गाभा:
नमस्कार मंडळी,
श्री. अमृत देशमुख नावाचे एक सद्गृहस्थ आहेत. ते प्रत्येक आठवड्याला एक बेस्ट सेलर पुस्तकाचा सारांश (बुकलेट) लिखित व ऑडिओ मध्ये तयार करून व्हाट्सअँपवर पाठवतात. हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. श्री. अमृत हे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून "मेक इंडिया रीड' हा उपक्रम चालवतात.
मी या उपक्रमाचा सभासद आहे व गेले 3 आठवडे त्यांच्या बुकलेटचा आस्वाद घेत आहे.
मिसळपाववरील वाचनप्रेमी मंडळींनी या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती. या साठी कृपया त्यांचा मोबाईल नंबर +919594700077 वर "Booklet' असा मेसेज पाठवा म्हणजे ते तुम्हाला त्यांच्या broadcast list मध्ये 10 ते 12 दिवसात अंतर्भूत करतील.
प्रतिक्रिया
21 Sep 2016 - 7:54 am | यशोधरा
कशा प्रकारची बेस्ट सेलर्स?
21 Sep 2016 - 11:55 pm | माधव
बेस्ट सेलर पुस्तके ही फिकशन्स असतील असे नाही. मी त्यांच्या उपक्रमात सामील झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी खालील पुस्तकांचा सारांश लिखित व ऑडिओ स्वरूपात उपलब्ध केला आहे -
1. Acres of Diamonds - Author Russell H. Conwell
2. For Her - Author Anirudh Bhardwaj
3. Talk like Ted -The 9 Public Speaking Secrets - Author Carmine गल्लो
सारांश वाचून व ऐकून पुस्तक वाचण्याची इच्छा नक्कीच होते. शेवटी प्रत्येकाची आवड वेगळी असणारच.
29 Sep 2016 - 12:49 am | अमित खोजे
मी सुद्धा त्या समूहाचा सभासद आहे. नेमक्या शब्दात त्या पुस्तकात काय लिहिले आहे ते व्यवस्थित सांगतात. हे पुस्तक परीक्षण नसते तर सारांश असतो. त्यामुळे आपल्याला पुढे पुस्तक विकत घ्यायचे आहे कि नाही तो निर्णय घेता येतो.
29 Sep 2016 - 4:22 am | बहुगुणी
माहितीबद्दल धन्यवाद!