खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले.
पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा.
३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व
४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने!
तुम्हाला काय वाटतं?
प्रतिक्रिया
3 Oct 2016 - 9:52 pm | विद्यार्थी
बोकोबा, तुमचे स्वतःचे मत चलाखीने लपवून लोकांच्या प्रतिक्रिया घेणार की राव तुम्ही. पण तुमचे या लेखातील प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.
आपण भारतीय लोक फार हळवे आहोत हो. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या भावना लगेच उफाळून येतात. त्यातून गोष्ट कोणतीही असो, राजकीय पक्षांनी/ नेत्यांनी त्यावर लगेच भूमिका घेऊन प्रतिक्रिया देणे हे त्यांना त्यांचे कर्तव्य वाटते. एकदाका एखाद्या गोष्टीत राजकारणाचा प्रवेश झाला की त्याची कशी माती होते हे आपल्याला माहित आहेच.
तात्विकदृष्ट्या कलाकारांवर बंदी नसावी हे कोणीही मान्य करेल. आणि आपण भारतीय लोक जगभरातील लोकांचे खुल्या मनाने स्वागत करतो हासुद्धा हजारो वर्षांचा इतिहास आहे. पाकिस्तान आणि तेथील कलाकार या गोष्टीला अपवाद असण्याचे कारण नाही.
परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये ह्या कलाकारांचे भारतात राहणे काही लोकांना अजिबात रुचत नाहीये आणि मी त्यांना त्याबद्दल अजिबात दोष देणार नाही.
पाकिस्तानी कलाकारांनी भारतात यावे किंवा नाही हे पूर्णपणे सरकारी निर्णयावर अवलंबून असते कारण जर या कलाकारांना भारतात राहण्याचा आणि काम करण्याचा व्हिसाच मिळाला नाही तर ते इथे येऊच शकणार नाहीत. जर बहुसंख्य लोकांना पाकिस्तानी कलाकारांनी भारतात येऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी त्यासाठी त्या कलाकारांना त्रास देण्यापेक्षा भारत सरकारवर दबाव आणावा असे मला वाटते.
एकीकडे भारतीय कलाकारांनी भारताशी एकनिष्ठता दाखवून ती प्रदर्शित करण्याची अपेक्षा आपण करतो आणि दुसरीकडे पाकिस्तानी कलाकार त्यांच्या देशाशी एकनिष्ठ राहिल्यास आपल्याला राग येतो हा दुटप्पीपणाच नाही का?
मला जर एखाद्या कलाकाराची कला आवडत असेल तर मी तिचा निखळ आनंद घेतो, मग तो कलाकार भारतीय असो किंवा पाकिस्तानी.
3 Oct 2016 - 10:05 pm | संदीप डांगे
उरी घटना हि दहशतवादी हल्ला आहे त्याचा स्पष्ट शब्दात निषेध करणे कोणत्याही देशाच्या विरुद्ध नव्हते,
इथे येऊन इथल्या लोकांच्या जीवावर कमावून इथल्या लोकांच्या भावनांचा आदर न करणे हे अजिबात मान्य नाही, ह्यात कोणत्याही देशाच्या सरकारचा संबंध नाही, लोकांना वाटले त्यांनी पाकिस्तान्याना हाकलून लावावे, सरकार त्यांना संरक्षण देते कि लोक भावनेचा आदर करते हा सरकारचा प्रश्न,
मला अजून बोलायाचे आहे, परत येतो..
4 Oct 2016 - 9:09 am | नाखु
पॅरीस हल्ल्याचा उघड निषेध करणारे उरी हल्ल्याचे वेळी सोयीस्कर मौन बाळ्गतात्,फवाद खान इथून तिथे गेल्यावर काय बोलतो ते पहा.
फवाद खान
पाकिस्तानमध्ये 'एम. एस. धोनी'वर बंदी!
मुजोरपणा
आणि तरीही कलाकार खेळाडूंना यापासून लांब आहेत हे सांगणार्यांची फक्त कीव वाटते.
सुस्पष्ट नाखु
3 Oct 2016 - 10:11 pm | बोका-ए-आझम
की जो न्याय एका पाकिस्तानी कलाकाराला लावायचा तोच सगळ्यांना लावायला हवा. तरच त्याला न्याय म्हणता येईल. म्हणजे पाकिस्तानच्या कुठल्याही कलाकाराला भारतात बंदी आणि ज्या भारतीय कलाकृतींमध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत, त्यांच्यावरही बंदी. नाहीतर मग सरळ आपण biased आहोत आणि आपल्याला फवाद खान आणि राहत फतेह अली खान यांच्यात फरक करायचा आहे हे मान्य करावे.
3 Oct 2016 - 10:19 pm | संदीप डांगे
मी तरी असा फरक करत नाही, मला पाकिस्तानी कलाकारांचं - ते कितीही ग्रेट असले तरी- बॉलिवूड सॉरी हां हिंदी चित्रपट सृष्टीतील घुसखोरी कधीच आवडली नाही, राहत फते मुळे कैलास खेर सारख्या गुणी गायकावर अन्याय झाला आहे, गरज नसतांना अनेक ठिकाणी झालेली ही घुसखोरी प्रत्यक्ष जाणवते, दाऊद तिकडे गेल्यापासून हा प्रकार सुरू झाला, जो पाकिस्तानी कलाकार पाकिस्तानच्या भारताविरुद्ध कारवायांचा निषेध करत नाही त्याला भारतात येऊन कामे व कमाई चा अधिकार नाही,
ह्यात न समजण्यासारखे काय आहे?
3 Oct 2016 - 10:28 pm | विद्यार्थी
संदीप, आपण मूळ लेखातील खालील मुद्यांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाहीत?
3 Oct 2016 - 10:35 pm | संदीप डांगे
I will come to that point
3 Oct 2016 - 10:39 pm | बोका-ए-आझम
हेही घुसखोरीचं उदाहरण म्हणायला हवं. जगजीत सिंगऐवजी गुलाम अली किंवा मेहदी हसन ऐकणं हेही चुकीचंच की.
कैलाश खेरवर राहत फतेह अली खानमुळे कसा अन्याय झाला ते कळलं नाही. ते सांगाल का?
4 Oct 2016 - 8:55 am | सामान्य वाचक
असे प्रश्न लोक ना पडू शकतात , याचेच आश्चर्य वाटते
अगदी क्रूड उदाहरण द्यायचे तर, माझ्या नात्यातल्या किंवा मित्र चा एकाने खून केला, त्या कुटुंबाला त्रास दिला इ इ , तर त्या अपराधी कुटुंबातील दुसऱ्या व्यक्ती बरोबर मी प्रेमाने वागावे का
विशेषतः जेंव्हा ती व्यक्ती झाल्या प्रकार बद्दल काहीही खेड व्यक्त करत नाही तेंव्हा?
तिथे हि हाच न्याय लावावा का? कि गुन्हा करणारी व्यक्ती दुसरी आहे हि नाही।
चांगुलपणा आणि मूर्खपणा , यात सीमा रेषा आहे , हे काही लोक च्या लक्षात येत नाही
4 Oct 2016 - 9:04 am | अजया
:)
4 Oct 2016 - 11:46 am | गंम्बा
गृहितक चुकीचे आहे असे वाटते. भारतीय नागरीक आणि परकीय नागरीक ( पाकीस्तानी ) ह्यांना एकच न्याय लावायचे काहीही कारण नाही.
4 Oct 2016 - 2:32 pm | हकु
बोकासाहेब, लेख आणि प्रतिसाद, दोन्हींशी सहमत. काही वर्षांपूर्वी युरोपातल्या दोन युद्धमान देशांपैकी (नक्की कोणते देश ते खात्रीने लक्षात नाही) एका देशाने दुसऱ्या देशाचं संगीत ऐकणं सुद्धा सोडून दिल्याचं वाचनात आलं होतं. मी स्वतः पूर्वी राहत फतेह अली खानची गाणी ऐकायचो पण आता सोडून दिलंय.
3 Oct 2016 - 10:27 pm | धर्मराजमुटके
कसं आहे की जेव्हा मोर्चा निघतो आणि पोलीस लाठी चालवितात तेव्हा जो समोर असेल त्याच्यावर लाठी पडते. माझ्या मागच्याला, पुढच्याला, उजव्या डाव्या बाजुच्याला का मारले नाही असा प्रश्न विचारणे लॉजीकल नसते. तुमच्या प्रश्नाचे साधारण तसेच आहे. जो समोर दिसला त्याला ठोकला
जेव्हा दोन्ही देशांत तणावाची परिस्थिती निर्माण होते तेव्हाच उद्रेक उफाळून येतो व तो रास्त असतो. परिस्थिती निवळल्यावर तुम्ही परत गळ्यात गळे घालायला मोकळे की. मग राह्त फतेह अली खान ऐका, सलमान ला पाहा. सब चलता है ! स्कोअर सेटलींग फक्त ठराविक वेळीच होत असते. हीच दुनियेची रीत आहे.
3 Oct 2016 - 10:34 pm | बोका-ए-आझम
मग तशी परिस्थिती तर फाळणीच्या काळापासून आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्यांच्या निर्मितीपासून तणाव आहे. मग अशी बंदी आधीपासून असायला हवी होती. उरीचा हल्ला झाल्यावरच तणावाची परिस्थिती आहे याचा साक्षात्कार झाल्यासारखं जे लोक वागताहेत त्याबद्दल आश्चर्य वाटतं.
3 Oct 2016 - 10:37 pm | विद्यार्थी
पूर्णपणे सहमत!!!
3 Oct 2016 - 10:41 pm | धर्मराजमुटके
होय. तणाव तर फाळणीपासून आहेच मात्र जेव्हा जेव्हा असे तात्कालिक कारण घडते तेव्हा हा साक्षात्कार जास्त लोकांना होतो इतकेच. शिवाय विविध बातमीपत्रे, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटसअप इ. बाबींच्या वापरामुळे प्रतिसादांचे प्रमाण लक्षणीय दिसते. उदाहरणा दाखल सलमान खान च्या केस चा निकाल लागल्यावरच्या दोन दिवसातील वर्तमानपत्रांतील बातमीखालील वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून पहा. मात्र हेच पब्लीक महिन्या दोन महिन्यांनी त्याचा रिलीज झालेला सिनेमा बघायला तुफान गर्दी करतं.
3 Oct 2016 - 10:47 pm | बोका-ए-आझम
सलमानच्या चित्रपटांना गर्दी करणारं आणि तो निर्दोष सुटल्यावर हा अन्याय आहे आणि त्याला शिक्षा मिळाली असती तरच न्याय झाला असता असं म्हणणारं पब्लिक हे वेगळं आहे. Indifferent public पण आहे त्यात - ज्यांना काहीही फरक पडत नाही.
3 Oct 2016 - 10:55 pm | धर्मराजमुटके
तुमच्या लेखातील मतितार्थ आणि सलमान चे उदाहरण घेऊन तोच विषय थोडा पुढे न्यायचा म्हटला तर सलमान खानचे चित्रपट न पाहणे यावरच बंदी घालून चालणार नाही. सलमान खानला काम देणार्या निर्माता, दिग्दर्शकावर, त्याच्यासाठी गाणारे गायक यांच्या इतर चित्रपटांवर पण बहिष्कार घातला पाहिजे कारण त्यांच्यामुळे सलमानला संधी मिळते असे कोणी म्हणाले तर ते नक्कीच लॉजीकल होईल पण प्रॅक्टीकल होणार नाही. (म्हणजे वास्तवात तसे होत नाही.
हाच विचार तुमच्या लेखातील मुद्द्याला लागू होईल असे मला वाटते.
3 Oct 2016 - 11:12 pm | बोका-ए-आझम
पण जसं आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू घेतले जात नाहीत त्याप्रमाणे भारतात कुठेही पाकिस्तानी कलाकार घेतले जाणार नाहीत असं ठरवणं कठीण नाही. हा न्याय फक्त चित्रपटांनाच लावणं चुकीचं आहे. वर्गात जर एक मुलगा/मुलगी गडबड करत असेल तर सगळ्या वर्गालाच शिक्षा करणं हे जसं चुकीचं आहे तसं. त्या मुलाला/मुलीला वर्गाबाहेर जायला सांगून प्रश्न सोडवता येतो. In short, पाकिस्तानी कलाकार - मग ते गायनासारख्या वैयक्तिक कलेत असोत किंवा चित्रपटासारख्या सामुदायिक कलेत - त्यांना सरसकट बॅन करा किंवा मग कला या सामरिक आणि राजकीय विषयापासून दूर ठेवा. दुर्दैवाने आपण इथेही मध्यममार्ग स्वीकारतोय. चित्रपट कलाकार हे सरळसरळ दिसून येतात, त्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जातंय पण इतर क्षेत्रातील पाकिस्तानी - गायक, संगीतकार, लेखक - यांना सोडलं जातंय. हा भेदभाव आहे आणि अन्यायसुद्धा.
3 Oct 2016 - 11:18 pm | टवाळ कार्टा
मला तरी अशी अधिकृत बंदी नसावी असे वाटते पण लोकांनीच बहिष्कार घालावाच म्हणजे सरकारसुद्धा बोलायला मोकळे कि बघा आमचे अधिकृत धोरण बंदी नसावी असे आहे पण लोकच बघत नाहीत
शिस्तीत चोराच्या उलट्या बोंबा टाइप करावे
3 Oct 2016 - 11:23 pm | कैलासवासी सोन्याबापु
पुर्ण पाकीस्तानी कलाकारी वर बॅन घाला तिच्यायला फक्त आमच्या लाडक्या "खुदा के लिये" ह्या फवाद खानने काम केलेल्या अन नसीरुद्दीन शाह (की शहा) ने अक्षरश: जगवलेल्या सिनेमावर बॅन घालणे आम्हाला मंजुर नाही, कींबहुना रॅडीकलायझेशनच्या तळ्यातमळ्यात असलेल्या सगळ्या तरण्या मुसलमान पोरांस बसवुन दाखवावा असा हा चित्रपट आहे
पेशे खिदमत है,
खुदा के लिये.
3 Oct 2016 - 11:25 pm | कैलासवासी सोन्याबापु
अरे रे रे रे, व्हिडीओ एंबेड करताना जरा धिंगाणा झाला, प्रिय संपादक मंडळ कृपया हे झ्यांगाट थोडे निस्तरावेत अन व्हिडो तासात आणावातही नम्र विनंती!!!.
3 Oct 2016 - 11:32 pm | बोका-ए-आझम
चांगला होता. आम्ही २००८ मध्ये जयहिंद काॅलेज आॅडिटोरियममध्ये तो नासिरुद्दीन शाहच्या उपस्थितीत दाखवला होता. त्याला मुस्लिम मुलींची उपस्थिती भरपूर होती.
4 Oct 2016 - 10:23 am | नि३सोलपुरकर
एक नंबर चित्रपट आहे हो "खुदा के लिये."
आणि नसीरुद्दीन शाह तो क्या कहने ,कोर्टातील युक्ती वाद पण जबरा आहे .
नसीरुद्दीन शाहच्या तोंडी एक डॉयलॉग आहे " दीन में दाढी है ,दाढी में दीन नहीं ".
3 Oct 2016 - 11:28 pm | गब्रिएल
समोरचा डायरेक कम्बरड्यात लाथ घालत अस्ला तरी त्याचे पाय चाटण्याची भारतियांची सवय नविन नाय. हे सल्मान खान आणि कंपनीला म्हायताय. गुन्हा केल्यावर महागडे वकील करून भार्तिय कायद्याला टूक टूक केला तरी नितीबितिची काळजी न कर्ता निब्बर पब्लिक पैसे भरुन आपला सिनेमा पाहतेय, आसा अन्भव त्येला हाय. जन्तेला लाम्ब आटवण नस्ती. तिचि आक्कल बोलिवुड बराबर वल्खून हाय.
4 Oct 2016 - 12:05 am | खटपट्या
लेखातील सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर मनसेसारख्या मारझोड पक्षाला कंत्राट द्यावे लागेल.
4 Oct 2016 - 4:21 am | मिहिर
अदनान सामीचं काय करायचं मग? जोपर्यंत पाकिस्तानी नागरिक होता तोपर्यंतच्या (म्हणजे परवापरवाच्या) गाण्यांवर बंदी घालायची, भारतीय नागरिकत्वच रद्द करायचं की सूट द्यायची?
4 Oct 2016 - 9:26 am | बोका-ए-आझम
मग आधीचं सगळं संगीत आता भारतीय आहे. शिवाय अदनान सामीने कधीच भारतावर टीका वगैरे केलेली नाही. अदनान सामी is reformed now.
4 Oct 2016 - 10:07 am | महासंग्राम
बोकेश राव या महान कलाकारांची आणि फवाद खान, गळेकाढू आतिफ अस्लम, मायरा खान यांची तुलनाच अशक्य आहे.
4 Oct 2016 - 10:20 am | बोका-ए-आझम
पाकिस्तानी अभिनेत्यांना ते महान कलाकार नाहीयेत म्हणून नव्हे, तर त्यांच्या देशाच्या सरकारने घेतलेल्या काही निर्णयांमुळे आपल्या देशाचे जवान मारले गेले त्याचा निषेध म्हणून बॅन केलं जातंय. मग तो निर्णय इतर पाकिस्तानी कलाकारांनाही लागू का नको व्हायला? साधं उदाहरण आहे. जर सलमान खानऐवजी अमिताभ बच्चन गाडी चालवत असते आणि त्यांच्या गाडीखाली येऊन काही लोक मरण पावले असते तर आपण महान कलाकार म्हणून अमिताभ बच्चनना सोडून दिलं असतं का? जो न्याय एकाला तोच सगळ्यांना. तरच त्याला न्याय म्हणता येईल. Selective Justice is tantamount to injustice.
4 Oct 2016 - 11:11 am | महासंग्राम
पण,ज्यांना बंदी घातली आहे त्यांच कलाकार म्हणून योगदान किती हा मुद्दा सुद्धा राहतो ना.
4 Oct 2016 - 8:48 pm | अनंत छंदी
http://jagatapahara.blogspot.in/2015/12/blog-post.html
यात असं म्हटलंय "दोनच महिन्यापुर्वीची गोष्ट आहे. जगजितसिंग या गझल गायकाच्या पुण्यतिथी निमीत्त गुलाम अली या पाकिस्तानी गायकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खुद्द जगजितसिंग यांनीच आपल्या हयातीत पाकिस्तानी कलावतांना इथे आणू नये, असा आग्रह धरला होता. त्याचे कारण पाक कलावंत पक्के भारतद्वेषी असतात, असाच त्यांचा आरोप होता. किंबहूना त्याच कारणास्तव गुलाम अली याच्यावर भारतात यायला प्रतिबंध लागू झाला होता. ही माहिती आपल्यापर्यंत माध्यमांनी कशाला पोहोचवू नये? शिवसेनेने त्याला विरोध केल्यावर गदारोळ माजवला गेला. पण गुलाम अली याच्याविषयी किती सत्य आपल्यासमोर आणले गेले? एकदा भारतातून मायदेशी परत जाणारा हा गुलाम अली शेजारी बसलेल्या भारतीय दूतावासातील अधिकार्याशी गप्पा मारू लागला. तो अधिकारीही त्या गायकाचा चहाताच होता. मात्र हा प्रवासी भारतीय आहे याची गुलाम अलीला किंचितही कल्पना नव्हती, म्हणून तो मनमोकळा बोलत होता. अगदी खास पंजाबी भाषेत त्याने भारतीयांची काफ़ीर कुत्ते अशी अवहेलना चालवली होती. आपण सच्चे मोमीन म्हणजे मुस्लिम असल्याने काफ़ीरांचे पैसे, बायकांची मजा लुटतो, असे गुलाम अलीने मन मोकळे केले. मात्र इस्लामाबाद विमानतळावर उतरल्यावर त्या अधिकार्याने आपली खरी ओळख या गायकाला करून दिली. तेव्हा गुलाम अली गयावया करून माफ़ी मागू लागला. कारण शेजारचा प्रवासी पाकिस्तानी आहे अशा विश्वासाने त्याने मनमोकळे केले होते. पण त्यातून संभवणारा तोटा लक्षात आल्यावर गुलाम अली गांगरला होता. अर्थात अधिकार्याने त्याला दमदाटी वगैरे काही केली नाही. पण भारत सरकारला त्याविषयी माहिती दिल्यावर गुलाम अलीच्या भारतात येण्यावर वा कार्यक्रम करण्यवर प्रतिबंध लावण्यात आला. त्याचा फ़ारसा कुठे गाजावाजा झाला नाही. पण अनेक वर्षे हा प्रतिबंध कायम होता." हे जर खरे असेल तर
तर आपण गुलाम अलीचे कौतुक कसे करायचे?
4 Oct 2016 - 10:27 am | संदीप डांगे
बोकशेठ, कलेला धर्म जात देश प्रांत नसतो पण कलाकारांना असतो, या वाक्यात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत,
4 Oct 2016 - 10:39 am | सामान्य वाचक
..
4 Oct 2016 - 10:53 am | बोका-ए-आझम
तुमचं म्हणणं चुकीचं नाही, पण मग प्रश्न हा उद्भवतो की कला ही कलाकारापासून वेगळी काढता येते का? विशेषत: सादरीकरणप्रधान कला (performing arts) या कलाकारांपासून वेगळ्या काढता येतील का?
आणि तसं जर नसेल तर कलेला धर्म, प्रांत, जात, देश हे नसतात पण कलाकारांना असतात याला काय अर्थ आहे? याचा अर्थ त्या कलाकाराची कलाही या सगळ्या बंधनांत अडकणार. मी तेच तर म्हणतोय. एक तर ही बंधनं अजिबात मानू नका, किंवा मग पूर्णपणे मान्य करा आणि सगळ्यांवर ती लागू करा. काही जणांना ती लागू आणि काही जणांना नाही हे जाॅर्ज आॅरवेलच्या All people are equal but some are more equal या वाक्याप्रमाणे होईल आणि तो दांभिकपणा असेल.
4 Oct 2016 - 11:00 am | संदीप डांगे
कलाकार हा आधी कोणत्यातरी देशाचा नागरिक असतो नंतर कलाकार असतो, जे कलाकार स्वतः देशाची, प्रांताची बंधने पाळत नाहीत त्यांच्याबद्दल निषेधाचे, बंदीचे विचार येणार नाहीत,
ज्या कोणा पाकिस्तानी कलाकाराने पाकिस्तानच्या कारवायांचा विचारूनही निषेध केला नाही ती लोक कलेपेक्षा आपल्या देशाला महत्त्व देत आहेत हे स्पष्ट आहे, अशावेळेस ते कलाकार नसून नागरिक म्हणून वागत आहेत मग त्यांच्याशीही आपण नागरिक म्हणून व्यवहार करायला हवा, ह्यात त्यांनी सादर केलेली कला अभिनय गायन हे येऊ नये, पण त्यापासून त्यांना एक व्यावसायिक म्हणून होणारा फायदा त्यांना घेऊ देऊ नये,
I hope i m not confusing you more, even it may feel like!
4 Oct 2016 - 11:10 am | अप्पा जोगळेकर
ती लोक कलेपेक्षा आपल्या देशाला महत्त्व देत आहेत हे स्पष्ट आहे
त्यांनी कलेला देशापेक्षा जास्त महत्व दिले तरी आपण देऊ नये. उद्या ते कलाकार चांगले वागले तरी आपण त्यांची ठासली पाहिजे. कारण ते पाकिस्तानी आहेत.
4 Oct 2016 - 11:14 am | महासंग्राम
ते पाकिस्तानी आहे म्हणून नव्हे तर ते दहशतवादाचं समर्थन करतात म्हणून बंदी घातली पाहिजे.
तुम्ही म्हणता त्या प्नन्यायाने अदनान सामी वर बंदी घातली पाहिजे कारण तो आधी पाकिस्तानी नागरिक होता. ( आता तो भारतीय नागरिक आहे हा भाग वेगळा )
4 Oct 2016 - 11:56 am | अप्पा जोगळेकर
पाकिस्तान म्हणजेच दहशतवाद.
4 Oct 2016 - 11:13 am | बोका-ए-आझम
ज्यांनी मत व्यक्त केलेलं नाही, त्यांना काही वाटत नाही हे कशावरून? म्हणूनतर हाकलायचं तर सगळ्यांना, नाहीतर कुणालाच नाही. बरं, प्रांतांची बंधनं न पाळणं ठीक आहे, पण देशांची बंधनं न पाळणं आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये अशक्य आहे. विशेषतः दहशतवाद हा प्रमुख धोका असताना.
4 Oct 2016 - 11:07 am | अप्पा जोगळेकर
जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने!
साहेब तुम्ही स्वतःच प्रश्नाच उत्तर दिल आहे. जे जे पाकिस्तानी आहे त्या सगळ्यावर कायद्याने बॅन असावा.
आणि या संस्थळापुरत बोलायच तर असल्या बुद्धिभेद करणार्या धाग्यांवर सुद्धा बॅन असावा. 'खुदा के लिए' वर सुद्धा बॅन असावा. सैयोनी, हंगामा वर पण बंदी असावी. फार काय पाकिस्तानी रेसिपीवर सुद्धा.
रच्याकने - एका अमेरिकास्थित पाकिस्तानी माणसाची कंपनी जिचे भारतात हपिस आहे.तगडा पगार देते.
त्याचे इंटर्व्हू कॉल आल्यावर मी 'नॉट इंटरेस्टेड टू वर्क इन युअर कंपनी' असे देतो. 'इफ पॉसिबल यु अल्सो सर्च सम गुड जॉब' असे उत्तर एचार ला देतो. सर्जिकल स्टाईक शी संबंध नाही. आधीपासूनच.
हाडवैर आहे तर त्यात ऑनेस्टी असावी.
4 Oct 2016 - 11:17 am | बोका-ए-आझम
त्या सगळ्या मुळात भारतीय आहेत. पाकिस्तानी रेसिपी असं काही अस्तित्वात नाही.
That's news to me. बुद्धिभेद कसा काय?
4 Oct 2016 - 11:56 am | अप्पा जोगळेकर
ओके.
4 Oct 2016 - 1:00 pm | अनिरुद्ध.वैद्य
फक्त त्यांचा शोध १९४७ नंतर लागला असेल, तर ती पाकिस्तानी बरं
4 Oct 2016 - 11:38 am | विशुमित
प्रत्येक वाक्याशी सहमत...!!
"हाडवैर आहे तर त्यात ऑनेस्टी असावी." विशेष आवडलं.
केलं तर आरपार कर हागरं काही ठेवू नगं - इति आमची इरसाल आजी
4 Oct 2016 - 11:11 am | धर्मराजमुटके
इति. ओम पुरी. अधिक बातमी इथे
4 Oct 2016 - 12:23 pm | झेन
हे ह्यांच्याकडून अपेक्षीतच होतं. एका मर्यादेनंतर प्रसिद्धी ची नशा हवेत घेवून जाते.
बोकोबां सारख्या सुलझ्या व्यक्तीला असे प्रश्न पडणं पटत नाही. आता असं बघा कुठलाही कलाकार त्या कलेव्यतिरीकत एरवी सामान्य नागरिकच असतो की, जरी तो स्वतः ला कााहीही समजत असला तरी. बाकी लोकभावना तात्कालीक असते आणि भावनेचा बाजार करणारे सर्वकालिक.
4 Oct 2016 - 12:44 pm | बोका-ए-आझम
कारण पाकिस्तानच्या इतर कलाकारांबद्दल कोणीच काही बोलत नाहीये. कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराच्या कलेला आपण आश्रय देणार नाही हे एकदा ठरवा की. मग पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं, पाकिस्तानी संगीतकार आणि गायकांच्या सीडीज, पाकिस्तानी चित्रकारांनी काढलेली चित्रं - या सगळ्या गोष्टी भारताबाहेर काढायला हव्यात. पण आपण फक्त चित्रपट अभिनेत्यांबद्दल action घेतोय. बाकीच्या कलाकारांचं काय? ते कमी पाकिस्तानी आहेत का? जर पाकिस्तानी या एका कारणावरून आपण एकाला बाहेर काढणार असू तर तोच न्याय सगळ्यांना लावायला हवा. मग एखाद्या पाकिस्तानी रुग्णाला, मग भले तो लहान मुलगा का असेना, आपल्या देशात उपचार नाकारायला हवेत. कराची बेकरी किंवा चंदू हलवाई कराचीवाला ही दुकानं बंद करायला हवीत किंवा जबरदस्तीने त्यांची नावं बदलायला हवीत. तरच पूर्णपणे बॅन ही संकल्पना प्रत्यक्षात येईल.
नाहीतर मग आपण selective ban करणार हे मान्य करुन आपला दांभिकपणा चालू ठेवावा. मध्यममार्ग अशा बाबतीत चालणार नाही.
4 Oct 2016 - 12:59 pm | अनिरुद्ध.वैद्य
कराची बेकरी किंवा चंदू हलवाई कराचीवाला ही दुकानं बंद करायला हवीत किंवा जबरदस्तीने त्यांची नावं बदलायला हवीत.
कराची बेकरी चालवणारा किंवा चंदु हलवाई हा कराचीतुन आणतोय का गोष्टी विकायला?
4 Oct 2016 - 1:16 pm | बोका-ए-आझम
मग पाकिस्तानवर बॅन तर पाकिस्तानी शहराचं नाव असलेल्या दुकानाचंही नाव बदलायला नको का?
4 Oct 2016 - 1:21 pm | संदीप डांगे
त्रिशतक मारायचं का बोकाशेठ? ;) =))
4 Oct 2016 - 1:29 pm | बोका-ए-आझम
त्यामुळे जरा कठीण दिसतंय. ;)
4 Oct 2016 - 1:44 pm | संदीप डांगे
अरे हम है ना!
4 Oct 2016 - 3:04 pm | महासंग्राम
मग तर ५०० कुठेच नै गेले भौ (कृहघ्या)
4 Oct 2016 - 1:22 pm | यशोधरा
ही कुस्कुटं नंतर काढू शकतोच हो, पण सद्ध्या जे सहज शक्य आहे ते तर आधी करा! इथे येऊन, इथल्या नाटक सिनेमांत काम करुन, पैसे कमवून, भरपूर लाड पदरात पाडून जर कोणी हिंदुस्थान के लोगोंके दिल छोटे हैं वगैरे बोलत असेल, तर पहिले त्याला बॅन करा.
4 Oct 2016 - 3:12 pm | डॉ सुहास म्हात्रे
बोकाजी आज वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत. "घटं भिद्यात, इ इ." करून काही जणांनी अनेक शतकी प्रतिसाद मिळवलेले पाहून तेही खवळले आहेत, अशी कुणकुण ऐकली आहे =)) ;)
4 Oct 2016 - 3:13 pm | यशोधरा
ते आलेच आहे लक्षात एक्काकाका. कधीतरी प्पणही हातभार लावावा म्हटले ;)
4 Oct 2016 - 3:41 pm | नाखु
तुम्ही सुद्धा !!
इतके म्हणून मी खाली बसतो.
गपगार नाखु
4 Oct 2016 - 4:55 pm | बोका-ए-आझम
बंदी आणा किंवा बॅन करा हे सोशल मिडियावर इतक्या सवंगपणे वापरलं जातंय (फेसबुक, whatsapp, इत्यादी) त्यावरून हा एक विचार मनात आला. म्हटलं जरा पाहू या लोकांची काय प्रतिक्रिया येते.
4 Oct 2016 - 1:38 pm | अनिरुद्ध.वैद्य
आम्हास * पाकिस्तानी * नकोयत. तिथलं नाव गाव मुळ असलेल चालेल की. त्यांना सहानुभुती असणारेही नकोत.
कलेशी खेळाशी कायीयेक वावड नाहिये, त्या खेळाडुंशी, कलाकारांशी वावड आहे.
4 Oct 2016 - 12:28 pm | यशोधरा
कितीही उच्चं प्रतीची आभाळातून पडलेली कला घेऊन आलेला कलाकार असेल तरी त्यापेक्षा देश श्रेष्ठ आहे.
4 Oct 2016 - 1:06 pm | गिरिजा देशपांडे
+11111
4 Oct 2016 - 1:25 pm | बोका-ए-आझम
मग जे जे पाकिस्तानी आहे त्या सगळ्यावर बॅन टाकायला हवा, बरोबर? त्याशिवाय देश श्रेष्ठ आहे यावर शिक्कामोर्तब कसं होणार?
4 Oct 2016 - 1:29 pm | यशोधरा
नुसते बुद्धीभेद करणारे प्रश्न विचारण्यापे़क्षा सुरुवात करायची. मी माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करते, खास करुन एखा/दी कलाकार त्याची 'कला' विसरुन स्वतःच्या देशाशी प्रामाणिक राहून माझ्या देशाबद्दल वाईट साईट बोलतो, तेव्हा माझ्यातल्या नागरिकाने त्याच्या कलेची पत्रास का करावी?
तुम्ही?
4 Oct 2016 - 1:36 pm | बोका-ए-आझम
आणि समोरचा त्याच्या देशाशी प्रामाणिक राहात असेल तर त्याचा निषेध करायचा? ठीक आहे. माझं सुरूवातीपासून एकच म्हणणं आहे - एकतर इस पार या फिर उस पार. हाकलायचं तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांना हाकला आणि त्यांच्या कलाकृतींचंही भारतात नामोनिशाण ठेवू नका. मग ज्यांनी तोंड उघडलेलं नाही तेही लोक सुटता कामा नयेत. किंवा मग कला ही देश, धर्म वगैरेच्या पलिकडे असते असं म्हणा आणि ते पाळा. आपल्याकडे काय होतंय की लोक फवाद खानला हाकलताहेत पण आतिफ, राहत, गुलाम अली यांना ठेवताहेत. त्यांची गाणी ऐकताहेत. त्यांनी गायलेली गाणी स्पर्धेत म्हणताहेत. हे चुकीचं आहे. तेही पाकिस्तानी आहेत. हाकलायचं तर सगळ्यांना. कुणाला एकाला हाकलायचं आणि बाकीच्यांसाठी पायघड्या पसरायच्या यात अर्थ नाही. हा माझ्या मते दांभिकपणा आहे.
4 Oct 2016 - 1:41 pm | अनिरुद्ध.वैद्य
आम्ही सर्वंकश बंदीच्या फेव्हर मध्ये आहोत. सीलेक्टीव्ह बंदी बिंदी नको.
4 Oct 2016 - 1:42 pm | यशोधरा
च्च!च्च! ऐसन काहे करत हो? स्वतःच्या देशाशी प्रामाणिक रहायला दुसर्या देशाला, जिथे आपली रोजी रोटी सुद्धा मिळते, त्याला शिव्या घालायला लागतात?
आणि त्याच्या देशाशी प्रामाणिक राहूदेत हो, अगदी छाताडावर गोळ्या (खर्या, फिल्मी नाही) खाऊदेत - गुड फॉर हिम, त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण माझ्या देशाला शिव्या घालू नकोस. इतकं सोपं आहे.
4 Oct 2016 - 1:51 pm | बोका-ए-आझम
की ज्या पाकिस्तानी कलाकारांनी/लेखकांनी असं कोणतंही मत दिलेलं नाही, त्यांना का सोडायचं? लताऐवजी नूरजहानचं गाणं ऐकणं, जगजीतऐवजी गुलाम अली आणि मेहदी हसन ऐकणं हेही थांबवायला हवं. Ban everything that is associated with Pakistan - right from 14th August 1947.
4 Oct 2016 - 2:13 pm | यशोधरा
करा.
4 Oct 2016 - 3:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
थोडे दिवस थांबा, २०१७ चा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यासाठी पाकिस्तानच नसणार अशी व्यवस्था चालली आहे अशी खबर आहे. (कधी मधी अर्णव गोस्वामीचे कार्यक्रम पहात जा हो ! ;) :) ) पाकिस्तान नाही तर पाकिस्तानीही नसणारच. मग तर कोणाला बॅन करावे आणि कोणाला नाही हा प्रश्नच उरणार नाही =))
4 Oct 2016 - 3:43 pm | यशोधरा
हाहाहा! हल्ली मज्जा येते त्याचे कारेक्रम बघायला!
4 Oct 2016 - 3:47 pm | मदनबाण
हो,हल्ली तो चक्क इतरांनाही थोड फार बोलु देतो. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
4 Oct 2016 - 3:57 pm | विशुमित
कसला ओरडून ओरडून बोलत असतो...त्याच्या घरचे वैतागत असतील नाही त्याला ?
4 Oct 2016 - 12:57 pm | अनिरुद्ध.वैद्य
कस्काय येवढे प्रश्न पडतात तुम्हाला?
ब्लँकेट बॅन करा न सरळ? पब्लिकनी बहिष्कार टाका! कोण कोण्ता बायकी राहत फ्तेह अन किंचाळणारा सय्योनीवाला. आमचे कान तेव्हाही किटायचे अन आताही किटतात.
लोक्स तेव्हाही आम्हाला द्वेषमुर्ती म्हणायचे अन आताही म्हणतील अन नंतरही म्हणतील, पण आमच्यातर्फे पाकड्याचं गुणगान गाणारे, त्यांना सपोर्ट करणारे अन खेळ कला सीमाविरहीत असते म्हणणारे सगळ्या सगळ्यांवर स्वयंघोषीत बहिष्कार असतोच, गेली १५ वर्ष हैच, अन असणार आहेच.
4 Oct 2016 - 1:12 pm | संदीप डांगे
+100000
4 Oct 2016 - 1:20 pm | बोका-ए-आझम
ते डोकं असल्याचं लक्षण आहे.
१५ वर्षे? त्याआधी काय परिस्थिती होती हे जाणण्यासाठी उत्सुक.
4 Oct 2016 - 1:32 pm | अनिरुद्ध.वैद्य
१५ वर्षे? त्याआधी काय परिस्थिती होती हे जाणण्यासाठी उत्सुक.
>>
त्याआदी आमी धावी बारावी करण्यात बिजि होतु.
4 Oct 2016 - 1:21 pm | lakhu risbud
पाकिस्तानी कलाकारांना प्रश्न सोपाच विचारला गेला होता,भारतात जे दहशवादी हल्ले होत आहेत त्यांचा तुंम्ही निषेध कराल का ?
या फवाद खान आणि तत्सम मंडळींनी तोंड बंद ठेवले. जर पाकिस्तान चे सरकार आणि माध्यमे जगाला ओरडून सांगत आहेत कि आमचा दहशतवादाशी काहीच संबंध नाही उलट पाकिस्तानच दहशतवादाचा शिकार आहे . मग या कलाकारांना मग अशी कोणती सक्ती आहे कि त्यांनी तोंड बंद ठेवावे ?
वस्तुस्थिती अशी आहे कि पाकिस्तानात तीन प्रकारच्या सर्वोच्च म्हणावे अशा ताकदी आहेत. १) सरकार २) पाकी लष्कर /ISI ३)LeT /JuD आणि अशा अनेक दहशतवादी संघटना. यातली पहिली ताकद हि फक्त चेहरा म्हणून काम करते (अमेरिका आणि इतर देशांकडून भीक मिळण्यात अडचण येऊ नये म्हणून ). वास्तवात सत्ते चे संचालन लष्कर आणि दहशतवादी संघटनाच करतात.जे खरे दुखणे आहे.
आपण आपल्या देशात ज्या काही वाईट घटना घडतात जसे कि बलात्कार,दहशतवादी हल्ले. तेव्हा त्या बाबतीत आपण आपल्या कलाकारांकडून अपेक्षा करतोच ना ? की त्यांनी त्या घटनांवर मत प्रदर्शन करावे /टीका करावी. इथे तर दहशतवाद आहे ज्यात माणसे मारली जात आहेत,ते हि धर्माच्या नांवाने प्रशिक्षित दहशतवाद्यांकडून. मग अशा वेळी कलाकार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून असल्या घटनेची निंदा/टीका न करण्याचे कारण समजत नाही.
4 Oct 2016 - 1:28 pm | जाबाली
काही गोष्टींना देशांची आणि सीमेची बंधने नसतात !
4 Oct 2016 - 1:28 pm | बोका-ए-आझम
कसं बोललात! म्हणजेच पाकिस्तानात जो यापैकी कोणत्याही ताकदीला आव्हान देईल तो संपवला जाईल. मग हे पाकिस्तानी कलाकार कशावरून त्याला भिऊन मत देत नाहीयेत? शेवटी जिवाची पर्वा असतेच ना प्रत्येकाला.
4 Oct 2016 - 1:32 pm | संदीप डांगे
असं असलं तर त्यांनी देश सोडायला हवा कि नाहि?
4 Oct 2016 - 1:44 pm | बोका-ए-आझम
त्यांचे विचार असे नाहीयेत असं म्हणायचंय का तुम्हाला? ते फक्त उघडपणे बोलत नाहीयेत. जे बोलताहेत ते निदान प्रामाणिक आहेत असं म्हणू या आपण. जे बोलत नाहीत त्यांचं काय? त्यांनाही हाकला. क्राॅसवर्डसारख्या दुकानांत जी पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं असतात त्यांनाही काढून टाकायला हवं. क्राॅसवर्डवर मोर्चा आलेला पाहिलाय का तुम्ही? आमच्या इथे राज ठाक-यांच्या कृष्णकुंजपासून हाकेच्या अंतरावर क्राॅसवर्ड आहे आणि तिथे पाकिस्तानी लेखकांची पुस्तकं सुखेनैव विकायला ठेवलेली आहेत. का? त्यावर का नाही बंदी? जर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालायची तर लेखकांना का सोडायचं? तेही कलाकारच आहेत ना? Be fair to everyone, even while throwing them out!
4 Oct 2016 - 2:26 pm | lakhu risbud
साब, जमीर नाम कि भी चीज होती है !
हे सगळे लोक आर्थिदृष्ट्या संपन्न अशा घरातून येतात. वडिलोपार्जित पैश्या च्या जीवावर त्यांना घर/देश सोडणे शक्य आहे.पण केले जात नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Fawad_Khan
4 Oct 2016 - 1:45 pm | प्रसाद_१९८२
भारताला ऑल आऊट करा, सर्जिकल स्ट्राईकनंतर जावेद मियाँदाद बरळला
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचं वातावरण आहे. यातच जावेद मियांदादने हे संतापजनक विधान केलं आहे. पाकिस्तानने आता भारतावर हल्ला करावा, असं जावेदने म्हटलं आहे.
http://abpmajha.abplive.in/world/pak-ex-cricketer-javed-miandad-calls-for-all-out-attack-on-india-following-surgical-strike-across-loc-294920
4 Oct 2016 - 2:32 pm | विशुमित
माफीवीर व्यंगचित्र वाल्यानी तर याला पायघड्या घातल्या होत्या. वरून सुंदर सुंदर फोटो ही काढले होते....!!
4 Oct 2016 - 2:28 pm | टवाळ कार्टा
बोक्याशी सहमत...एखाद दुसर्या कलकाराला बॅन करणे हा दांभीकपणा झाला
आत्ता मीच सय्योनी ऐकतोय :)
4 Oct 2016 - 2:32 pm | मदनबाण
तुम्हाला काय वाटतं?
बरचं काही वाटतं ! पण नुसतं वाटुन काय उपयोग ?
बाकी त्या पाकड्यांचे मरु दे.... पण आपल्याकडच्या माकडांचे काय करायचे ? याचा विचार आपल्या लोकांनी आधी करायला हवा नाही ?
लेटेस्ट माकड :- राजकारणासाठी सर्जिकल स्ट्राईकची अफवा : संजय निरुपम
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
4 Oct 2016 - 2:44 pm | विशुमित
असू ही शकतं... या सरकारचा काही भरोसा नाही.
पुणे-मुंबई मध्ये बसून थोडीच कळत नक्की काय परिस्थिती आहे तिथे.
पिताडी, मूर्ख आणि वेडी माणसं बऱ्याच वेळा खरं बोलत असतात, फक्त लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत.
पण या माकडांच्या हातात कोण बरं कोलीत देत असावं???
4 Oct 2016 - 2:58 pm | मदनबाण
पिताडी, मूर्ख आणि वेडी माणसं बऱ्याच वेळा खरं बोलत असतात, फक्त लोक यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत.
आपले DGMO { Director General of Military Operations } Lt Gen रणबीर सिंह देशाला चुकीची माहिती देतील असे मला वाटतं नाही,मला माझ्या देशाच्या आर्म फोर्सेसवर आणि त्यांच्या पराक्रम गाजवण्याच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
4 Oct 2016 - 3:08 pm | विशुमित
मी ऊपरोधक प्रतिसाद दिला होता...!!
माकडांनी कसा उच्छाद मांडला आहे ते सांगायला...
DGMO आणि आर्मी वर 100% काय 1000% संपूर्ण विश्वास आहे. गैरसमज नसावा...
4 Oct 2016 - 3:31 pm | अनुप ढेरे
चीनबद्दल काय मत आहे? त्यांच्या वस्तूंवरपण टाकायचा का बहिष्कार?
4 Oct 2016 - 3:44 pm | विशुमित
चिनी कलाकारांवर पहिल्यांदा बॅन आणला पाहिजे...
4 Oct 2016 - 4:01 pm | अमर विश्वास
भारतात एक प्रथा आहे.. दसऱ्याला रावणदहन करतात ... वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून...
तसेच प्रत्येकाला आपली देशभक्ती दाखवायला अशी प्रतिके लागतात.. काही विधायक.. जसे झेंडावंदन..
किंवा मग असे.. पाक कलाकरांवर बंदी वगैरे... बंदीची मागणी करणारे कितीजण न चुकता 15 ऑगस्टला झेंडवंदन करतात हा वेगळा संशोधनाचा विषय आहे...
दुसरा मुद्दा म्हणजे हे रेट्रोस्पेक्टिव (पूर्वलक्षी प्रभावाने) बंदी घालणे ... आता गुलाम आलीच्या सगळ्यअ सीडी फेकुन द्याल.. विकायला बंदी आणाल.. पण मग इतकी वर्षे हे गाणे ऐकले.. त्याचा आनंद घेतला.. त्याचे काय? कुठे फेडाल ही पापे ?
अर्थात या पापक्षालनाचा एक उपाय आहे.. करून बघा.. उपयोग झला तर कळवा...
उपाय असा :
ओळीने नउ दिवस आपले संपूर्ण भारतीय असलेले श्री हिमेश रेशमीया यांचे "तेरा सरूर" हे गणे रोज एकाशेआठ वेळा ऐकावे.. त्यानंतर दहाव्या दिवशी (जर जगण्याची उभारी राहिली तर) भारतमाता की जय ओरडावे.. जरूर पापक्षालन होईल..
बघा प्रयातना करून.. ऑल ते बेस्ट..
4 Oct 2016 - 7:35 pm | बोका-ए-आझम
म्हणजे तुमच्या दृष्टीने गुलाम अलींचं गाणं ऐकणं हे पाप आहे? बाकी प्रयातना हा शब्द आवडला. ज्याने यातना होतात अशा गोष्टी स्वतःहून करणे म्हणजे प्रयातना ;)
4 Oct 2016 - 4:08 pm | वेल्लाभट
बोकोबांशी तात्विक दृष्ट्या पूर्ण सहमत आहे. ग़ुलाम अली, मेहदी हसन न ऐकणं तेवढं जरा कठीण वाटतंय. एकवेळ न ऐकणंही जमेल, पण न गुणगुणणं.... विचारही न करणं....
कठीण आहे. तरीही सहमत.
4 Oct 2016 - 4:42 pm | विशुमित
<<<<<<ऐकणंही जमेल, पण न गुणगुणणं.... विचारही न करणं....
कठीण आहे.>>>>>
म्हणजे सोशल मीडिया वरची सर्व फुकाची देशभक्ती म्हणायची.
शेवटी सलमान खान निर्दोषच सुटणार....!!
ओम पुरी झिंदाबाद म्हणायची च वेळ येणार...!!
संजय निरुपम देशाचा संरक्षण मंत्री बनवा म्ह्णून सिद्धिविनायक आणि हाजी अली ला साकडे घालावे लागणार...!!
4 Oct 2016 - 5:14 pm | वेल्लाभट
सगळं फुकाचंच असतं हो आयुष्यात... टेन्शन नका घेऊ.
4 Oct 2016 - 5:34 pm | विशुमित
टेन्शन कोणी घेतलंय ??
तसं त्या इक्बाल च पण गाणं आपण गुणगुणतच असतो की---
सारे जहाँ से अच्छा हिन्दोसिताँ हमारा
हम बुलबुलें हैं इसकी यह गुलसिताँ हमारा
4 Oct 2016 - 5:37 pm | वेल्लाभट
एक्झॅक्टली!
4 Oct 2016 - 5:28 pm | विशुमित
सुषमा स्वराज यांचं ममत्व :::: याबद्दल काय मत आहे मदन भाऊ??
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=FBGGXA
4 Oct 2016 - 8:28 pm | मदनबाण
हँहँहँ... नवाज शरिफ यांच्या मातोश्रींची आणि सुषमा स्वराज यांची मागच्या वर्षी डिसेंबर {बहुधा} मध्ये भेट घेतली होती. त्यांचे शब्द होते, तू तो मेरे वतन से आयी हो इं इं इं... मग पाकिस्तानी लोकांचे काय मत असेल यावर ?
ते समजले की मी वरच्या प्रश्नाचे उत्तर देइन ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जोपर्यंत चंदू परतणार नाही, तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन नाही!
4 Oct 2016 - 7:32 pm | संदीप डांगे
अरे काय, आजच्या दिवसात शंभर पण झाले नाही? :(
4 Oct 2016 - 7:38 pm | बोका-ए-आझम
देशभक्ती म्हणून काही राहिलेलीच नाही लोकांमध्ये!
4 Oct 2016 - 7:51 pm | यशोधरा
तुमच्याइतकी, हा शब्द अॅड करा की ;)
4 Oct 2016 - 7:55 pm | बोका-ए-आझम
स्वतःची स्तुती करायची सवय नसली की हे असं होतं. :)
4 Oct 2016 - 7:57 pm | यशोधरा
बरोबर आहे म्हणा, स्तुती करायसारखं फारसं काही नसलं की सवय कशी असणार? =))
4 Oct 2016 - 8:08 pm | बोका-ए-आझम
रच्याकने तुम्हाला उपरोध कळत नसावा असं मला वाटलं नव्हतं. असो.
4 Oct 2016 - 8:13 pm | यशोधरा
कळतो की दादा, आणि तुम्ही निखळ गंमत तशी घेऊ शकता असं मला वाटलं होतं. :)
4 Oct 2016 - 9:06 pm | कैलासवासी सोन्याबापु
असो(च)!
4 Oct 2016 - 9:19 pm | खटपट्या
मी माझ्यापासून सुरवात करतोय.
आजपासून आलेपाक खायचे सोडून दीले....
4 Oct 2016 - 10:30 pm | अमर विश्वास
गुलाबजाम सुद्धा साखरेचे खणार.. "पाक"तील नको
4 Oct 2016 - 10:52 pm | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
नाक दाबलं की तोंड उघडतं. सरसकटपणे सगळे अवयव पिरगळंत बसायची गरज नाही. घोट्या (पायाच्या बरंका) पिरगळल्या की डोळे उघडतात.
फावड्याखानास हाकलून दिला कारण त्याने कमावलेला पैसा पाकिस्तानात परत जाऊ शकला असता. त्यातून दहशतवादास प्रोत्साहन मिळाल्यासारखं झालं असतं.
दांभिकपणाचं म्हणाल तर शिवसेनेचे मुंबईतले पहिले महापौर सुधीर जोशींना निवडून आणतेवेळी बाळासाहेबांनी चक्क मुस्लिम लीगची मदत घेतली होती. पुरंदरच्या तहानंतर शिवाजीमहाराजांना आदिलशाहीविरुद्ध मोगलांचे अंकित बनून (दिलेरखानाच्या(?) हाताखाली) लढाई लढावी लागली. तिच्यात त्यांचा सपशेल पराभवही झाला होता.
आ.न.,
-गा.पै.
4 Oct 2016 - 11:43 pm | बोका-ए-आझम
हो, पण तेव्हा पाकिस्तानने हल्ला केलेला नव्हता आणि मुस्लीम लीग हा भारतात नोंदणी केलेला अधिकृत पक्ष आहे. बाकी शिवाजीमहाराजांनी जे केलं, तो त्यांच्या मुत्सद्दीपणाचा एक भाग होता. या दोन्हीही ठिकाणी दांभिकपणाचा संबंध कसा येतो हे सांगितलं तर बरं होईल.
5 Oct 2016 - 1:18 am | गामा पैलवान
बोका-ए-आझम,
अहो, दांभिकपणाचा संबंध येतंच नाही मुळी. तेच तर सांगायचं होतं.
दांभिक हा शब्द तुम्ही तीन ठिकाणी वापरला आहे.
हे तिन्ही राजकारणात मोडतात. राजकारण म्हंटलं की दांभिक काय अन अदांभिक काय सगळं सारखंच नाही का?
आ.न.,
-गा.पै.
5 Oct 2016 - 1:40 am | चित्रगुप्त
हा लेख वाचून मी बायकोला म्हणालो, आजपासून मी गुलाबजाम, रसगुल्ला वगैरे 'पाक' असलेले पदार्थ खाणार नाही...
बायको म्हणाली, छान... आजपासून मीसुद्धा स्वयं'पाक' करणार नाही.
वाचा आणखी मिसळपाव.
5 Oct 2016 - 2:25 am | विकास
माझ्या मर्यादीत वाचनाप्रमाणे IMMPA या मला वाटते बिगर सरकारी असलेल्या चित्रपट दिग्दर्शक-निर्मात्यांच्या संघटनेच्या नावाने बातमी आलेली आहे. त्यांचा अधिकृत ठराव खाली चिकटवेला आहे. ज्यांना माझ्याप्रमाणे अधिकृत प्रस्ताव (सही शिक्क्यानुसार) बघून खात्री करून घेण्याची हौस आहे त्यांनी येथे बघावा.
यात म्हणल्याप्रमाणे त्यांनी, "...appeal to all IMPPA members" अर्थात त्यांच्या सभासद कंपान्यांना वगैरे जाहीर आवाहन केले आहे. आवाहन करणे म्हणजे बॅन करणे असते का? त्यात काही "आज्ञा" असते का? आणि असली तरी ती एका संघटनेच्या सदस्यांना दिलेली आज्ञा फारतर असू शकेल... सरकार काही मधे पडले आहे का? बरं कोणी कुणाला घ्यावे आणि का घेऊ नये आणि घेतले तरी नंतर फायर करावे हे आवडो अथवा न आवडोत, पण ते त्या पैसे देणार्याचे हक्क असतात, हे खाजगी कंपन्यांमधे नोकरदार असतात त्यांना तरी किमान कळायला हवे.
IMPPA takes significant decisions in its Extraordinary General Body Meeting
and Annual General Meeting
IMPPA in its Seventy Seventh Annual General Meeting began the meeting with obituary and condolence for the brave martyrs of the Indian Armed Forces in the cowardly terrorist attack at Pathankot and Uri. All members present were highly concerned and aggrieved at the total silence of the Pakistani artistes and technicians towards the shameful attack on India and after discussions and deliberations the members in the meeting unanimously decided that this silence of Pakistani artistes
was an insult and humiliation of our armed forces and the country at large.
The members unanimously felt that this is the right time to react and stand by the emotions and dignity of our Country and passed the following resolution.
It is unanimously resolved to appeal to all IMPPA members to henceforth in future not to work with any artistes, singers or technicians from Pakistan until the situation of hostilities between Pakistan and India subsides and the Government of India declares that all is well with Pakistan and India.
माझ्या दृष्टीने हा ठराव म्हणजे शुद्ध चावटपणा पक्षी धूळफेक आहे... मराठीत "हात रे" म्हणणे अथवा इंग्रजी, "slap on the wrist" वाक्प्रचारासारखा प्रकार आहे... त्यातून ऐन पंजाब-युपि निवडणुकांच्या वेळेस नवीन कावकाव करण्याची तयारी झालेली आहे इतकेच.