खर्डा चिकन

केडी's picture
केडी in पाककृती
30 Sep 2016 - 8:08 pm

Mirchi Kharda

साहित्य
६०० ते ७५० ग्रॅम चिकन, तुकडे करून
२ मध्यम आकाराचे कांदे, बारीक चिरून
३ ते ४ चमचे मिरचीचा खर्डा
१ चमचा जिरं
१ चमचा धने पावडर
१ चमचा मसाला
१/२ चमचा हळद
२ मोठे चमचे तेल
एका लिंबाचा रस
मीठ, चवीनुसार
आल्याचे उभे बारीक काप
बारीक चिरलेली कोथिंबीर

एकदा मित्राने हॉटेलात हि डिश खाऊन मला अवश्य खाऊन बघ, असे सुचवले. मी लगेच पार्सल आणून खाऊन बघितली आणि अर्थातच आवडली. मग थोडे प्रयोग करून घरीच करून बघितली. ह्यात वापरायचा मिरचीच्या खर्ड्याची पाककृती लवकरच टाकेन, तोवर ती इंग्रजीत इथे वाचू शकता. मी खास ह्या साठी गावरान कोंबडा आणलेला, पण ब्रॉयलर चिकनची पण छान पाककृती होते.

कृती
चिकनच्या तुकड्याना स्वच्छ धुवून कोरडे करून त्याला थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा ते एक तास मुरत ठेवा. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं कि कांदा घालून तो थोडा वेळ परतून घ्या. हळद, धने पावडर आणि निम्मा गरम मसाला घालून परतून घ्या.

ह्यात चिकनचे तुकडे घालून ते रंग बदलेस्तोवर मोठ्या आचेवर परतून घ्या. (साधारण ३ ते ५ मिनिटे). आता गॅस बारीक करून, साधारण एक ते दिड वाटी पाणी घालून, चिकन मंद आचेवर झाकण ठेऊन शिजवा. (पाणी आटून गेले तर थोडं अजून घाला).

चिकन शिजल्यावर, मिरचीचा खर्डा ह्यात घाला. चिकनला खर्डा सगळीकडून लागेल असे ढवळून उरलेला गरम मसाला घालून परत एक वाफ काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून, बारीक चिरलेल्या कोथिंबीर आणि आल्याच्या कापांनी सजवून, गरम भाकरी, कांदा आणि लिंबाच्या फोडी बरोबर वाढा!

[मिरचीचा खर्डा करताना आपण त्यात मीठ वापरतो, म्हणून मीठ शेवटी चव बघून मगच घाला. मिरच्या किती तिखट आहेत त्यावर खर्डा किती घालायचा ह्याचे प्रमाण ठरेल. हि पाककृती झटपट करायची असेल,तर चिकन आधी मिठाच्या पाण्यात उकडून घ्या, मग इतर कृती वरील प्रमाणे करून पटकन तयार करू शकता. गावरान चिकन शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे त्या प्रमाणात पाणी घाला. ह्याला रस्सा अगदीच अंगासरशी ठेवा किंवा ठेवला नाही तरी चालेल. हा पदार्थ तसा सुक्काच असतो, त्यामुळे अर्थातच "चकना" म्हणून देखील चालू शकेल]

प्रतिक्रिया

एकच फोटो न्याय देत नाही. पाककृती नेहमीप्रमाणे झकास..!!!

बाकी....

मी खास ह्या साठी गावरान कोंबडा आणलेला... सायकलवर आणला होता का..?? =))

केडी's picture

30 Sep 2016 - 8:15 pm | केडी

सायकलवर आणला होता का..??

हाहाहा..... :-)))

अरिंजय's picture

30 Sep 2016 - 11:04 pm | अरिंजय

हा हा हा हा

रच्याकने चिकन नक्कीच चविला भारी लागत असणार.

वरुण मोहिते's picture

30 Sep 2016 - 9:53 pm | वरुण मोहिते

करून नक्की पाहणार

कविता१९७८'s picture

30 Sep 2016 - 10:46 pm | कविता१९७८

मस्तच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Oct 2016 - 10:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारी दिस्ताहेत चिकन पीस.... येऊ द्या अजुन अशा रेशीप्या...!

-दिलीप बिरुटे

नूतन सावंत's picture

1 Oct 2016 - 10:19 am | नूतन सावंत

गावरान कोंबडा वापरूनच करून बघायला पाहिजे.झणझणीत पाककृती.

यशोधरा's picture

1 Oct 2016 - 10:28 am | यशोधरा

मस्त! इट, लिव्ह, कुक तुमचाच ब्लॉग आहे का?

हो माझाच आहे. गेली ३ वर्ष जमेल तसं तिथे माझे प्रयोग टाकतोय.

यशोधरा's picture

1 Oct 2016 - 12:45 pm | यशोधरा

भारीये.

सरल मान's picture

1 Oct 2016 - 12:42 pm | सरल मान

केडी सर प्लीज लिन्क द्या ना ब्लोगची.

अहो फोटोत दिली आहे लिंक
www. EatLiveCook.com

सरल मान's picture

1 Oct 2016 - 2:09 pm | सरल मान

धन्यवाद सर....

आनंदराव's picture

1 Oct 2016 - 2:19 pm | आनंदराव

खायला घाला. नुसत्या रेसिपी टाकू नका

विशाखा राऊत's picture

1 Oct 2016 - 8:25 pm | विशाखा राऊत

मस्त रेसेपी.. ब्लॉग आवडला

चिकन काही खात नाही. तुमची रेसिपी म्हणजे छान असणार म्हणून वाचून गेले!

केडी's picture

1 Oct 2016 - 11:29 pm | केडी

__/\__ धन्यवाद!

कपिलमुनी's picture

2 Oct 2016 - 2:19 am | कपिलमुनी

वाट पाहीन पण बंडिवारचेच चिकन खाईन =))

अभिजीत अवलिया's picture

2 Oct 2016 - 7:31 pm | अभिजीत अवलिया

खायला न घालता फक्त पाककृती दिल्याबद्दल जाहीर निषेध !!!

रॉजरमूर's picture

2 Oct 2016 - 9:06 pm | रॉजरमूर

रेसिपी छानच आहे .......

एअर फ्रायर च्या रेसिपी येऊ द्या अजून ती मालिका बंद करू नका फार उपयुक्त आहे .
बाकी तुमचा ब्लॉग छान आहे ....
आवडला आपल्याला .

हो टाकेन अजून एयर फ्रायर च्या पाकृ लवकरच.

एस's picture

2 Oct 2016 - 9:42 pm | एस

यम्मी!

आनंदी गोपाळ's picture

3 Oct 2016 - 1:58 pm | आनंदी गोपाळ

हे चिकन करून खाल्ल्यावरच प्रतिसाद देण्यात येईल. तोपर्यंत रुमाल टाकून ठेवतो.

हो नक्की करून बघा आणि फोटो टाका इथे!

आनंदी गोपाळ's picture

9 Oct 2016 - 3:43 pm | आनंदी गोपाळ

धागे के 2670 वाचने करने वालोऽ

या तो ये चिकन कर के खाओ, या तो डुब मरो...

केडी's picture

9 Oct 2016 - 4:41 pm | केडी

:-)))
मंडळ आभारी आहे
__/\__

सविता००१'s picture

4 Oct 2016 - 2:14 pm | सविता००१

छानच.
बाकी चिकन खात नाही म्हणून पास आमचा.

सह्च दिसते आहे चिअक्न., भारी पाकृ. आता नवरात्राचे उपवास संपल्यावर करुन बघणार नक्की.

पाककृतीत वापरलेल्या मिरची च्या खरड्याची पाककृती इथे मिळेल.

KD, बॉस, तु(म्हा)ला एक पप्पी सगळ्यात आधी. तेरे हाथ चूम लूँ!! लै जबरा चव होती चिकनची.. खल्लास.

हा खर्डा:

अन हे चिकनः

आलं किसून घातलंय. ते ज्युलियनचं नाटक करण्याइतका धीर नव्हता. शिजवतानाही थोडं घातलं होतं किसून. कोथिंबीर जरा जास्त घातली, शिजवतानाही, अन नंतरही. उरलेला ठेचा सोबत ठेवला होता, हवा तेव्हा हवा तितका मिक्स करून घ्यायला. आहाहा! दिवस सार्थकी लागला. एक भारी डिश दिल्याबद्दल धन्यवाद!

यशोधरा's picture

9 Oct 2016 - 3:47 pm | यशोधरा

आता करुन बघायलाच हवं.

क्या बात है! सर (तुम्हा)ला पण सलाम, आणि आभार, आणि अर्थातच एक पप्पी उधार!
:-)))