मिपा दुपारी 1 ते 4 मध्ये का बंद पडते ?

वाल्मिक's picture
वाल्मिक in काथ्याकूट
21 Sep 2016 - 2:20 pm
गाभा: 

ह्या आठवड्यात 3 वेळा झाले ,सादर संकेत स्थळ दुपारीच बंद पडते
ह्यावर आमच्या CID टीम काढून आलेल्या शक्यतेची यादी

1) चितळे हे मिपा चालविण्यास घेणार आहेत त्यामुळे
2) चितळे बंधू दुकानात मिसळ पाव मिळणार आहे म्हणून
3) संपादक मंडळ दुपारी वाक कुक्षी घेण्यासाठी सर्वर बंद करून ठेवतात
4) सगळे IT वाले मिपाकर जेवण करून इकडेच पडीक असतात
5) सूर्य नारायणाची कृपा

तुमचे काय मत आहे ?

प्रतिक्रिया

हो मिपा आता चितळेंनी चालवायला घेतलय.

भंगार जिलब्यांचं ओझं नको वाटत असावं.

बोल की तोंडावर यशोमैय्या.
मी बोलतो. ओ वाल्मिक राव, बास करा भुरटेपणा. लोक उगी खरडताहेत म्हणून तुम्ही पण ताळतंत्र सोडल्यासारखे करु नका. जरा विचार करा, काय लिहितोय ते.
उगी जिल्ब्या आन प्रतिसाद वाढवायचे एवढाच हेतू असेल तर फेस्बुक हाय ते चिताडा.

यशोधरा's picture

21 Sep 2016 - 3:05 pm | यशोधरा

तर काय! वैताग नुसता.

नीलमोहर's picture

21 Sep 2016 - 3:07 pm | नीलमोहर

स्वतः:च्या फोटोंचे फ्लेक्स स्वतःच छापून चौका चौकात लावणारे हिरो असतात ना, तसा प्रकार आहे सगळा,

पुंबा's picture

21 Sep 2016 - 4:14 pm | पुंबा

+१११

जव्हेरगंज's picture

21 Sep 2016 - 4:09 pm | जव्हेरगंज

ha

मज्जाय तुमची!!

का हो भाऊ, काड्या घालताय का? तुम्ही जेव्हा काही चांगले लिहिता तेव्हा हेच मिपाकर तुमचे कौतुक करतात ना? ज्या संस्थळावर आपल्या चांगल्या लिखाणाची उचित दाखल घेतली जातेय, तिथे ट्रोलिंग, फालतू धागे असू नयेत असे वाटत नाही का आपल्याला?

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2016 - 4:26 pm | टवाळ कार्टा

खिक्क...गल्ली चुक्याच

जव्हेरगंज's picture

21 Sep 2016 - 5:25 pm | जव्हेरगंज

+१
हेच म्हणतो.
लोकं आमचा निषेधसुद्धा समजुन घेत नाहीत.... :(

cc

काका, समजून घ्यायलाच विचारले हो काड्या घालताय की काय, असे. घालता आहात असे म्हटले नाही. ये पॉइंट नोट किया जाय.

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2016 - 6:05 pm | टवाळ कार्टा

काका तुम्ही

"प्रतिसाद लिहिताना माझ्या मनात आले होते की मुद्दा लक्षात न घेता आणि प्रतिसाद नीट न वाचता तूम्ही पुढचा प्रतिसाद टाकणार, तसेच झाले अगदी. :) असो. अगदीच अर्थ नाही रे तुमच्याशी चर्चा करायचा प्रयत्न करण्यात."

असे लिहू शकता इथे =))

वाल्मिक's picture

21 Sep 2016 - 6:18 pm | वाल्मिक

टका हा यशोधरा ह्यांचा ड्यू आयडी आहे का ?
दोघे सारख्याच खरडी टाकत आहेत

जव्हेरगंज's picture

21 Sep 2016 - 9:32 pm | जव्हेरगंज

अहो अंकल, आणि अहो मावशी,

स्वारी बर्का!

तुमच्या जाळ्यात मी हकनाक अडकलो.

असो अडकलोच आहे तर सांगतो,

वाल्मिक बेटा ऑन द फायर आहे, त्याच्या टुकार फुसक्या जिलब्या तुम्हाला आवडत नसतील पण मला आवडतात. सो & सो . असो.

आवड आपली आपली !!!

वाल्मिक's picture

21 Sep 2016 - 4:11 pm | वाल्मिक

मी शांत एकदम

निशब्द ,1-2 महिने

पिलीयन रायडर's picture

21 Sep 2016 - 8:46 pm | पिलीयन रायडर

अगदी मोजुन चार ओळींचे नसले तरी हे असले धागे का उडवत नाही संपादक मंडळ?

१८-१९-२०-२१ सप्टेंबर, रोज एक टाईमपास धागा येतोय. पैकी तो मराठा मोर्चाचा धागा पेटलाय. लोक दुर्लक्ष करतील, धागे खाली जातील, पण एक धोरण असायला हवे काय ते असल्या धाग्यांना.