देवनागरी सुलेखन

धनंजय's picture
धनंजय in कलादालन
26 Sep 2008 - 12:37 am

येथे काही कॅलिग्राफीचे नमुने देत आहे.

हा अष्टाध्यायीचा सुरुवातीचा भाग.
aShTAdhyAyI
हा लिहिताना मला माहीत नव्हते की देवनागरी लिपी लिहिताना बोरूचा कोन रोमन लिपीपेक्षा वेगळा असतो. (ज्यांना कळते त्यांना काही अक्षरे लिहिताना उडालेली त्रेधा आणि त्यांच्यातला बेढबपणा जाणवेल - गंमत वाटली म्हणजे झाले...)

हा धातुपाठातला एक धातू. संस्कृत स्तोत्रे शिकलेल्यांसाठी हा तसा कुप्रसिद्ध आहे.
kR
आपली मजा...

रेखाटन

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

26 Sep 2008 - 12:56 am | प्रियाली

तुमचं अक्षर सुरेख आहे पण माझं तुमच्याहून सुरेख आहे. कळफलक बडवायला लागल्यापासून युनिकोड फाँट हेच माझे हस्ताक्षर. ;) ह. घ्या.

देवनागरी नेहमी लिहिली जात नसताना (असा माझा ग्रह) तुम्ही वळण राखले आहे हे खरेच उत्तम.

इथे बोरू आणि शाई कुठे मिळते? देवनागरी लिहिण्यासाठी बोरूचा कोन तासलात का ब्लेडने? तो कसा असावा त्याचा फोटो चढवता येईल का?

भडकमकर मास्तर's picture

26 Sep 2008 - 1:36 am | भडकमकर मास्तर

देवनागरी लिहिण्यासाठी बोरूचा कोन तासलात का ब्लेडने? तो कसा असावा त्याचा फोटो चढवता येईल का?

खरंच हेच विचारणार होतो, जरूर फोटो टाका धनंजय..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

धनंजय's picture

26 Sep 2008 - 2:08 am | धनंजय

मी बोरू पूर्वी बनवला आहे, पण वरील नमुन्यांमध्ये वापरलेला नाही.

बोरू कडक वेत (रीड) क्राफ्टच्या चाकूने कापून/तासून बनवत असे. पण वापरताना तो फार लवकर बोथट व्हायचा (बहुधा योग्य प्रकारच्या वेताच्या काड्या वाकड्या अंगणात वाढत नसाव्यात), म्हणून कंटाळून मी तो प्रयोग बंद केला.

वरील नमुने रोमन पद्धतीने कापलेल्या (तयार विकत घेतलेल्या) निबने काढलेले आहेत. आता मी देवनागरी निबही मिळवली आहे - दोन्ही प्रकारच्या निबचे फोटो इथे डकवतो.

भारतातून शाई आणली होती, पण ती शालेय शाई होती, पर्मनंट नव्हती. दोनतीन वर्षांत अक्षरे फिक्की पडली. साधारणपणे आर्टिस्ट सप्लाय दुकानातून शाई आणतो. (वरील नमुन्यांतली शाई अशीच. दुसर्‍या नमुन्यातली शाई कॅलिग्राफी सेटबरोबर फुकट मिळाली होती.) त्याच दुकानांत उगाळायची शाईची काडी आणि सहाणही मिळते. ही काडी काजळाची असते, त्यामुळे एकदम पर्मनंट असते. ही शाई मी फक्त कुंचल्याने लिहिण्यासाठी वापरली आहे. (निबमध्ये साकळली तर नीब बाद होईल, असा चिक्कू विचार.)

ऋषिकेश's picture

26 Sep 2008 - 12:37 pm | ऋषिकेश

अतिशय सुंदर हस्ताक्षर चित्रे.. खूप आवडली

बोरू बद्दल इथे वाचता येईल (तिथे लेखा पेक्षा प्रतिक्रियांमधे बरीच माहिती आहे म्हणा :) )

-(या अक्षरापुढे कोंबडीच्या पायांसारखं अक्षर असणारा) ऋषिकेश

नीलकांत's picture

26 Sep 2008 - 1:01 am | नीलकांत

हे सुलेखन तर खुपच सुंदर झालेलं आहे.

असेच आणि असतील तर येऊ द्या ना !

मिसळपाव वर आणि कुणी सुलेखन करतं का?

नीलकांत

चित्रा's picture

26 Sep 2008 - 2:20 am | चित्रा

तुम्ही नेमकं काय काय करता?

अगदी माझ्या मनातले विचारलेत.

सुलेखन छान. (खरोखरच "सु"लेखन आहे.)
तुमचे पाहून आता पुण्याहून नक्की नीब मागवणार! :-)

बाकी त्या पाठाचा अर्थ काही कळला नाही.

विकि's picture

30 Sep 2008 - 12:08 am | विकि

सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युतपालव यांचे संकेतस्थळ http://achyutpalav.com/wallpaper.htm येथे पाहू शकतोस.

बेसनलाडू's picture

26 Sep 2008 - 1:43 am | बेसनलाडू

(हस्ताक्षरप्रेमी)बेसनलाडू

नंदन's picture

26 Sep 2008 - 2:00 am | नंदन

देवनागरी सुलेखन सुरेख आहे, अतिशय आवडले.

अप्पा बळवंत चौकातील त्रिमूर्ती ट्रेडर्स या दुकानात हे बोरू मिळतात. धनंजयांकडून माहिती घेऊन मी ते आणले खरे, पण अजून काही प्रयोगाला मुहूर्त सापडलेला नाही :(.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

26 Sep 2008 - 2:15 am | चतुरंग

वाटोळे सरळे मोकळे। वोतले मसीचे काळे।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळे। मुक्तमाला जैशा।।

अक्षरमात्र तितुके नीट। नेमस्त पैस काने नीट।
आडव्या मात्रा त्याहि नीट। आर्कुली वेलांट्या।।

पहिले अक्षर जे काढीले। ग्रंथ संपे तो पहात गेले।
येका टाकेचि लिहिले। ऐसे वाटे।।

ह्या समर्थ सूचना आठवल्या!

"सुंदर हस्ताक्षर हा दागिना आहे!" हा सुविचार आता कळफलक बडवून लिहावा लागतो हा दैवदुर्विलास!
कागदावर बोरु टेकवून जमाना झाला, आता तर कधीमधी पत्र लिहिताना मराठी अक्षरांची वळणेच आठवत नाहीत अशी परिस्थिती येते.

(खुद के साथ बातां : रंग्या, लेका बघ, धन्याशेठ डॉक्टर असूनही त्याचे हस्ताक्षर कसे मोत्यासारखे आहे! ;) तुला संपूर्ण बाराखडी आठवते का रे? चल बघू 'ज्ञ' आणि 'ऋ' काढून दाखव! :T )

चतुरंग

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 2:57 am | लिखाळ

छान प्रतिसाद

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Sep 2008 - 8:47 am | llपुण्याचे पेशवेll

रंग्या, लेका बघ, धन्याशेठ डॉक्टर असूनही त्याचे हस्ताक्षर कसे मोत्यासारखे आहे!
अगदी खरे बोललात रंगाशेठ.हे तर जगातले ८वे आश्चर्य म्हणजे डॉक्टर असूनही त्यांचे अक्षर केमिस्ट सोडून इतरानाही वाचता येते. :) कदाचित प्रॅक्टीसींग डॉक्टर नसल्याचा फायदा म्हणावा का हा?
पुण्याचे पेशवे

बेसनलाडू's picture

26 Sep 2008 - 2:34 am | बेसनलाडू

या प्रसिद्ध गीतमालिकेतील 'श्रावणमासी' या भागाअंतर्गत वैशाली सामंत यांनी 'असा बेभान हा वारा...' हे गाणे म्हटले तेव्हा मंचावरच संतोष क्षीरसागर यांनी त्या गीताचे बोल घेऊन देवनागरी सुलेखनाचे काही नमुने पेश केले होते, त्याची यानिमित्ताने आठवण झाली. त्यात बोरूबरोबरच (की बोरू नव्हता? बहुधा नसावा) साधे पेन्ट ब्रशचे फलकारे मारून सुलेखन केले गेले होते.
(स्मरणशील)बेसनलाडू
या कारागिरीचे यू ट्यूबवरील चित्रण येथे पाहता येईल.
(दुवादार)बेसनलाडू

टग्या's picture

26 Sep 2008 - 3:06 am | टग्या (not verified)

मला वाटतं त्या कार्यक्रमात (किमानपक्षी मी जी त्याची डीव्हीडी आवृत्ती पाहिली त्यात) जवळपास सगळ्याच (किंवा बर्‍याच) गाण्यांच्या बोलांचं सुलेखन केलं होतं. मला तरी तो प्रकार फारसा झेपला नाही. म्हणजे, स्टेजवर गायलं जात असलेलं गाणं घ्यायचं, त्यातले काही रँडम कीवर्डस रंगवायचे. मला तरी त्यात काही विशेष इंप्रेसिव्ह असं, त्यातून काही भाव वगैरे पेश होतात वगैरे असं काहीही वाटलं नाही. उलट स्टेजवर गायल्या जात असलेल्या गाण्यापासून डिस्ट्रॅक्शन!

असो. ज्याचं त्याचं मत.

बेसनलाडू's picture

26 Sep 2008 - 3:11 am | बेसनलाडू

मुळात मला ते सगळेच जे चालले होते ते आवडले असे माझ्या वरील प्रतिसादातून वाटले असल्यास क्षमस्व; मला काही प्रकार झेपले नाहीत, पण काही नक्कीच आवडले. जसे 'जटा पिंजून या लाटा' चे सुलेखन आवडले, पण निळ्या रंगात जे बटबटीत स्वरूपात लिहिले गेले, ते झेपले नाही. याबाबत धनंजयांना खरड केली आणि दुवा दिला. त्या खरडीला त्यांनी दिलेल्या उत्तरातील लॅक ऑफ प्लॅनिंगसह बोल भराभर सुलेखित करायचा मुद्दा पटण्यासारखा वाटला.
त्याच कार्यक्रमात बेला शेंडेंच्या 'ये रे घना...' गाण्यासमयी फडके का कुणीतरी शिल्पकाराने आकारलेले शिल्प तर मला ओ की ठो कळले नाही.
गाण्यापासून डिस्ट्रॅक्शन - तसेही सामंतताई आणि शेंडेताईंना त्यांच्या वाद्यवृंदासह पूर्ण गाणे बघणे हे सुद्धा 'गाण्या'पासून डिस्ट्रॅक्शनच वाटते/ले मला
(सुस्पष्ट)बेसनलाडू

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 3:22 am | लिखाळ

सहमत आहे.

http://www.youtube.com/watch?v=aYd75dJ9o7I&feature=related
या प्रमाणे काही असावे अशी कल्पना असेल असे वाटले. प्रयोग म्हणून नक्षत्रांचे देणेमधला तो भाग ठीकआहे.
--लिखाळ.

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 2:56 am | लिखाळ

फार उत्तम नमुने.
तुम्ही नक्की काय काय करता हा प्रश्न नीलकांताप्रमाणे मलाही पडला.
डॉक्टरचे अक्षर इतके सुंदर..कमाल आहे :)

>>(बहुधा योग्य प्रकारच्या वेताच्या काड्या वाकड्या अंगणात वाढत नसाव्या>>
:) मस्त !

--लिखाळ.
आमच्या हातातली पेने आणि आमच्या वह्या वाकड्या दुकानातल्या असल्याने आमचे लिखाण आम्ही केमिस्ट कडुनच वाचून घेतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Sep 2008 - 10:05 am | बिपिन कार्यकर्ते

सुंदर....

धनंजय, तुम्ही खूपच छान सुलेखन करता हो... मस्तच. बाकी डॉक्टरचे अक्षर इतके छान!!!! बाकीचे डॉक्टर काही बोलत नाहीत तुम्हाला? ;)

बिपिन.

सुनील's picture

26 Sep 2008 - 10:12 am | सुनील

सुलेखन सुरेखच!

अरे सुनील, तुझे अक्षर की कोंबडीचे पाय, असे आमचे शिक्षक विचारीत असत! असो.

अवांतर - रोमन कॅलिग्राफीच्या मानाने देवनागरी कॅलिग्राफी तशी दुर्लक्षीतच. पण आता मुंबईत झालेल्या देवनागरी पाट्यांच्या सक्तीमुळे देवनागरी सुलेखनाला संजीवनी मिळेल?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसुनाना's picture

26 Sep 2008 - 10:45 am | विसुनाना

कॅलीग्राफी आवडली.
कॅलीग्राफीसाठी वापरले जाणारे टाक/बोरू , शाया (शाईचे अनेकवचन?), वेगवेगळ्या पद्धती (रोमन, देवनागरी, चिनी) असे माहितीप्रद लेखन वाचायला आवडेल.

स्वाती दिनेश's picture

26 Sep 2008 - 12:24 pm | स्वाती दिनेश

सुलेखन सुरेख !
वरील सर्वांप्रमाणेच हा धनंजय अजून काय काय करतो? हा प्रश्न कौतुकाने विचारावासा वाटतो आहे,:)
स्वाती

प्राजु's picture

29 Sep 2008 - 11:48 pm | प्राजु

स्वातीताई आणि इतरांप्रमाणे मी ही कन्फूज्ड आहे... तुम्ही नक्की काय कात करता?
सुलेखन अप्रतिम आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 1:12 pm | विसोबा खेचर

धन्याशेठ, तुझी कॅलिग्राफीही लै भारी रे! :)

तात्या.

शशिकांत ओक's picture

29 Sep 2008 - 10:12 pm | शशिकांत ओक

अप्रतीम...
आपल्या एक एक कलांची ओळख हळू हळू होते आहे.
प्रा. गळतग्यांच्या पुस्तकावरील आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.

संदीप चित्रे's picture

29 Sep 2008 - 11:35 pm | संदीप चित्रे

धनंजय ..
प्रतिसादाला उशीर झाल्याबद्दल सॉरी पण तुम्ही केवळ अशक्य आहात :)
खूपच सुरेख सुलेखन आहे.
मला व्यनिने तुमचा इपत्ता कळवाल का?
-------
मला खात्री आहे अच्युत पालव ह्यांची वेब साईट तुम्ही पाहिली असेलच. ह्या क्षेत्रातला दादा माणूस आहे :)

विकि's picture

30 Sep 2008 - 12:05 am | विकि

फारच सुंदर सुलेखन. आम्हालाही शिकवा सुलेखन कसे करायचे ते.
खरोखरच बोरु तासणे सर्वात कठीण काम आहे.
बोरूविषयी माझी आठवण सांगतो- मी अख्या मुंबईत बोरू शोधत होतो शेवटी परळला मनोहर बुकडेपोत बोरू मिळाला.
सर्वात कठीण काम म्हणजे बोरूने लिहीणे असे मला वाटते.
आपला
कॉ.विकि

भडकमकर मास्तर's picture

30 Sep 2008 - 10:01 am | भडकमकर मास्तर

रिपीट प्रकाटाआ
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण's picture

30 Sep 2008 - 12:27 pm | मदनबाण

सु रे ख . . .

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

चित्तरंजन भट's picture

1 Oct 2008 - 11:58 am | चित्तरंजन भट

धनंजय, सुलेखन आवडले. उर्दू कॅलिग्राफीतला पहिला नमुनाही चांगला होता. "तुग्रा" शैलीतला आहे बहुतेक. असो. तुमच्या सुलेखकाच्या कारकीर्दीसाठी माझ्या शुभेच्छा.

सुलेखन करण्यासाठी बोरूच हवा असेही नाही. मिळेल त्या साधनाने सुलेखन करता येते. करायला हवे, असे म्हणतात.अच्युत पालव ह्यांचे सुलेखन अवलोकनार्थ. अक्षरांत "पैलतोगे काऊ कोकताहे"चा गोडवा आहेच. शिवाय त्यातला "काऊ"ही डोकावतो आहे.

धनंजय's picture

5 Oct 2008 - 7:48 pm | धनंजय

एक रेखीव लिपी-शैलीच (फाँटच) बनवली आहे अच्युत पालव यांनी.

सुबक आणि आकाराने मोठ्या शेंड्या-टोप्यांखाली चिमुकली देवनागरी अक्षरे बघून उडिया लिपीची आठवण आली. उडिया लिपीत मोठ्या वळणदार गोल फराट्यांच्या खाली आपली नेहमीची देवनागरी अक्षरे असतात.

ऋषिकेश's picture

5 Oct 2008 - 7:53 pm | ऋषिकेश

वा वा वा वा वा!
मला हा फाँट ;) प्रचंड आवडला.. सुरेख आलेखन!!!!!
अजुन नव्या शैलीत लिहिलं असेल तर येऊद्या इथे चित्तर साहेब!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

इनोबा म्हणे's picture

5 Oct 2008 - 8:26 pm | इनोबा म्हणे

हा धागा आवडला.
आणखी माहीती मिळाल्यास उत्तम कारण मी स्वतः कॅलीग्राफी शिकण्याचा प्रयत्न करतोय.
मी तासलेले बोरु आणले आहेत. सराव करतोय सद्ध्या.
पुण्यात अप्पा बळवंत चौकातील 'त्रिमूर्ती' नावाच्या दूकानात कॅलीग्राफी संबंधीत सामग्री मिळते.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चित्तरंजन भट's picture

7 Oct 2008 - 3:07 pm | चित्तरंजन भट

हृषिकेश ह्यांचा मागणीनुसार अच्युत पालव ह्यांच्या सुलेखनाचा आणखी एक नमुना :

अच्युत पालवकृत पसायदान

र. कृ. जोशी आणि कमल शेडगे ह्यांचे नमुनेही आहेत. सध्या जवळ नाहीत. मिळाल्यावर इथे देईन.

चित्तरंजन भट's picture

7 Oct 2008 - 3:14 pm | चित्तरंजन भट

'भाषा आणि जीवन' पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील नमुने अवलोकनार्थ: भाषा आणि जीवनच्या मुखपृष्ठावरील र. कृ. जोशी