सायकलिंग

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
31 Oct 2016 - 11:55 am

मित्र हो, ट्रेकिंग कमी करून सायकलिंग सुरु करावे असा विचारएक दोन वर्ष सुरु होता.गेल्या मे मध्ये जालोरी पास सायकल ट्रेक केल्यावर तर निर्णय पक्का झाला होता.स्वताच्या धरसोड स्वभावाची खात्री असल्याने गेल्या वर्षी साधीच हिरोची गिअर वाली सायकल घेतली होती, पण आता खात्री वाटू लागली कि काही वर्षे तरी आपण सायकलिंग करत राहू.
त्यामुळे गेल्या २०तारखेला , scott sub cross 40 असे मॉडेल चे नाव असलेली सायकल घेतली.(मला यातलं फार काही कळत नाही)
सलग दोन दिवस ६०/६५ किमी सायकलिंग केले. एकदिवस अंबरनाथ ते नेरळ व दुसऱ्या दिवशी अंबरनाथ ते दिघा असे. त्यानंतर सलग पाचही दिवस कामावर गेलो. त्यामुळे आता जरा आत्मविश्वास आलाय.
सायकलिंग मधील तद्य्न अनुभवी मिपा करानां नम्र विनंती.
सायकलची निगा कशी राखावी याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे.
आपला सायकलिंग चा काही बेत असेल तर मला ही कळवावे.
आलो तर थोडे सांभाळून घ्यावे. माझा भ्रमण ध्वनी ९९६००९६४३५ /८८७९४४६४५७/, यावर संपर्क करून मला कळवा, शक्य असेल तर सहभागी होईन.
मात्र तेव्हढी निगा कशी राखावी याबद्दल नक्की सांगाच.

प्रतिक्रिया

अभिनंदन आणि शुभेच्छा!

यशोधरा's picture

31 Oct 2016 - 9:05 pm | यशोधरा

मे मध्ये जालोरी पास सायकल ट्रेक >> ह्याबद्दल लिहाल का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Oct 2016 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सायकलवाल्यांचा एक वाट्सपग्रुप आहे, त्यात सामील व्हा !

-दिलीप बिरुटे

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Nov 2016 - 8:35 am | भ ट क्या खे ड वा ला

डॉक्टर साहेब , या सायकलिंग ग्रुप च्या चालका चा नंबर द्या , प्लीज .

सागर पाध्ये हाजीर हो s s s

कपिलमुनी's picture

31 Oct 2016 - 9:36 pm | कपिलमुनी

वाट्स अप वाड्यावर या !
बैजवार कळलं !

अभिनंदन. सायकलिंग क्लबात स्वागत आहे.

राम राम मंडळी,

नववर्ष्यात सायकलिंग सुरु करावी असा एक इचार आहे. आपल्या सारख्या थोरामोठ्यांच मार्गदर्शन लाभला तर चांगला होईल. कृपया आपल्या सायकलिंग वाट्स अप वाड्यावर आमचे बी नाव सामावून घ्यावे.

हि विनंती.

आभारी आहे,
नाजूक पाटील

इरसाल कार्टं's picture

23 Jan 2017 - 5:12 pm | इरसाल कार्टं

सायकल घ्यायची म्हणतोय मीही. कृपया मलाही सायकलिंग च्या ग्रुप वर घ्या सामावून. माझया परिसरात क्षणीही नाही सायकलिंगवालं.
माझा क्रमांक ९२२५८४९०३२ नाव: कल्पेश गावळे