"मुक्त लैंगिक व्यवहार" स्विकारल्यास बलात्कार थांबतील काय ?????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture
टर्बोचार्जड फिलॉसॉफर in काथ्याकूट
2 Nov 2016 - 8:52 pm
गाभा: 

आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मिसळपाववरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.

१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.

प्रतिक्रिया

आनंदी गोपाळ's picture

2 Nov 2016 - 9:13 pm | आनंदी गोपाळ

"मुक्त लैंगिक व्यवहार" स्विकारल्यास बलात्कार थांबतील काय ?????

थांबणार नाहीत.

बलात्कार हा मुक्त लैंगितकेच्या आभावाचा परिणाम नसून, मला जे सामोपचाराने, वा माझ्या लायकीमुळे मिळत नाही, ते 'हिसकावून' घेणे, या प्रवृत्तीचा परिपाक आहे.

दुसरे, अनेक बलात्कार हे लैंगिक अपेक्षांव्यतिरिक्त इतर बाबी 'डिनाय' केल्याचा सूड म्हणून घडतात.

तिसरे, फोरेन्सिक मेडिसिन/ ज्युरिस्प्रुडन्समधे करण्यात आलेली "बलात्कार" शब्दाची व्याख्या नीट समजून घ्या, मुळातल्याच अनेक शंकांचे निरसन होईल.

संदीप डांगे's picture

2 Nov 2016 - 9:40 pm | संदीप डांगे

सहमत!

तुषार काळभोर's picture

3 Nov 2016 - 6:23 am | तुषार काळभोर

सहमत

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

2 Nov 2016 - 9:34 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

@ संपादक मंडळ ,लेखात मायबोलीचा उल्लेख आहे ,त्याऐवजी मिसळपाव असा उल्लेख करावा.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

3 Nov 2016 - 11:12 am | झपाटलेला फिलॉसॉफर

संक्षी आणि टफी यान्च्या अलिकडच्या लेखांमुळे मिपा चे झपाट्याने ऐसीकरण होत असल्याचे निरीक्षण नोन्दवतो

संदीप डांगे's picture

2 Nov 2016 - 9:41 pm | संदीप डांगे

भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे

^^^ रिपोर्टींग मध्ये वाढ झाली आहे

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

2 Nov 2016 - 10:27 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

गैरसमज आहे ,शंभर बलात्कार झाल्यास १०% रीपोर्टींग होते असे या प्रश्नावर काम करणार्यांचे मत आहे.काहींच्या मते हा आकडा १℅ आहे.

"काहींच्या मते हा आकडा १℅ आहे." -हा गैरसमज नाही का?

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Nov 2016 - 10:41 pm | माम्लेदारचा पन्खा

मुक्त लैंगिक व्यवहार आणि बलात्काराचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही....बलात्कार केवळ पुरुषाकडून होतात .....आणि मुक्त लैंगिक व्यवहारात स्त्रीचे स्वातंत्र्य कुठे असणार आहे किंवा तिच्या मताचा आदर ठेवला जाईल ?

हे म्हणजे पुरुषाने केवळ स्वत:च्या सोयीसाठी मुक्त वगैरे म्हणण्याला काहीच अर्थ नाही.....

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Nov 2016 - 8:37 pm | हतोळकरांचा प्रसाद

सहमत! बलात्कारी दुसरे पर्याय उपलब्ध नाहीत म्हणून बलात्कार करत असतील हे पटत नाही.

परामर्श घेतला आहे, पण आपल्या देशात अल्पवयीन मुलांवर (मुली आणि मुलगे दोन्ही) बलात्कार होण्याचंही प्रमाण जास्त आहे. अशा केसेस उघडकीला येण्याचं प्रमाणही खूप कमी आहे. तीन महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करणारे नराधम आहेत. या सगळ्याला पुरुषी मानसिकता या गोष्टीखाली categorize करणं हे चुकीचं आहे. समोरच्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार करावेसे वाटणं ही विकृती आहे आणि तिचा सभोवतालच्या परिस्थितीशी संबंध असतोच असं नाही. दुस-या शब्दांत सांगायचं तर मुक्त लैंगिक व्यवहार असूनही बलात्कार कमी होतील असं मानणं हे चुकीचं आहे.

बोका-ए-आझम's picture

2 Nov 2016 - 10:52 pm | बोका-ए-आझम

.

निराकार गाढव's picture

2 Nov 2016 - 11:00 pm | निराकार गाढव

गुर्जेन्च्या जिल्बोचार्जड् टिप्पणीच्या प्रतिक्षेत...

.

नाखु's picture

3 Nov 2016 - 9:20 am | नाखु

गाढवरावांशी सहमत.

फक्त सर आणि सरच आप्ला प्रकाश झोत टाकू शकतील असल्या महत्वाच्या विषयावर.

नित वाचक नाखु

भारतातील बलात्कारांच्या घटना वाढत आहेत ह्यांत काहीही तथ्य नाही. सध्या भारतीय स्त्री जास्त घराबाहेर पडत आहे. समाजांत जास्त मिसळत आहे आणि त्याशिवाय पोलिसा कडे जायला घाबरत सुद्धा नाही म्हणून बलात्काराच्या घटना कागदोपत्री वाढत आहेत. उगाच पॅनिक निर्माण न करता आपली बेसिक कायदा आणि न्याय व्यवस्था कशी चालेल ह्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे.

माझ्या मते महिलांचे स्वातंत्र्य आणि महिलांची सुरक्षा ह्यांत ट्रेड ऑफ आहे आणि बलात्कार कमी करण्यासाठी हे सत्य स्वीकारणे आवश्यक आहे.

बलात्कार ही मानवी प्रवृत्ती आहे. ती जाणार नाही. चोरी, खोटे बोलणे, मारहाण करणे, इत्यादी मूलभूत मानवी दुर्गुणा प्रमाणे बलात्कार सुद्धा एक न जाणारा दुर्गुण आहे. उत्क्रांतीच्या दरम्यान अनेक वेळा ताकतवर पुरुष स्त्रीला उचलून घेऊन जाऊन शरीर संबंध उपस्थतीत करत असे. आम्हा सर्वाच्याच अंगात काही प्रमाणात ती जनुके असतीलच.

बलात्कार विरहित समाज शक्य नाही. हे सत्य स्वीकारून त्याप्रमाणे पब्लिक पॉलिसी कराव्या लागतील. लोक बलात्कार अमुक तमुक कारणांनी करतात हे असले तर्क निरर्थक आहेत.

मुक्त लैगिक संबंध

मुक्त लैगिक व्यवहार जिथे जास्त असतात तिथे जास्त बलात्कार विनयभंगाच्या जास्त घटना घडतात आणि ते स्वाभाविक सुद्धा आहे. कारण अश्या समाजांत स्त्रीला "प्रोटेक्शन" आहे हि भावना स्पर्धा करणाऱ्या पुरुषां मध्ये नसते. स्त्री जास्त vulnareble दिसल्याने पुरुषांची आक्रमक प्रवृत्ती थोडी जास्त वाढते. म्हणजे मंगळसूत्र घातलेल्या मुलीला कमी लोक छेडतात त्याप्रमाणे.

उदा म्हणजे साधारण क्लब मध्ये तुम्ही जोडीदार शोधण्यासाठी जाता, मनासारखा जोडीदार सापडला तर त्यापुढे लैगिक संबंध उपस्थित होतात आणि नंतर पाहिजे असेल तर रिलेशनशिप मध्ये त्याचे रूपांतरण होते. पण प्रत्यक्षांत एकटी गेलेल्या मुलीला ग्रोपिंग, नको असलेले स्पर्श, मूर्ख पुरुष इत्यादींचा सामना इथे जास्त करावा लागतो. एखाद्या पुरुष मित्राबरोबर गेल्यास त्यामानाने कमी त्रास होतो पण त्याच वेळी कमी पुरुष तुम्हाला अप्रोच करतात. ह्या उलट तुम्ही कांदे पोहे टाईप जोडीदार शोधण्याचा कार्यक्रम पहा. इथे स्त्रीला भरपूर प्रोटेक्शन असते, अप्रोच करण्याचा प्रयत्न सुद्धा फार मोठे प्लॅनिंग करून होतो.

अर्थात दोन्ही प्रकारांत आपले उणे दुणे आहेतच. क्लब मार्गाने तुम्हाला अल्फा मेल मिळण्याची शक्यता जास्त असते. रिलेशनशिप दृष्टीने way out of your league टाईप पुरुष मिळण्याची शक्यता खूप असते. कांदे-पोहे मार्गाने साधारण पुरुष मिळण्याची शक्यता जास्त असते. आपल्या कुवतीपेक्षा जास्त चांगला पुरुष मिळण्याची शक्यता जवळ जवळ शून्य असते. ह्यातील कुठला मार्ग चांगला हे व्यक्ती व्यक्तीवर आणि सामाजिक रचनेवर अवलंबून असते. आपण फ्लोरिडा मधील नाईटक्लब मध्ये गेलात तर सुंदर स्त्रियांची अक्षरशः गर्दी असते. अश्यांत सर्वच मुलींना अल्फा मेल मिळविण्यासाठी जास्त धडपड करावी लागते, जास्त तडजोडी कराव्या लागतात आणि थोडक्यांत पुरुषांचा फायदा जास्त असतो. उलट तुम्ही दिल्ली, गोवा किंवा सॅन फ्रान्सिस्को इत्यादी ठिकाणी गेलात तर परिस्तिथी उलटी असते.

ह्या उलट आपल्या कांदे पोहे कार्यक्रमांत मुलीला १००% प्रोटेक्शन असते. ह्याचेच अतिशय एक्सट्रीम उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया मधील महिलांची परिस्तिथी. इथे महिला म्हणजे खाजगी मालमत्ता (गाडी, सोन्याची चेन इत्यादी प्रमाणे) म्हणून पहिली जाते त्यामुळे त्यांचे मालक त्यांच्या रक्षणासाठी भरपूर खर्च सुद्धा करतात. बलात्काराचे प्रमाण ह्या देशांत जवळ जवळ शून्य असले तरी महिलांचे फ्रिडम सुद्धा शून्य आहे.

अगोचर's picture

3 Nov 2016 - 8:12 pm | अगोचर
  • कांदे-पोहे व नैटक्लब ची तुलना
  • उत्क्रांती वादावरचे विचार

पटले आणि आवडले

साहना's picture

3 Nov 2016 - 2:00 am | साहना

सौदी मधील रेप दर १.२ आहे तुलनेत अमेरिकेतील हा दर २८ आहे. भारतांत १.८ आहे. अर्थांत बलात्काराची व्याख्या, पोलिसांमध्ये जाणायचे प्रमाण ह्यावर सुद्धा हे आकडे बहुत अवलंबून असतील. इतर मुस्लिम राष्ट्रांना मी सौदी च्या बँकेत मध्ये टाकणार नाही कारण तिथे कायदा सुव्यवस्था असेल असे नाहीच. "जिसकी लाठी उसकी भैस" नियमाने हे बहुतेक देश चालत असल्याने तिथे महिलांची दुर्गती होत असेल ह्यांत शंका नाही.

सौदी चे उदाहरण इतक्या साठी घेतले कि भारतांत ज्या प्रकारच्या रेप घटना बातमीत घटना तिथे कमी असतील/आहेत कारण स्त्रियांना मुली बाहेर पडूच देत नाहीत. पण लहान मुली विकत घेणे, मॅरिटल रेप इत्यादी बाबतीत सौदी पुढे असेल ह्यांत शंका नाही.

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2016 - 7:56 am | चलत मुसाफिर

बलात्कार हा गुन्हा कामभावनेतून केला जातो, ही मीमांसाच मुळात चुकीची आहे. सरासरी नव्वद टक्के (चू.भू.द्या.घ्या.) बलात्कार हे महिलेला परिचित असलेल्या पुरुषांकडून होतात, उदा. मित्र, नातेवाईक, शेजारी, सहकर्मचारी वगैरे. कामभावना ही नैस बलात्कार ही संकल्पना अपरिचित आहे. संपूर्ण प्राणिजगतात एक मानव सोडून अन्य कोठेही ती आढळत नाही. याचा अर्थ असा की मानवसमाजाने निर्माण केलेल्या दमनयुक्त, शोषणयुक्त समाजरचनेतच बलात्कार या विकृतीचे मूळ आहे. मानवी समाजरचना ही अनिर्बंध बलसंचयाला प्रोत्साहन देते (आर्थिक, सामाजिक, राजकीय, सैनिकी बल). त्यामुळे परिणामस्वरूप भासणारी निर्बलता इतर मानवसमूहास सहन होत नाही. त्यातून समाजविरोधी गुन्ह्यांचा जन्म होतो.

पण हे मान्य करणे समाजाला, विशेषतः प्रस्थापित घटकांना अडचणीचे आहे. त्यामुळे- बलात्कार हा विकृत कामभावनेतून होतो, चंगळवादी जीवनशैली त्याला खतपाणी घालते, कडक कायदे करून, जीन पँटवर बंदी घालून बलात्कार थांबतील अशा खुळचट विचारांना जाणूनबुजून रुजवले जाते.

याच सोयीस्कर, स्वार्थी विचारसरणीमुळे निर्भयाची शोकांतिका ही वास्तवात आहे त्याहून अनेकपट मोठी करून समाजाला दाखवली जाते. वास्तविक पहाता ढळढळीत अपरिचितांकडून झालेला बलात्कार हा अगदीच अपवादात्मक असतो.

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2016 - 7:58 am | चलत मुसाफिर

असे वाचावे:

कामभावना ही नैसर्गिक आहे. बलात्कार ही संकल्पना निसर्गाला अपरिचित आहे. संपूर्ण प्राणिजगतात एक मानव सोडून अन्य कोठेही ती आढळत नाही.

बोका-ए-आझम's picture

3 Nov 2016 - 9:31 am | बोका-ए-आझम

संपूर्ण प्राणिजगतात एक मानव सोडून अन्य कोठेही ती आढळत नाही.

याच्याशी असहमत. पटकन आठवणारा संदर्भ - मीना प्रभू यांच्या ' दक्षिणरंग ' पुस्तकात त्यांनी गॅलॅपॅगोस बेटांवरील एका पक्ष्यांचा उल्लेख केलेला आहे, ज्यात नर माद्यांचा बळजबरीनं उपभोग घेतात (without courtship and other mating rituals). अर्थात मानवप्राणी वगळता इतर प्राण्यांमध्ये लैंगिकतेचा भावनेशी एवढा संबंध नसल्यामुळे बलात्काराचे मानसिक परिणाम इतर प्राण्यांमध्ये होत नसणार.

असहमत +२
आपल्याला आढळत नसणारी गोष्ट अस्तित्वातच नाही, असे कशावरून?
उंदीर, कुत्रा, वाघ, ओरांगउटान, घुबड, पेंग्विन, जिराफ, हत्ती हे काय माणसांच्या पुढ्यात येऊन बलात्कार करतील असे वाटत नाही. शिवाय जर बलात्कार होत असतील तर पीडित व्यक्ती प्राणी माणसाला अ‍ॅक्सेसिबल असलेल्या माध्यमात तक्रार करण्याची शक्यता थोडी कमीच वाटते. त्यामुळे भारतात बलात्काराचा दर दहा हजार लोकसंख्येमागे क्षक्षक्ष इतका असणे जितके अचूक असेल तितकेच प्राण्यामध्ये हा दर शून्य असणे अचूक असेल.

हे फील गुड BS आहे. जबरदस्तीने केलेले संबंध निसर्गांत सगळीकडे आढळतात. बोनोबो माकडा मध्ये मादा पूर्णतः कामांध असतात. त्या नर आणि लहान मुलांना सुद्धा सोडत नाहीत आणि त्यांच्यातील क्षमता संपल्यावर मादा इतर मादा बरोबर सुद्धा संभोग करतात.

डॉल्फिन सुद्धा अतिशय नालायक प्राणी आहे. आपल्या मादा बरोबर (आणि लहान मुला बरोबर) तर ते जबरदस्तीने संबंध प्रस्थापिती करतातच पण अगदी माणसांना सुद्धा सोडत नाहीत. अनेक मानवी स्त्रियांवर डॉल्फिन अश्या प्रकारचे लैगिक हल्ले केले आहेत. (यूट्यूब पहा)

विंचू, टोळ इत्यादी प्राण्यांत सुद्धा वेळ प्रसंगी हिंसा वापरून शरीर संबंध निर्माण केले जातात. काही माकडा मध्ये बलात्काराबरोबरच वेश्या वृत्ती सुद्धा दिसून येते. काही प्रजातीत्न संबंध निर्माण झाल्यानंतर मादा सरळ सरळ नराला मारून टाकते.

अर्थांत शरीर संबंध प्रस्थापित करण्यासाठी मानव प्रमाणे सामाजिक, आर्थिक, राजकीय घटक महत्वाचे नसल्याने प्राणी जीवनातील बलात्कार कदाचित आमच्या सारखे उत्क्रांत झाले नसतील किंवा मादा स्वतःहून अल्फा मेल पुढे हार पत्करत असेल.

अप्पा जोगळेकर's picture

3 Nov 2016 - 2:34 pm | अप्पा जोगळेकर

संपूर्ण प्राणिजगतात एक मानव सोडून अन्य कोठेही ती आढळत नाही.
काहीतरीच. भादव्यातली कुत्री नाय पाहिली का ?

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2016 - 7:48 pm | चलत मुसाफिर

या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून झालेली चर्चा ही स्वागतार्ह आहेच. पण समाजशास्त्रीय दृष्टीने विचार केल्यास बलात्कार आणि त्याहूनही अधिक म्हणजे शक्तिप्रदर्शनार्थ होणारा बलात्कार हे अनैसर्गिक आणि निखळ कामभावनेपासून दूर आहेत हे लक्षात येईल.

एका दृष्टीने पाहता बलात्काराप्रमाणेच लग्न हीदेखील एक अनैसर्गिक गोष्ट आहे. या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का? जाणकारांची मते ऐकण्यास आवडेल.

फार दूर जाण्याची गरज नाही कोंबडा प्राणि चे निरीक्षण करा किंवा बोकडा बघा, त्यांना सारखी तलफ येत असते. बलात्कार करण्याचा मोह प्रत्येक पुरूषाला होत असावा पण संस्कार तसे करू देत नसेल.

संदीप डांगे's picture

3 Nov 2016 - 2:25 pm | संदीप डांगे

संभोग इच्छा आणि बलात्काराची इच्छा ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे हो!

अप्पा जोगळेकर's picture

3 Nov 2016 - 2:36 pm | अप्पा जोगळेकर

'रिंग'चा प्रसार झाला तर 'प्रायपिझम'चे रुग्ण आणि बलात्कार वाढतील काय ? असा प्रश्न पडला.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Nov 2016 - 6:43 pm | अविनाशकुलकर्णी

४-५-८ वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतात त्यावर आपले काय मत आहे?

चलत मुसाफिर's picture

3 Nov 2016 - 7:39 pm | चलत मुसाफिर

अधिकांश बलात्कार परिचित पुरुषांकडून होतात. त्यात हेही आलेच.

सतरंगी's picture

1 Jan 2017 - 9:57 pm | सतरंगी

मुक्त लैंगिक व्यवहार स्वीकारले पाहिजेत पण याने बलात्कार नाही थांबणार कारण बलात्कार वासनेपोटी केला जातो, त्याक्षणी त्या स्त्रीमुळे किंवा त्या वातावरणामुळे निर्माण झालेली वासना शमवण्यासाठी केला जातो.
पण मला खरच असे वाटते मुक्त लैंगिक व्यवहार स्वीकारल्यामुळे समलिंगी लोकांचे प्रश्न काही प्रमाणात नक्कीच निकालात नक्कीच निघतील कारण आज आज असे अनेक लोक आहेत जे समलिंगी असूनही विरुद्धलिंगी व्यक्तीशी लग्न करतात ज्यात दोघेही शारीरिक सुखाच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत.