4 कारणे...
//
---------------------------------------------------------------------------
पहिलं कारण-
संख्या.
या देशात 80 टकक्यांपेक्षा जास्त लोकसंख्या हिंदुची आहे. नॅचरली- कोणत्याही धर्मावर होणाऱ्या टोटल टीकेपैकी -80 टक्के टीकासुद्धा -मेजोरिटी फॉलो करत असलेल्या धर्मातल्या चुकीच्या घडणाऱ्या गोष्टीबद्दलच होणार. याईतकं साहजिक काय?
उदाहरणार्थ. हेच जर अमेरिका किंवा यूरोपमधलं घेतलं तर- तिथले प्रोग्रेसिव लोक करत असलेली टिका- बहुसंख्य वेळा ख्रिश्चनिटी 'च्याच' विरोधात असते. अमिरिकेतले ख्रिश्चन लोक, तिथल्या अल्पसंख्य हिंदू धर्मावर टिका करून काय मिळवणार? ---तसंच भारतात आपण अत्यल्प असलेल्या ख्रिश्चन धर्मावर --टोटल टिकेच्या 50 टक्के टिका करून काय मिळवणार??
---------------------------------------------------------------------------
दुसरं कारण:
मी जन्मलो -त्या धर्मातल्या लहानपणापासून पाहत आलेल्या चुक बरोबर अशा साऱ्या गोष्टी बद्दल बोलताना मला नेचुरल कॉन्फीडेंस असतो. मी ठामपणाने एखाद्या गोष्टीला चुक तर चुक किंवा बरोबर तर बरोबर म्हणू शकतो. हेच मी (पुरेशा अभ्यासा अभावी) दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना थोडासा तरी कचरेल...
उदाहरणार्थ.
मी हिंदू आहे अन जर मला इस्लामच्या ईद-उल-अध वर (हे नाव सुद्धा बरोबर आहे की नाही मला ठाऊक नाही) -टिका करायची म्हटलं-- तर त्याआधी ती मुळात साजरी का केली जाते?? याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार.
या विरुद्ध -मी ज्या हिन्दू धर्मात जन्माला आलो त्यात फॉलो होणाऱ्या अंधश्रद्धा, जात-पात, भोंदू बाबा, फुकटे पुजारी, अंगात येणे, या चुकीच्या गोष्टी मी लहानपणा पासून पाहत आल्याने- यावर टिका करताना स्वत:च्या धर्माच्या (मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे) करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो.
प्लस यात परत संख्या कामाला येते. आता 2015 च्या रिपोर्ट नुसार भारतात
80 टक्के हिन्दू
14 टक्के मुस्लीम
2 टक्के ख्रिश्चन
1 टक्का बुद्ध अन
इतर 3 टक्के आहेत.
त्यामुळे 10 पैकी टिकाकार घेतले तर-
प्रत्येक धर्मावर होणारी टिका साहजिक अशी असेल...
हिंदू 8%
मुस्लीम 1.4%
ख्रिश्चन 0.2% अन
बुद्ध 0.1%
म्हणजे हिंदू धर्माची होणारी समीक्षा 'कठोर' असणार यात वाद नाही.
---------------------------------------------------------------------------
तिसरं कारण:
मेजोरिटीचा-- माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम.
म्हणजे कोणत्याही देशातल्या मेजोरिटीचं जेवढं रॅशनलायजेशन, सेक्युलरिजेशन आणि लिब्रलायजेशन होईल- तेवद्याच प्रामाणात त्या त्या देशातल्या माइनोरिटीजचंही -थॉट एंड बेहविरियल लिब्रलायजेशन "आपोआप" अन नकळत होईल. "आपोआप" -हा शब्द इथं फार महत्वाच्या आहे- कारण ही प्रोसेस अतिशय इम्प्लीसीट आहे. ठरवून न करता केलेली.
अतिशय सोपं उदाहरण म्हणजे समजा 10 पोरांत 8 जन हुशार आहेत अन 2 थोड़े ढ. --तर त्या 2 ढ मधल्या, या 8 च्या संगतीत राहून ,एक तरी पोरगा हुशार होण्याची शकयता जास्त असते. And vice-a-versa!
म्हणजे केरळ मधला मुस्लीम अन बिहारचा मुस्लीम यात साहजिक फरक असणार आहे. तसाच भारतातला मुस्लीम अन पकिस्तानला मुस्लीम यात खुप फरक असणार आहे. "माझ्या engg च्या वर्गातल्या, कित्येक मुस्लीम मूली इतर मुलींसारखं जीन्स टॉप घालायच्या." तेच पकिस्तान मधल्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना तिथे इंजिनिअरींग पर्यंत 'शिकू तरी देत असतील का?' हाच मला प्रश्न आहे.
म्हणून हिंदू-- म्हणजे या देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही.
---------------------------------------------------------------------------
चौथं कारण.
माझी टिका ही --माझा धर्म धुसमसत का होईना पण स्वीकारेल.
पण दुसऱ्या धर्मातल्या कोणी माझ्या धर्मावर केलेली टिका (मग ती कितीही बरोबर असली) तरी ती- माझा धर्म स्वीकारेल का?
उदाहरणार्थ:
एखादा मुस्लीम म्हटला की "काय तुमच्या हिन्दू धर्मात ते फालतू अंगात येणे अन असले काय काय प्रकार असतात." आता अंगात येणे हा प्रकार कितीही खोटा असला तरी त्याबद्दल ची टीका मी एका मुस्लीमाकडूम (प्रैक्टिकली बोलताना) स्वीकारेल का??? कुठेतरी मनातल्या मनात मी त्याला 'आउटसायडर' च मानेल. मग मी त्याला काय उत्तर देईल की "आधी तुम्ही त्या बुरख्याचा फाल्तुपना बंद करा- आता आपण ईसवी सन 2016 मधे आहोत. ईसवी सन - 216 मधे नाही".
प्रसंगी मी त्याच्या अंगावर सुद्धा जाईल. हिंसक होईल.
पण हेच एक हिंदू म्हणून मी म्हटलो की "काय यार आपल्या धर्मात हे अंगात येणे काय -अन जातीयवाद पाळने काय- प्रकार बिलकुल फालतू आहेत." तर समोरचा व्यक्ती माझा विरोध् करेल. पण शेवटी टोकाला न जाता किंवा हिंसक न होता -- गप्प बसेल. कारण त्यांच्यासाठी मनातल्या मनात मी कुठेतरी "इनसायडर" असतो.
त्यामुळे प्रोग्रेसिव हिंदू म्हणून -माझी हिंदू धर्मावर (कंपेरिटीवली जास्त) टिका होते..
.
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
//
(Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) )
Article is inspired from T Manoj's view on religion...
प्रतिक्रिया
10 Oct 2016 - 9:49 am | टवाळ कार्टा
आता तुम्हाला "सुंता करून या" वगैरे प्रतिसाद येतील, लेखातले विचार बरोबर असले तरीही
10 Oct 2016 - 9:59 am | अर्थहीन
सॉरी तुम्ही नेहमी हा शब्द वापरता ... मला याचा अर्थ माहीत नाही...
10 Oct 2016 - 10:11 am | मदनबाण
बोळा अडकला की होतं असं...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Will breach LoC to hunt terrorists, India tells Pakistan
10 Oct 2016 - 10:12 am | अर्थहीन
ओकेे
10 Oct 2016 - 9:50 am | महासंग्राम
(Constructive counter-arguments are Welcome as usual... :-) )
Article is inspired from T Manoj's view on religion...
म्हणजे यात तुमचं स्वतःच असं काहीच मत नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते कळलं नाही.
10 Oct 2016 - 9:58 am | अर्थहीन
मी का टीका करतो - हेच मी म्हटलो आहे
10 Oct 2016 - 9:54 am | एस
कारणमीमांसा बरोबर आहे.
12 Oct 2016 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. लेखातील मुद्दे पटणारे.
-दिलीप बिरुटे
10 Oct 2016 - 10:45 am | कपिलमुनी
मी हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहितो
10 Oct 2016 - 10:47 am | अर्थहीन
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
10 Oct 2016 - 10:49 am | कपिलमुनी
आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
>>मान्य !
पण सर्व धर्मात अशी आवाज उठवायची परवानगी नसते .
आवाज बंद केले जातात
10 Oct 2016 - 1:44 pm | टवाळ कार्टा
मग आपणसुध्धा हिंदू धर्माला मुसलमानांच्या इतके खाली आणून ठेवायचे का?
10 Oct 2016 - 2:59 pm | कपिलमुनी
इतर काही धर्मात असे होते एवढेच निदर्शनास आणायचे होते.
हिंदूमधे असे सध्या होत नाही पण कलबुर्गी आणि दाभोळकर यांच्ज्या हत्या जर वैचारीक विरोधातून झाल्या असतील तर हिंदू धर्म तीच वाटचाल करत आहे असे म्हणावे लागेल
10 Oct 2016 - 6:56 pm | सुबोध खरे
साडे तीन अतिरेकी सनातन्यांमुळे हिंदू धर्म अशा वाटेवर जाईल हे म्हणणे म्हणजे अतिशयोक्ती आहे.
मिपावरसुद्धा ९९% टक्के लोक अशा सनातनी अतिरेक्यांना उघडपणे विरोध करताना दिसतील.
11 Oct 2016 - 3:54 pm | कपिलमुनी
दोन हत्या किंवा दोन तीन अतिरेकी यांच्यामुळे सध्यातरी हिंदू धर्माला फरक पडणार नाही.
परंतु या किंवा अशा प्रकारछ्या हत्यांमागे विचार मंथन , ब्रेन वॉशिंग आणि इतर सपोर्ट ग्रुप असतात त्यामुळे हे विचार फोफावतात त्याची काळजी वाटते .
अर्थात अजून हे सनातन्यानी केलाय याचा कोणताच पुरावा नाही त्यामुळे जर तर जास्त चर्चण्यात अर्थ नाही.
10 Oct 2016 - 11:21 am | बाजीगर
चांगलं तर्कशुद्घ लिहीलय, सहमत.
10 Oct 2016 - 2:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
.
10 Oct 2016 - 2:06 pm | नावातकायआहे
जाऊं द्याना बाळासाहेब.....
10 Oct 2016 - 2:25 pm | पुंबा
प्रत्येक मुद्द्याशी सहमत..
10 Oct 2016 - 2:32 pm | शब्दबम्बाळ
>>"याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार."
काय राव! असं असतंय का? टीका करायची तर असे विचार करून चालत नाही इकडे... बिनधास्त टीका करायची आणि पुढच्याने संदर्भ मागितले कि त्यालाच उलट पुरावे मागायचे अशी पद्धत असते! ;)
10 Oct 2016 - 2:49 pm | अर्थहीन
वेड्यासारखा हसलो... एक नंबर... शब्दबम्बाळ.
10 Oct 2016 - 3:14 pm | यशोधरा
तुमचा स्वतःच्या हिंदू धर्माच्या अभ्यासा/आकलनावरुन हिंदू धर्म म्हणजे काय हे जाणून घ्यायला आवडेल.
10 Oct 2016 - 3:27 pm | हेमन्त वाघे
माझी फाटते ...
दरदरून
बरोबर ना ?
नाहीतर गिरीश कुबेर काकांना विचार ना ?
केरळात बघा कि ?
आणि चार्ली हेब्दो तर माहीतच आहे ..
मग काय ??
10 Oct 2016 - 4:59 pm | अर्थहीन
बरोबर हेरून या वाक्याकडे दुर्लक्ष केलत... व्हेरी गुड...
>>
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
10 Oct 2016 - 3:28 pm | अमर विश्वास
तुमचे नक्की काय म्हणणे आहे ?
ह्या लेखातील मते तुमची आहेत का टी मनोज यांची?
तुम्हाला एखादी गोष्ट (कुठल्याही धर्मातील) पटत नसेल तर जरूर टीका करा... त्याच बरोबरोबर सुधारण्याचा मार्गही सुचवा.. व त्याच बरोबर येणार्या बर्या वाईट प्रतिक्रियांना सामोरे जायची तायारी ठेवा..
हे जमत नसेल तर मिपा सारख्या स्थळावर लेख लिहा.. मर्यादित प्रतिक्रियांना सामोरे जाणे सोपे आहे..
तेही जमात नसेल तर घरच्या घरी टीका करा..
हा लेख लिहून हिंदू धर्माविरोधात(च) केल्लेल्या टीकेचे समर्थन कशाला?
हिंदू धर्मात जे अयोग्य आहे जसे देवल बळी देणे.. ह्याचा विरोध जरूर करावा.. आणि आम्ही विरोध करतो हे जाहिरपणे सांगावे.. उगाच या लेखातील मुद्यांच्या कुबड्या कशाला?
10 Oct 2016 - 5:04 pm | अर्थहीन
काय एवढं बेसिक पण मिपा वर सांगावं लागतं का राव?
बकऱ्याचा बली देऊ नका... आवरण सवर्ण मानू नका,
सुचवला मार्ग अजून काय सांगायला पाहिजे?
...
घरच्या घरी.. (त्याचा इथं काय संबंध)
...
लेख नीट वाचलात (पूर्वग्रह न ठेवता) तर हे लगेच समजलं असता कि माझी ऑलरेडी टीका करून झालीय आणि करत राहणारे...
फक्त ती का करतोय याची मला वाटलेली कारणे (मनोज च्या) लेखाच्या आधारे मी एक्सप्लिन केली आहेत...
11 Oct 2016 - 5:25 am | दिगोचि
टी मनोज यान्च्या लेखाचा सन्दर्भ द्याल का?
10 Oct 2016 - 3:43 pm | Dhananjay Borgaonkar
बिनधास्त आणि मनोसोक्त टिका करा. आजिबात घाबरु नका. ज्यांच्या नावातच अर्थहिनता आहे त्यांचीन टिका सुद्धा तशीच असेल. आम्ही खुप सहिष्णु आहोत.
10 Oct 2016 - 5:05 pm | अर्थहीन
अपेक्षित आहे... चालुद्या...
.
.
लेखावर टीकाच होणार नाही... हे माहीत नसण्याइतका खुला मी नक्कीच नाही...
10 Oct 2016 - 6:41 pm | कैलासवासी सोन्याबापु
बोरगावकर साहेब, अर्थहीन ह्यांनी काही माझ्या घरात ह्या महिन्याचा किराणा भरलेला नाही, फक्त कसंय न तुम्ही आत्ताच जे केलेत त्याला सभाशास्त्रात एड होमिनेम किंवा मुद्दे नसताना केलेले वैयक्तिक हल्ले म्हणतात, तेव्हा संभाषण शुचिता अबाधित ठेऊन जर चर्चेत विरोधाभासी तर्क देता आला तर जरूर द्या अन चर्चा सकस ठेवा. नाहीतर कमीपणा तुमच्या आयडीला येईल त्याच्याशी काही मला सोयरसुतक नाही, पण कमीपणा माझ्या धर्माला सुद्धा येईल, अन तो न येऊ देणे एक हिंदू म्हणून माझे कर्तव्य मी तरी समजतो.
10 Oct 2016 - 6:45 pm | अर्थहीन
मला खूप मोठी अपेक्षा होती कि इथे या लेखाला खूप चांगल्या "काउंटर" अर्ग्युमेंट्स येतील पण इथे मला फक्त वैयक्तिक हल्ले - नाहीतर मग मुसलीम किंवा दुसरे धर्म कसे वाईट आहेत एवढच दिसत आहे...- सर्वां कडून नाही - पण काही जणा कडून... जे माझ्या दृष्टीने फारच दुर्दैवी आहे... अपेक्षा भंग झाल्यासारखे वाटते...
10 Oct 2016 - 6:47 pm | यशोधरा
तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत.
10 Oct 2016 - 7:15 pm | कैलासवासी सोन्याबापु
अर्थहीन साहेब, कृपया उत्तर द्या अन आरग्युमेंटची सुरुवात करा.
10 Oct 2016 - 7:38 pm | यशोधरा
ऑ?
10 Oct 2016 - 7:39 pm | यशोधरा
हां हां..
10 Oct 2016 - 8:12 pm | अर्थहीन
एक वाक्यच पुरेसं आहे..
"तहाणलेल्याला ओंजळीने पाणी देणं" म्हणजेच हिंदू (अन दुसरा कोणताही) धर्म आहे...
पण याच्यात खूप अर्थ आहे ...
यशोधरा... नक्कीच समजेन तुम्हाला कि मला काय म्हणायचं आहे...
10 Oct 2016 - 9:26 pm | यशोधरा
तुम्ही धर्म आणि रुढी ह्यांची गल्लत करीत आहात असे मला वाटते. हिंदू धर्म म्हणजे "रिलिजन" ह्या अर्थी तो धर्म नाही. चांगल्या वाईट रुढी प्रत्येक धर्मात आहेत. त्या बर्या का वाईट हा वेगळा विषय.
तेव्हा आधी तुम्ही रुढींविषयी बोलता आहात का धर्माविषयी, हे आधी सांगा.
10 Oct 2016 - 9:51 pm | अर्धवटराव
अनेकांची दुकानं एव्हाना बंद झाली असती.
असो. सावरकरांनी टिका जरुर करावी, पण ति सावरकरांनी करावी :ड
10 Oct 2016 - 10:18 pm | सतिश गावडे
>>तुम्ही धर्म आणि रुढी ह्यांची गल्लत करीत आहात असे मला वाटते.
धर्म आणि रुढी यात काय फरक असतो? एखादी प्रचलित बाब धार्मिक बाब आहे की रुढी हे कसे ठरवतात?
10 Oct 2016 - 10:23 pm | यशोधरा
धार्मिक बाब म्हणजे काय?
10 Oct 2016 - 10:38 pm | सतिश गावडे
असो.
11 Oct 2016 - 7:15 am | यशोधरा
असो काय? :) मी खरेच विचारले होते. खालच्या काही खरडी वाचून त्या अनुषंगाने माझे जे काही आकलन आहे ते लिहिन.
10 Oct 2016 - 10:25 pm | कैलासवासी सोन्याबापु
धर्म = Macro
रूढी = Micro
असे सुचवावे वाटते सगा सर, आयुष्य जगायचे ढोबळ नियम म्हणजे धर्म
त्या ढोबळ नियामातले व्यक्ती/ समूह/ गट/ भौगोलिक विविधातेनुसार पडलेले उपगट म्हणजे रूढी असाव्यात असे वाटते.
10 Oct 2016 - 11:10 pm | गणेश उमाजी पाजवे
माझ्या मतानुसार हिंदू हा धर्म नसून जगण्याचे ढोबळ मार्ग ( WAY OF LIFE ) आहेत. महाभारत किंवा रामायण किंवा कोणतेही वेद यामध्ये जगण्याची मार्गदर्शक तत्वे हि गोष्टीरूपाने सांगितली गेली असावीत.कारण लोक असेच प्रवचन सांगितले तर ऐकून घेत नाहीत पण देवाधर्माची भीती घातली तर गोष्टी सहज गळी उतरवता येतात त्यांच्या.
10 Oct 2016 - 11:18 pm | सतिश गावडे
अस्पृश्यता हा धर्माचा भाग होता की रुढी होती?
मला वाटतं काहींना धर्मामध्ये काही गोष्टी वाईट असतात हे स्विकारणे अवघड जात असावे. त्यावर मग जे जे चांगले ते धर्म आणि जे जे वाईट त्या रुढी असा एक पळवाटसदृश्य मार्ग काढला जातो.
11 Oct 2016 - 12:24 am | कैलासवासी सोन्याबापु
मान्य ! जातीवाद हा एक हिणकस प्रकार होता/आहे अन दुर्दैवाने अजून काही दिवस राहील. मला धर्म अन रूढी वर्गीकरण फक्त पळवाट म्हणून करावे वाटले असे नाही, तर तत्क्षणी जे मला ग्राह्य धरता येण्यालायक दिसले ते मी ग्राह्य धरले होते
11 Oct 2016 - 8:11 am | यशोधरा
मुळात, हिंदू तत्वज्ञान 'वसुधैव कुटुंबकम' ह्या संकल्पनेवर आधारीत आहे, असे मला वाटते.
सुरुवातीला ऋग्वेद काळात - वैदिक धर्मामध्ये - जन्मावरुन जात ठरत नसावी. उदा. ब्राह्मणाची संतती ब्राह्मण, क्षत्रियाची क्षत्रिय वगैरे. प्रत्येकाला आपले व्यवसाय क्षेत्र निवडण्याची मुभा होती, तस्मात एकाच घरातील मंडळी वेगवेगळे व्यवसाय निवडू शकत आणि जाति ही व्यवसायावरुन ठरत असे. पुढे जेव्हा कधी जाती ठरवण्यामधील ही लवचिकता संपुष्टात आली असेल आणि काही व्यक्तींचे हितसंबंध, फायदे वगैरे टिकून राहण्यासाठी जन्मावरुन जात ठरवण्याचे प्रकार सुरु झाले असतील तेव्हा ह्या रुढीचा पायंडा पडला असावा.
हिंदू तत्वज्ञान हे एकाच व्यक्तीने सांगितलेले नाही. अनेक व्यक्तींनी आपापल्या आकलनानुसार काही मते मांडली आहेत, त्यावर चर्चा, वाद- प्रतिवाद झडले, घडले असतील आणि त्यातून त्या मतांना काही आकार प्राप्त झाला असेल. हिंदू हा धर्म आहेच कुठे? आहे ते तत्वज्ञान. अनेक विचारधारा त्यामध्ये समाविष्ट आहेत. अनेक परस्पर विरोधी विचारधारांना त्यामध्ये स्थान आहे, त्यांना कोणी झिडकारलेले नाही - भलेही स्वीकारले नसेल पण म्हणून त्यांचा गळा दाबून टाकलेला नाही.
हिंदू तत्वज्ञानाची लवचिकता हीच तर त्याची ताकद. त्यात जसे सुंदर आहे तसेच काही हीणही असेल, पण त्या हीणाचा प्रतिवाद करण्याची, त्याला नाकारण्याची, आणि सुधारण्याची संधी हे तत्वज्ञान प्रत्येकाला देते, हे त्याचे बलस्थान आहे. ते नाकारुन आपण काय मिळवतो?
असो. :) मग वाटल्यास लिहीन आणि जे लिहिले आहे, ते पटायलाच हवे असाही आग्रह नाही.
11 Oct 2016 - 8:17 am | प्रचेतस
वेदकाळात जात नसून वर्णव्यवस्था होती. जाती खूप नंतर आल्या.
अर्थात वर्णसंकरही होत असेच.
ह्या विषयावर कुरुंदकरांचे मनुस्मृती हे पुस्तक वाचनीय आहे.
11 Oct 2016 - 8:23 am | यशोधरा
हो, वर्णव्यवस्था होती हे वाचनात आहे. वर्ण आणि ancestry महत्वाची मानली जात असे, असे वाचले आहे, परंतु पोस्ट वैदिक काळात ज्याप्रमाणे ठराविक व्यवसाय ठराविक जातीच्या व्यक्तीलाच करता येई, तसे नव्हते.
10 Oct 2016 - 5:36 pm | अमर विश्वास
हा संपूर्ण लेख म्हणजे आपण फक्त हिंदू धर्मावर टीका करतो पण आपण निःपक्षपाती आहोत हे पटवण्याची केविलवाणी धडपड आहे..
तुम्हाला जर हिंदू धर्मावर(च) टीका करायची असेल तर जरूर करा..
पण तसे जहिरपणे सांगा.. कि येथे हिंदू धर्मावर टीका करून मिळेल.. बाकीच्या धर्मांच्या वाटेला जाण्याची टाप नाही.. उगाच आपल्या कृतीचे लंगडे समर्थन कशाला ?
बाकी हिंधु धर्मात टीका करण्यसरखे बरेच काही आहे.. तेंव्हा तुमचे दुकान बराच काळ चालू राहील काळजी नसावी
10 Oct 2016 - 6:33 pm | अर्थहीन
बरोबर हेरून या वाक्याकडे दुर्लक्ष केलत... व्हेरी गुड...
>>
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
>>
म्हणजे मी एकाच लेखात सगळ्या धर्माला धारेवर धरलं पाहिजे...
कसल्या बाष्फळ अपेक्षा...
वाह!
10 Oct 2016 - 9:08 pm | अमर विश्वास
अर्थहीन .. तुम्ही एकदा काय ते नक्की ठरवा...
हिंदू धर्मावर टीका करण्याची चार कारणे देता.. आणि वर म्हणता की सर्व धरमांवर टीका करतो असेही म्हणता..
जर तुम्ही सर्व धर्मांवर टीका करत असाल तर मग अशी चार कर्णे द्यायची वेळ का यावी ?
10 Oct 2016 - 9:12 pm | अर्थहीन
अहो... मला जसं हिंदू धर्मात काही चुकीचं वाटतं त्यावर मी बोलतो... तसं इतर धर्मातल्या चुकांवर सुद्धा बोलला पाहिजे असं म्हणणे अयोग्य आहे --असं तुम्हाला वाटतं?
...
वेळ वगैरे काही आलेली नाही माझ्यावर कशाची ...
मला स्वतःला वाटलं कि मी का टीका करतो हे मी स्पष्ट करावं... मला वाटतं हा माझा हक्क असायला हरकत नाही...
10 Oct 2016 - 9:22 pm | अमर विश्वास
इतर धार्माबद्दल बोलले पाहिजे वगैरे मान्य... तुम्ही स्वाट: मात्र फक्त हिंदू धर्मा बद्दलच बोलता... इतर धार्माबद्दल नाही..
त्यमुळे निधर्मी असल्याचा आव आणु नये..
10 Oct 2016 - 10:03 pm | अर्थहीन
एकाच लेखात सगळ्या धर्माबद्दल बोलणं मला शक्य नाही...
---
बाकी
आव आणून मला करोड रुपये मिळणार आहेत म्हणून मी आणतोय... तुम्हाला तोटा?
इथून पुढे असल्या कमेंट्स ना उत्तर देणे बंद... तुम्ही शिव्या दिल्या तरी तुमचा आदर --मात्र तुम्हाला उत्तर देण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ आहे --असं स्वतः "अर्थहीन" लाच वाटतं नाही... यावारून समजा काय समजायचं ते...
शिवीगाळ वगैरे...चालुद्या तुमचं आता बिनधास्त...
11 Oct 2016 - 12:25 am | अमर विश्वास
मी तुम्हाला कधी शिविगाळ केला?
बाकी चलुद्या तुमचे दुकान..
11 Oct 2016 - 12:31 am | अमर विश्वास
तुम्हाला एका लेखात सर्वा धर्माबद्दल लिहीणे शक्या नाही.. मान्य..
मग बाकीच्या लेखांच्या लिंक्स द्या.. जेथे तुम्ही इतर धर्माबद्दल मतप्रदर्शन केले आहे,,,
13 Oct 2016 - 4:13 pm | amit१२३
@ अमर विश्वास ..पटलं आपल्याला ..4 कारणे सांगण्यामागचा हेतू काय ?
@ अर्थहीन एकीकडे म्हणता मला खूप मोठी अपेक्षा होती कि इथे या लेखाला खूप चांगल्या "काउंटर" अर्ग्युमेंट्स येतील आणि दुसरीकडे तुम्ही बोलता आव आणून मला करोड रुपये मिळणार आहेत म्हणून मी आणतोय... तुम्हाला तोटा?
नावडतीचे मीठ आळणी तसा प्रकार आहे ..
10 Oct 2016 - 6:16 pm | Dipankar
हिन्दु आहात म्हन्णुन टिकेला आक्शेप नसतो निधर्मी म्हन्णुन घ्यायचे आणी टिका करणे याला आक्शेप असतो
10 Oct 2016 - 8:27 pm | श्रीगुरुजी
तुम्ही हिंदू असूनही हिंदू धर्माविरोधात का लिहिता यामागची ४ कारणे समजली. परंतु हिंदू धर्मातल्या नक्की कोणकोणत्या गोष्टींविरूद्ध लिहिता आणि काय लिहिता ते सांगता का जरा.
का टीका करतो हेच फक्त सांगण्यापेक्षा तुमच्यामते हिंदू धर्मातील टीकाकरण्यायोग्य गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि स्वीकारार्ह गोष्टी (असल्यास) कोणकोणत्या आहेत, त्या गोष्टी तुमच्यामते टीकाकरण्यायोग्य का आहेत, त्यावर तुम्ही कशाप्रकारे टीका करता व त्या गोष्टी सुधारण्यासाठी तुम्ही काय केले आहे किंवा काय करायला हवे हे सांगितले तर ते जास्त योग्य होईल.
10 Oct 2016 - 9:57 pm | अर्थहीन
काही गोष्टी मी वरती सांगितल्याचं आहेत...
अंगात येणे, बकरी कापणे, मुहूर्त पाहणे, ब्राह्मण कडून सल्ले घेणे., देवाच्या दानपेटीत पैसे टाकून मात्र एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करायची वेळ आले कि हात मागे घेणे... जातपात पाळणे...
आणि ओ माय गॉड अँड PK मध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी...
--
चांगल्या म्हणाल तर सर्वात महत्वाची गोष्ट मला हिंदू धर्माकडून सहिष्णू पणा शिकायला मिलाली हि वाटते...
--
चुकीच्या गोष्टीवर टीका करून त्या करण्यापासून लोकांना परावृत्त करणे हे मला माझ्या बाजूने केलेलं काँट्रीब्युशन वाटतं...
--
धन्यवाद श्रीगुरुजी....... तुम्ही योग्य अर्ग्युमेण्ट केली असं वाटतं --नाहीतर इथे काहीजण नुसते वैयक्तिक हल्ले करण्यापलीकडे काही करतात असं वाटतं नाही...
--
13 Oct 2016 - 8:00 pm | तेजस आठवले
अर्थहीन जी,
अंगात येणे हि गोष्ट फक्त हिंदूंपुरती मर्यादित नाही असे मला वाटते. बकरी कापणे हे तुम्ही बळी देणे अर्थाने म्हणत असाल तर ते चुकीचेच आहे.
बाकी ब्राह्मणाकडून सल्ले घेणे यात काय चुकीचे आहे ? प्रत्येक धर्मात काही लोक असतात ज्यांचा सल्ला इतर लोक घेतात. चांगले आणि वाईट दिवस ते शोधून देतात(मुहूर्त ह्या अर्थाने) आणि त्यानुसार सल्ला मागणारा माणूस निर्णय घेऊ शकतो. ब्राह्मण काही त्यांना सक्तीने बोलावून घेत नाहीत आणि अमकी तमकी गोष्ट कराच अशी सक्ती करू शकत नाहीत.(एखाद्या गोष्टीची भीती घालणे हे एक अजूनच वेगळे प्रकरण आहे, आणि त्याला कुठलाच धर्म अपवाद नाही.... अमके तमके नाही केलेस तर तुझे वाईट होईल वगैरे वगैरे)
हे हिंदू करतात ? ह्याचा काही विदा आहे का ? म्हणजे फक्त हिंदूच असे करतात ह्याचा काही विदा/ पुरावा आहे का ? माझ्या मते तुमचे हे विधान हे सरसकटीकरण आहे. माझ्या माहितीतही मध्ये किती लोक असे आहेत कि त्यांनी खूप रक्कम दान केली आहे आणि तिचा विनियोग त्याच कारणासाठी होतो आहे हे ते बघतात. हे सगळे हिंदू आहेत.
(अवांतर : काही लोक दुसर्याने त्याच्या पैशाचे काय करावे हे ज्या आग्रहीपणे मांडतात ती गोष्ट मला फार खटकते. "इतका पगार कमावतोय, दिले *** रुपये दान तर काय जातेय ह्याचे!" असे अगदी सहज बोलून जातात. मुळात दुसर्याने त्याच्या संपत्तीचे काय करावे हे ठरवणारे आपण कोण हा विचार हे लोक कधी करणार देव जाणे. तो माणूस दान देईल/ पैसे खर्च करेल/ उधळेल नाहीतर कुजवून ठेवेल, आयजीच्या जीवावर बायजी उदार कशाला ? असो.) बाकी गरजू गरजू म्हणवणारे सगळेच प्रत्यक्षात गरजू नसतात हे सुद्धा काही अनुभवातून दिसून येते. त्यामुळे हे ज्याच्या त्यावर सोडून द्यावे हेच खरे.
हि गोष्ट चुकीची आहे, पण फक्त हिंदूंमध्ये हे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल.इस्लाम ह्या शब्दाखातर सर्व मुस्लिम एकत्र येत असले/ येऊ शकत असले तरी त्यांच्यात पण एकी नाही.सुफी आणि शिया ह्यांची भांडणे आहेतच. अहमदिया मुस्लिमांना इतर मुस्लिम हे मुस्लिम मानत नाहीत असे ऐकले आहे. बोहरा मुस्लिम हे व्यवसायात जास्त असल्याने त्यांच्यात कर्मठपणा त्यामानाने कमी आहे आणि लवचिकपणा सुद्धा आहे.जातीपाती तर प्रत्येक धर्मात आहेत, गोव्यातल्या ख्रिश्चनांमध्ये पण सारस्वत ख्रिश्चन वेगळे आणि बाकीचे वेगळे असे ऐकले आहे. प्रोटेस्टंट वेगळे, कॅथॉलिक वेगळे हा भेद आहेच. त्यामुळे फक्त हिंदू धर्मातच जातीपाती आहेत असे जर तुम्ही म्हणत असाल तर ते संपूर्ण सत्य नाही.
हिंदू धर्म लवचिक आहे हे मानण्यास कोणताही प्रत्यवाय नसावा. सर्वसामान्यपणे माझ्या धर्मात ज्या गोष्टी पाळल्या जातात त्यांना विरोध करण्याचे मला स्वातंत्र्य आहे ही एक फार मोठी बाब आहे. मला हवा तो ग्रंथ मी प्रमाण मानू शकतो, त्याप्रमाणे आचरण करू शकतो, काही दिवसांनी त्यातल्या काही गोष्टी नाही पटल्या तर सोडून देऊ शकतो, किंवा दोन विचारप्रवाहांमधून माझा माझ्यापुरताच एक स्वतंत्र आचरण मार्ग तयार करू शकतो. अशा प्रकारचे स्वातंत्र्य दुसऱ्या कुठल्या धर्मात असेल असे वाटत नाही( हा स्वधर्माचा दुराभिमान नाही).
तुम्ही बाकीच्या धर्मांवर अश्या प्रकारचा लेख लिहिला असेल तर त्याची लिंक द्यावी.
14 Oct 2016 - 3:24 pm | मराठी_माणूस
लोकसत्ते मार्फत चालावला जाणारा "सर्वकार्येशु सर्वदा" नावाचा उपक्रम आणि त्या अंतर्गत लोकांचा येणारा मदतीचा ओघ पहा.
10 Oct 2016 - 9:45 pm | हेमन्त वाघे
मी फटू आहे , माझी फाटे आणि म्हणूनच मला तुलनेबे बारा हिंदू भर वाटतो
झाले समाधान ??
तुमची लाल , कलाम लाल !!
10 Oct 2016 - 9:58 pm | अर्थहीन
ओके
10 Oct 2016 - 10:09 pm | Rahul D
हा शब्द योग्य आहे का?
11 Oct 2016 - 1:05 am | बोका-ए-आझम
तिसरं आणि चौथं याबद्दल मात्र शंका आहे. तिसऱ्याबद्दल जास्त. तिसरं कारण म्हणून तुम्ही जे मांडलंय त्याला trickle down theory म्हणतात. प्रामुख्याने अर्थशास्त्रात तिचा बराच प्रभाव होता. या theory नुसार जर श्रीमंत देशांनी गरीब देशांबरोबर व्यापार वाढवला तर श्रीमंत देशांमधली संपत्ती तिथे झिरपेल किंवा trickle down होईल. काळाच्या ओघात असं आपोआप होणार नाही हे सिद्ध झालंय. बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक यांच्यातही तसं आपोआप होण्याची शक्यता कमी आहे, rather नाहीच. जर १. अल्पसंख्यांक समाज बहुसंख्यांकांच्या जीवनशैलीला आपल्या जीवनशैलीवरचं आक्रमण समजायला लागला आणि २. अल्पसंख्यांक समाज जर आपल्या कमी संख्येमुळे स्वतःला असुरक्षित समजत असेल तर - असा समाज स्वतःला बहुसंख्यांपासून जाणीवपूर्वक वेगळं ठेवायचा प्रयत्न करेल. मुस्लिम पर्सनल लाॅ बोर्ड आणि देवबांदी धर्मगुरूंनी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा विरोध केलाय त्यामागे हेच कारण आहे. त्यामुळे असा समाज आपोआप लिबरल होणं शक्य नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मुख्यतः स्त्रियांची परिस्थिती सुधरावी लागेल कारण कोणत्याही सामाजिक सुधारणा या स्त्रियांशिवाय होऊच शकत नाहीत.
चौथं कारण फारच आशावादी वाटलं मला. आॅनर किलिंगच्या ज्या दुर्दैवी घटना आपल्या देशात आणि हिंदूंमध्ये झालेल्या आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं की हिंदू समाजही पूर्णपणे प्रागतिक किंवा पुरोगामी झालेला नाही. शहरांत कदाचित सुरूवात झाली असेल. गावांत अजूनही वेगळी परिस्थिती आहे. मी एका तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंजिनियरिंग काॅलेजच्या वसतिगृहात ४-५ जातींचे वेगळे गणपती बसलेले पाहिले आहेत. बसवणारी मुलं १९-२० वर्षांची. एवढ्या लहान वयात जर जात डोक्यात पक्की बसली असेल तर ती पुढे निघून जाणं फार कठीण आहे. त्यामुळे दुसरा धर्म सोडा, आपल्या धर्माचे लोक ऐकून घेतील असंही नाही. हिंदू धर्मात तर असंख्य मतप्रवाह आणि विचारधारा असल्यामुळे धर्माच्या स्वरुपाबाबत एकमत होणं हे जवळपास अशक्य असावं.
11 Oct 2016 - 1:30 am | कैलासवासी सोन्याबापु
सहमत आहे बोक्याभाऊला आमच्या, ट्रिकल डाउन शक्य नाही कारण मुळात भारतात अल्पसंख्य लोक अब्राहमीक धर्मांचे किंवा सेमिटीक धर्माचे आहेत, ह्या मंडळींचे पूर्ण आयुष्य आजही 1200-2000 वर्षे आधीच थांबलेले आहे, ते ही एकाच पुस्तकाभोवती थांबलेले आहे. अश्यात बहुसंख्य लोकांनी कितीही ट्रिकल डाउन केले तरी ते शोषून घ्यायची वृत्तीच मुळात नसली तर पंचायत होते.
11 Oct 2016 - 1:34 am | कैलासवासी सोन्याबापु
अजून एक,
सेमिटीक धर्मांतील अचल वृत्ती पाहता हिंदू धर्म हा अतिशय वेगवान अन प्रवाही वाटू शकतो, किंबहुना काही प्रमाणात आहेच तरीही २१व्या शतकात माहिती/ज्ञानाचा महास्फोट झाल्यानंतर मात्र विलक्षण जास्त वेगाने धावणाऱ्या मानवी मेंदू पेक्षा ही प्रवाहगती फारच धीमी असल्याचे जाणवते.तस्मात हिंदूधर्मातही टिकेला स्कोप बराच उरला आहे
11 Oct 2016 - 9:30 am | अर्थहीन
सर धर्माचं आणि अर्थशास्त्राचा तत्वज्ञान वेगवेगळं आहे... याला एका धाग्यात गुंफत येईल असं मला वाटत नाही...!
...
Law बोर्ड काहीही म्हणेल त्यांना अजून फार दिवस पाहिल्याइतकंच महत्व राहील असं मला खरंच वाटत नाही... माझे कित्येक मुसलीम मित्र आहेत जे पूर्णपणे भारतीय Way Of Life जगतात... ट्रिकल डाउन होत नाही असं मानलं तर मग आज कित्येक भारतीय मुलीनी बुरखा फेकून जीन्स अन टॉप का स्वीकारले... अन बहुसंख्यामुळे हे होत नाही असं मानलं तर पाकिस्तान इराण इराक मध्ये आजही का एवढ्या मोठ्या प्रमाणात बुरखा का अस्तित्वात आहे??
सॉरी मुद्द्याशी असहमत...
11 Oct 2016 - 10:41 am | बोका-ए-आझम
असहमत. धर्म आणि अर्थ हे दोन्हीही जीवनशैली ठरवतात. त्यामुळे त्यांचं तत्वज्ञान वेगवेगळं असू शकत नाही. नीतिमत्ता किंवा ethics याला धर्म आणि अर्थशास्त्र या दोन्हींमध्ये स्थान आहे.जागतिक पातळीवर इस्लामचं, विशेषतः वहाबी इस्लामचं मूळ सौदी अरेबियामध्ये आहे आणि सौदीच्या आर्थिक संपन्नतेचा आणि तिथल्या कडवेपणाचा संबंध नक्कीच आहे. हुप्प्या यांची मक्केतील उठाव ही मालिका याच विषयावर आहे. ती वाचा.
फार दिवस हा फार गोंधळात टाकणारा शब्दप्रयोग आहे. जोपर्यंत आपल्या देशात समान नागरी कायदा लागू होत नाही, तोपर्यंत AIMPLB (All India Muslim Personal Law Board) ला महत्व आहे. ते आत्ताच तलाकच्या मुद्द्यावरुन सरकारशी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. त्यावरून काही तडजोड झालीच तर त्याला वेळ लागेल. समान नागरी कायद्यासाठी प्रत्येक राज्याची मंजुरी लागेल. झालंच तर आपल्या देशात कायदा मंजूर होणं आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणं यात फरक आहे. त्यामुळे इथेही असहमत.
भारतातील मुस्लिम हे भारताचे नागरिक असल्यामुळे त्यांची जीवनपद्धती ही भारतीयच म्हणायला पाहिजे. झालंच तर आपल्या देशात प्रचंड विविधता असल्यामुळे भारतीय way of life या गोष्टीला भारतीय जेवण या गोष्टीसारखाच विशिष्ट अर्थ नाही. झालंच तर तुमच्या मित्रांवरुन सर्व मुस्लिम समाजाबद्दल अनुमान कसं काढणार?
असं झालंय पण त्याच बरोबर अनेक मुस्लिम मुली identity म्हणून हिजाब वापरायला लागल्या आहेत. पण त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. झालंच तर काॅलेजमध्ये किंवा आॅफिसमध्ये आल्यावर हिजाब न वापरणाऱ्या आणि घरी जाताना वापरणाऱ्या अनेक मुली आणि स्त्रिया आहेत. शिवाय हिजाबपासून पूर्ण सुटका नाहीच झालेली. टेनिस कोर्टवर खेळण्याचा पोषाख आणि बाहेर हिजाब घालणाऱ्या सानिया मिर्झाचा फोटो पाहिला असेलच तुम्ही.
पाकिस्तान, इराण आणि इराक हे इस्लामिक देश आहेत. इस्लाम हा तिथला अधिकृत धर्म आहे. भारताप्रमाणे हे देश धर्मनिरपेक्ष नाहीत. त्यामुळे तिथल्या स्त्रियांवर हिजाब आणि चादोरची (विशेषतः इराणमध्ये) सक्ती आहे. मीना प्रभूंच्या गाथा इराणी या प्रवासवर्णनात आणि आतिवास यांच्या भय इथले या अफगाणिस्तानमधील प्रत्यक्ष अनुभवांवरील पुस्तकांत याचा स्पष्ट उल्लेख आहे. परकीय स्त्रियांनाही हे नियम पाळावेच लागतात. त्यामुळे तुमच्या या मुद्द्याशीही असहमत.
11 Oct 2016 - 5:48 pm | chitraa
केवळ हिजाब वापरण्या न वापरण्यानं स्त्री मुक्त आहे किंवा नाही हे ठरते का ?
https://en.m.wikipedia.org/wiki/Women%27s_rights_in_Iran
12 Oct 2016 - 10:06 am | सुबोध खरे
मोगा खान
नुसता हिजाब/ चादर वापरण्याची सक्ती असेल तरीही त्या स्त्रीला स्वतःच्या मताप्रमाणे कपडे वापरण्याची परवानगी नाही हेच सिद्ध होत नाही का?
बाकी समान हक्क कुराणातच नाहीत. मग व्यवहारात कुठून येणार?
आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
उत्तर आफ्रिका ते कोरिया या प्रचंड पट्ट्यात (इस्रायल आणि भारत सोडल्यास) कोणत्याच देशात लोकशाही नाही. (बाकी सगळे इस्लामी बहुल देश आहेत आणि इस्लामला लोकशाही मान्य नाही) समान हक्क पुरुषांनाच नाहीत स्त्रियांना कुठून येणार.
12 Oct 2016 - 10:35 am | chitraa
हिजाब वापरूनही / सक्ती असुनही त्या देशात वुमन लिटरसी आपल्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
अॅवरेज एज ऑफ वुमन अॅट मॅरेजही आपल्यापेक्षा जास्त आहे.
बाहेर फिरताना बुरखा वापरुन हस्पिटलात रेगुलर नाइट ड्युटी करणारे स्टाफ मला माहीत आहेत... घरी परवानगी देत नाहीत म्हणुन नाइट ड्युटी टाळणारे इतर धर्मियही असतात.
तात्पर्य : नुसता बुरखा असणे नसणे या एकाच फ्याक्टरवर काही ठरत नाही , पण अशी सक्ती नसावी , हेही मान्य आहे.
12 Oct 2016 - 6:35 pm | बोका-ए-आझम
मान्य.
मान्य.
पण का? इस्लामिक क्रांतीनंतर इराणच्या अर्थव्यवस्थेची वाट लागली. नंतरच्या ८ वर्षांच्या इराण-इराक युद्धाने तर देश डबघाईला आला. त्यामुळे स्त्रियांना घराबाहेर पडून काम करणं अनिवार्य झालं. एक पिढी युद्धात नष्ट झाली. त्यामुळे साहजिकच पुढची पिढी लग्नाच्या वयात यायला वेळ लागला. दुस-या शब्दांत सांगायचं तर हे परिस्थितीच्या रेट्याने झालं. तिथल्या राजवटीने आपणहून घडवून आणलं नाही. तसं करणारा एकच माणूस. तुर्कस्तानचा मुस्तफा केमाल अतातुर्क. बाकी कुठल्याही इस्लामिक देशाने आपणहून स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीही केलेलं नाही.
12 Oct 2016 - 7:01 pm | chitraa
असेल.
सौदी अरेबियातही असेच आहे... त्याचे क्रेडिट कोणत्या युद्धाला द्यायचे ?
https://en.wikipedia.org/wiki/Education_in_Saudi_Arabia#Literacy
According to the World Bank, there is gender disparity in literacy rate. In 2007, 85.0 percent of adult (people ages 15 and above) are literate and 98.1 percent of youth (people ages 15 – 24) are literate, 89.1 percent of male adults are literate and 79.4 percent of female adults are literate. As for youth literacy rate (people ages 15 – 24), 97.0 percent is literate, 98.1 percent of male youths are literate, and 95.9 percent of female youths are literate.[37] One of the World Bank reports suggested the relatively high adult literacy rate of Saudi Arabia, considering the continued low level of primary enrollment, derived from the successful use of religious organizations, particularly local mosques and local religious institutions such as Koranic schools for the provision of ancillary educational services, which is a trend of particular note in the MENA region.
12 Oct 2016 - 7:46 pm | बोका-ए-आझम
सौदी अरेबियाची भाषा अरेबिक, कुराणाची भाषा अरेबिक. म्हणजे एवढी सगळी साक्षरता फक्त एका भाषेपुरती आहे. तीही सक्तीची. अजून एखादं उदाहरण आणलंत तरी तिथे तेच सापडेल. तुर्कस्तान हा अपवाद. एक वेळ स्त्रियांच्या शिक्षणाचा मुद्दा जरी मान्य केला तरी नंतरचा भेदभाव नाकारता येणार नाही. एका शिक्षणाच्या मुद्द्याने बाकीचे सगळे अन्याय समर्थनीय ठरतात असं तुम्हाला वाटत असेल तर बोलणंच खुंटलं.
12 Oct 2016 - 8:24 pm | chitraa
त्यांची मातृभाषा व्यवहाराची भाष जी असेल तीच ते शिकणार ना ?
नुस्त्या युद्धात पुरुषांच्या मरण्याने बायका साक्षर होतात तर महाभारत युद्धानंतर भारत हा विश्वातला टॉप स्त्री साक्षर देश झाला असता !
13 Oct 2016 - 11:08 am | chitraa
भारतात स्त्री शिक्षण नव्हते / बायका सती जात होत्या. का ?
अहो , युद्ध्हामुळे .. तरुण पुरुष मरायचे , मग बायका सती जायच्या .
इराणात स्त्रीशिक्षणाचे प्रमाण जास्त आहे. का ?
अहो , युद्ध्हामुळे .... तरुण पुरुष मरायचे , मग बायका शिकून नोकरी करायला लागल्या !
13 Oct 2016 - 2:50 pm | शब्दबम्बाळ
तुमचे काही प्रतिसाद विचार करायला लावणारे असतात पण दरवेळी नुसती टीकाच उपयोगी नसते असे वाटते...
बुरखा अथवा हिजाब घालायला भाग पाडणे हे बंधनाचेच प्रतीक आहे, हे तर मान्य असेल आपल्याला...
आता तुलनेने आपल्याकडे त्यापेक्षा थोडे अधिक स्वातंत्र्य आहे असे म्हणता येईल, अर्थात हिंदू धर्मात वेगवेगळ्या जाती आपला अभिमान धरून असतात आणि त्याच्या नावाखाली आमच्या घरातल्या स्त्रिया अंगाचा एक भाग हि दिसणार नाही(किंवा कमीत कमी दिसेल) अशा साड्या/कपडे घालतात हे अभिमानाने सांगितले जाते. पर्यायाने स्त्रियांवर नकळत तसेच कपडे घालण्याचे बंधन येते, याला आपण संस्कार देखील म्हणू शकतो कारण अंग प्रदर्शन आपल्याकडे सभ्य मानले जात नाही. त्यात फारसे काही वावगे देखील वाटत नाही कारण प्रत्येक पाश्च्यात पद्धत अंगीकारणे म्हणजे प्रगत होणे नाही!
आता काळानुसार हे अभिमान देखील पुसट होत चालले आहेत आणि स्त्रियांना त्यांच्या अधिकारांबद्दल मोठ्या आवाजात बोलणे शक्य होत आहे.
हीच गोष्ट हिजाब अथवा बुरखा याबद्दल होऊ शकते.
इस्लाम मध्ये विरोधाचा हा आवाज इतका मोठा आहे का? हे हि त्या धर्मातल्या प्रगतिशील लोकांनी पाहायला हवे...
13 Oct 2016 - 5:00 pm | chitraa
हिजाब हे बंधन म्हणता म्हणता अंगभर साडी नेसून अंग झाकणे याला मात्र शालीनता ठरवुन मोकळे झालात !
अंग झाकणे ही शालीनता असेल तर हिजाब , पदर , नऊवारी , पल्लो वगैरे ज्या त्या धर्म आणि संस्कृतीचा प्रश्न झाला. मूळ तत्व सारखेच असेल तर बाह्यरुपावरुन वाद घालणे हास्यास्पद होइल.
राहिता राहिला आवाजाचा प्रश्न ! तर आमच्या धर्मात आवाज जास्त आहे वगैरे जे बोलताय तो आवाज यायला दहा हजार वर्षे जावी लागली आहेत. त्यासाठी अनेकाना शेणगोळे , दगड , निखारे खावे लागले आहेत.
13 Oct 2016 - 5:16 pm | शब्दबम्बाळ
आपण प्रतिसाद नीट वाचलात का?
मी साडीचे उदाहरण देऊन झाल्यावर खाली "हीच गोष्ट हिजाब अथवा बुरखा याबद्दल होऊ शकते."
हे लिहिले आहे. उगाच काहीतरी पूर्व ग्रह धरून अर्थ लावू नका...
पण मूळ मुद्दा हा मांडला होता कि बदल होतोय. त्याला किती हजार वर्षे गेली तितकीच वर्ष झाली कि मग मुस्लिम परिवर्तनाला सुरुवात करणार आहेत का? तसे म्हणणे असेल तर मग झालंच!
13 Oct 2016 - 5:39 pm | बोका-ए-आझम
तरी वडाची साल पिंपळाला लावणं काही जात नाही. महाभारत युद्धानंतर कशाला, युद्धाच्या वेळीच आणि त्याच्या आधीही भारतातल्या स्त्रिया साक्षर असणार. पण इस्लामी आक्रमणामुळे स्त्रियांवर बंधनं आली. बाकी इराणमध्ये युद्धात एक पिढी मारली गेल्यामुळे जी आर्थिक आपत्ती आली,त्यात स्त्रियांना शिक्षणाची आणि नोकरी करण्याची परवानगी तिथल्या सरकारला द्यावी लागली ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही हिंदूंना सुधरायला दहा हजार वर्षं लागली वगैरे जे म्हणताय त्याला तर काहीही आधार नाही. माणसाने १०,००० वर्षांपूर्वी शेती सुरु केली. तेव्हा धर्म ही संकल्पना जशी आज मानली जाते तशी नसावी. सती वगैरे चालीरीती फार नंतर आलेल्या आहेत. जेमतेम हजार वर्षे. दहा हजार वर्षांपासून वगैरे जे पालुपद तुम्ही तुमच्या प्रत्येक अवतारात आळवता ते साफ चुकीचं आहे. असो. Psuedo-science प्रमाणेच psuedo-history हाही प्रकार असतो हेच तुम्ही सिद्ध करताय. बाकी काही नाही.
13 Oct 2016 - 6:33 pm | chitraa
काही झालं तरी इस्लामी आक्रमण व मेकॉले हेच जबाबदार.
सतीप्रथा रामायण महाभारतापासून आहे. तेंव्हा , माझ्या माहितीनुसार तरी , मोघल इंग्रज नव्हते.
13 Oct 2016 - 7:53 pm | बोका-ए-आझम
हा दहा हजार वर्षे एवढा जुना आहे का? रच्याकने अनेक रामायणं लिहिली गेली आहेत. तुलसीरामायण, भावार्थ रामायण वगैरे. ए.के.रामानुजम यांचा त्यावर अत्यंत प्रसिद्ध लेख आहे. महाभारतातही अनेक गोष्टी नंतर समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. सती प्रथाही अशीच नंतर समाविष्ट करण्यात आलेली असू शकते. शिवाय महाभारतात सती ही ऐच्छिक दाखवली आहे. माद्री सती जाते, कुंती जात नाही.(इथे रामायण आणि महाभारत हे प्रत्यक्षात घडलं असावं असं मानलेलं आहे) नंतर शिवकाळात शिवाजीमहाराजांचे वडील शहाजीराजे मरण पावल्यावर जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं. बंगालमध्ये होत असावी, कारण १८२९ मध्ये जो सतीवर बंदी घालणारा कायदा लाॅर्ड बेंटिकने केला तो राजा राममोहन राॅय यांच्या अाग्रहावरुन केला असणार. काहीही असो. १०,००० वर्षांपूर्वी धर्मच नव्हते, त्यामुळे त्याच्या नावावर चालणारा फालतूपणाही नव्हता. आणि इस्लामी आक्रमण हे जोहार अाणि सती यासारख्या प्रथा लोकांमध्ये रुजायला जबाबदार आहेच. वस्तुस्थिती आहे. नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळे तुम्ही १०,००० वर्षे ही जी जुनी record लावताय ती बंद करा. उलट त्यामुळे आयडी बदलला तरी लगेच पकडले जाताय तुम्ही.:)
13 Oct 2016 - 8:02 pm | कैलासवासी सोन्याबापु
जिजाबाई सती गेल्या नव्हत्या. यावरून महाराष्ट्रात तरी सतीची सक्ती होत नव्हती हे समजतं.
जिजाऊ सती गेल्या नाहीत म्हणुन महाराष्ट्रात सती नव्हती हे वाक्य तुमच्या एरवी असणाऱ्या जबरी विश्लेषणात्मक लिखाणाला सूट होत नाही.
13 Oct 2016 - 8:40 pm | बोका-ए-आझम
सतीची सक्ती होत नव्हती असं म्हटलंय. स्त्रिया सती जाणं हे त्यांच्या निर्णयावर अवलंबून असावं. पेशवाईतही थोरल्या माधवराव पेशव्यांच्या आई गोपिकाबाई पती नानासाहेब पेशव्यांच्या निधनानंतर सती गेल्या नाहीत पण माधवरावांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या.
अजून एक पुरावा म्हणजे ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या काही विद्यार्थिनी या विधवा होत्या. त्यांनी दत्तक घेतलेले पुत्र यशवंतराव (चूभूद्याघ्या) यांची जन्मदात्री आई ही त्यावेळी विधवा होती. सतीसारखी प्रथा जर त्यावेळी असती आणि ज्या अमानुषपणे ती बंगालमध्ये होती, तशी असती तर त्याविरूद्ध ज्योतिबा नक्कीच उभे राहिले असते. पण तसं वर्णन त्यांच्या वाङ्मयात आढळत नाही.
13 Oct 2016 - 9:15 pm | बोका-ए-आझम
http://www.misalpav.com/node/22806
हा जयंतकाकांचा २०१२ च्या श्रीगणेश लेखमालेत लिहिलेला लेख आहे. दीड-दोन हजार वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्राबद्दल असलेलं हे वर्णन आहे. त्यात स्त्रिया सुशिक्षित असल्याचं वर्णन तर आहेच, पण सती हा शब्द कुठेही सापडत नाही. स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्यही होतं. मग हा सगळा माहोल उध्वस्त होऊन स्त्रियांवर एवढी बंधनं का लादण्यात आली? इस्लामी आक्रमण हेच कारण दिसतं. १०,००० वर्षांपूर्वी स्त्रिया सती जात होत्या हा तर खोटारडेपणा आहे आणि त्याला कुठचाही ऐतिहासिक आधार नाही हे आमच्या नेहमीच्या यशस्वी डू आयडींना समजेल अशी आशा.
13 Oct 2016 - 10:26 pm | chitraa
महाभारतात माद्री सती गेली , कुंतीही जाणार होती. पण तू मुलांकडे बघ असे सांगून माद्रीने तिला परावृत्त केले.
सती जाण्यामागे / न जाण्यामागे अशी अनेक कौटुंबिक कारणे असायची. बाहेरील कारणांमध्ये मुस्लिम आक्रमण हे एक कारण असू शकेल , पण सती प्रथेची सुरुवात व्हायचे ते नक्कीच कारण नव्हे.
मराठ्यानी १६७० ला राज्य स्थापले ना ? नंतर पेश्वेही मोघलाना मार देत फिरत होते ना ? आणि तो औरंग्या ? तो तर बिचारा बुडाला ना ? आणि तरीही बंगालमधल्या स्त्रीया अशिक्षित राहिल्या किंवा पुण्यातील पेश्वीण सती गेली तर त्याला मोघलच जबाबदार का ? बरं , मोघलांची भिती फक्त रमाबाईनाच ? गोपिकाबाईना का नव्हती म्हणे ? औरंगजेबानंतरच जर मोघलाईला उतरती कळा लागली , तर सती अॅक्ट १८२७ ला का आला म्हणे ? तेंव्हा कोणते क्रूर मोघल सत्तेत होते म्हणे ?
मोघलांच्या भितीने विधवा जाळून घेत होत्या म्हणे ! सधवा कुमारिका याना मोघल पळवुन नेत नव्हते की काय ?
तो मेघदूताचा पुरावा ऐकुन तर धन्यच झालो ... प्रेमकाव्यात तरुणी , घट , बगिचा , मद्य , मोर हेच लिहिले जाणार ना ?की वरुन जाणार्या मेघाने खाली स्मशानात एका विधवेला लोक भाल्याने टोचुन चितेत ढकलत होते , याचे वर्णन करायला हवे होते ?
13 Oct 2016 - 10:56 pm | बोका-ए-आझम
तुमसे न हो पायेगा! तुम्ही denial mode मध्ये आहात. अशा वेळी माणसाला सहानुभूतीची गरज असते. ती आहेच आमच्याकडून. Enjoy!
13 Oct 2016 - 11:19 pm | टवाळ कार्टा
औरंग्या बिचारा? उद्या अफजल खानाला पापभिरू म्हणाल...परवा कसाबला नेक बंदा म्हणतील
14 Oct 2016 - 7:15 pm | सुबोध खरे
पण अशी सक्ती नसावी , हेही मान्य आहे.
तोबा तोबा इस्लाम खतरे मे है . जिहाद करो
मोगाखानने कुराणाविरुध्द भाष्य केले.
कुफ्र बेमुकद्दस
लाहोल वला क़ुवत
11 Oct 2016 - 7:19 am | विवेकपटाईत
आता काय करणार हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त दुसर्या धर्म बाबत लिहिले तर रासुका लागू शकतो.(उत्तर भारतात अनेक लोक जेलमध्ये बंद आहेत).
हिंदू धर्म रुपी गंगा नदीत घाण टाकण्याची आणि स्वच्छ करण्याची परवानगी प्रत्येकाला आहे.
शिवाय आपल्या देशात हिंदू धर्म विरुद्ध लिहिणार्यांना पुरोगामी, सेकुलर, प्रगतीशील इत्यादी उपाध्या आणि सम्मान हि मिळतात.
11 Oct 2016 - 4:43 pm | chitraa
http://indianexpress.com/article/explained/the-jain-religion-and-the-rig...
11 Oct 2016 - 11:08 pm | गामा पैलवान
अर्थहीन,
तुमचा लेख वाचला. एक प्रश्न पडला आहे. आपल्या शरीराने आयुष्यभर घाण उत्पन्न केल्याखेरीज दुसरं काहीही केलेलं नाहीये. मग शरीरावर लोकं का टीका करंत नाहीत? उलट त्याला सुखावण्यासाठी लोकं कितीतरी मेहनत करतात. ते इतकं प्रिय का असतं?
आ.न.,
-गा.पै.
13 Oct 2016 - 3:13 pm | शब्दबम्बाळ
हा लेख वाचून असा प्रश्न का पडला, हा प्रश्न मला पडलाय! :)
"घाण" म्हणजे काय? शरीराने उत्पन्न केलेल्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकच नाहीत का? निसर्गाने बहाल केलेल्या गुण अवगुणांशिवाय शरीर वेगळे काही "निर्माण" करू शकते का? मग शरीरावर टीका कशासाठी करावी?
"देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर" आणि कदाचित त्या आत्म्याला टिकवण्यापायी देहाची आपसूकच काळजी घेतली जात असावी!
13 Oct 2016 - 7:52 pm | गामा पैलवान
शब्दबम्बाळ,
तुमचा प्रश्न अत्यंत समर्पक आहे. किंबहुना तो कोणीतरी विचारावा याच हेतूने उपरोक्त संदेश टाकला होता.
जसं शरीराचं नैसर्गिक वर्तन असतं अगदी तस्संच मनाचंही नैसर्गिक वर्तन असतं. ज्याप्रमाणे शरीरावर टीका करून उपयोग नसतो, त्याचप्रमाणे धर्मावर टीका करूनही काहीच साध्य होत नाही. शरीराचे व्यापार बिघडले तर त्यावर टीका करायची नसते. औषध घेऊन रोग दुरुस्त करायचा असतो. त्याचप्रमाणे धर्म ही स्वत: आचरणात आणायची वस्तू आहे. त्याचा रोख इतरत्र जाऊ द्यायचा नसतो. भले इतरांचा धर्म बिघडला असला तरी त्यावर उत्तर म्हणजे आपण स्वत:चा धर्म स्वत:च कसोशीने आचरणात आणणे हे होय. टीका कितीही सयुक्तिक असली तरी तो उपाय नव्हे.
बस एव्हढंच.
आ.न.,
-गा.पै.
13 Oct 2016 - 6:48 pm | chitraa
शरीर घाण करतं कारण ते एक थर्मोडायन्यामिक मशिन आहे.
घाण शून्य व्हायला इन्पुट आउटपुट रेशो एक व्हावा लागेल , असे मशीन आस्तित्वात येउ शकत नाही.
11 Oct 2016 - 11:13 pm | धर्मराजमुटके
मला माझ्या धर्माबद्द्ल केवळ ऐकीव माहिती असते. आजुबाजुचे (कथीत) हिंदू लोक जसे वागतात त्यांचे बघून मी धर्म चांगला की वाईट ठरवतो. एखादी गोष्ट खरोखरीच धर्मसंमंत आहे काय ? हे तपासण्याइतका अभ्यास करण्याची तयारी नसणे / इच्छा नसणे हे ही मी हिंदू असून हिंदू धर्माविरोधात लिहिण्याचे कारण असू शकते.
उपनिषदे पुराणे गहन आहेतच पण कमीत कमी मराठीत उपलब्ध असलेले गीता / ज्ञानेश्वरी / तुकोबाची गाथा / रामायण / महाभारत इ. प्राकृत ग्रंथांचा / कथांचा देखील कधीही वारा न लागल्यामुळे देखील मी हिंदू धर्मावर टिका करु शकतो.
सगळेच्या सगळे आध्यात्मिक गुरु म्हणजे केवळ भोंदूच किंवा पुजा सांगणारा ब्राह्मण किंवा मंदिरातला पुजारी म्हणजे केवळ दलालच असे आपण स्वतः अगोदरच ठरवून टाकलेले असल्यामुळे देखील आपण स्वधर्मावर टीका करण्यास समर्थ होऊ शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'अच्छा जो देखन मै चला अच्छा न मिलिया कोय ! जो दिल खोजा अपना, मुझसे अच्छा न कोय' ही जी आपली धारणा झालेली असते तिच्यामुळेही आपण आपल्या धर्मावर टिका करु शकतो.
अशी बरीच कारणे देता येतील. असो. विस्तारभयास्तव थांबतो.
12 Oct 2016 - 7:19 am | टवाळ कार्टा
परफेक्ट मुद्दा, पण मग या सगळ्याचा अभ्यास असणारेच जर काहीही न करता ढिम्म बसत असतील तर? आणि त्यांना काही सांगायला गेलो की लगेच ते सुद्धा वरचेच मुद्दे तोंडावर फेकतात
काही गोष्टी या कॉमन सेन्सनेसुद्दा चुकीच्या आहेत हे समजू शकतात त्या बंद करायला पोथ्या पुराणे वाचायची काय आवश्यकता?
13 Oct 2016 - 3:41 pm | amit१२३
मुद्दे पटण्यासाखे आहेत ..अभ्यास न करता टीका करणे आजकाल फॅशन आहे
12 Oct 2016 - 10:09 am | सुबोध खरे
काही गोष्टी या कॉमन सेन्सनेसुद्दा चुकीच्या आहेत हे समजू शकतात त्या बंद करायला पोथ्या पुराणे वाचायची काय आवश्यकता?
+ १
नैसर्गिक न्याय (principle of natural justice) याविरुद्ध असणारी कोणतीही गोष्ट जर धर्माच्या आड लपत असेल तर तिचा त्याग करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रकांड पंडित असायची गरज नाही.
13 Oct 2016 - 3:42 pm | amit१२३
कॉमन सेन्स या शब्दावर वेगळी चर्चा होऊ शकते. कारण काहींच्या मते एखादी गोष्ट खूप कॉमन असू शकते तर काहींच्या मते तीच धार्मिक किंवा भावनिक असू शकते ..ठरवणार कसे ? ज्याला त्याला ज्याचे त्याचेच बरोबर वाटणार
13 Oct 2016 - 4:48 pm | टवाळ कार्टा
त्या हिशोबाने मध्यपुर्वेत जे सुरु आहे ते तिथे रहाणार्या जास्तीत जास्त लोकांना मान्य असणारेच आहे...ते सुध्धा बरोबरच म्हणायचे?
common sense is not so common
12 Oct 2016 - 7:15 pm | विचित्रा
असं म्हणणं जास्त सयुक्तीक ठरेल. यापूर्वीच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, हिंदू ही फक्त एक जीवनपद्धती आहे. माझ्या अल्प माहितीप्रमाणे, इंडस नदीच्या खोर्यातील नागरिकांना परकीयांनी दिलेलं एक नाव. या धर्माला एक बांधीव संरचना, एकच एक देव, एक धर्मग्रंथ आणि एक प्रेषित असं स्वरुप कधीच नव्हतं. नास्तिक किंवा अज्ञेयवादी चार्वाकापासून, मनुस्मृतीवाल्या मनूपर्यंत; मूर्तिपूजक,निसर्गपूजकांपासून, निर्गुण निराकार ब्रह्मस्वरूप मानणार्यापर्यंत,सगळेच या धर्मात समाविष्ट होऊ शकतात. आपापले विचार अनुयायांसाठी लिखित स्वरुपात ठेवू शकतात. ( पण महाभारताचा एक भाग असलेल्या गीतेला हिंदूंचा एकमेव धर्मग्रंथ म्हणून प्रचलित करण्याचा प्रकार अतार्किक वाटतो़)
काळानुरुप राज्यकर्ते, आक्रमक शासक आणि समाजातील प्रभावी व्यक्तींनी नव्या रुढीपरंपरा निर्माण केल्या. जुन्या विस्मृतीत गेल्या. स्त्रीच्या ऋतुप्राप्तीचा समारंभ साजरा करणारा समाज कालांतराने त्याच गोष्टीला अपवित्र समजायला लागला. बौद्ध प्रसारानंतर सर्वाहारी असणार्या लोकांमध्ये शाकाहारींना महत्व प्राप्त झालं. मध्यपूर्वेतल्या आक्रमकांनंतर, विवाहपूर्व अपत्त्यप्राप्ती, बहुपतीत्व, स्त्रियांचं निवडस्वातंत्र्य अशा पुराणकथांना फक्त मनोरंजनमुल्य उरलं आणि योनिशुचिता, गोषापद्धती अशा गोष्टींचं महत्व वाढलं.
निरर्थक कर्मकांड, जातिभेद, पुरुषी वर्चस्ववाद अशा सगळ्या अनिष्ट रुढींवर आपण टीका करु शकतो, त्याचप्रमाणे त्या बदलण्यासाठी प्रयत्नपण करु शकतो. कारण हा तथाकथित ''. 'हिंदू' धर्म प्रवाही आहे. तो बदल स्वीकारुन टिकून राहू शकतो.
12 Oct 2016 - 9:05 pm | Nitin Palkar
माझ्या मते या सर्व कारणांमुळे प्रत्येक धर्मातील चुकीच्या गोष्टींविरुद्ध त्या-त्या धर्मातल्या प्रोग्रेसिव्ह लोकांनी आवाज उठवणे अतिशय गरजेचे आहे...
हे एक वाक्य वगळता सर्व काहि पूर्णपणे भोन्गळ्पणे मान्डले आहे.
12 Oct 2016 - 9:16 pm | Nitin Palkar
अतिशय सम्यक प्रतिक्रिया! छान विवेचन. हिंदू धर्म केवळ प्रवाही नाही तर सर्व समावेशक आहे. अती-सहिष्णुता हा हिंदूंचा कमकुवतपणा समजला गेला.
12 Oct 2016 - 11:46 pm | जानु
https://www.youtube.com/watch?v=wxQzfN-jEc8
13 Oct 2016 - 2:25 pm | मार्मिक गोडसे
जेव्हा डॉक्टर दाभोळकरांना तुम्ही फक्त हिंदू धर्मातलच अंधश्रद्धा निर्मूलन करता का असा प्रश्न विचारला जात असे तेव्हा ते काय उत्तर देत असत ? पहा खालील विडीओ.
13 Oct 2016 - 3:35 pm | amit१२३
1) दुसऱ्या धर्मावर टीका करताना त्याचा प्रचंड आणि "थेरोटिकल" अभ्यास करून मगच टिका करावी लागणार मग हेच धोरण हिंदू धर्मा बद्दल का नाही ? काय तर म्हणे मुद्दाम न करताही- आपोआप झालेल्या अभ्यासामुळे करणाऱ्या टिकेत एक कॉन्फीडन्स असतो ..अरे नुसत्या कॉन्फिडन्स वर टीका करणार. त्या गोष्टी मध्ये तथ्य काय आहे हे जाणून न घेता टीका करणार .वाह
2) 2015 ला कोणता रिपोर्ट दिला गेला कारण जनगणना तर 2011 ला झाली. बाकी आकडे बऱ्यापैकी मिळते जुळते आहेत.
3) माइनॉरिटी वरती सतत होणारा अन "न टाळता येणारा" परिणाम. ..माझ्यामते जर आपण छोट्या गोष्टींना बदलू शकत नाही तर मोठ्या गोष्टी बदलणे फार अवघड असते. हाच विचार जर माइनॉरिटी वर केला तर कमी लोकसंख्या असलेले लोकांचे विचार बदलणे हे बहुसंख्य लोकांचे विचार बदलण्यापेक्षा सोपे असेल.
4) हा मुद्दा ठीक आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ
तरीही कोणत्याही धर्मावर किंवा प्रथेवर टीका करण्याआधी त्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
आपली हिंदू संस्कृती हि इतर संस्कृतींपेक्षा खूप प्रगल्भ होती. त्यांना त्या काळात ज्या गोष्टीची माहिती होती त्यांनी ती सण आणि प्रथांद्वारे समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला फक्त कालांतराने सत्य माहित नसल्याने त्या गोष्टीवर अंध विश्वास ठेवून आणि काही चुकीच्या लोकांमुळे त्या गोष्टी विस्मृतीत गेल्या आहेत. त्यामुळे आधी स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि मगच त्याविषयावर आपले तोंड उघडावे. नाहीतरी आपल्याकडे अर्ध्या हळकुंडाने पिवळे जास्तच असतात
13 Oct 2016 - 9:26 pm | वटवट
देशातला बहुसंख्य समाज जेवढया कठोर समिक्षेला सामोरा जाईल अन जास्त लिबरल होईल तेवढाच इथला अल्पसंख्यक समाज सुद्धा आपोआप लिबरल होणार आहे यात काहीच शंका नाही.>>>> भाऊ अभ्यास खरंच वाढवा... ह्या देशात फक्त हिंदूच जास्त लिबरल होत गेले आणि मुस्लिम अजून कट्टर... हिंदू कोड बिल आणि शाह बानो माहित नसेलंच बहुदा... वाचा, अभ्यास करा आणि मगच प्रतिसाद द्या... किंवा अर्थातच दुर्लक्ष करण्याचा तुमचा अधिकार अबाधित आहेच. आणि तसाही मी सहिष्णू आहे बरं...
13 Oct 2016 - 10:31 pm | तेजस आठवले
ये बात कुछ हजम नही हुई. तुम्ही स्वतःच एकदा या वरील वाक्याबाबत नीट विचार करून पहा.
अभ्यास न करता टीका करून वर त्यात तुम्हाला कॉन्फिडन्स दिसतो? ह्याला सामान्य बोलीभाषेत फेकुगिरी म्हणतात.
अवांतर : अभ्यास आपोआप होतो ? कसा काय ? अभियांत्रिकीचा अभ्यास करावा लागला आणि ते कष्ट (4 वर्ष घासून घासून इंजिनिअर होणे हा शब्दप्रयोग) आठवून डोळे पाणावले बॉ
14 Oct 2016 - 1:25 am | गामा पैलवान
chitraa,
म्लेंच्छ आक्रमकांना प्रेताशी संभोग करायची हौस असे. त्यापासून सुटायचा मार्ग म्हणजे सहगमन करणे. महाराजा रणजितसिंहांच्या अनेक स्त्रियांनी चितागमन केलं. त्यात एका मुस्लिम स्त्रीचाही सहभाग होता.
आ.न.,
-गा.पै.
14 Oct 2016 - 5:15 am | chitraa
कोणत्या प्रेताशी कोण संभोग करायचे ? तसे असेल तर प्रेत जाळतील ना ? की जिवंत स्त्री जाळतील ?
14 Oct 2016 - 6:58 am | chitraa
गामा गामा गामा ....
म्लेंछ म्हणजे मोघल का ?
कुठल्या तरी एका धाग्यावर कुठल्या तरी एका शब्दकोष की ज्ञानकोषाचा पुरावा देऊन म्लेंछ म्हणजे मुसलमान नव्हे , तर कुठल्यातरी हिमालयीन शिवपूजक टोळ्या होत्या , असे काहीतरी आपणच बोलला होतात ना ? आठवते का गडे ? की विस्मरण झाले ?
आणि इथे म्लेंछ म्हणजे मोघल असे सांगताय ?
14 Oct 2016 - 11:50 am | गामा पैलवान
chitraa,
म्लेंच्छ कोपरडीतही सापडतात.
आ.न.,
-गा.पै.
14 Oct 2016 - 9:44 am | बोका-ए-आझम
का दगडावर डोकं आपटताय? Don't waste your valuable time.
14 Oct 2016 - 4:15 pm | पैसा
धागा वाचला आणि प्रतिक्रिया पण वाचल्या. एक गोष्ट कळली की "जामोप्या परतुनी आला". =))