रानडुक्कर/हरण इत्यादींची देशी शाकुती रेसिपी हवी आहे

साहना's picture
साहना in पाककृती
27 Oct 2016 - 6:32 am

कुणाकडे रानडुक्कर, हरण, साळ, ससा इत्यादी जंगली जनावरांच्या शाकुती (किंवा इतर पाककृती) च्या रेसिपी आहेत का ? सशाचे मास चिकन, मटण च्या तुलनेत फार ड्राय असल्याने सशाचे मटण ची रेसिपी सपशेल फेल झाली. ह्यानिमित्ताने लक्षांत आले कि जंगली जनावरांच्या मासाच्या पाककृतीच्या रेसिपी अनेकदा थोड्या वेगळया असतात. कुणाला ठाऊक असेल/अनुभव असेल तर नक्की सांगावे.

धन्यवाद!

प्रतिक्रिया

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Oct 2016 - 8:23 am | कैलासवासी सोन्याबापु

एक रेसिपी आहे सश्याची माहिती, म्हणजे कृती डिट्टेल नाही आठवत पण थोडी आठवते, प्रयोग थोड्या वाट्यावर करून पहा नाहीतर ससा बरबाद होईल (ही आगाऊ विनंती/चेतावनी)

ही रेसिपी मी मेळघाटात गुगामल , ढाकणा भागात खाल्ली होती, अन मला ती पारंपरिक आदिवासी रेसिपी म्हणून सांगण्यात आली होती.

प्रथम सस्यांचे बारीक तुकडे करून घ्यावे, प्री प्रोसेस्ड ससा असल्यास हरकत नाही, मग ससा पापड फुलके भाजायच्या जाळीत ठेऊन चांगला जाळून गेलेला दिसे पर्यंत (चार्ड लूक) भाजावा, नंतर त्याचे बाईट साईज तुकडे करून ते तुकडे एका मलमली/सुती कापडात ठेवावे, त्याच कापडात सस्यासोबत वाटोळे सागरगोटे/पेबल्स ठेवाव्यात, मग त्याची पोटली करून खसखस हलवावी ह्याने सस्याचे बाहेरून काळे झालेले अन चवीला कडू लागतील असे जळक्या मांस-चरबीचे तुकडे गळून पडतील, नंतर उरलेले भाजल्यामुळे आतून मस्त शिजलेले गुलाबीसर पीस वेगळे ठेवावे, आता एका कढईत भरपूर लसूण म्हणजे किलोला 5 गड्डे, इतकी फोडणी करावी, अगोदर तेल गरम करून मोहरी घालून तडकवावी अन त्यात लसूण घालून लालसर फ्राय करावा, मग त्यात जवळपास एक जुडी बारीक चिरलेली मेथी घालावी, मेथी नसल्यास पालक चालतो पण मजा तितकीशी येणार नाही, शक्यतो मेथीचा घाला त्यामुळं, मेथीची भाजी मीठ घालून चांगली परता, पूर्ण सुकू देऊ नका थोडे पाणी असू दे मग त्यात ससा तुकडे घालून चांगली परता अन सुकी होऊस्तोवर भाजा, पाणी पारच गेले पाहिजे उडून, आता चव घेऊन मीठ ऍडजस्ट करा अन ही गावठी ससा-मेथी भाजी तयार मसाला नसतो ह्यात फक्त मीठ असते त्यामुळे मीठ एखाद कणी जास्त पडले तरी हरकत नसते, ही भाजी नाचणीच्या भाकरी सोबत उत्तम लागते, गेला बाजार ड्रिंक्स सोबत मंचिंग/बायटिंग म्हणून खल्लास लागते, खास करून स्कॉच असली तर

सेम रेसिपी साळ, घोरपड, हरीण वापरून करता येते

बोका-ए-आझम's picture

27 Oct 2016 - 10:35 am | बोका-ए-आझम

साळिंदर का? त्याच्या काट्यांचं काय?

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Oct 2016 - 11:08 am | कैलासवासी सोन्याबापु

काटे उचकटून काढले जातात मग पूर्ण साळी आगोटीत भाजून नंतर सोलून खाण्यालायक भाग काढला जातो

साहना's picture

27 Oct 2016 - 12:21 pm | साहना

धन्यवाद! ससे भरपूर आहेत. नक्की करून सांगते.

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2016 - 9:25 am | टवाळ कार्टा

हरण मारलेले चालते?

संदीप डांगे's picture

27 Oct 2016 - 9:59 am | संदीप डांगे

त्या भारतात नैत... त्यांना चालत असेल

महासंग्राम's picture

27 Oct 2016 - 11:37 am | महासंग्राम

त्या कि तो ?????

संदीप डांगे's picture

27 Oct 2016 - 11:51 am | संदीप डांगे

त्या ताई आहेत!

महासंग्राम's picture

27 Oct 2016 - 12:36 pm | महासंग्राम

नावावरून काई कल्पना नै येत बावा

प्रभाकर पेठकर's picture

27 Oct 2016 - 1:14 pm | प्रभाकर पेठकर

टका, Its a news to me.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Oct 2016 - 10:35 am | कैलासवासी सोन्याबापु

आमच्याकडे, रब्बीच्या मोसमात, हरबरा वगैरे पिके असतात, तेव्हा जर हरीण लोकसंख्या जास्त असेल तर सिझनल परमिट देतात शिकारीची, हरीण अन रानडुकरे खूप नुकसान करतायत असे दिसले पिकांचे तर, आमच्याकडे शिकारी प्राणी नाहीत त्यामुळे हरणे, निलगायी अन रानडुकरे लैच नुकसान करतात

हे नक्की कुठे ? हरियाणा मध्ये नीलगायींचा प्रचंड त्रास आहे आणि शिकार करून सुद्धा त्यांची लोकसंख्या कमी व्हायचे नाव घेत नाही असे ठाऊक होते पण महाष्ट्रांत सुद्धा नीलगायी इतक्य उपद्रवी असेल असे वाटले नव्हते.

सुबोध खरे's picture

27 Oct 2016 - 1:03 pm | सुबोध खरे

खरं तर नीलगाय हा हरिणांचा एक प्रकार आहे परंतु त्याला "गाय" नाव दिल्यामुळे हरियाणा आणि राजस्थान येथे त्यांची शिकार केली जात नाही त्यामुळे त्यांचा उपद्रव अतोनात वाढला आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Oct 2016 - 2:29 pm | कैलासवासी सोन्याबापु

विदर्भात, अकोला-वाशिम-अमरावती जिल्ह्यात अशी लायसन्स दिली जातात, निलगायी तरी इतक्या नाही सापडत जास्त पण रानडुकरे अन चितळांचा भयानक त्रास असतो, खास करून रब्बी च्या हंगामात, त्यातही हरबरा पिकाला जास्तच. हरबरा (रब्बीतला) ओलिताचा नसतो तर कोरडवाहू शेतीचा असतो तसेच त्याला आर्द्रता अन ओल ही दवाच्या पाण्याची असते, हरबरा कोवळा असतो तेव्हा झाडोरा फक्त एखाद वित उंच असतो, त्याची चव मुळातच आंबूस असते (घरांत सुद्धा अश्या कोवळ्या हरभऱ्याच्या पाल्याची भाजी करतात) त्यावर दव पडले की ती आंबूस चव अजून उभारून येते, त्यामुळे रानडुकरे अन चितळं खूप येतात वावरात, मग परमिट घेऊन शिकार करावी लागते, हरणे तेज असतात एकदा मारले एखादे की सहसा नंतर आठवडाभर वावरात फिरकत नाहीत, रानडुकरे मंद असतात ती लेकाची पार 12 बोर (छऱ्याची ठासणी करायला लागणारी गावठी बंदूक) ने सुद्धा मरत नाहीत, मग आपटबॉम्ब असतात तसे मोठे फॉस्फरस का कसले गोळे बनवतात काचा छरे घालून त्याला कणकेचे आवरण लावून शेतात पसरतात, ते जोरात चावले की डुकरं तोंड फाटून मरतात, मग त्यांचे वाटे होतात, आमच्या वावरात एकदा एक हल्या (नर डुक्कर) मारले होते, त्याच्या अंगात 10 सेमी सुरी घातली तरी रक्त येत नव्हते इतकी चरबी अंगभर! मग त्याचे तुकडे करून चाळणीत रचून ठेवतात, अन ती चाळणी एका उकळत्या पाण्याच्या भांड्यावर ठेऊन झाकतात, पाणी जसे जास्त उकळू लागते तसे चरबी वितळून खाली पडत राहते पाण्याच्या भांड्यात, नंतर उरलेले गुलाबी लाल मांस खायला वापरतात अन चरबी असलेले पाण्याचे भांडे बर्फात ठेवतात, त्याने ती चरबी थिजली की त्याच्या साबण असावे तश्या वड्या कापतात, अशी चरबी नंतर गरज पडेल तशी संधिवात, सांधेदुखीच्या पेशन्ट करता मालीशला वापरतात

अन् माझ्या तोंडाला पाणि सुटलं हे सगळं वर्णान बघुन :)
२०-२५ लोक्स सहज जेवले असतील ना त्या हल्या रेसिपीवर?

कोळसे चांगले फुलावेत म्हणून असली एक चरबीची वडी निखार्‍यामध्ये घालून, त्यावर भाजलेले कबाब दाल लेकातल्या शिकार्‍यात बसून खाल्ले.

सौन्दर्य's picture

28 Oct 2016 - 8:04 am | सौन्दर्य

१९८२ साली मंगलोरला एका ख्रिश्चन लग्नाला गेलो होतो त्यावेळी गावजेवणासाठी एक डुक्कर मारला होता. त्याला कापून शिजवताना भांड्यावर जवळजवळ सहा इंच चरबीचा थर जमला होता. तो काढून गावकर्यांना वाटला होता. त्यावेळी कळले की ती चरबी दिवे लावायला, भाजी करायला, किंवा इतर पदार्थ शिजवताना तेल म्हणून वापरली जाते. डुकराच्या अंगावरच्या चरबीचे आवरण इतके जाड असते की साप चावला तरी त्याला काहीही होत नाही असे ऐकून आहे. खरं खोटं तो साप, डुक्कर किंवा देवच जाणो.

मॅक डोनाल्ड अगदी हल्ली पर्यंत फ्रेंच फ्राय त्याच्याच चरबीत तळून बनावट असे. काही वर्षा मागे चरबी सोडून काही तरी केमिकल वापरले जाणे सुरु झाले.

हृषीकेश पालोदकर's picture

28 Oct 2016 - 12:28 pm | हृषीकेश पालोदकर

रानडुक्कर नुकसान करते हे वाईट हाये पण त्याला मारायची अन शिजवायची कृती भयावह वाटली रे बाबा. काही ऑब्जेक्शन नाही निव्वळ प्रतिक्रिया.

मारायची कृती मोठी भयावह नाही. बहुतेक वेळा एक slug गोळींत रान-डुक्कर मरू शकतो. पण गावठी डुक्कराला मारण्याची कृती मात्र अतिशय भयावह आहे. प्रथे प्रथे प्रमाणे डुकराला जिवंत जाळून, डोक्यावर हातोडा मारून इत्यादी पद्धतीने हाल हाल करून मारले जाते.

अन्कुश शिन्दे's picture

28 Oct 2016 - 1:09 pm | अन्कुश शिन्दे

या वर्षीच्या साधना बालकुमार दिवाळी अंकात श्री विवेक सावंत यांचा एक लेख आहे, त्यात रानडुकरांचा त्रास थांबिवण्यासाठी त्यातील मुलगा सलून मधील केस डाळींबाच्या बागेच्या कुपंणाभोवती टाकतो, डुकरे जोराने श्वास घेतात त्यामुळे केस त्यांच्या नाक-घश्यात जाऊन त्यांना त्रास होई. बाकी आमच्याकडे शिकार करून मेजवानीच झोडली जाते. आणि एखाद्याच्या घरी पाहून आला असेल तर त्या कुटुंबाला एक वाट जास्त :)

सीताहरण नावाची एक श्रीलंकन रेसिपी आहे.बघा चालत असेल तर.

त्याचीच अपग्रेडेड व्हर्शन अपहरण म्हनून आहे.
हरणाचा वरचा भाग असतो बहुधा त्यात.

संजय पाटिल's picture

27 Oct 2016 - 12:37 pm | संजय पाटिल

लोल...

सस्नेह's picture

27 Oct 2016 - 12:45 pm | सस्नेह

मग, वस्त्र-हरणात बहुधा हरण कापडात गुंडाळून भाजत असावेत

कोणाकडे गर्वहरणाची रेशिपी मिळेल काय?

तुम्ही गृहशोभिका थोडी जास्त वाचताय असे वाटते ...

मागच्या वेळी हि रेसिपी ज्याने केली होती त्याच्या घराला त्या नादात आग लागली असे ऐकून आहे. इतकी रिस्क घ्यायची सध्या तरी इच्छा नाही.

त्याने 'लाक्षागृह' व्हर्शन केली असेल चुकून.
तुम्ही कांचनमृग ऑप्शन ट्राय करा.

हो पण मदतीस वानर पाहिजेत !

सुबोध खरे's picture

27 Oct 2016 - 1:01 pm | सुबोध खरे

https://www.youtube.com/watch?v=hthD3IT84w8
http://www.goanfoodrecipes.com/recipe-items/mutton-xacuti
मटण शाकुती याची पाकक्रिया येथे दिली आहे.
ससा किंवा लहान हरीण तत्सम लहान प्राणी हा पटकन शिजतो तेंव्हा तो शिजवायला कमी वेळ घ्यावा
मोठे हरीण डुक्कर इ प्राणी शिजायला जास्त वेळ द्यावा लागतो किंवा त्यांना शिजवताना त्यात कच्च्या पपईच्या फोडी टाकतात.

सुबोध खरे's picture

27 Oct 2016 - 1:10 pm | सुबोध खरे

गोव्यात शाकुती मसाला पेस्ट मिळते ती घालून थेट हि पाककृती करता येते. फक्त त्याला व्हिनेगरचा जरा जास्त वास येतो.
http://www.goanimports.com/Indian_Xacuti_Spice_Blend_3_8oz_p/gixm100gms.htm येथे आयात पण करता येते

धन्यवाद, गोव्यांत काही महिने मागे गेले असताना काही लोकांनी घरगुती शाकुती मसाले दिले होते (व्हिनेगर शिवाय), चिकन आणि शार्क माशांसाठी अगदी जबरदस्त आहेत पण सश्याचा मासाला मात्र ती चव आली नाही म्हणून पोस्ट टाकला. माझी कृतीच कुठे तरी चुकत असेल. पण ह्या संकेतस्थळासाठी धन्यवाद उपयुक्त आहे.

Nitin Palkar's picture

27 Oct 2016 - 2:32 pm | Nitin Palkar

कुठचेही मांस व्यवस्थित (खरपूस) भाजले की माणूस खाऊ शकतो. पुढील सर्व प्रक्रिया आपल्या जीव्हालौल्यासाठी.

साळींदर हा खरं तर उंदिर किंवा घुशीच्या वर्गातला प्राणी (Rodent). त्यात खायला (माणसांना) खुपसे नसते. कोकणात शिकारीला गेल्यावर, ‘काय रे उंदिर तरी तरी मारलात काय’ असे विचारत. त्या वेळेला काहीच नाही तर दोन चार साळींदरे तरी मारलेली दाखवली की विचारणार्याचे तोंड बंद करता येत असे.
हरण कोकणात कुठेही सापडत नसे. पन्नास वर्षांपूर्वी तुरळक दिसत.
ससे आणि रानडुक्करं मात्र कोकणात अजून आहेत. (“चोरट्या शिकारीतून वाचलेली”) ही दोन्ही जनावरं नैसर्गिक वातावरणात वाढलेली असल्यामुळे कमीत कमी मसाले वापरून शिजवल्यास खूप छान लागतात.
टिप: स्कॉच नसली आणि लोकल स्टफ असला तरी हे सगळे पचते/ एन्जॉय करू शकता....

रानडुक्करे गोव्यांत प्रचंड माजली आहेत. मागच्या वेळी एका मित्राच्या घरी असताना त्याच्या बागेंत धुडघूस घेणारी २ मोठी अन सुमारे ६ छोटी रानडुक्करे पहिली होती. स्थानिक लोकांच्या मते काडतुसे मिळणे थोडे मुश्किल झाल्याने ह्यांना मारणे कठीण जाते. नेहमीच्या शॉटगन कार्ट्रिरेज रानडुक्करासाठी चालत नाहीत त्याच्या साठी slug हवा असतो. हा दक्षिण भारतांत मिळणे मुश्किल आहे.

सांबर हा प्राणी म्हणे गोव्यांत एके काली विपुल प्रमाणात उपलब्ध होता पण सध्या बहुतेक सांबरानी अभयारण्यांत बस्तान हलवले आहे. तिथे फक्त फारेस्ट लोक आणि सरकारी अधिकारी त्यांना मारतात (एका आदिवासी माणसाने मला अतिशय निष्पाप पाने सांगितले).

माम्लेदारचा पन्खा's picture

27 Oct 2016 - 9:44 pm | माम्लेदारचा पन्खा

ससा इतका गोजिरवाणा असतो त्याला खातात ?? घोर कलियुग !

गामा पैलवान's picture

27 Oct 2016 - 10:25 pm | गामा पैलवान

मापं,

गोजिरवाणा ससा वेगळा आणि खायचा ससा वेगळा असतो. इंग्रजीत एकास रॅबिट तर दुसरा हेअर म्हणतात. दोन्ही खाल्ले जातात, पण हेअर रॅबिटइतका गोजिरवाणा नसतो. त्यामुळे कलियुगाची घोर मात्रा कमी करून अघोर कलियुग म्हणा.

आ.न.,
-गा.पै.

मिपावर कुनी नरभक्षक वगैरे हैत का? मला जरा रेशिपी पायजे व्हती. जंगलात शिकारीबिकारी दिसले की लय विच्छा व्हती बगा. ;-)

साहना's picture

28 Oct 2016 - 4:55 am | साहना

हे पहा अक्खे पुस्तक आहे : https://www.amazon.com/Feeding-Hannibal-Connoisseurs-Janice-Poon/dp/1783...

चाणक्य's picture

27 Oct 2016 - 11:05 pm | चाणक्य

नवीनच आहे हे सगळं मला. विशेषतः ती हल्याची पाकृ

मनीषा's picture

28 Oct 2016 - 7:44 am | मनीषा

मला वाटले .. मिपा वरील स्फोटक धागे वाचून तुम्ही असे काही विचारताय की काय?

नाही, पण तुम्हाला खरीच पाकृ. हवी आहे.