घोसाळ्याची (पारोश्यांची) भजी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
18 Oct 2016 - 6:34 pm

या मोसमात मुबलक प्रमाणात ही भाजी बाजारात दिसते. याची चिंचगुळाची भाजी, दह्यातले भरीत होतेच, पण भजी म्हणजे अहाहा!!!!
bhaji
साहित्यः
दोन पारोशी, तीन वाट्या बेसन, अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा ओवा, दोन चमचे तिखट, मीठ, तेल तळणीसाठी.
bhaji
कृती:
पारोशी धुवून त्याच्या गोल चकत्या करून घ्या. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ घाला. मीठाची चव आली पाहिजे पाण्याला. आता या पाण्यात चकत्या बुडवून ठेवा. एका खोलगट भांड्यात बेसन, रवा, तिखट, मीठ एकत्र करा. ओवा अगदी थोडा भरड करून घ्या. पिठात मिसळा.पाणी घाला. पिठाची चव बघून लागेल तसे तिखट, मीठ वाढवा. आता चकत्या चाळणीवर काढा. पाणी निघून जाऊ द्या. कढईत तेल तापत ठेवा. चकत्या पिठात बुडवून तळून घ्या. रव्यामुळे कुरकुरीत होतात भजी, सोडा किंवा तेल घालायची गरज नाही.
bhaji
मस्त कुरकुरीत भजी तयार आहेत!!
bhaji
आता वाट का पाहताय? करा सुरूवात!! पण जरा जपून, नाहीतर कांदाभजीसारखी खायला जाल आणि तोंड भाजेल!!
ही काही नविन पाकृ नव्हे....फक्त आठवण...केली नसाल तर लगेच करा!!

प्रतिक्रिया

विजय पिंपळापुरे's picture

18 Oct 2016 - 6:57 pm | विजय पिंपळापुरे

छान, पण फार जुनी आणि साधी रेसिपी आहे

भरताची रिसेपी सांगा

सस्नेह's picture

19 Oct 2016 - 11:50 am | सस्नेह
स्वाती दिनेश's picture

18 Oct 2016 - 7:13 pm | स्वाती दिनेश

भजी, ह्या भारतवारीत खायलाच हवीत, :)
आजोळी घोसाळी,तोंडलीच्या वेलाचा मांडव होता. दिवाळीच्या सुटीत हमखास घोसाळ्याच्या भज्यांचा प्रोग्राम असायचा त्याची आठवण आणि भज्यांची चव दोन्ही ताजे झाले.
स्वाती

हे मी आधीच लिहिलय!! फोडी करून वाफवून घेऊन त्यावर तूपाची मिरच्या, जिरे आणि हिंग अशी फोडणी द्या आणि मीठ, साखर, दही घाला. झाले भरीत!!

तुषार काळभोर's picture

18 Oct 2016 - 7:18 pm | तुषार काळभोर

उम्मम्मम्म!!!
स्लर्प स्लर्प स्लर्प!!!
अवर्णनीय प्रमाणात आवडतात मला....
घोसाळ्याची भजी > बटाटा भजी > सिंह्गड ष्टाईल खेकडा भजी > पालक भजी > गोल भजी

अरे देवा! असे फोटू टाकल्याने पाकृ करण्याची सक्ती होते. घोसाळी मिळतील असे वाटत नाही पण दुसर्‍या प्रकारातली भजी करायला हरकत नाही.

त्रिवेणी's picture

18 Oct 2016 - 8:00 pm | त्रिवेणी

मला भाजी जास्त आवडते गिलक्यांची.

त्रिवेणी's picture

18 Oct 2016 - 8:00 pm | त्रिवेणी

मला भाजी जास्त आवडते गिलक्यांची.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2016 - 8:22 pm | अत्रुप्त आत्मा

य्या हू.. काय योगायोग पण!
थंडीचे दिवस हे , अन् घोसाळ्याची ही भजी
थंडीचे दिवस हे , अन् घोसाळ्याची ही भजी
अत्ताच खाल्ली केलेली घरी, अशीच ताजी ताजी!

काय जबरा लागतायत!
सांजेला भाजी आणाया ग्येलू आनी बायकूनी बगितल्या बगितल्या घेतली... आनी क्येली अत्ताच गरम

अनन्न्या's picture

18 Oct 2016 - 10:02 pm | अनन्न्या

आता फोटो पण द्या की!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Oct 2016 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

चूक !

भजी म्हणजे अहाहा!!!! नाsssही (रागावलेली स्मायली)

घोसाळ्याची भजी म्हणजे अहाहा!!!! अहाहा!!!! अहाहा!!!!

अनन्न्या's picture

18 Oct 2016 - 11:33 pm | अनन्न्या

खरय तुमचं!

कविता१९७८'s picture

18 Oct 2016 - 10:35 pm | कविता१९७८

नेहमी खाते, एकदम चविष्ट

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Oct 2016 - 10:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

आयला म्हणले घोसाळी म्हणजे काय भाजी असेल बुआ? हे तर आमच्याकडले गिलके! मंदार भालेराव साहेब, सचुभाऊ, डांगे अण्णा, बोक्याभाऊ, ह्यांनाही बहुदा हा व्होकेबलरी प्रॉब्लेम आला असावा असे वाटते! =))

गिलक्याचे भजे म्हणजे एकदम हिट आयटम आमच्याकडला, पण घरगुती हॉटेल मध्ये नाही :)

अनन्याजी तुमचे आभार नॉस्टॅल्जीया बद्दल :)

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Oct 2016 - 12:21 pm | अनिरुद्ध.वैद्य

मी दोनेकदा गिलके नाहीत, घोसाळी आहेत, आस ऐकुन परत गेलेलो ;)

अनन्न्या's picture

18 Oct 2016 - 11:31 pm | अनन्न्या

आमच्याकडे पारोशी म्हणतात याला!पण भजी मात्र भारी लागतात.

प्रभाकर पेठकर's picture

19 Oct 2016 - 2:04 am | प्रभाकर पेठकर

गिलक्यांची भाजी, भिजवलेली मुगाची डाळ घालून मस्त लागते.
भजी तर त्याहून मस्त.

सहज घरच्या (मोठ्या) कुंडीतही गिलक्यांचा वेल घरच्या घरी लावता येतो. ताजी ताजी गिलकी आणि ताजी ताजी भजी लै भारी लागतात.

विशाखा राऊत's picture

19 Oct 2016 - 2:38 am | विशाखा राऊत

एक नंबर.. भजी तशीही आवडतात :)

सस्नेह's picture

19 Oct 2016 - 11:50 am | सस्नेह

मस्त दिसताहेत भजी !

सपे-पुणे-३०'s picture

19 Oct 2016 - 11:56 am | सपे-पुणे-३०

मस्त दिसतायत भजी.... ! आता करून खाल्ल्याशिवाय चैन पडणार नाही.
अगं कोकणात 'पारोशी' तर घाटावर घोसाळ्यांना 'गिलकी' म्हणतात.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Oct 2016 - 12:22 pm | अनिरुद्ध.वैद्य

सणासुदीच्या दिवसातली भजी! कांदा चालत नाही मग गिलकी घालुन करणार, पण खाणार!!

अनुप ढेरे's picture

19 Oct 2016 - 12:31 pm | अनुप ढेरे

गणपतीमध्ये वर्षानुवर्ष घरी बनतात ही भजी. कधीही आवडली नाहीत :(

वटवट's picture

19 Oct 2016 - 12:50 pm | वटवट

तोंडाला पाणी सुटलं....

अनन्न्या's picture

19 Oct 2016 - 1:09 pm | अनन्न्या

धन्यवाद सर्वांना!!