरोप. आमचे चार प्रामाणिक मिपाकर डॉक्टर्स वैतागणार आता. एक नेव्हीमधले लष्करी शिस्तीत समजवतील, दुसरे प्रेमाने सांगतील, तिसरे बंदुक दाखवुन समजावतील आणि चौथ्यांमुळे दंतारिष्ट ओढावणार.

आता पळा, लैचं डॉक्टरांच्या स्टेथॉस्कोप ला हात घातला. टु टोर्टुगा!!! =))

टवाळ कार्टा's picture

14 Nov 2016 - 9:45 am | टवाळ कार्टा

मिपावर दातवाले डॉक्टर ब्रेच आहेत

चौकटराजा's picture

14 Nov 2016 - 9:52 am | चौकटराजा

बाबौ काय त्यात ! आम्ही वर डिसक्लेमर दिला आहे की हेटाई करण्यासाठी नाही. आमच्या एका मित्राला प्रश्न पडला आहे की मुलाला वकील सी ए करावा का डोक्टर करावा.? आता ९ नोव्हे नंतर ल्येट्येस्ट पोशीशन काय हाय ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 2:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्याला काहीही करू नका. त्याला जे काय व्हायचे आहे ते व्हायला मदत करा. :)

निराकार गाढव's picture

14 Nov 2016 - 3:40 pm | निराकार गाढव

डॉक्टरची दात काढतो,......!!!

.

सुबोध खरे's picture

14 Nov 2016 - 12:12 pm | सुबोध खरे

कारण वकील व सीए ची गरज तुलनेने कमी नागरिकांना असते व त्यांची फी देखील डॉक्टरांच्या तुलनेत कमी असते.गुरुजी हे वाक्य चूक आहे?
१०० रुपयात काम करणारा वकील किंवा सी ए दाखवून द्या?
१०० रुपये (किंवा गरीब वस्ती/ झोपडपट्टी मध्ये त्याहून कमी) घेणारे डॉक्टर मी मुंबईत शेकड्याने दाखवू शकेन.

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 2:52 pm | श्रीगुरुजी

१०० रुपयात काम करणारा वकील किंवा सी ए दाखवून द्या?
१०० रुपये (किंवा गरीब वस्ती/ झोपडपट्टी मध्ये त्याहून कमी) घेणारे डॉक्टर मी मुंबईत शेकड्याने दाखवू शकेन.

मामलेदार कचेरीत किंवा तत्सम सरकारी कार्यालयात गेल्यावर आवारात काळा डगला घातलेल्या वकीलांची झुंड अंगावर धावून येते. ते १०० रूपयांमध्ये विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळवून देणे, प्रतिज्ञापत्र करून देणे इ. किरकोळ कामे करून देतात.

मी पूर्वी इन्फोसिस मध्ये असताना प्रत्येकी २०० रूपये घेऊन आयकर रिटर्न्स सबमिट करणारा एक सीए तिथे येऊन कर्मचार्‍यांचे रिटर्न्स आयकर कार्यालयात जाऊन सबमिट करून पोचपावती द्यायचा. अगदी १०० रूपये नसले तरी २०० ही फारच किरकोळ रक्कम होते. अलिकडे १०० रूपये घेणारे डॉक्टर्स पाहण्यात नाहीत. ते किमान २०० रूपये घेतात.

डॉक्टर्सची गरज वकील/सीए पेक्षा खूप जास्त आहे. झोपडपट्टीत तर सीए ची अजिबातच गरज नसावी. वकीलाची गरज तिथे सरकारी कामांसाठीच असेल.

या न्यायाने तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलात तर डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार फुकट मिळेल.

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 8:57 pm | श्रीगुरुजी

ग्राहक पेठेतही मोफत कायदेशीर सल्ला मिळतो.

निओ१'s picture

13 Nov 2016 - 8:57 pm | निओ१

डॉक्टर्स

सुबोध खरे's picture

14 Nov 2016 - 11:51 am | सुबोध खरे

काळा पैसे निर्माण करणार्यात संख्येने डॉक्टर्स जास्त असावेत. पण रकमेत पाहाल तर डॉक्टरना मिळणारे पैसे फारच कमी आहेत.
बहुसंख्य कॉर्पोरेट आणि मोठ्या रुग्णालयात रोखीने व्यवहार जवळ जवळ होतच नाहीत. तेथील डॉक्टरना पगारही चेकनेच मिळतो. (यात अंबानींचे पण रुग्णालय येते)
खाजगी रुग्णालयात आरोग्य विमा असलेले लोक आणि नोकरदार वर्ग हा सुद्धा चेकने पैसे देतो किंवा रोख पैसे दिले तर त्याचे बिल परताव्यासाठी नेतो. राहिलेले लोक म्हणजे धंदेवाईक, व्यवसाय करणारे किंवा सरकारी (खाबू) बाबू जे रोखीत व्यवहार करतात आणि बिल नेत नाहीत यांच्या कडून आलेला पैसा कर न भरता डॉक्टरना घरात ठेवता येतो.
याहून खाली म्हणजे स्वतंत्र व्यावसायिक यात साधे फॅमिली डॉक्टर जे १००-२०० रुपये घेऊन रुग्णांना औषधे देतात किंवा विशेषज्ञ डॉक्टर जे ५००-१००० रुपये फी घेतात. हे लोक पैसे जमा करून करून किती करणार आणि त्यातील किती दाखवणार आणि किती लपवणार? फार तर काही लाखात
कोट्यवधी नाहीच नाही
डॉ पांडा ज्यांचे स्वतःचे रुग्णालय आहे (एशियन हार्ट) ते जास्तीत जास्त ५ शल्यक्रिया करतात. एका शल्यक्रियेचे त्यांना १ लाख रुपये मिळत. म्हणजे दिवसाचे ५ लाख. हे म्हणजे शिखरावर असलेल्या डॉक्टरची परिस्थिती आहे.असे डॉक्टर भारत भरात किती असतील? फार तर काही डझन.
या तुलनेत वकील पहा. एक प्रथितयश वकील जे आता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. ते वकील असताना आपली केस नुसती वाचण्यासाठी ८ लाख रुपये डिमांड ड्रॉफ्टने "अगोदर" घेत असत. केस वाचली आणि त्यात दम असेल तर ते ती स्वीकारत असत आणि आपला "मीटर" चालू होत असे. आपल्या केस मध्ये एकदा हजेरी लावण्याचे ३-४ लाख. अशा ८-१० केस मध्ये ते रोज उपस्थित राहू शकतात.( हि माहिती मला माझ्या एका वकील रुग्णाने दिली आहे)
असे काही शेकडा वकील सर्वोच्च न्यायालयात आहेत. यात कितीही पैसे टेबलाखालून घेणे सहज शक्य आहे.
सी ए बद्दल अशीच वस्तुस्थिती आहे.
डॉक्टरशी रोज रोज संबंध येत असल्याने डॉक्टरची किंमत राहिलेली नाही हि वस्तुस्थिती.
"तुझे आहे तुजपाशी मधील संवादाची आठवण येत आहे.
काकाजी आचार्यांना म्हणतात. आपण जंगलात जाउ तुम्ही तप करा मी शिकार करतो म्हणजे सारखा समाजाशी संबंध येणार नाही. समाजाशी जास्त जवळीक ठेवली तर पोरे सोरे दाढी ओढतात."

श्रीगुरुजी's picture

14 Nov 2016 - 3:05 pm | श्रीगुरुजी

दिवसाला एका हिअरिंगला ३-४ लाख रूपये घेणारे सिब्बल, जेठमलानी यांच्यासारखे कुशल वकील संख्येने खूपच कमी आहेत. बहुसंख्य वकील त्यांच्या तुलनेत खूपच कमी पैसे घेतात. मुळात सर्वसामान्यांना वकीलाची गरज डॉक्टरांच्या तुलनेत खूपच कमी असते. इथल्या मिपा सदस्यांना विचारले की तुम्ही गेल्या १० वर्षात किती वेळा वकीलाच्या कार्यालयाची पायरी चढलात व किती वेळा डॉक्टरच्या दवाखान्यात गेलात तर काय उत्तर असेल?

डॉक्टर्सची गरज समाजात खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत वकीलांची गरज खूपच कमी आहे. जेव्हा आरोग्य समस्या असतात तेव्हा रूग्ण पैशाचा फारसा विचार करीत नाही. सिर सलामत तो पगडी पचास हा विचार डोक्यात ठेवून महागडे उपचार घेतले जातात. एखाद्या वकीलाने गलेलठ्ठ फी सांगितली तर अशील लगेच ती मान्य करेल असे नाही. माझ्या घराजवळील एका गायनिक नर्सिंग होममध्ये रोज किमान १-२ शस्त्रक्रिया होतात. दोघेही नवराबायको डॉक्टर आहेत. त्यांची ओपीडी सकाळ संध्याकाळ तुडुंब गर्दीने भरलेली असते. ते चेक घेत नाहीत व कार्डही घेत नाहीत. फक्त रोख पैसे घेतात. पुण्यातील एक दुसरे अत्यंत प्रसिद्ध डॉक्टर प्रत्येक रूग्णाची तपासणी फी किमान ७०० रूपये घेतात. ते रोज किमान ४०-५० रूग्ण तपासतात. ते सुद्धा सर्व व्यवहार रोखीने करतात. अजून एक कॉस्मेटिक डेंटिस्ट आहेत. त्यांची प्रत्येक रूग्णाची फी ४०००० च्या आसपास आहे (संपूर्ण ट्रीटमेंट). सध्या कोणत्याही दवाखान्यात गेल्यावर किमान ८-१० रूग्ण आपल्याआधी असतातच. असे किती वकील असतील ज्यांच्याकडे ८-१० अशील वेटींग मध्ये बसलेले आहेत?

डॉक्टरांची गरज खूप जास्त व त्याप्रमाणात त्यांचे उत्पन्नही आहे. बहुसंख्य डॉक्टर्स रोखीने व्यवहार करतात. त्यामुळे त्यांनी ठरविले तर वकीलांच्या तुलनेत ते कितीतरी जास्त प्रमाणात बेहिशेबी पैसा निर्माण करू शकतील. ते असे करतातच असे मी म्हणत नाही. परंतु त्यांना वकीलांच्या तुलनेत जास्त संधी आहे हे नक्की.

मार्मिक गोडसे's picture

14 Nov 2016 - 4:23 pm | मार्मिक गोडसे

असे किती वकील असतील ज्यांच्याकडे ८-१० अशील वेटींग मध्ये बसलेले आहेत?

नसतीलही वेटिंगमध्ये बसलेले अशील किंवा केबीनमध्ये वकील, परंतू बरेचसे वकील जमीन , प्लॉट खरेदीविक्रीचे व्यवहार करतात अशा व्यवहारातून मिळणारे उत्पन्नही रग्गड रोखीत असतं

मार्मिक गोडसे's picture

13 Nov 2016 - 9:02 pm | मार्मिक गोडसे

कारण वकील व सीए ची गरज तुलनेने कमी नागरिकांना असते व त्यांची फी देखील डॉक्टरांच्या तुलनेत कमी असते.

पाझरणार्‍या माठासारखी वकीलाची फी असते. माठातील पाणी संपल्यावर फीचा आणि त्या वकीलाचा फोलपणा ल़क्षात येतो.

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2016 - 9:05 pm | श्रीगुरुजी

असेल. परंतु वकीलाची गरज सर्वांना आणि कायमच लागते असे नाही. डॉक्टरची गरज मात्र सर्वांना आयुष्यभर लागते.

चित्रगुप्त's picture

13 Nov 2016 - 9:43 pm | चित्रगुप्त

डॉक्टरे ही एकेकटी नसून त्यांच्यासोबत पॅथॅलॉजीवाले, जड्व्याळ औषध कंपन्या, मोठमोठे दवाखाने, औषध विक्रेते, मेडिकल इन्शुरन्सवाल्या कंपन्या वगैरे असतात, त्या महाजालात--- योग्य आहार आणि व्यायाम यांनी बर्‍या होऊ शकणार्‍या व्याधिंसाठीसुद्धा --- अनेक लोक जन्मभरासाठी अडकलेले रहात असतात. खरेतर या सर्व गोरखधंद्याबद्दल एक स्वतंत्र धागा असावा.

यात सिटीस्कॅन करणारे सेंटरची भर घाला...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Daily currency exchange, ATM withdrawal limits increased as banks start releasing new Rs 500 notes

मार्मिक गोडसे's picture

13 Nov 2016 - 9:20 pm | मार्मिक गोडसे

डॉक्टरांच्या तुलनेत वकिलाला त्याच्या केससाठी किती गुंतवणूक करावी लागते ? तो किती जणांना त्याच्या फीची पावती देतो?

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2016 - 11:05 pm | श्रीगुरुजी

वकील अशिल मिळविण्यासाठी धावाधाव करत असतात. डॉक्टर असे करताना दिसतात का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

13 Nov 2016 - 11:06 pm | हतोळकरांचा प्रसाद

लेख आवडला!

चित्रगुप्त's picture

14 Nov 2016 - 1:19 am | चित्रगुप्त

एकूण लोकसंख्येच्या फक्त १ वा ३ टक्के लोक आयकर भरत असले, तरी देशातील एकूण जनसंख्येपैकी लहान मुले, वृद्ध, अपंग, गृहिणी इ. वगळता ज्यांनी आयकर भरायला हवा, असे लोक किती टक्के आहेत हेही ध्यानात घेतले पाहिजे (असे लोक किती आहेत?). युरोप-अमेरिकेत एकूण एक लोक आयकर भरतात का ? माझ्या अंदाजाप्रमाणे अरब, आफ्रिकन, भारतीय, बांगलादेशी, चिनी, पाकिस्तानी, मेक्सिकन वगैरे मोठ्या प्रमाणावर असलेले (अवैध रीत्या येऊन विविध कामे रोखीवर करणारे) कर भरत नाहीत, परंतु सरकारी योजनांचा बरोब्बर लाभ उचलतात.

संदीप डांगे's picture

14 Nov 2016 - 1:27 am | संदीप डांगे

एकूण लोकसंख्येच्या सुमारे 40 टक्के कमावती लोकं आहेत, ह्यातल्या अर्ध्यांचे आयटी रिटर्न नुसते फाईल जरी झाले तरी धुमाकूळ होईल!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 3:52 am | डॉ सुहास म्हात्रे

२०११ च्या जनगणनेप्रमाणे २५ ते ६० च्या गटातच ४०% लोक होते. त्यापेक्षा कमी वयाचेही बरेच लोक काम करतात व जास्त वयाच्या सधन लोकांचे उत्पन्न करपात्र असू शकते. त्यामुळे हा आकडा अजून वाढेल.

ह्यातल्या अर्ध्यांचे आयटी रिटर्न नुसते फाईल जरी झाले तरी धुमाकूळ होईल!
+१००

चित्रगुप्त's picture

14 Nov 2016 - 1:30 am | चित्रगुप्त

लेखाच्या एकंदरित आशयाविषयी सहमत. चोरी ही मानवाची आदिम सवय असावी, असे वाटते. मोझेसच्या टेन कमांडमेंटीत (आठवी आज्ञा), कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, रामायणादि पुराणात, पतंजली योगसूत्रात, जैन ग्रंथात वगैरे चोरी करू नये या अर्थाचा उपदेश यामुळेच असणार. अर्थात या उपदेशाचा परिणाम फक्त मुळातच सज्जन असणारांवरच काय तो होतो (म्हणजे ते तसे आपल्या मुलांना उपदेशितात), इतरांना कठोर शासनातूनच ते शिकवावे लागते. या दृष्टीतून मोदींनी उचललेले पाऊल आवश्यकच आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Nov 2016 - 3:53 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख. आशय खरा असल्याने सहमत.

विवेकपटाईत's picture

14 Nov 2016 - 8:33 am | विवेकपटाईत

काल भाषणात मोदीजीनी स्पष्ट केले, जनधन खाते का उघडले. आज ज्यांनी सरकारला कर दिला नाही ते आता गरिबांना कर(लाईनीत उभी राहण्याची दिहाडी किंवा खाते वापरण्याचे कमिशन)देत आहे. विचार करा २ लक्ष कोटी जरी बदलले तरी गरिबांच्या खात्यात / कमाई किमान ५०,००० हजार कोटी तरी होईलच. आई वडिलांच्या खात्यात पैशे जमा करीत आहे. सरकारी थकबाकी देत आहे. आपण सरकारला काही मात्रेत कर दिला पाहिजे हा धडा निश्चित लोकांना मिळेल. शिवाय digital भारताच्या दिशेने पाउले टाकण्याची सुरुवात हि.

शिवाय लक्ष्मी चंचल असते, एका जागी बंद केल्याचे परिणाम असेच होतात. पहिले लुटारू लुटून घेऊन जायचे आज सरकारने लुटले. म्हणून गरजेपेक्षा जास्त पैसा समाज कल्याणासाठी वापरला पाहिजे.

कपिलमुनी's picture

14 Nov 2016 - 10:14 am | कपिलमुनी

काहीही लिहीला आहे !
पण चष्मा घालुन लिहीला आहे सो प्रतिवाद करुन उपयोग नाही

इरसाल's picture

14 Nov 2016 - 1:58 pm | इरसाल

तुम्ही खालुन १३ वी १४ वी ओळ सोडुन वाचा म्हणजे चष्मा घालुन लिहीलेला नाही याची जाणीव होईल. हाकानाका !!!!!

साधा मुलगा's picture

14 Nov 2016 - 12:17 pm | साधा मुलगा

लेखकाच्या आशयाशी सहमत, जे लोक पूर्वी कर चुकवायचे, ते आता ५००, १००० च्या नोटा( मग white असोत कि black ) खपवायला म्हणून कर भरत आहेत, हेच कर पूर्वी नियमितपणे का भरत नव्हते? नोटा बंद करण्यामागे हा उद्देश नसेल पण त्यातून जर कर भरला जात असेल, तर चांगली गोष्ट आहे. आता एवढा जमा झालेला पैसा स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोकांच्या भल्याकरता वापरावा आणि त्यात पुन्हा भ्रष्टाचार होऊ नये एवढीच अपेक्षा.

पाटीलभाऊ's picture

14 Nov 2016 - 12:59 pm | पाटीलभाऊ

छान लेख

होकाका's picture

14 Nov 2016 - 3:24 pm | होकाका

१ टक्का जनता...

माहिती:

http://indianexpress.com/article/india/india-news-india/data-shows-only-...

या कलियुगात डॉक्टर व वकीलाकडे जायची वेळ कोणावरही येउ नये,