खरंच का आपण इतके भयंकर आहोत?

येडा खवीस's picture
येडा खवीस in काथ्याकूट
29 Sep 2008 - 4:55 pm
गाभा: 

आज दुपारी एका गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी उभा होतो. बाजुने एक कुत्री दबकत दबकत चालली होती, तिचे माझ्या हालचालीकडे लक्ष होते...नेमके मी जिथे उभा होतो तिथुनच तिला जायचे असल्याने अर्थातच तिला जाण्यासाठी वाट द्यावी म्हणुन मी जरा सरकलो, त्यावर दचकुन ती मागच्या मागे पळत सुटली...हे पाहुन मला सखेद आश्चर्य वाटले...

इतकी वर्षे माणसांबरोबर राहुनही कुत्री-मांजरे किती भितात आपल्याला?
माणुस हा इतका भयंकर प्राणि आहे का?

मानव जातीच्या उत्क्रांतीबरोबर आज समस्त जगावर स्वत:चे अनभिषिक्त साम्राज्य माणसाने उभं केलय. समस्त प्राणी-पशु जगताला ताब्यात घेऊन त्यांच्यावरही राज्य करतो आहे ( काहींना गुलाम, पाळीव प्राणि बनवलय तर काहींना पिंजऱ्यात कोंडलय) जगातल्या इंचभर जमीनीवर एकाही प्राण्याचा अधिकार नाही....सगळ्या सातबाराच्या उताऱ्यावर माणसाचीच नोंदणी ( भुतदयेच्या नावावर थोडीफार अभयारण्ये केलीयेत पण ती देखील नावालाच)
वाट्टेल ती पापे करायची आणि मग बिचार्या प्राण्यांच्या नावाच्या उपमा द्यायच्या ( "पशुतुल्य बलात्कार", "अकलेने गाढव आहेस नुसता", "कुत्ते की मौत", गीदड, जानवर, इत्यादी इत्यादी)

काय हो खरंच इतके भयंकर, कृतघ्न आणि विश्वास ठेवायला नालायक आहोत का आपण?

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

29 Sep 2008 - 5:05 pm | सखाराम_गटणे™

>>काय हो खरंच इतके भयंकर, कृतघ्न आणि विश्वास ठेवायला नालायक आहोत का आपण?
हो, जर माणसाने केलेले उद्योग बगितले तर कोणीही हो म्हणेल.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते,
झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!! ;)

अवलिया's picture

29 Sep 2008 - 6:41 pm | अवलिया

हो, जर माणसाने केलेले उद्योग बगितले तर कोणीही हो म्हणेल.

काय काय उद्योग केले हो...

वाहनचालक मुली पाहिल्या की आमची उत्सुकता वाढते,
का बुवा?

झाकली मुठ किती लाखाची !!!!!!!!

ती मुठ किती वेळ बंद असते, किती वेळा झाकली जाते, कशाकरीता झाकली जाते यावर अवलंबुन आहे.
ही माहिती द्या लगेच सांगतो किती लाखाची ते.. कसे?

टारझन's picture

29 Sep 2008 - 5:12 pm | टारझन

.नेमके मी जिथे उभा होतो तिथुनच तिला जायचे असल्याने अर्थातच तिला जाण्यासाठी वाट द्यावी म्हणुन मी जरा सरकलो, त्यावर दचकुन ती मागच्या मागे पळत सुटली.
=)) =)) =))
आजकाल मिपावर जबरा कॉमिक्स यायला लागलय

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं

योगी९००'s picture

29 Sep 2008 - 5:53 pm | योगी९००

कारण त्या कुत्रीने तुमचा मि.पा. वरील कुठलातरी लेख किंवा तुमची गुढकथा वाचली असणार ..!!!

खादाडमाऊ
( देशी माणसांना आणि परदेशी कुत्र्यांना न घाबरणारा)

विनायक प्रभू's picture

29 Sep 2008 - 6:01 pm | विनायक प्रभू
हेरंब's picture

29 Sep 2008 - 8:25 pm | हेरंब

मुके प्राणी माणसांना लांबूनच ओळखतात आणि सर्वच माणसांना घाबरत नाहीत असा माझा अनुभव आहे.

भास्कर केन्डे's picture

29 Sep 2008 - 10:54 pm | भास्कर केन्डे

जंगले नष्ट झाली/होत आहेत... प्रदुषणाने पृथ्वीला विळखा घातला आहे... बर्फ वितळत आहे... असंख्य प्राणी, वनस्पती नष्ट झाल्या आहेत.

या भूमीच्या प्रत्येक कणावर (अगदी भारतीय संसद वा अमे. व्हाईट हाऊस) जेवढा मानसाचा अधिकार आहे तेवढाच प्राण्यांचा पण आहे. बिचार्‍या प्राण्यांना त्यांच्या हक्काच्या घरातून हुसकून त्यांचे दररोज हत्याकांड चालवले आहे आपण... पृथ्वीला पूर्ण विनाशाकडे घेऊन चाललेला मानव प्राणिमात्रांसाठी जल्लाद आहेच.

आपला,
(चिंतित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2008 - 11:34 pm | विसोबा खेचर

काय हो खरंच इतके भयंकर, कृतघ्न आणि विश्वास ठेवायला नालायक आहोत का आपण?

हो, आहोत. नक्कीच आहोत...

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Sep 2008 - 8:20 am | प्रकाश घाटपांडे

एका माणसापासुन लांब अंतरावर कुत्रे असते.
माणुसः (कुत्र्याला उद्देशुन) यु यु यु.....
कुत्रा आश्चर्य भिती संभ्रम या संमिश्र भावनेतुन त्याच्याकडे नुसते पहात राहते
माणुसः यु यु यु....
कुत्रा(मनात) : च्यायला हा माणुस आपल्याला बोलावतोय म्हणजे नक्कीच याच्या मनात दुष्ट विचार असणार. दगड घालतोय का काय?
माणुसः यु यु यु....
कुत्रा: (मनात) सगळीच माणस तशी नसतील . हा जरा बरा वाटतोय जाव! बोलावतोय तर!
माणुस्(मनात) च्यायला या कुत्तरड्याला येवढ बोलावतय तर माजोर्ड्या सारख नुसतच बघतय. साल्याल दगडच मारतो
कुत्रा(मनात) जाव याच्या कडे
जाण्याच्या तयारीत
माणुस- (दगड फेकुन)हाड तिच्यायला ...यवढा टिकोजी राव लागुन गेला का?
कुत्रा ( दगड चुकवत व मनात) बरं झाल आपण पुढे गेलो नाही. नाही तर फुकट मार खाल्ला असता. हा माणुस प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही

(कुत्रा)
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

30 Sep 2008 - 8:26 am | प्राजु

पण आपल्यापेक्षा आकाराने मोठा असणार्‍या कोणत्याही प्राण्याला सगळेच घाबरतात. उद्या तुमच्या समोर सुमो पैल्वान आणून उभा केला आणि तो नुसता तुमच्याकडे नुसता बघत उभा राहिला तरी तुमच्या मनात थोडी का होईना भीती ही निर्माण होणारचं...मग भलेही नंतर तुम्ही त्याच्याकडे जाऊन ओळख करून घ्याल .. बोलाल पण पाहताक्षणी भिती वाटणारच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

30 Sep 2008 - 10:04 am | भडकमकर मास्तर

असं काहीही नाहीये हो...
कुत्रे सगळे सारखे थोडेच असतात?? :)
हे वाचा... आणि प्रतिक्रियासुद्धा... http://www.misalpav.com/node/2194
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/