द स्केअरक्रो - अँड्रॉइड बुक अँप

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in काथ्याकूट
3 Oct 2016 - 9:29 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,
मिपा वरील बोका ए आझम ह्यांनी अनुवाद केलेली 'द स्केअरक्रो' हि कादंबरी अनेक वाचन प्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. ह्या दीर्घ कादंबरीच्या अनुवादा साठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे मिपाकरांनी आपल्या प्रतिक्रियांतून कौतुकही केले आहे. त्यांची हि कादंबरी जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अँड्रॉइड बुक अँप च्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेली आहे, ज्याद्वारे वाचक ती ऑफलाईन पण वाचू शकतील अर्थातच मोफत. हे Book app केवळ 4.4 Mb चे आहे जे आपण खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता.

आपण स्वतः हि कादंबरी वाचा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्र मंडळींना Whatsapp, फेसबुक , twitter या माध्यमांतून
हि लिंक शेअर करा हि विनंती.
(जर हे app install करताना "For security, your phone is set to block installation of applications not obtained from the Android Market" असा मेसेज आला तर Allow app installs from 'unknown sources' वर चेक करावे. आणि तरीही काही अडचण आली तर ह्या लिंक वर क्लिक करा.

आपला,
टर्मीनेटर.

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

3 Oct 2016 - 10:54 am | राजाभाउ

मस्त काम केलय तुम्ही !! घन्यवाद.
रच्याकने त्या अँप मध्ये इतर कादंबर्याही टाकता येतील काय ?

टर्मीनेटर's picture

3 Oct 2016 - 1:12 pm | टर्मीनेटर

जरूर टाकता येतील राजाभाऊ...

बोका-ए-आझम यांच्या स्केरक्रो लेखमाले नंतर Michael Connelly यांच्या लेखनाचं फॅन झालोय.
आजच The Gods of Guilt हातावेगळी केली...अफलातून लेखन

टर्मीनेटर's picture

3 Oct 2016 - 5:09 pm | टर्मीनेटर

मी पण ...आता THE POET वाचायला घेतोय....

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Oct 2016 - 5:12 pm | कैलासवासी सोन्याबापु

ह्या ऍप करता खुद्द मायकल कोनेली ह्यांची परवानगी घेतली आहे का? नसल्यास प्रताधिकार संबंधी तांत्रिक मुद्दे पुढ्यात येऊ शकतात.

टीप :- मला आठवते त्याप्रमाणे बोकाभाऊ ह्यांनी कोनेली ह्यांच्यासोबत पत्रव्यवहार करून अनुवादाची परवानगी घेतली आहे, आता ती परवानगी मिसळपाव करता एक्सक्लुसिवली घेतली आहे का एकंदरीत त्याचा अव्यवसायिक वापर करण्याकरता घेतलेली आहे ह्यावर बोकभाऊच अधिक प्रकाश टाकू शकतील असे वाटते, जर सगळ्या परवानग्या रीतसर घेतलेल्या असतील (अशी अशा आहे) तर तुमच्या उपक्रमाचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतील ही पावती मी आगाऊच देऊन ठेवतो झालं.

अजून एक महत्वाचे, ऍप वर लेख टाकायच्या आधी संबंधित लेखकांची रीतसर परवानगी घेतली जावी ही एक माफक अपेक्षा व्यक्त करतो

धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

3 Oct 2016 - 6:26 pm | टर्मीनेटर

धन्यवाद सोन्याबापू,
सर्वप्रथम मी बोका ए आझम ह्यांची परवानगी घेतली....त्यांच्याशी मूळ लेखका बरोबर झालेल्या अव्यावसायिक वापरा संबंधीची माहिती घेतली...त्या नंतर हे app त्यांना चेक करण्यासाठी पाठवले...आणि जेव्हा त्यांच्या कडून ग्रीन सिग्नल आला तेव्हा आज हे इथे प्रकाशित केले आहे.
आणि हे सगळे मी फक्त माझी आवड म्हणून करत आहे... अजून कुठल्याही मिपाकरांचे साहित्य app स्वरुपात प्रकाशित करायला मला नक्कीच आवडेल...मी वाचलेले आणि मला आवडलेले लेखन अशा स्वरुपात उपलब्ध करायला मी त्या त्या लेखकांना व्यक्तिगत संदेश पाठवत आहेच... पण जे वेळे अभावी मी वाचू शकलो नाहीये असे साहित्य जर मला व्यक्तिगत संदेश पाठवून कळवले तर ते पण मी नक्कीच app स्वरुपात प्रकाशित करीन....

आपला
टर्मीनेटर

स्रुजा's picture

3 Oct 2016 - 8:34 pm | स्रुजा

अरे वा! सहीच काम केलंत.

टर्मीनेटर's picture

3 Oct 2016 - 9:38 pm | टर्मीनेटर

धन्यवाद

शिव कन्या's picture

3 Oct 2016 - 10:27 pm | शिव कन्या

अरे वा!इतके चांगले काम केल्याबद्दल अभिनंदन!
तुम्ही टर्मीनेटर कुठले? तुम्ही तर क्रिएटर!
:-)

टर्मीनेटर's picture

3 Oct 2016 - 10:45 pm | टर्मीनेटर

धन्यवाद. आपला प्रतिसाद मनापासून आवडला. :)

धर्मराजमुटके's picture

3 Oct 2016 - 10:48 pm | धर्मराजमुटके

बोकाभाऊये रचिला पाया, टर्मिनेटर झाला रे कळस असेच या कादंबरीचे आणी अ‍ॅपचे वर्णन करावे लागेल.
अवांतर : अ‍ॅप बरेच लोकांना सोयीचे वाटते पण मला स्वतःला पीडीएफ स्वरुपातील मजकुर वाचणे जास्त सुखद वाटते. तो मोठ्या पडद्यावर वाचता येतो म्हणून.
मुळ लेखक, बोकाभाऊ यांच्या परवानगीने संपुर्ण कादंबरीचा अनुवाद एका सिंगल पीडीएफ स्वरुपात करणे शक्य आहे काय ?

राघवेंद्र's picture

3 Oct 2016 - 11:16 pm | राघवेंद्र

मोदक भाऊ कडे विचारा त्यांच्याकडे आहेत सगळ्या PDF :)

धर्मराजमुटके's picture

3 Oct 2016 - 11:28 pm | धर्मराजमुटके

मोदकभाऊ ? आम्हालाही द्या की पीडीएफ चा प्रसाद !

टर्मीनेटर's picture

4 Oct 2016 - 7:59 am | टर्मीनेटर

धन्यवाद,
आधी संपूर्ण कादंबरी PDF मध्येच convert करावी लागली, त्यानंतर app मध्ये integrate केली. मी आपल्याला pdf ची लिंक पाठवीन.

कंजूस's picture

4 Oct 2016 - 6:24 am | कंजूस

धन्यवाद!
अॅपमध्ये .TXT फाइल आहे का?
या फाइल्स एलइडी टिव्हित मोठ्या स्क्रिनवर वाचता येतात. txt फाइल जास्ती मेमरी लागते.

टर्मीनेटर's picture

4 Oct 2016 - 8:05 am | टर्मीनेटर

अॅपमध्ये .TXT फाइल नाही आहे, कारण फ़ाईल साईज खूप मोठी होते. हेच अॅप TXT फाईल वापरून 47 Mb चे होते जे Download करणे खूप जणांना नकोसे वाटू शकते.

वरुण मोहिते's picture

4 Oct 2016 - 3:03 pm | वरुण मोहिते

शेयर करीन

टर्मीनेटर's picture

4 Oct 2016 - 3:25 pm | टर्मीनेटर

धन्यवाद.