पाताळयंत्री : गूढ कथा -१

साहना's picture
साहना in काथ्याकूट
15 Sep 2016 - 7:59 am
गाभा: 

हा भाग १ आहे आणि भाग दोन सध्या लिहिणे चालू आहे. संपादन प्रक्रिया सध्या केली नसल्याने शुद्धलेखन आणि इतर त्रुटी आहेत ह्या मिपाकरांनी माफ कराव्यात. चांगल्या आणि विशेष करून वाईट प्रतरिक्रियांची वाट पाहीन. सदर कथा माझ्या परवानगी शिवाय इतरत्र टाकू नये हि विनंती. कथेंत हिंसा, व्यभिचार, इत्यादी गोष्टी विपुल प्रमाणात आहेत/असतील त्यामुळे जर आपणाला संकोच असेल तर वाचू नये.

----

शुकाच्या मनात वादळ उठले होते. भय, आश्चर्य आणि हुरहूर अश्या भावनांचे विचित्र मिश्रण त्याच्या अंगात उद्भवले होते. काही काही क्षणांनी अंगावर काटे उठत होते. अमावास्येच्या रात्रीचे तापमान इतके कमी जरी नसले तरी शुकाच्या हाडांना थंडी वाजत होती. गुरुदेव रक्तसंभव मात्र झपाझप पुढे चालत होते. शुक मागे येत आहे कि नाही हे सुद्धा त्यांच्या ध्यानात नसावे असेच कुणाला वाटले असते पण अनेक महिन्यांच्या अथक सेवे नंतर आज ते स्वतः शुकाला घेऊन स्मशानात आले होते. अमावस्या म्हणजे महवराहच्या मंदिरात बसून मौन व्रताने साधना करण्याचा दिवस पण आपले हे व्रत कदाचित तोडून ते शुकाची इच्छा पूर्ती करणार होते.

"पंगू लंघयते गिरीं" असे संस्कृत वाचन लहानपणी शुकाने घोकले होते. टाकीचे घाव पडून दगडातून सुद्धा देव निर्माण होतो हे संस्कार त्याच्यावर केले गेले होते पण प्रत्यक्षांत आपण सुद्धा काही अजब, अशक्य असे काही करू असे त्याला वाटले नव्हते पण कदाचित आज तो दिवस, नाही रात्र प्रकट झाली होती. गुरु रक्तसंभवाच्या प्रति शुकाच्या मनात आज नेहमीपेक्षा जास्त आदर निर्माण झाला होता. "गुरु रक्तसंभवना तुझ्या आदराची गरज नाही" देवी विद्याने त्याला सांगितले होते. "सूर्य आकाशांत आहे म्हणून अमी जिवंत असलो तरी आमच्या आदर किंवा अर्घ्याची गरज किंवा अपेक्षा सूर्याला नसते. हिमालयाला पाहून आमच्या सारखे तुच्छ प्राणी तोंडात बोटे घालतील पण हिमालयाला आमच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसते" देवी विद्याने त्याला पहिल्याच दिवशी सांगितले होते. जसे जसे दिवस गेले तसे तसे शुकाला त्या शब्दांचा अर्थ सुद्धा समजाला होता.

गुरु रक्तसंभव सह्याद्रीच्या कुशीतील एका निर्जन आणि कालौघात विस्मृतीत गेलेल्या एका जुनाट आणि ओसाड गावांत आपली शिष्य विद्या सोबत राहत होते. तिथे जायचा रास्ता आपल्याला कसा सापडला हेच शुकाला आठवत नव्हते. आपण का आलो फक्त हेच त्याच्या मनावर कोरले गेले होते. शुक उपस्थित झाला आणि गुरुनी चेहेऱ्यावर काहीही भाव दाखवले नाहीत. विद्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या किंवा कदाचित ते भस्माचे पट्टेही असतील. शुक इतका घाबरून गेला होता कि त्याला नक्की सगळे आठवत सुद्धा नव्हते.

वेळ संध्याकाळची होती, सूर्याचे लालसर किरण क्षितिजावर रांगोळी टाकत होते. एका भग्न घरांत गुरु रक्तसंभव उग्र मुद्रेत ध्यानस्त बसले होते. बाजूला त्यांची शिष्या श्वेत रंगाचे विद्या एकवस्त्र परिधान करून उभी होती. गुरु साक्षांत क्षितिजावरचे तप्त सूर्य वाटत होते तर त्याच्या बाजूला फुलाप्रमाणे कोमल आणि श्वेतवर्णीय विद्या चंद्रा प्रमाणे भासत होती. शुकाचा घास वाटचालीची दाटून आला होता. "गुरु देव" इतके शब्द तोंडातून येऊन त्याच्या डोळ्यापुढे अंधार दाटला होता.

जाग अली तेंव्हा के घुबड रडण्याचा आवाज येत होता. रात्र पडली होती, तो ओशाळुनच उठला आणि गुरु रक्तसंभव आणि विद्या दोघेहीस तिथे नव्हते. त्याला घेरी अली होती तर दोघांनी त्याला मदत वगैरे करण्याचा जराही प्रयत्न केला नव्हता. सह्याद्रीच्या जंगलात रात्र घालवणे त्याला इतक्या दिवसांच्या पायपिटी नंतर सोपे झाले होते पण चंद्र प्रक्षसांत तो ओसाड गाव म्हणजे जणू काही स्मशान भूमी वाटत होता. त्याला थोडी तरी भीती नक्कीच वाटली होती. तो पळत पळत गुरुदेवांना शोधू लागला. गुरुदेव कदाचित आणखीन कुठे गेले असतील तर त्यांना कसे शोधायचे ? पण गुरुदेव एका विहिरीच्या बाजूला उभे होते. विद्या विहिरीतून त्यांना पाणी कडून देत होती. वेड्याप्रमाणे शुक तिथे धावून गेला होता आणि गुरूच्या चरणी लोटांगण घातले होते.

"गुरुदेव, मला साहाय्य करा. मी वाट्टेल ते काम करण्यासाठी तयार आहे. मला दीक्षा द्या." म्हणून तो रडला होता. इतके दिवस बांधून ठेवलेला अश्रूंचा बांध खड्डकरून फुटला होता.

त्या दिवा पासून आजच्या दिवस पर्यंत खूप काही घडले होते. गुरुदेव तर किती तरी आठवडे त्याच्याशी बोलले सुद्धा नव्हते. विद्याने त्याच्याकडून हार प्रकारची कामे करून घेतली होती. पाणी विहिरीतून काढण्यापासून गुरु शिष्येचे मळलेले कपडे धुण्या पर्यंत आणि ध्यान खोलीतुन कोल्ह्याची विष्ठा साफ करण्यापासून जंगलातून लाकडे अनन्य पर्यंत सर्व काम त्याने मनोभावे आणि काहीही संकोच ना करता केले होते.

अपरिचयातून परिचयाकडे त्याचा प्रवास २ वर्षांत झाला होता. जी विद्या साध्य करायची होती त्यासाठी २० वर्षे सुद्धा थांबण्याची त्याची तयारी होती. जो अग्नी हृदयांत ठेवून तो इथे आला होता तो अग्नी दिवस रात्र त्याने जागृत ठेवला होता. तंत्र साधने साठी गुरूकडून दीक्षा जरुरी असते त्याशिवाय पर्याय नव्हता आणि जी विद्या त्याला हवी होती ती गुरुदेव रक्तसंभव सोडून पृथ्वी तलावर आणखी कुणाकडे कदाचित नव्हती.

गुरु ची पावले मंद झाली. निमुळती वाट आता जवळ जवळ गायब झाली होती. आता झाड झुडुपातून वाट शोधात ते पुढे जात होत. रात्रीच्या शांततेचा भंग करत दुरून कोल्ह्यांचा आवाज ऐकू येत होता. मधूनच कधी कधी एखादे घुबड उडताना दिसायचे. बऱ्याच वेळाने अंगभर काटेरी झाडांचे ओरखडे वगैरे आल्या नंतर गुरुदेवांना जुनाट स्मशान भूमी सापडली. कदाचित शेकडो वर्षां पूर्वी हि स्मशान भूमी वापरात होती. सह्याद्रीच्या जंगलात काय काय रहस्ये होती महवराहाच जाणे. एके काळी जिथे मोठी मोठी गवे शहरे होती तिथे आता वनदेवीचे साम्राज्य होते. राजांचे आलिशान महाल, जिथे रेशमी पडदे पसरले होते तिथे आता फक्त भग्न भिंती होत्या आणि त्यावर वेलींचे आवरण. जिथे एके काळी अनावृत्त ललनाची क्रीडा चालली होती तिथे आता माकडे खेळात होती. काळाच्या उदरात सर्व काही जाऊन गडप होते. शुकाने ह्याचा प्रथम दर्शनी अनुभव ह्याच जंगलात घेतला होता.

गुरुदेवांनी एक पायावर उभे राहून मंत्रसाधना केली. गुरुदेव जिथे उभे होते तिथे वादाचे एक विस्तृत झाड उभे होते. अमावास्येच्या काळोखांत सुद्धा ते प्रचंड झाड युद्धभूमीवरील एक काळ्याभोर हत्ती प्रमाणे वाटत होते. गुरुदेवांनी आपल्या हातातील दंड प्रचंड वेगाने फिरविला. कुणी माणसाला इतक्या वेगाने हालचाल करता शुकाने प्रथमच पहिले असेल. हातातील दंड वेगाने फिरवून गुरुदेवांनी दंड जोरांत जमिनीत गाडला. धरणी जणू काही कंप पावली असेल असा भास झाला. आजूबाजूचा सर्व झाडातून झोपलेले पक्षी वटवाघुळे अंकही काय काय कर्कश आवाज करत उडून गेले. रात्र पूर्णतः काळीं असली तरी अचानक प्रकाश पसरावा तसे वातावरण निर्माण झाले. प्रकाशाचा स्रोत कुठेच नव्हता पण तरी सुद्धा सुकाळ पूर्वीपेक्षा फारच स्पष्ट दिसत होते. स्मशानाच्या दूरच्या बाजूला एक पाण्याचा मंद झरा वाहत होता. वटवृक्षाच्या आजूबाजूलाल दगडी बांधकाम दिसत होते. प्रेते जलविण्यासाठी जागो जागी चौथर्यांचे अंश सुद्धा दिसत होते.

किमान १०-१२ प्रेते एका वेळी जाळता येऊ शकतील इतकी मोठी भूमी होती. शुकाने गुरुच्या जवळ जाऊन पायावर लोटांगण घातले. रक्तसंभव गुरूंचा चेहरा इतका वेळ उग्र वाट होता त्याची चर्या थोडी मंद झाली. गंभीर भाव जाऊन अभय भाव उत्पन्न झाला. आपल्या हातानी गुरूंनी मुद्रा करून आपले मौन तोडले.

"शिष्य शुक, तुझी इच्छा पूर्ण करण्या साठी मी तुला इथे आणले आहे. काल मी ह्याच जमिनीवर मी हाच प्रयोग पहिल्यांदा केला होता. त्या दिवसापासून आज पर्यंत तो क्षण मी अनेकदा जगलो. अग्नीच्या ज्वाळेवर ज्याप्रमाणे कीटक झेप घेतात त्या प्रमाणे मी ह्या सिद्धीवर झेप घेतली. पण कीटक तात्काळ मरून जातो मी हजारदा मेलो. जीवन आणि मृत्यू ह्यांच्या दरम्यान मी तांडव नृत्य केले. काळ जणू काही थांबून गेला आणि त्याच क्षणी जणू काही प्रचंड वेगाने सुद्धा गेला. सर्व सृष्टी जणू काही एकाच वेळी उलगडली आणि नष्ट सुद्धा झाली. युवा रक्तसंभवाला तहान होती, तहान होती शक्तीची, तंत्र विद्येची, विश्वाच्या रहस्यांची, काळाच्या उदरातील खोलीत उडी मारून सर्व काही पाहण्याची आणि मी ते सर्व काही पहिले. माझी तहान भागली नाही उलट वाढली. प्रत्येक रहस्याबरोबर आणखीन रहस्ये दिसत गेली. इंद्रजाल प्रमाणे प्रत्येक अस्तित्वाचे प्रतिबिंब प्रत्येक अस्तित्वात दिसत गेले."

गुरु रक्तसंभव भावना विरहित होते. त्यांच्या शब्दांत एक ओढ होती पण चेहरा निर्विकार होता.

"काल एक युवा अपरिपकव तांत्रिक ज्ञानाच्या गर्वांत इथे आला आणि अज्ञानाच्या अधिकाराला घाबरून पळून गेला. आज पर्यंत मी पळत आहे. समाजापासून, मृत्यूपासून मी पळत आहे. " गुरु बोलत होते पण शुकाला समजणे मुसखील होते. गुरुदेव नेहमीच कोड्यांत बोलत तर कधी अगदी विचित्र बरळत असत. कधी ना ऐकलेल्या भाषांत कधी कधी ते बोलत तर कधी काही कुणी ना पाहिलेल्या जनावरांचे वर्णन करत. देवी विद्याच्या मते गुरुदेवांना काळाचा विसर पडतो कारण ते ध्यानमग्न होऊन काळ संचार करत असतात. ह्याच लोकांत नाही तर अनेक लोकांचं त्यांचे वास्तव्य असते. गुरु जेंव्हा काल म्हणतात ह्याचा दहा हजार वर्षा मागे सुद्धा असू शकतो असे विद्याने त्याला शिकवले होते.

त्यांत आश्चर्य नव्हते. शुक स्वतः तंत्र साधना करायला लागल्या पासून त्याला काळाचा विसर पडत होता. ध्यानातून तो खोल काळोख्या दरीत पडत होता तर कधी स्वतःला उंच पर्वत शिखरावर उभा असल्याचा भास घेत होता. कधी सापांनी भरलेल्या विहिरींत तर कधी अगणित जाळून तो मरत आहे असा अनुभव घेत होता. खरे तर त्याला लहान पानापासून ज्या ज्या गोष्टींची भीत वाटत होती त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्याला येत होता. अनेकदा तर ह्या अनुभवाने त्याची अंगवस्त्रे ओली व्हायची. अश्या परिस्थितीत गुरुदेवांनी त्याला विवस्त्र करून माथ्यावरून थंड पाण्याची धार विद्याला सोडयला सांगितले होते. पाणी असते तर शुकाने सहन केले असते पण ते पाणी सुद्धा सिद्ध होते. एका एका थेंबातुन कधी कधी त्याला प्रचंड आनंदाची अनुभूती येत असे तर कधी कधी व्याकुळता. कधी कधी महासागराच्या वादळांत आपण सापडलो आहो असा भास व्हायचा तर कधी जंगली श्वापदे आपल्या मासाचे लचके काढून खात आहेत असा भास व्हायचा.

साधना कठोर होती पण गुरु रक्तसंभव फारच मोठे सिद्ध होते. महावरहाचा कदाचित पृथी तळावरील शेवटचा आणि सर्वांत अनुभवी भक्त रक्त संभव होते. त्यांच्या स्पर्शाने सुद्धा दशकांची प्रगती होऊ शकते असे देवी विद्याचे मत होते. महावारः ह्या दैवताला शुकाने पहिल्यांदाच अनुभवले होते. खूप खूप वर्षांमागे महावराह फार मोठे जागृत दैवत होते पण तो काळ गेला आणि आता नवीन देवांचा काळ उत्पन्न झाला होता. काचेवरील उछवास ज्याप्रमाणे हळू हवेंत विरून जातो तसे महवराहाचे अस्तित्व पृथीवरून दंतकथा बनून नष्ट झाले होते. पण गुरु रक्त संभव मात्र आपली तपस्या करत जिवंत होते. ते किती वर्षे जगले ह्याला हिशोब नव्हता. म्हणे ते जेंव्हा पृथीवर विहार करत होते तेंव्हा पृथीवळ दोन चंद्र होते.

आधुनिक शैव तंत्रसाधना आणि महावरहाची तंत्र साधना ह्यांत फार मोठा फरक होता. महवराहच्या साधनेत आत्म्याचे ९ बंध तोडण्याचे शिक्षण होते. संकोच, काळ, भय, स्मृती, रक्षण, वेदना, प्राण, अस्तित्व आणि सापेक्ष. गुरु रक्तसंभव ९ हि बंध तोडू शकत होते आणि शुकाची साधना ३ बंध वर बंद पडली होती. आणखीन पुढे जाण्याची पात्रता शुकात नवहती असे गुरुदेवांचे म्हणणे होते. बंध तोडण्यासाठी आपला आत्मा एकाग्र करणे जरुरीचे असते पण जीवित व्यक्तीला आपल्या आत्माचि अनुभूती नसते. त्यामुळे अनेकदा साधक आत्म्या ऐवजी मनाला केंद्रित करतात अश्या साधकांना स्मृती बंध तोंडात येत नाही. आपल्या आठवणी, पूर्व आयुष्य ह्यातून ते मुक्त होऊ शकत नाहीत. शुकाला मुक्त व्हायचे सुद्धा नव्हते कारण तो साधने साठी आला त्याचे कारण त्याच आयुष्यांतील आठवणी होत्या. त्या आठवणी शिवाय त्याला जगायची इचछा नव्हती.

गुरु रक्तसंभव बोलता बोलता थांबले. त्यांनी हाताने आपले तोंड फासले त्यांच्या तोंडातून रक्त येत होते. "गुरुदेव... " शुकाच्या तोंडातून अस्फुट उद्गार बाहेर आले. पण गुरुची चिंता कार्याची नाही हे विद्याने त्याला शिकवले होते. गुरुदेव पडून त्याची हाडे मोडलेली शुकाने बघितली होती, महिनोन महिने ना काही शरीर अस्थीपंजर होताना त्याने पहिले होते. पण त्या सर्वातून गुरुदेव सही सलामत बाहेर आले होते. पण त्या प्रत्येक क्लेशामागे काही तरी कारण असते. कुठेतरी त्यांचा आत्म्याचा एक तुकडा विरघळून गेल्या प्रमाणे जातो असे विद्याने सांगितले होते. तिच्या मते गुरुदेव कधी कधी खरोखर मारायचा प्रयत्न करतात पण काही कारणाने ते आपला विचार बदलतात.

त्यांनी कमंडलूतून हाताने पाणी काढले आणि शुकाला वराह मुद्रेत संकल्प करण्याची आज्ञा दिली. कधी ना ऐकलेली नावे गुरूंनी घेतली. कदाचित नदीची नवे असावीत वा ग्रहांची काही सांगता येत नव्हते.

"भद्र शुक, तुझ्या इच्छे प्रमाणे "प्रकटीकरण" विद्या मी तुला दान करत आहे. शेकडो वर्षांत ह्या विद्येच्या वापराने पृथ्वी अमंगल झाली नव्हती पण ती आता होत आहे. प्रत्येक अस्तित्वाला सुरवात आणि अंत दोन्ही असते. दोन्ही गोष्टीत मह्त्वाचया आहेत. अनादी अनंत असे काही नाही. पण प्रकटीकरण विद्या हिचे अस्तित्व कुणी साधकाने फार जुन्या काळी शोधून काढले. हि विद्या अमंगल आहे, अस्तित्वाचा समतोल बिघडवणारी आहे. किमान सहा बंध विमुक्त केल्याशिवाय ह्या विद्येचा योग्य पद्धतीने वापर करता येऊ शकत नाही. किमान ३ बंद तोडल्याशिवाय वापराच करता येत नाही. तू वापर करू शकतोस पण योग्य प्रकारे नाही. पण काळाच्या पृष्ठभागावर हि ओळ अंकित केली गेली आहे कि रक्तसंभव तुला हि विद्या दान करेल . इतका अधिकार तो साधनेने प्राप्त केला आहेस. तुझ्या हृदयातील अग्नी मी पाहू शकतो. पाहिजे तर नष्ट सुद्धा करू शकतो पण मी करणार नाही. काळाच्या प्रवाहात बदल करणे मी सोडून दिलेय."

शुकाच्या हृदयांत धडकी भरली. गुरु रक्तसंभव त्रिकाल ज्ञानी होते असे विद्या सांगत होते. गुरुदेवांना भूत,भविष्य,वर्तमान,विचार,प्रवृत्ती सर्व काही समजत आणि त्यात कुहराळी बदल ते घडवून आणू शकतात. हे ऐकून प्रकटीकरण विद्या आपल्याला कशा साठी हवी आहे हे त्यांना समजले तर हि भीती त्याला नेहमी वाटायची पण गुरुदेवांना त्याचा काही फरक पडत नाही असे विद्या सागंत आहे. ज्या प्रमाणे सूर्याला पृथ्वीवर काय चालले आहे ह्याचे सोयर सुतक नसते त्याच प्रमाणे ठाऊक असले तरी गुरुदेवन काहीही फरक पडत नाही.

पण आज पहिल्यांदा प्रकटीकरण विद्येच्या उपयोगा बद्दल गुरुदेव बोलत होते. शुकाच्या ध्येयाची ज्योत हृदयांत धडधडत होती पण गुरुदेवांची प्रखर दृष्टीच्या एका क्षेपात त्याला जणू काही साऱ्या गोष्टीचे विस्मरण झाले पण एकाच क्षण.

गुरुदेवांनी पुन्हा आपल्या हाताची मुद्रा केली. शुकाने मुद्रा तात्काळ ओळखली आणि गुरुदेव सोबत तो हि ओरडला "संकोच विमुक्त". त्याच क्षणी त्याला आपल्या शरीराचा विसर पडल्या सारखे झाले. तो एका तटस्थ नजरेने आता स्वतःच्या शरीराकडे पाहू शकत होता. "काळ विमुक्त" पुढील बंध सुद्धा त्याने तोडला. अचानक आजूबाजूची परिस्थिती बदलल्या सारखी अवस्था झाली. तो वृक्ष, स्म्शान भूमी, सह्याद्रीचे जंगल सर्व काही नष्ट झाले होते. चोहो बाजूला फक्त वैराण जमीन होती. पाणी नसल्याने जमीन दुभंगून गेली होती. गुरु रक्तसंभव अचानक कृश झाले होते. त्यांचे शरीर जणू वाऱ्यावर उडून जाईल असे वाटत होते किना त्या भयानक गर्मीत वितळून जाईल असे वाटत होते. "भय विमुक्त" त्याक्षणी शुकाला एक चैतन्याची भावना मनात आली वैरण जमीन आणि हिरवीगार वनराई ह्यातील फरक त्याला आता जाणवत नव्हता. पण शुकाचे शारिक हलके वाटत होते. आपलय शरीरावर त्याचा ताबा राहिला नव्हता.

गुरुदेव रक्तसंभवानी आपले पुढील बंध तोडले. पण शुकाला आणखीन काही जाणवले नाही. रक्तसंभव हळू हळू चालत शुकाजवळ आले त्यांचा दंड अजून जमिनीत गाडला गेलेला होता. गुरुदेवांच्या हातात एक कृष्णवर्णीय खंजीर होता. जणू काही आसुरी शक्तीने निर्माण केला असावा असा त्याचा आकार आणि रंग होता. रक्तसंभवानी सर्वप्रथम आपल्या डाव्या हातावर खोल घाव घातला. रक्ताचे थेम्ब माणका प्रमाणे जमिनीवर ओघळले. लाल रंगांचे रक्त कृष्णवर्णीय भूमीवर सिंचन करते झाले. जमीन हादरते आहे असा भास शुकाला झाला. शुक अजून हालचाल करण्याच्या परिस्थितीत नव्हता, हलके आणि चैतन्यमयी शरीर घेऊन आपण तटस्थ पाणे पाहत आहोत असेल त्याला वाटत होते.

पुढच्याच क्षणी गुरु रक्तसंभवानी तोच खंजीर चपळतेने शुकाच्या पोटांत घुसवला. शुकाला जराही भीती वाटली नाही पण शरीरात वेदना भरून गेली, पोटांतील रक्ताची प्रत्येक नास घावणे तुटत गेली हे त्याला जाणवले, कदाचित आतड्यांवर घाव पडले होते आणि टोक मूत्रपिंडाला भोक पडत होते. गरम रक्त नावातून सांगून आतील मासपेशींवर पसरत होते ह्याची जाणीव त्याला झाली वेदना असह्य होत्या पण त्याच क्षणी काहीही हालचाल करण्यापासून त्याला त्याचेच शरिर रोखत होते.

तंत्रसाधनेत ह्या अनुभवांची त्याला सवय झाली होती. वेदना बंध जो पर्यंत तोडता येत नाही तो पर्यंत वराही तांत्रिक साधनेत वेदनांपासून आपण अलिप्त राहू शकत नाही. सिद्धी जितकी महान तितक्या वेदना जास्त.

रक्तसंभवानी शुकाचे रक्त आपल्या हातावर घेतले. दोघांचे रक्त मिश्रित होऊन त्यांचा डावा हाथ लालभडक झाला होता. ग्लानीतुन शुकाला तो लाल रंग आणखीन बोचत होता. आपल्या हाताने रक्तसंभवानी जमिनीवर काही चिन्हे निर्माण केली. रक्ताची चिन्हे वराह तंत्रात फार शक्तिशाली असतात. आपले रक्त वापरून आपण भूत प्रेत पिशाचच आणि इतर शक्तीशी करार करू शकतो. रक्तात भूलोक आणि इतर लोकात संपर्क करण्याची शक्ती असते. रक्त वापरून चिन्हे निर्माण करून आपण विविध सिद्धी आकाराशीत करू शकतो हे सामान्य ज्ञान शुकाला होते. पण अजून त्याने त्याचा विशेष प्रयोग केला नव्हता. रक्तचिन्हे वापरून हवामान आणि जंगली श्वापद पासून रक्षण करणे इतकीच विद्या त्याला अवगत होती.

चिन्हे निर्माण झाल्यावर गुरुदेवांनी शुकाला आपल्या हाताचा पंजा चिन्हावर टेकवायला सांगितला. शुकाने आज्ञेचे पालन केले. भोकसलेल्या पोटांतून अजून वेदनांचा महापूर निघत होता. "प्रकटीकरण" असे गुरुदेव मोठ्याने ओरडले आणि शुकाने सुद्धा त्यांचा आवाजांत आपला कृश आवाज मिळविला. नक्की अपेक्षा काय ठेवायची हे शुकाला ठाऊक नव्हते. प्रकटीकरण विद्या त्याला हवी होती. ह्या विद्येने पुरातन असे अतृप्त आणि अशांत आत्मे भूतलावर आणून वश केले जाऊ शकतात हे त्याला माहिती होते. आपल्या ध्येयपुर्तीसाठी हि एकाच विद्या कामाला आली असती. मानवी आत्मे वंशांत करण्यासाठी अनेक तांत्रिक उपलब्ध असतात पण अतिमानवीय किंवा असुरी दैवी आत्मे बोलावू शकणारे सिध्दपुरुष भूतलावर फारच कमी होते. पुन्हा एकदा मला गुरु रक्तसंभवाकडे कोणी पाठवले हा विचार करण्याचा प्रयत्न शुकानें केला पण त्याला आठवले नाही.

"प्रकटीकरण" आवाहनानंतर काही क्षण काहीही झाले नाही. त्या नंतर हवेंत एक विचित्र वास पसरला, वातावरणात धुके पसरले आणि आणि पुढील जमिनीतून एक प्रचंड सावली बाहेर आली. शुक श्वास रोखून पाहत होता. काळी सावळी हाळी हळू वर येत होती आणि वास आणखीन उग्र होत होता आणि शुकाच्या पोटांतून कळा येत होत्या.

शुकाने जळणीपूर्वक सावलीत काही आकार शोधण्याचा प्रयत्न केला. हळू हळू सावळी हवेत विरून शुकाला प्रकट झालेला आत्मा दिसला. खरे तर जमिनीतून फक्त एक प्रचंड मोठा चेहरा बाहेर आला होता. गडद लाल आणि काळ्या रंगाच्या छबीतून एक पुरुषी चेहरा वाटत होता. चेहेऱ्याला दोन शिंगे होती. असुरा प्रमाणे नसून मोठ्या हरणाला जशी असतात तशी अत्यंत सम्यक अशी शिंगे. शिंगांचा रंग लाल होता कि त्याच्या वरून रक्त ओघळत होते शुक सांगू शकला नसता.

"गुरा, रुद्र, कर्कशीं, डीमां अशी अनेक नवे असलेला हा आत्मा आहे भद्र शुक. लाखो वर्षां पासून ह्या पृथ्वीवर आणि कुठे कुठे हा फिरला आहे आणि आता कुठल्या तरी पाताळातून तुझ्या साठी वर आला आहे. तुज्या रक्ताने मी त्याच्याशी करार बांधला आहे. जो पर्यंत तुज्या रक्तात जीव आहे तो पर्यंत त्याची १०० टक्के स्वामी भक्ती तुझ्या कडे असेल. हि विद्या सर्वाना जमत नाही आणि कुणालाच फळत नाही. गुरु म्हणून सांगणे कर्तव्य आहे कि ह्या रुद्राचा वापर काळजी पूर्वक कर." गुरु रक्तसंभवानी पुन्हा हाताच्या मुद्रा बदलीत शुकाला सांगितले.

"आमचा प्रवास इथे संपतो" हे शब्द शुकाच्या कानावर पडले.

शुक एक पावूल पुढे गेला. त्याच्या समोर तो प्रचंड चेहरा उभा होता. त्याची उंची इतकी होती कि नजर मिळविण्यासाठी त्याला नजर वर करावी लागली. शुकाने वर पहिले त्या रुद्राने शुकाकडे नजर वळवली. एखाद्या खोल दरीत आपण झुकून पाहावे आणि त्याची खोली पाहून पोटांत खड्डा पडावा अशी जाणीव सुकाळ झाली आणि त्याच वेळी आपण सोडलेला भय बंद कमकुवत झाला आहे हि जाणीव झाली. आणखीन वेळ गेला तर कदाचित आपला मृत्यू होईल ह्या विचाराने शुकाने हस्तमुद्रा करत जमिनीवर हात लावला. पुन्हा काळ्या सावलीच्या आवरणात तो चेहरा गुप्त झाला.

Image

सुकाळ शुद्ध अली तेंव्हा शुक वटवृक्षाच्या खाली होता. गुरु रक्तसंभव निघून गेले होते आणि कदाचित अनेक तास निघून सूर्य मध्यावर आला होता. ते पुराणकालीन स्मशानात काही हरणे मुक्त पणे चरत होती. शुकाने हालचाल केली आणि एका हरणाने आपलय डोळ्यांनी शुकाकडे कटाक्ष टाकला. त्याची शिंगे पाहून शुकाला रात्रीची घटना आठवली.
त्याचा उद्धेश सफल झाला होता. रक्तसंभव आणि विद्यांची आठवण त्याला होणार होती पण तो इंद्रा गुरु आणि ती साक्षांत सरस्वती सामान विद्या पृथ्वीच्या कुठल्या भागांत निघून गेली असेल सांगता येणे शक्य नव्हते.

शुकाने आपल्या पोटाकडे पहिले. तिथे काहीही घावाचे निशाण नव्हते. त्याच्या अंगात पूर्वी सारखीच शक्ती होती. आपलय ध्येय पूर्तीच्या फार जवळ तो आला होता.

एखादा अडाणी शेतकरी बायका मुलां सहित शेती करत राहतो. एक दिवस युद्ध होते आणि सैनिक गावातून जातात. काही जण त्याचे धान्य ओढून नेतात तर काही जण त्याच्या बायको मुलीला अंगाखाली घेतात. बिचारा शेतकरी प्रतिकार करू शकत नाही. काही जण तो अपमान आणि विटंबना सहन करून राहतात पण कधी कधी सहनशीलतेचा अंत होतो. तो शेतकरी बंड पुकारतो, विरोधी सैनिकांना जाऊन भेटतो. त्याला सुद्धा एखादी जुनाट तलवार दिली जाते. ज्या बायका मुलांच्या प्रेमापोटी तो हे पाऊल उचलतो त्यांनाच सोडून तो युद्धावर जातो. लहान पाणी शूर सरदारांच्या कथा ऐकल्या असतात पण प्रत्यक्ष युद्ध भूमीवर पोटांत अन्न नसताना, डोळ्यावर झोप नसताना त्याचा सरदार त्याला पुढे ढकलतो. त्याचे काही दिवसांचे मित्र कापले जातात, कधी कधी त्याला इजा होते. आपण कुठे लढलो, कुणासाठी लढलो हेच समजत नाही. मढ्याच्या अंगावरून वस्त्र आणि चिलखत तो चोरतो, भुकेने विव्हळून वाटेवर कुना गरीब शेतकऱ्याचे धान्य चोरतो आणि कधी कधी दारूच्या नशेतून त्याच्या मुलीला सुद्धा ओढतो. तो ओरडते, आक्रंदत असते, तिचा चेहरा, त्या विनवण्या कधी कधी ओळखीच्या वाटतात पण नक्की काही आठवत नाही.

माणूस का जन्माला येताना वाईट म्हणून येतो ? त्या सैनिकाने आपल्या बायका मुलांना हात लावला नसता तर आज ह्या मुलीला आपण हात लावला असता का ? चूक कुणाची ? मी दुर्बल आहे म्हणून माझी ? युद्धाला सैनिकांना नेणाऱ्या राजाची ? सैनिकांची कि जन्माचे रहाट गाडगे हे असेच असते ?

शुक चालत चालत विचार करत होता. सह्याद्रीचे अनेक कडे कपारी त्याला चालून जायचे होते. अनेक नद्या त्याला पार करायच्या होत्या. आपल्या जीवनाच्या सत्यावर विचार मंथन करायला आणखी कधी वेळ भेटेल ? आपण काय करणार हे त्याने खूप आधीच ठरवले होते. पण आपण करतो ते बरोबर कि वाईट हे ठरविण्यासाठी मात्र त्याला आताच वेळ मिळाला होता.

ह्या जंगलात त्याचे काय बरे काम होते ? इतरांप्रमाणे त्याची सुद्धा सामान्य स्वप्ने होती. तंत्र मंत्र त्याच्यासाठी नव्हते, त्याला कॉलेज मध्ये जायचे होते. आईबरोबर राहायचे होते. शिकून तिला चांगले दिवस दाखवायचे होते. रस्त्याच्या कडेला डोंबारी लोक जादू दाखवत ते पाहून तो थक्क होत होता. कुणी त्याला तू अगम्य विध्येच्या शोधांत फिरशील असे सांगितले असते तर त्याने त्या व्यक्तीला मूर्खांत काढले असते. पण कदाचित त्या शेतकऱ्याला सुद्धा कुणी तू हातांत तलवार घेऊन युद्ध भूमीवर जाशील असे सांगितले असते तर खरे वाटले नसते. पण अतिशय सामान्य पापभीरु माणसाच्या मनाला सुद्धा सीमा असतात, त्यावर ताण पडला कि तो माणूस तुटतो. कधी कधी मोत्यांच्या माळे प्रमाणे विखरून नामशेष होऊन जातो तर कधी ज्वालामुखी प्रमाणे उद्रेक करून जातो. शुक सुद्धा तुटला होता. लहानपणी त्याला पाण्यात कागदी नवा सोडायला फार आवडायचे. कधी कधी आपण सुद्धा एका होड्यावर स्वर होऊन अथांग सागराच्या कुशीत जाऊ असे त्याला वाटायचे पण त्या कागदी होड्या नेहमीच कागदाने मऊ होऊन बुडायच्या. कागदाची ती होडी पाण्यात विरघळून लुप्त व्हायची आणि आपले स्वप्न सुद्धा त्याच प्रमाणे विलुप्त होत आहे असे त्याला वाटायचे. आज त्याची विद्या सिद्ध झाली होती ४ वर्षा पासून तो जे शोधात होता ते भेटले होते पण त्याच्या त्या ध्येयाची होडी पाण्यावर तरंगत होती, काही काळ जाईल आणि कदाचित ती विरून जाईल." हे सगळे संपेल तेंव्हा मन रॆकमी रिकामी होईल आणि त्यावेळी मी काय करून बरे ?" शुकाच्या मनात विचार आला.

अनेक दिवस रात्र वाटचाल करून तो शेवट मानव वस्तीच्या जवळ आला होता. पायाच्या साली निघाल्या होत्या आणि पोटांत कावळे ओरडत होते. शरीराला दुर्गंध येत होती. आणि तश्यांत त्याला एस टी येताना दिसली. तो लाल रंगाचा ओबड धोबड डबा त्याहून बेढब हालचालीने जावळ येत होता. धुराळ्यातील त्यावरील पती दिसत नव्हती पण बस जवळ येतंच तिने करकचून ब्रेक मारला. "कुठे जाणार संन्यासी साहेब ? " आतून चालकाने विचारले. "मुंबई" म्हणून शुक आंत चढला.

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

15 Sep 2016 - 10:09 am | जव्हेरगंज

लेखनशैली आवडली!!
सुंदर!

विशेष करून वाईट प्रतरिक्रियांची वाट पाहीन.

घ्या मग,

हे नक्की काय चालू आहे?
लिखाण विस्कळीत आहे.
कथा पकड घेत नाही.

हि कथा कितीतरी चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकाल.

असो पुभाप्र.

धन्यवाद, वाचकांचे "पहिले इम्प्रेशन" आणि त्यातल्या त्यांत टीका मिळावी हा हेतू होता. आपण दिलेला प्रतिसाद बहुतेक लोकां कडून मिळाला. "लिखाण विस्कळीत असल्याने कथेची पकड राहत नाही" हाच प्रतिसाद बहुतेक लोकांनी दिला आहे.

अगदी झकास... आवडीने वाचत आहे...
घरातील सर्वचजणांना आवडली ही कथा... पुढील भाग लवकर टाका...

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 3:55 pm | पगला गजोधर

कथामालिकेचे पोटेन्शिअल

लेखा मधे चित्रे टाकता आली तर पहा ...

बापू नारू's picture

15 Sep 2016 - 4:03 pm | बापू नारू

छान जमलाय हा भाग ,लवकर पुढचा भाग येऊद्या

सिरुसेरि's picture

15 Sep 2016 - 6:43 pm | सिरुसेरि

थरारक . "खुनी कंकाल" ची आठवण आली .

प्रकाशित करण्याची घाई न करता दुरुस्त्या करुन, पुन्हा वाचून मग येऊद्या. वाचक म्हणून तुमचं तुम्हालाच आवडलंय का? हे बघा.

पुलेशु.

आणखीन २-३ द वाचून कथा सुधारली तर फार चांगली होईल ह्यांत शंका नाही पण "प्रथम संस्करण" मुद्दाम हुन टाकले आहे जेणे करून माझ्या लेखनात प्रथम दर्शनीच काय त्रुटी आहेत हे इथे उपलब्ध राहील. कधी कधी मला स्वतःला बरोबर वाटले नाही म्हणून मी काही भाग काढून टाकते पण नंतर कदाचित वाचकांना आवडले असते असे सुद्धा वाटते. म्हणून काहीही बदल ना करता कथा टाकली आहे.

बोका-ए-आझम's picture

15 Sep 2016 - 7:12 pm | बोका-ए-आझम

हे काथ्याकूट मध्ये का टाकलंय तुम्ही? ही तर कथा आहे ना?

diggi12's picture

12 Feb 2022 - 5:34 pm | diggi12

पुढचा भाग आहे का ?