हिरवाई

स्नेहश्री's picture
स्नेहश्री in पाककृती
26 Sep 2008 - 3:01 pm

सध्या मला डॉक्टर ने जेवणात दुधी खायला सांगितला आहे.
तर सध्या माझा दुधीवर संशोधन चालु आहे.
आजच सकाळी एक मॉकटेल दुधीपासुन केला.
खर सांगते दुधीपासुन एवढ छान मॉकटेल होवु शकत अस कधी वाटल नव्हत.
फ्रेश फ्रेश हिरवाई तुमच्यासाठी खास.
दुधी १/४ किलो साल काढुन आणि उकडुन
काकड्या २ बारीक तुकडे करुन
१५/१६ पुदिन्याची पान
४/५ मिरी
१/२ इंच आलं
काळ मीठ चवीनुसार
लिंबु रस ३/४ चमचे
सर्व एकत्र मिक्सर मध्ये गुळगळीत वाटुन घ्यायच.
मग ते सर्व पाणी घालुन सारख करुन परत मिक्सर मध्ये फिरवुन घ्यायच.
आणि मग ग्लास मध्ये घालुन थंड करुन प्यायच.
सजावटी साठी पुदिन्याची पान बारिक चिरून वर घाला
आणि काकडीचे बारीक तुकडे पण घाला पिताना मस्त लागतात.

दुधी आणि पुदिना हे ह्रुदयरोगा साठी चांगला असतो.
त्यांनी हे जरुर प्यावे. अगदी रोज सुद्धा.

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

26 Sep 2008 - 3:25 pm | आनंदयात्री

छान मॉकटेल.

स्वाती दिनेश's picture

26 Sep 2008 - 3:28 pm | स्वाती दिनेश

छान दिसतय की..सगळे पदार्थ आहेत घरात..करतेच आता आणि सांगते कसे झाले ते..
स्वाती

स्नेहश्री, कुठे वाचून केलंत की, स्वप्रयोगातून??
धन्यवाद.. दूधीचा असाही काही प्रकार होऊ शकतो हे संगितल्याबद्दल.
नक्की करून बघेन.

एक शंका : सगळं एकत्र जर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं तर मग काकड्या बारिक तुकडे का करून घ्यायच्या?? त्याचे मोठे तुकडे केले तर चालतील का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्नेहश्री's picture

27 Sep 2008 - 9:39 am | स्नेहश्री

हे काही हिरवाई चे फोटो.

http://picasaweb.google.co.in/snehashree/Hirvai#5250546351278218034

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

स्नेहश्री's picture

27 Sep 2008 - 9:57 am | स्नेहश्री

धन्यवाद.. ....ताई...!!!!

स्नेहश्री, कुठे वाचून केलंत की, स्वप्रयोगातून??
स्वप्रयोगातून. सहज सुचल आणि केल आणि खुप छान झाल.

धन्यवाद.. दूधीचा असाही काही प्रकार होऊ शकतो हे संगितल्याबद्दल.
नक्की करून बघेन.
नक्की कर आणि सांग कस झाल आहे ते.

एक शंका : सगळं एकत्र जर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं तर मग काकड्या बारिक तुकडे का करून घ्यायच्या?? त्याचे मोठे तुकडे केले तर चालतील का?

अगं ताई दूधी उकडलेला असतोना मग तो लगेच वाटला जातो आणि काकडीला वेळ लागतो . काकडीचे बारिक तुकडे केले तर तो वेळ वाचतो म्हणुन ग.अजुन काही नाही...!!!!

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 1:12 pm | विसोबा खेचर

मस्तच पाकृ! :)

दुधीचा रस खूप गुणकारी आहे असं म्हणतात...

असो, आम्ही बुधवार-शनिवार जो रस पितो तेच आमचं फिट रहण्याच औषध आहे! आम्हाला अन्य रस प्यायची गरज वाटत नाही.. :)

तात्या.

जैनाचं कार्ट's picture

27 Sep 2008 - 1:59 pm | जैनाचं कार्ट (not verified)

>>बुधवार-शनिवार जो रस पितो तेच आमचं फिट रहण्याच औषध आहे! आम्हाला अन्य रस प्यायची गरज वाटत नाही..

:D हेच म्हणतो !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2008 - 2:08 pm | प्रभाकर पेठकर

दुधी मधुमेहावरही गुणकारी आहे. ट्राय करून पाहिला पाहिजे.

चकली's picture

30 Sep 2008 - 11:24 pm | चकली

मस्त मॉकटेल .. मी सध्या दर आठवडयाला दु्धी घेतेय. दुधीची थालीपिठे पण एकदम मस्त लागतात!

चकली
http://chakali.blogspot.com

धनंजय's picture

30 Sep 2008 - 11:39 pm | धनंजय

अनायासे घरी सर्वच सामग्री आहे.