ताज्या घडामोडी - ३

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
31 Oct 2016 - 8:16 pm
गाभा: 

ताज्या घडामोडी - १
ताज्या घडामोडी - २

मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

19 Feb 2017 - 3:12 pm | श्रीगुरुजी

जरी असला तरी त्याविरुद्ध जनमत जागं करायचा हक्क प्रत्येकाला आहे. हे जनमत जागृत करतांना किरकोळ हिंसा घडली तर त्या हिंसेमागील कार्यकारणभाव शोधून मूळ कारण नष्ट करण्यास माझं प्राधान्य राहील.

हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे. हिंदूहितविरोधी कार्यक्रमांचा निषेध करायचा अधिकार मला आहे. आणि मी तो बजावणारच.

जरूर करा. तो करण्याचा हक्क तुम्हाला आहेच. पण हिंसक विरोध नको. तरूण मुलामुलींना व्हॅलेंटाईन डे चे निमित्त सांगून मारहाण करणे हे विकृतीचे लक्षण आहे.

हिंदूंचा देश आहे म्हणून कुणालाही स्वैर वर्तनाचा मुक्त परवाना मिळालेला नाही.

वर्तन स्वैर आहे का नाही याचा निर्णय देण्याचा हक्क तुम्हाला नाही. त्याचप्रमाणे एखाद्याचे वर्तन स्वैर आहे हे स्वतःच ठरवून मारहाण करून शिक्षा देण्याचा हक्क तुम्हाला नाही. वर्तन स्वैर आहे असे वाटत असेल तर पोलिसात किंवा न्यायलयात तक्रार करता येईल.

सहमत आहे. याची सकारात्मक सुरुवात म्हणून स्वैराचरणास प्रोत्साहन देणाऱ्या तद्दन गल्लाभरू व्हयाडे बंद पाडण्यास माझं समर्थन आहे.

हा विशिष्ट दिवस अजिबात उपद्रवकारक नाही. याउलट मी वर यादी दिलेले सर्व समारंभ अत्यंत उपद्रवी आहेत. त्या समारंभातून ध्वनी व हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतेच, पण त्यातून मानवी जीव जाण्याचे (उदा. दहीहंडी) व स्वैराचारणाचे प्रकारही घडतात. असले घातक सार्वजनिक समारंभ बंद करण्याला सर्वात जास्त प्राथमिकता द्यायला हवी.

मुंबईत डोंगरीत निकिता कदम ही हिंदू महिला मतांपायी लाचार होऊन हिजाब घालून प्रचार करते. ठीके ती काँग्रेसची आहे. आढ्याचं पाणी गेलं वळचणीला म्हणूया. पण तुम्हीसुद्धा? तुमच्यारखा हिंदुत्वनिष्ठ घड्याळ लावून बांगेची वेळ मोजण्यात धन्यता मानतोय? विरोध कुठवर करावा याची काही मर्यादा?

मुस्लिमांचे मतांसाठी लांगूलचालन करणे ही काँग्रेसची खूप जुनी विकृती आहे. मी हिंदुत्वनिष्ठ असलो तरी कडव्या व सनातनी विचारांचा नाही आणि तर्कहीन व कालबाह्य प्रथांना आणि परंपरांना माझा विरोध आहे. काही मूठभर कडव्या लोकांमुळे हिंदू धर्माची हानी होत आहे. काळ्या भिंती लावून कान फुटतील एवढ्या आवाजात घाणेरडी गाणी लावून अचकट विचकट नाचणे, वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणे, महिनोमहिने रस्ते अडवून समाजाला उपद्रव देणे हा हिंदू तत्वज्ञानाचा भाग नाही.

श्रीगुरुजी,

१.

वर्तन स्वैर आहे असे वाटत असेल तर पोलिसात किंवा न्यायलयात तक्रार करता येईल.

निवासीसंकुलातले कुटुंबवत्सल लोकं उच्चभ्रू वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींना जागा देण्यास राजी नसतात. जरी वेश्याव्यवसाय बेकायदेशीर नसला तरीही कोणी वेश्येला घराबाजूला राहू देत नाहीत.

२.

हा विशिष्ट दिवस अजिबात उपद्रवकारक नाही.

तो उपद्रवकारक होईपर्यंत थांबावं का असा प्रश्न आहे. जर नवरात्र आणि रंगपंचमीसारख्या सणांच्या वेळेस मुलीबाळींना त्रास होतो तर व्हयाडेला काय हालत होईल!

३.

असले घातक सार्वजनिक समारंभ बंद करण्याला सर्वात जास्त प्राथमिकता द्यायला हवी.

मान्य. पण म्हणून इतर कमी घातक कृत्यांकडे दुर्लक्ष करू नये हेही खरंच.

४.

आणि तर्कहीन व कालबाह्य प्रथांना आणि परंपरांना माझा विरोध आहे.

व्हयाडे ही तर्कहीन आणि कालबाह्य परंपरा आहे.

५.

काळ्या भिंती लावून कान फुटतील एवढ्या आवाजात घाणेरडी गाणी लावून अचकट विचकट नाचणे, वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणे, महिनोमहिने रस्ते अडवून समाजाला उपद्रव देणे हा हिंदू तत्वज्ञानाचा भाग नाही.

शंभर टक्के सहमत आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

19 Feb 2017 - 10:30 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

१.

आता जे व्हॅलेन्टाईन डे विषयी तुम्ही लिहिले आहेत अगदी तसेच १००-१५० वर्षांपूर्वी स्त्रीशिक्षण, दलितांचे शिक्षण इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींविषयी बोलले जात असेल.

यासंबंधी काही विदा मिळेल काय? माझ्या मते दलितांच्या शिक्षणाचा विषय तत्कालीन चर्चेत नसावा. स्त्रियांचं म्हणाल तर घरच्या घरी शिक्षण द्यायला लोकांची ना नसावी. झाशीची राणी, आनंदीबाई, अहिल्याबाई, निजामाचा जनाना, आदिलशाहीक बडीसाहेबा, ताराबाई, जिजाबाई, नगरची चांदबीबी वगैरे महिला अशाच शिक्षणपद्धतीतनं पुढे आल्या होत्या.

२.

असो. आता संस्कृतीरक्षण या नावाखाली विरोध व्हॅलेन्टाईन डे पर्यंत खाली आला असेल तरी ती बरीच प्रगती म्हणायची. उत्तम. किप इट अप.

धन्यवाद. व्हयाडेच्या नावाखाली स्वैर वर्तनास प्रोत्साहन मिळंत आहे. म्हणून माझा विरोध आहे. नवरात्रीत स्वैरप्रकारे साजऱ्या होणाऱ्या दांडियांनाही माझा विरोधच आहे.

आ.न.,
-गा.पै.

गॅरी ट्रुमन's picture

20 Feb 2017 - 1:51 pm | गॅरी ट्रुमन

यासंबंधी काही विदा मिळेल काय?

अनेकदा आपल्याकडे लोक मुळात प्रॉब्लेम होता हे मान्य करायलाच तयार नसतात आणि त्यातून असे प्रश्न पुढे येतात. नाही माझ्याकडे विदा. आणि तो गोळा करण्यात मला इंटरेस्टही नाही. पण जर आपल्याच समाजात गोपाळराव आगरकर, अण्णासाहेब कर्वे, महात्मा फुले इत्यादी अनेक समाजसुधारक होऊन गेले आणि स्त्रीशिक्षण यासारख्या गोष्टीवर त्यांनी आपले आयुष्य वेचले असेल तर मुळात प्रॉब्लेम होता हे मान्य करायला मला तरी काहीही अडचण वाटत नाही. जर सगळे आलबेल असते तर इतके समाजसुधारक मुळात लागलेच का असते? सावित्रीबाई फुलेंवर दगडांचा आणि शेणाचा मारा का झाला असता? असो.

व्हयाडेच्या नावाखाली स्वैर वर्तनास प्रोत्साहन मिळंत आहे. म्हणून माझा विरोध आहे. नवरात्रीत स्वैरप्रकारे साजऱ्या होणाऱ्या दांडियांनाही माझा विरोधच आहे.

यात विरोधाभास नाही? पहिल्या वाक्यातून वाटेल की स्वैर वर्तनास विरोध आहे. जर स्वैर वर्तनास विरोध म्हणून व्हॅलेन्टाईन डे ला विरोध असेल तर तोच प्रकार नवरात्रातही काही ठिकाणी होत असेल तर त्याच न्यायाने नवरात्रालाही विरोध हवा. पण तसे न होता विरोध "स्वैरपणे होणार्‍या दांडियांनाच" आहे मुळातल्या नवरात्राला नाही. याचे कारण नवरात्र हिंदूचा सण म्हणायचे का?

असो. मी आणि बेस उर्फ रोझ (पूर्वाश्रमीची हिलरी) दरवर्षी न चुकता व्हॅलेन्टाईन डे साजरा करत असतो. यावर्षीचे आमचे व्हॅलेन्टाईन डे कार्ड हे होते---

1

खरे तर आम्हाला व्हॅलेन्टाईन डे ची पण गरज नसते. कारण---

2

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2017 - 2:26 pm | श्रीगुरुजी

३००+ प्रतिसाद होऊन गेले. नवीन धागा सुरू करायची वेळ आली आहे.

गामा पैलवान's picture

20 Feb 2017 - 10:57 pm | गामा पैलवान

गॅरी ट्रुमन,

Every day is Valentine's Day when you are in the right relationship.

हे वाक्य उद्धृत केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. मलाही नेमकं हेच म्हणायचं होतं. पण द्रव्यलोभी वृत्तीच्या काही लोकांना याचा बाजार मांडून पैसे कमवावेसे वाटतात. त्यासाठी भले स्वैरपणास प्रोत्साहन मिळालं तरी चालेल, अशी त्यांची मनोवृत्ती असते. माझा या मनोवृत्तीला विरोध आहे.

बाकी नवरात्रीचं म्हणाल तर हा सण प्राचीन काळापासून चालंत आलेला आहे. याउलट व्ह्याडे हे विसाव्या शतकातलं गल्लाभरू खूळ आहे.

आ.न.,
-गा.पै.

गुजरात दंगलीला या वर्षी १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या दंगलीने, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या राष्ट्रनिर्मीतीच्या प्रोजेक्टला बारीकसे का होईना तडे गेले. प्रत्यक्ष दंगलींत हजारो लोकांचा बळी गेला, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचली, मुस्लिमांमधील कडव्या मुलतत्ववादाचा प्रभाव वाढला, पुर्वीचे हिंदू मुस्लिम साहचर्य संपून घेट्टोज निर्माण झाले, हिंदूंमध्ये देखील मुलतत्त्ववादाला राजकिय अधिष्ठान मिळाले.
तेव्हा या दु:खद प्रकारापासून आपण काही शिकलो आहोत का? अल्पसंख्यांकांचे जे खरे प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक करण्याने ही दरी बुजेल काय? आणि सर्वात महत्त्वाचे असे प्रकार होऊ नयेत, मनुष्यहानी, वित्तहानी टळण्यासाठी, सामाजीक सौर्हार्द टिकावे यासाठी कोणते उपाय योजले जावेत?

सौरा,

त्याचं काय आहे की प्रत्येक दंगल मुसलमान मोहोल्ल्यात सुरू होते. अपवाद फक्त १९९२/९३ च्या मुंबईच्या आणि २००२ च्या गुजरात दंगलींचा. या दंगलींत हिंदूंनी सुरू केल्या आणि मुस्लिमांना ठेचून काढलं. म्हणून फुरोगामी फक्त या दोन दंगलींचा उल्लेख करतात. जणूकाही गुजरात सोडून इतरत्र दंगली झाल्याच नाहीत! त्यांच्या नादी लागू नका. बाकी काही नाही.

आ.न.,
-गा.पै.

पुंबा's picture

6 Mar 2017 - 12:52 pm | पुंबा

बरं..

सर्वात महत्त्वाचे असे प्रकार होऊ नयेत, मनुष्यहानी, वित्तहानी टळण्यासाठी, सामाजीक सौर्हार्द टिकावे यासाठी कोणते उपाय योजले जावेत?

ह्याचं काय?

डँबिस००७'s picture

1 Mar 2017 - 5:43 pm | डँबिस००७

आ य ला म्हणजे चोरा ला सोडुन सन्याश्यालाच धरत होतो आपण आता पर्यंत,

याचा अर्थ २६/११ ला मुंबईत झालेला हल्ला हा हल्ला होता त्यामागे पाकिस्तानातुन आलेले अतिरेकी नव्हते,
त्या अगोदर मुंबईत झालेले सर्व बाँबस्फोट तसेच पार्लमेंटवरचा हल्ला हा हल्ला होता, देशाबरोबर पाकिस्तानने केलेले युद्ध नव्हत तर .

गामा पैलवान's picture

2 Mar 2017 - 3:10 am | गामा पैलवान

लोकहो,

एका गंभीर बाबीकडे लक्ष वेधू इच्छितो. पानसरे खून खटल्यात समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे या सनातन संस्थेच्या निरपराध साधकांना गोवल्याचं सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. खटला चालू होऊ नये म्हणून अनेक युक्त्या अवलंबण्यात आल्या. त्यावर मात करून खटला सुरू झाला.

आता सनातन संस्थेने वकिलाच्या नियुक्तीत झालेला घोटाळा उघड केला आहे. शिवाजीराव राणे यांची शासनाने विशेष शासकीय अधिवक्ता म्हणून नियुक्ती केलेलीच नसतांना हा माणूस खटला लढवायला शासनातर्फे न्यायालयात उभा राहिला आहे. यास सनातन संस्थेने जोरदार आक्षेप घेतला. बातमी इथे आहे : http://www.pudhari.com/news/kolhapur/134429.html

सनातन प्रभात वृत्तपत्रात हिंदूराष्ट्राबद्दल जरा काही बातमी छापून आली की स्पष्टीकरण मागणारे न्यायमूर्ती एल. डी. बिले या प्रकरणात कडक भूमिका घेणार का? च्यायला, कोणीही उठतो आणि सरकारी वकील म्हणून उभा राहतो? आयशप्पत, हे न्यायलय आहे का हजामखाना? तिथे केस कापायला एखादा न्हावी नसला तर दुसरा कोणीही चालतो. शासनातर्फे अशी काही वकिली व्यवस्था न्यायालयात चालू झाली आहे काय?

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी

दाभोळकर खून प्रकरण आणि नंतर पानसरे खून प्रकरण या दोन्ही प्रकरणांच्या तपासाला सुरवातीपासूनच एक विशिष्ट दिशा दिली गेल्यामुळे (अजाणता की जाणूनबुजून?) त्या खुनांचा आजवर तपास लागलेला नाही. दाभोळकरांच्या खुनानंतर काही मिनिटातच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "ज्या विचारसरणीने गांधीजींना मारले त्याचे विचारसरणीने दाभोळकरांना मारले आहे" असे जाहीर विधान करून तपासाची दिशा दाखवून दिली होती. हे विधान करताना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे, धागेदोरे नव्हते. तरीसुद्धा संशयाची सुई हिंदुत्ववाद्यांवर व विशेषतः सनातनवर वळविण्यात ते जाणता/अजाणता यशस्वी झाले.

सनातनवर संशय धरून तपास करायचा हे काही तासातच नक्की झाल्याने तपास यंत्रणांनी खुनामागील इतर शक्यता लक्षात न घेतात पुढील काही आठवडे सनातनला लक्ष्य केले. त्यामुळे खर्‍या खुन्यांना पळून जाण्यात, खुनाचे धागेदोरे नष्ट करण्यात पुरेसा वेळ मिळाला. अर्थात खुनानंतर जवळपास साडेतीन वर्षे लोटल्यानंतर सुद्धा सनातनविरूद्ध निर्णायक ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे तपास अधांतरीच आहे.

खुनानंतर काही दिवसांनी तपास यंत्रणांनी काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून संभाव्य खुन्यांची खालील चित्र प्रदर्शित केली होती.

http://www.dnaindia.com/mumbai/report-cbi-releases-sketches-of-suspects-...

या चित्रातील व्यक्ती आजतगायत सापडलेल्या नाहीत. परंतु खुनानंतर ४-५ महिन्यांनी तपासयंत्रणांनी एका शस्त्रविक्रेत्यांच्या टोळीतील मनीष नागोरी व विकास खंडेलवाल या दोघांना संशयावरून अटक केली. परंतु त्यांच्याविरूद्ध कोणताच पुरावा न मिळाल्याने त्यांना अटकेत ठेवून ९० दिवसानंतर सोडावे लागले.

त्यानंतर सनातनच्या वीरेंद्र तावडेला जून २०१६ मध्ये खुनाच्या आरोपावरून अटक केली व तो आजतगायत विनाजामीन तुरूंगात आहे. परंतु आजतगायत त्याच्याविरूद्ध खुनासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्याचे ऐकिवात नाही.

नंतर काही दिवसांनी सनातनच्या सारंग अकोलकर व विनय पवार यांचे नाव संशयित म्हणून पुढे आले. त्यांची माहिती देणार्‍यास ५ लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे.

सुरवातीस दिलेली मूळ संशयितांची चित्रे आणि अकोलकर व पवार यांची चित्र पाहिली तर लक्षात येईल यातील चारही व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे सुरवातीला दोन अज्ञात संशयित, नंतर खंडेलवाल व नागोरी, नंतर वीरेंद्र तावडे आणि आता अकोलकर व पवार असा तपासयंत्रणांचा तपास भरकटलेला आहे. या खुनामागे सनातन व फक्त सनातनच आहे या गृहितकावरच विसंबून तपास केल्याने आजवर खुनी सापडलेले दिसत नाहीत. ज्याक्षणी तपासयंत्रणा सनातनऐवजी किंवा सनातनच्या बरोबरीने इतर दिशेलाही शोध घ्यायचा प्रयत्न करतील त्याक्षणी खुनाचे गूढ उलगडायला सुरूवात होऊ शकेल.

आता जर अकोलकर व पवार संशयित असतील तर वीरेंद्र तावडेला ९ महिने तुरूंगात अडकवून ठेवण्याचे कारणच काय? तावडेप्रमाणेच पानसरे खुनासाठी समीर गायकवाडला गेली दीड वर्षे विनाजामीन तुरंगात ठेवले आहे. या दोघांना पकडूनसुद्धा, पोलिसांना खुन्यांचा तपास करण्यात अपयश आले आहे अशी दाभोळकर व पानसरे कुटुंबियांची टीका सुरू आहे. म्हणजे हे दोघे खुनी नाहीत किंवा नसावेत अशी यांना खात्री आहे. असे असेल तर त्यांना जामीन द्यायला व खटल्याची सुनावणी सुरू करायला यांचा विरोध का?

एकंदरीत दाभोळकर व पानसरे कुटुंबियांचा दबाव, सामाजिक दबाव इ. दबावाखाली येऊन पोलिसांचा तपास सुरू आहे. यामध्ये नाहक सनातनच्या काही निरपराध संशयितांचा बळी जात आहे.

कपिलमुनी's picture

6 Mar 2017 - 3:17 pm | कपिलमुनी

मागचे २ वर्षेहून अधिक काळ ' योग्य ' सरकार असूनदेखील असे घडते याचेच आश्चर्य !

गामा पैलवान's picture

6 Mar 2017 - 11:01 pm | गामा पैलवान

भाऊसाहेब, उतरा आता यष्टीमदनं. पेडगाव आलं बरंका.
आ.न.,
-गा.पै.