अशी सजेल दिवाळी

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 11:35 pm

नमस्कार मंडळी,

श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ. सर्वांच्या जिव्हाळ्याची आणि आनंदाची अशी दिवाळीच मला खुणावू लागली.मग काय विचार पक्का झाला आणि कामाला सुरवात कॆली.
दिवाळी म्हटलं की सर्वप्रथम आठवतॊ तॊ आकाश कंदील.तॆंव्हा सादर आहॆ,

क्विलींगचा आकाश कंदील.......

आकाश कंदीला पाठॊपठ यॆतॆ ती अंगण सजवणारी रांगॊळी,प्रस्तुत आहॆ रांगॊळी....

आकाश कंदील लागला ,रांगॊळीही काढून झाली. दीपावली म्हणजॆ दिव्यांची आवली.तर मग अमावस्यॆच्या अंधकाराला उजळून टाकणाऱ्या आपल्या पणती भॊवतीची ही सजावट....

मंडळी,या शुभसूचक रांगॊळीनॆ आणि प्रकाशदिव्यांनी आपणा सर्वांचॆ आयुष्य सुखसमृद्धीनॆ आणि आनंदानॆ झळाळून उठॊ,हीच ईश्वर्चरणी प्रार्थना!

शुभ दीपावली!

कलासद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

फोटो दिसत नाहीयेत. बादवे, लेख कलादालनात हलवा.

रेवती's picture

13 Oct 2016 - 4:07 am | रेवती

गणेशा झालाय माझा.

नाही.. मलाही दिसत नाहीयेत. बहुतेक पब्लिक अ‍ॅक्सेस नाहीये.

यशोधरा's picture

13 Oct 2016 - 7:50 am | यशोधरा

मीपण तुझ्याच बोटीत.

५-५ kbचे pngफोटोलिंक आहे आणि पब्लिक अक्सेस नाही.

नूतन's picture

13 Oct 2016 - 8:30 am | नूतन

फोटो नेहमी प्रमाणे गुगलवर चढवले आहेत आणि मला लॉग इन न करताही दिसत आहेत. काय प्रॉब्लेम असावा? कुणी मार्गदर्शन करु शकेल का?

मला वाटते, सगळ्यांना(पब्लिक) फोटो पाहण्याचा अ‍ॅक्सेस न देण्यामुळे असे झालेय. ते चेक करा प्लीज.

कंजूस's picture

13 Oct 2016 - 10:41 am | कंजूस

१) फोटोवर क्लिक करा
२)मोठा दिसल्यावर लिंक कॅाप करा
३)ही लिंक ( गुगल लॅागिन नसताना ) नवीन अड्रेस बारमध्ये पेस्ट करून तो फोटो मोठा दिसतो का पाहा. दिसला तर ती लिंक वापरा.
-
४)सध्याच्या लिंक पेस्ट करून पाहिल्या तेव्हा नाही दिसत शिवाय साइज फक्त ५ kb येतेय (thumbnail). मोठे फोटो बहुधा १५० ते ६०० kb असतात.

नूतन सावंत's picture

13 Oct 2016 - 6:57 pm | नूतन सावंत

मलाही दिसत नाहीयेत फोटो.

दिसले दिसले. एक नंबर जबरदस्त काम झालेय.
आकाशकंदील तर खतरनाक भारी झालाय. अल्टीमेट काम.
गणेशचित्रमालेच्या क्विलिंगमास्टरची भारीच कामगिरी.

यशोधरा's picture

14 Oct 2016 - 7:27 pm | यशोधरा

ओह! भारीच सुंदर!

रुस्तम's picture

14 Oct 2016 - 7:29 pm | रुस्तम

मस्तच आता फोटो दिसत आहेत.

सुंदरच!! हा आमचा मागल्या वर्षीचा कंदील!!

kandil1

kandil2

kandil3

यशोधरा's picture

14 Oct 2016 - 9:26 pm | यशोधरा

वा! हे फोटोही सुरेख आहेत!

सूडक्या, कंदील जबरा जमलाय.
फोटो तर काय पार कंदील बलोच म्हणले असते पण गेली बिचारी. असो.
लास्ट फोटो भयंकर आवडलेला हाये.

अनन्न्या's picture

19 Oct 2016 - 6:43 pm | अनन्न्या

मस्त

कंजूस's picture

14 Oct 2016 - 8:32 pm | कंजूस

खुपच सुंदर आणि सुबक!!!
( आताचे फोटो सुमारे १३० kb JPEG आले आहेत)
मला वाटतं jpeg फोटोत नाव /watermark नाही केले तर अधिक kbचे येतील.

सूड , तमारापण बहु सारो छे।

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Oct 2016 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखातल्या आणि सूड यांच्या, दोन्हीही कलाकृती खूप सुंदर आहेत !

पिंगू's picture

14 Oct 2016 - 8:50 pm | पिंगू

जबरी फोटो आहेत..

फोटो दिसले. फारच छान. सूड यांचेही फोटो छान आहेत.

किसन शिंदे's picture

15 Oct 2016 - 11:53 am | किसन शिंदे

जबराट केलेय राव सगळे. सूडचा कंदील आधी पाहीला होताच, तुमचंही क्विलिंग वर्क किलर दिसतंय अगदी

इथे ऑनलाईन क्विलिंग शिकवता येईल का?

किसन शिंदे's picture

15 Oct 2016 - 12:17 pm | किसन शिंदे

+१

आम्हालाही शिकवा की, तुम्ही कसं करता ते

स्वाती दिनेश's picture

15 Oct 2016 - 12:32 pm | स्वाती दिनेश

सुंदर आहेत ग तुझ्या सगळ्या कलाकृती,
सूड, तू केलेला कंदिलही सुरेख.
स्वाती

मूळ धाग्यातल्या कलाकृती आणि सूडची, दोन्ही सुंदर आहेत !

सानझरी's picture

17 Oct 2016 - 12:33 pm | सानझरी

सुंदर!!!

उल्का's picture

17 Oct 2016 - 12:36 pm | उल्का

अतिशय सुरेख!

बरखा's picture

17 Oct 2016 - 1:01 pm | बरखा

खुपच सुंदर आहेत सर्व फोटो.

नूतन's picture

18 Oct 2016 - 9:44 am | नूतन

प्रतिसाद आणि कौतुकासाठी मनापासून आभार.
ऑनलाईन क्विलिंग शिकवता येणं जरा कठीण आहे, पण एखाद्या मिपा कट्ट्यावर जरूर शिकवेन.
दिनांक २२ आणि २३ ऑक्टोबरला ठाणे येथे आयोजीत एका प्रदर्शनात माझ्या क्वीलींगच्या वस्तूंचे
प्रदर्शन व विक्रीसाठी मी सहभागी होत आहे.सर्वाना आग्रहाचे निमंत्रण.

स्टॉलचे, कलाकृतींचे फोटो टाका इथे नूतनताई,
प्रदर्शनाचा वृत्तांत आल्यास अतिउत्तम.

यशोधरा's picture

18 Oct 2016 - 6:15 pm | यशोधरा

हो जरुर टाका फोटो.

किसन शिंदे's picture

18 Oct 2016 - 5:47 pm | किसन शिंदे

ठाण्यात कुठे?

गावदेवी मैदान कि घंटाळी मैदान कि शिवसमर्थ शाळेचे पटांगण??

नूतन's picture

18 Oct 2016 - 11:58 pm | नूतन

दिनांक २२ शनिवार व २३ रविवार
नौपाडा हिंदू भगिनी मंडळ
पूजा अपार्टमेंट, हरी कृष्ण लेन
ब्राह्मण सोसायटी नौपाडा ठाणे

धन्यवाद

सुड आणि नुतन, क्विलिंग वर्क अगदी किलींग आहे. आम्हाला पण शिकवा की. याच साहित्य कुठे मिळत?

त्रिवेणी's picture

18 Oct 2016 - 8:11 pm | त्रिवेणी

जबरी आहे सगळी कलाकुसर.
@सुड तुमचा ही आकाशकंदिल मस्त.
पुण्यात मिळतील का असे आकाशकंदिल.

अमिता राउत's picture

19 Oct 2016 - 12:11 am | अमिता राउत

अप्रतिम , नवीन प्रकारचा आकाश कंदील पाहायला मिळाला .

सर्व फोटू मस्त. सुडकूचाही फोटू छान.

अनन्न्या's picture

19 Oct 2016 - 8:27 am | अनन्न्या

सहीच! ठाण्याला बहिण असते माझी नौपाड्यातच तिला सांगते.

पैसा's picture

19 Oct 2016 - 4:41 pm | पैसा

सगळेच फोटो फार सुरेख आलेत. जबरदस्त कलाकृती आहेत या!