कांदा-कोलंबी-कैरीच कालवण

लवंगी's picture
लवंगी in पाककृती
27 Sep 2008 - 10:23 pm

ही माझ्या आईची पाककृती. पावसाळी दिवसात गरम मऊ भाताबरोबर खाल्ल्यावर हमखास पांघरूण घेऊन ताणून देताय की नाही पहा!!

२ मोठे कांदे उभे चिरून घ्यावे. १ मोठी कैरी सोलून उभ्या चिरा करून घ्याव्या. २ वाट्या कोलंबी सोलून घ्यावी. छोटे ३-४ चमचे लसूण-आले -हिरवि मिरचि पेस्ट करून घ्यावी. भांड्यात २ मोठे चमचे तेल गरम करून घ्यावे. तेलात आल-लसूण पेस्ट टाकून कोलंबी टाकावी. कोलंबी लालसर झाली की चिरलेले कांदे टाकून अर्धवट गुलाबी परतून घ्यावे. नंतर त्यात कैरी टाकून थोडे पाणी टाकावे. थोडी लाल मिरची पावडर, मालवणी मसाला असेल तर १ चमचा आणि थोडे मीठ टाकावे. एक चांगली उकळी आणून कैरी शीजली की बंद करावे. गरम भाताबरोबर झकास लागते.

गणपा, तोंडाला पाणी सुटले की नाही रे!!

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Sep 2008 - 12:15 am | विसोबा खेचर

अ प्र ती म...!!!

गणपा's picture

30 Sep 2008 - 1:28 pm | गणपा

वाह... लवंगी तै....झकास..
आइच्या हातच्या कालवणाची आठवण करुन दिलीस... =P~
येउदे अजुन एक से एक ...
(बर्‍याच लवकर शिकलीस की तु मराठीत टंकायला)
-गणपा..

लवंगी's picture

1 Oct 2008 - 5:56 am | लवंगी

अरे भारतात परत जाईपर्यंत आईच्या पदार्थांचि आठवण काढून दिवस मोजतेय..

संदीप चित्रे's picture

30 Sep 2008 - 6:24 pm | संदीप चित्रे

नवरात्रीच्या सुरूवातीला अशा रेसिपी देऊन का छळताय ? :)

गणपा's picture

30 Sep 2008 - 6:47 pm | गणपा

अरे संदिप,
एकविरा मातेला चलतं रे नैवेद्य म्हणुन...
आपण प्रसाद म्हणुन खाउ. ;)

संदीप चित्रे's picture

30 Sep 2008 - 9:11 pm | संदीप चित्रे

बरोबर थोडं 'तीर्थ' ही असतंच की :)

लवंगी's picture

1 Oct 2008 - 5:49 am | लवंगी

नवरात्र आत्ता संपेल.. आता नाही छळत.. शाकाहारी पदार्थ देईन नवरात्र संपेपर्यंत.

मनस्वी's picture

30 Sep 2008 - 6:48 pm | मनस्वी

१ नंबर.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*