विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
11 Sep 2016 - 11:04 am

सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता. वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव. बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे गेली नाही. दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही. त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल. याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात.

आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.

योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे. विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे, जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे. पुढ्या सहा महिन्यातच या फूड पार्कच्या काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे. दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर नागपूर येथील फूडपार्क जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल.

साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले आहे.

जीवनमानप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

11 Sep 2016 - 11:21 am | मार्मिक गोडसे

चांगली बातमी

कविता१९७८'s picture

11 Sep 2016 - 11:23 am | कविता१९७८

छान बातमी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2016 - 4:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

इरसाल's picture

11 Sep 2016 - 12:13 pm | इरसाल

योग्य बातमी पण टायमिंग चुकलाच तुमचा !!

हे (बाबा) राम (देव) !!!!

विवेकपटाईत's picture

11 Sep 2016 - 4:06 pm | विवेकपटाईत

मी येथे रामदेव बाबांचे नाव दिले नाही आहे. शिवाय बाबा रामदेवांचा पतंजली मध्ये कुठलाही स्टेक नाही. ते फक्त ब्रांड अम्बेसिडर काय ते म्हणतात आहे.

ओके पटाईत. तुम्ही म्हणता ते खरे समजू एकवेळ.
मग हे कोण

हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य.

कोण हा योगी? तुमचे नेहमीचे बळंच क्रिप्टीक सोडा अन आमचे अडाणीपण समजून क्लीअर सांगा.
बरं हा योगी जर रामदेव बाबा समजले तर तुम्ही म्हणता तसे या ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडार ला कंपनीची एवढी सत्ता कोण दिली की एवढे मोठे डिसीजन तो घेऊ शकेल? स्टेक सोडा, ते म्हणतील तिकडे प्लांट उभारण्याची अन अब्जोवधीत गुंतवणूक करण्याची डेरिंग कंपनी कसे करते? ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडरला एवढी ताकद असते का?
बरं हा योगी जर रामदेव बाबा नाहीत तर मग कोण आहे? कुणाला आहे विदर्भाची कळकळ एवढी हरयाणात जन्मूनसुध्दा?
कळू दे आम्हाला तरी.

महासंग्राम's picture

12 Sep 2016 - 9:13 am | महासंग्राम


बरं हा योगी जर रामदेव बाबा नाहीत तर मग कोण आहे? कुणाला आहे विदर्भाची कळकळ एवढी हरयाणात जन्मूनसुध्दा

?

हॅहॅहॅ हवं ना एवढी काळजी आमच्या गडकरी सायेब, मेघे सायेब आन मुत्तेमवार अन्नाले बी वाटतं नाही, इदर्भाबद्दल जेवढी या शेवया वाल्या बाबाले वाटू लागली.

"शेवया वाला बाबा" हा हा हा

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 5:36 pm | विवेकपटाईत

अभय साहेब, महाराष्ट्राच्या कुठल्या हि नेता पेक्षा जास्त महाराष्ट्रात बाबा जास्त फिरले असतील. गेल्या २० वर्षांत २० लाख किमी हून जास्त प्रवास त्यांनी केला आहे. त्यात अधिकांश प्रवास कार जीप इत्यादी. त्यांची दिनचर्या तपासून घ्या. गुंतवणूकि साठी बँक आहेतच. पतंजली एकमात्र फूड प्रोसेसिंग कंपनी आहे, जिने वेळेवर बँकांचे कर्ज चुकविले आहे. बाकी देशातील कोटीहून अधिक लोकांनी त्यांना पैसा दिलेला आहे. त्यात अधिकांश गरीब आणि मध्यमवर्गीय लोक जे सकाळी ५ वाचता शिवीरात भाग घ्यायला आले होते. कधी आस्था बघितले आहे, रोज किमान ४००० लोक तरी हरिद्वार येथे शिविरात येतात. या शिवाय ५०हून जास्त शिवीर देशात इतर भागात हि लागतात. बाकी आसाम, उत्तर प्रदेश (बुंदेल खंड), मध्य प्रदेश या ठिकाणी हि फूड पार्क उभे राहणार आहे. रामदासांनी म्हंटलेले आहे, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो.

<<<महाराष्ट्राच्या कुठल्या हि नेता पेक्षा जास्त महाराष्ट्रात बाबा जास्त फिरले असतील.>>>>

महाराष्ट्रात गावो गावी प्रवास करण्याच्या बाबतीत पवार साहेबांचा कोणीही हात धरू शकत नाही.
कृपया मान्य नसेल तर "नाही" म्हणा पण उगाच पवारांबद्दल खोचक प्रतिक्रिया देऊ नका, कारण चर्चेचा रोख मला पवारांकडे वळवायचा नाही.

फेदरवेट साहेब's picture

13 Sep 2016 - 5:48 pm | फेदरवेट साहेब

तुम्ही फक्त एकांगीच लिहिण्यात पारंगत आहात का हो? धंद्याची चाचपणी करायला एकटे बाबाच फिरलेत का जगात, जमशेटजी टाटा झारखंडच्या रानावनात बैलगाडीतून फिरले होते तेव्हा कुठे जमशेदपूर उभे राहिले होते. उगाच कोणाच्या धंदेवाईक फिरण्याला फार काहीतरी भारी केल्यासारखे मांडू नका. नफा निघतोय/निघायची शक्यता आहे म्हणूच बाबा हिंडत असतात. बाबांनी योगाला सुद्धा एक कॉर्पोरेट लूक दिलाय इतके मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे, असली फंडु बिजनेस स्ट्रॅटेजी आधी नव्हती (माझ्या ऐकण्यात तरी नाही) .

मृत्युन्जय's picture

12 Sep 2016 - 1:58 pm | मृत्युन्जय

जसे लव्हासा मध्ये पवारांचा स्टेक नाही, सहारा मध्ये यादवांचा स्टेक नाही तसेच पतंजली मध्ये रामदेव बाबांचा स्टेक नाही हे देखील खरेच म्हणायचे.

चांगली बातमी ईथे दिल्या बद्दल विकास यांचे धन्यवाद !

क्षमस्व's picture

11 Sep 2016 - 3:55 pm | क्षमस्व

खरंच टायमिंग चुकला।।
धाग्यावर महाभारत होणार लिहून ठेवा।।

काहीतरी 'आठवले'

बाबांनी ओतले विदर्भात कोटी,
म्हणून आम्हाला आठवली ही कोटी।।।

संदीप डांगे's picture

11 Sep 2016 - 4:15 pm | संदीप डांगे

;) =))

मौनम् सर्वार्थ साधनम् !!

क्षमस्व's picture

11 Sep 2016 - 4:56 pm | क्षमस्व

हॅट।।।

मला वाटलं येथे 'संडां'स चालू होणार।।।

संदीप डांगे's picture

11 Sep 2016 - 5:11 pm | संदीप डांगे

तुम्ही जे करताय ते पुरेसे आहे की...

क्षमस्व's picture

11 Sep 2016 - 5:24 pm | क्षमस्व

नाही हो सर।
तुमच्या टेराबाईटीपुढे माझा बीटी कुठे?

शाम भागवत's picture

12 Sep 2016 - 9:33 am | शाम भागवत

सहमत

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Sep 2016 - 4:25 pm | कैलासवासी सोन्याबापु

आकडे एकदा क्रॉसचेक करून घ्याल काका, काही ठिकाणी शंका आहे, मी माझ्यापरीने आकडे वेरिफाय करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही पण एकदा क्रॉसचेक करा ही विनंती. एकंदरीत बातमी चांगली आहेच. तुमचे ते रामदेव प्रेम वगैरे आजकाल अंगळवणी पडते आहे त्यामुळे त्याने काही फरक पडत नाही आजकाल. चालायचेच!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2016 - 4:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> तुमचे ते रामदेव प्रेम वगैरे आजकाल अंगळवणी पडते आहे त्यामुळे त्याने काही फरक पडत नाही आजकाल. चालायचेच !

बापू, विदर्भाच्या विकासाची आकडेमोड व्हेरीफाय करायला हरकत नाही, पण असा पूर्वग्रह धरुन व्यक्तिगत आकडेमोड नको करायला असे वाटले. बाकी, चालू द्या.

-दिलीप बिरुटे

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Sep 2016 - 5:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

हा पूर्वग्रह आहे का?? तुम्हाला तसे वाटत असल्यास तुमच्या मताचा आदर, पण मी माझा स्पष्टीकरण द्यायचा हक्क राखून ठेऊ इच्छितो, त्यानुसार बोलतो

माझ्यादृष्टीने ही वाक्ये पूर्वग्रह निदर्शक नाहीत तर फक्त लेखन शैलीतले एक कायम दिसून येणारे फिचर नोंदवायचा एक प्रयत्न होय सर, अर्थात त्यात मी कमी पडलो असेल ही शक्यता मी गृहीत धरेलच, तरीही ह्याला पूर्वग्रह म्हणून झटकू नये असे सुचवतो. रामदेव बाबाने काय माझे एखाद एक्कर वावर किंवा वावराचे धुरे हडपलेले नाहीत, त्यामुळे मला रामदेवांविषयी काही प्रतिकूल मते असायचे कारण नाही, किंवा पटाईत साहेबांना त्यांची भक्ती करायची असल्यास त्याला विरोध करणाराही मी कोणी टिकोजी लागून गेलेलो नाही, हे मी आधीच स्पष्ट करतो.

मी हे का लिहिले ?? तर एकंदरीत ताकाला जाऊन भांडी लपवायचे धंदे आवडत नाहीत, "हरयाणात जन्मलेला योगी" वगैरे मखलाशी करून नंतर "मी रामदेवांचे नाव घेतलेले नाही" छाप खोडसाळ प्रतिसाद टाकणाऱ्या व्यक्तीलाच पूर्वग्रह किती आहेत ते तपासायला हवे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

पटले तर बघा, नाहीतर परत एकदा आमच्या क्षमता कमी पडल्या असे समजा अन आम्हाला माफ करा ही विनंती

आमचा इथेच पूर्णविराम

ओम शांती शांती शांती:

आतिवास's picture

11 Sep 2016 - 5:24 pm | आतिवास

हं!
माहिती शोधायला हवी.

आतिवास's picture

11 Sep 2016 - 5:24 pm | आतिवास

हं!
माहिती शोधायला हवी.

संदीप डांगे's picture

11 Sep 2016 - 5:28 pm | संदीप डांगे

नका शोधू, भक्तगण नाराज होतिल..

गामा पैलवान's picture

11 Sep 2016 - 9:09 pm | गामा पैलवान

अरे वा! तुम्हाला कसं माहिती भक्तांना काय वाटणारे ते? तुम्हीही भक्तांप्रमाणे विचार करू लागलात वाट्टे? प्रगती आहे! ;-)
आ.न.,
-गा.पै.

डांगेण्णा.. नक्की काय चुकीचे आहे या बातमीमध्ये..?

मुक्त's picture

11 Sep 2016 - 7:01 pm | मुक्त

हॅहॅहॅ
शिर्षक वाचून वारल्या गेलो आहे. बाकी पेड भकताकडून जास्त अपेक्षा कधीच नव्हत्या.

डँबिस००७'s picture

11 Sep 2016 - 7:01 pm | डँबिस००७

वरच्या बातमीत आक्षेपार्ह अस काय आहे ?

विरोधी पक्षाप्रमाणे सर्व गोष्टींना विरोध करायचा म्हणुन विरोध करत आहात ?

नागपुरला देशातील सर्वात मोठे कार्गो हब बनवण्याचे प्रोजेक्ट मिहान अंतर्गत चालु आहे.
मिहान म्हणजे Multi-modal International Cargo Hub and Airport at Nagpur (MIHAN) ह्या
पार्श्वभुमीवर स्वामी रामदेव बाबांनी फुडपार्कची घोषणा केली, ती पुढे कार्यांन्वयीत केली तर त्यात काय चुकलय ?
https://en.wikipedia.org/wiki/Multi-modal_International_Cargo_Hub_and_Ai...

गेल्या दहा वर्षांत ३ लाखाच्यावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या , त्या वर काँग्रेस सरकारने ८००० कोटीच पॅकेज आणल होत. ती पॅकेज ची रक्कम कुठे गेली किती पर्यंत शेतकर्यां पर्यंत पोहोचली ?
पण त्या नंतरही आत्महत्या काही थांबल्या नाहीत.

आता रामदेव बाबांच्या प्लान प्रमाणे मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्क डेवलप करणार असतील, या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार असेल, पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार असेल. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केलेला असेल , तर त्यात वाईट काय आहे.

ह्या फुडपार्क मध्ये तयार झालेल प्रोडक्ट लोकांनी विकत घेवो अथवा न घेवो फुडपार्क मध्ये काम करणार्यांना वेतन / मोबदला मिळेलच, ज्या पद्धतीने पतंजली प्रोडक्टस मार्केट मध्ये पसंतीस उतरत आहेत त्या प्रमाणे हा प्लान यशस्वी होण्याची शक्यताच जास्त आहे.

मग लोकांच्या पोटात का दुखत आहे ?

देशातील १/३ जनता राईच तेल रोजच्या जिवनात वापरते, ते तेल बनवताना राईच्या तेलाचा जास्तीत जास्त भाग काढण्यासाठी स्वस्त सॉल्वेंटचा वापर केला जातो. हे सर्वच तेल बियांच्या एकस्ट्रेकशन प्रोसेस मध्ये होत. अश्या तेलात
ह्या खरतनाक सॉल्वेंटचा अंश रहातोच. हे सॉल्वेंट शरिरासाठी खतरनाक असतात. तेल काढण्याची प्रोसेस फिसिबल व्हावी म्हणुन स्वस्तातले सॉल्वेंटचाच वापर होत असतो. त्याच विरोधात राम देव बाबानी कच्चे घानीका राईका तेल
बाजारात आणल. त्या तेलाच उत्पादन हे पारंपारीक घाण्यापासुन होत. फक्त ही घाणी बैल न चालवता इलेक्ट्रीक मोटर चालवते. मग लोकांची पसंती अश्याच पारंपारीक तेलालाच असणार !!
आमच्या ईथे अजुनही गावावरुन शहरातल्या घराकडे येताना घरच (घाण्याच) नारळाच तेल आणण्याची प्रथा आहे.

राम्देव बाबाच्या प्रोडक्ट मध्ये राईच घाण्यावरच तेल मिळत, हे तेल देशातील १/३ जनता वापरते

क्षमस्व's picture

11 Sep 2016 - 7:42 pm | क्षमस्व

+१११११

राईच तेल आमी हिवाळ्यात वापरतो ..अंग मालीश साठी..
मोहरी तेल उष्ण असल्यामुळे त्यात 2 /3 खोबरेल तेल वापरावे.
.
अवांतर-एका कवितेतले शब्द आठवले..
"याल पुढे तर उडविन चिंधड्या राई राई एवढ्या.."

Sanjay Uwach's picture

11 Sep 2016 - 10:54 pm | Sanjay Uwach

अगदी योग्य ते बोललात . सॉलव्हन्ट एकस्ट्रक्शन प्लांट मध्ये तेल बियांतील तेल काढण्या साठी जे केमीकल वापरण्यात येतात ती प्राणिमात्रा साठी फारच घातक असतात . कार्बन टेट्रा क्लोराईड या सारखी ती केमिकल्स असतात . याचेच पुढचे व्हर्जीन क्लोरोफॉर्म जे माणसास ऑपरेशनच्या वेळी दिले जाते .या मालाच्या पोत्या समोर जरी उभारला तरी डोळ्यातून घळा घळा पाणी येते . या हि पुढे जाऊन तेल काढलेल्या बिया कि ज्यांच्यात तेल फक्त ०. ५ ते १ % शिल्लक राहते कि ज्या वाळू प्रमाणे असतात त्याचा उपयोग लोक पशुखाद्यात त्याची किंमत कमी करण्यासाठी म्हणून ( फिलर ) वापरतात . यामुळे दुधाचे फॅट पण कमी होते व जनावरांना निकृष्ट प्रतीचा व विषारी खुराक मिळतो

सुबोध खरे's picture

12 Sep 2016 - 10:22 am | सुबोध खरे

जे केमीकल वापरण्यात येतात ती प्राणिमात्रा साठी फारच घातक असतात . कार्बन टेट्रा क्लोराईड या सारखी ती केमिकल्स असतात . याला कुठलाही आधार नाही.
साधारण सर्वत्र सॉल्व्हंट एक्सट्रॅक्षन साठी n हेक्झेन आणि थोड्या प्रमाणात आयसो हेक्झेन यांचे मिश्रण वापरले जाते. हे द्रावक ६० अंश तापमानाला उडून जातात.(पेट्रोल सारखे) आणि त्यामुळे शरीराला अपाय होतो असे गेल्या ५० वर्षात सिद्ध झालेले नाही. हेक्झेन हे द्रवरूप असल्याने ते पोत्यातून अने शक्य नाही तेंव्हा कोणत्या पदार्थामुळे आपल्या डोळ्यातून घळा घळा पाणी आले ते आपण ठरवा. मुळात कार्बन टेट्रा क्लोराईड किंवा क्लोरोफॉर्म हेहि गोड वासाचे "द्रव" आहेत
तेल काढलेल्या बिया कि ज्यांच्यात तेल फक्त ०. ५ ते १ % शिल्लक राहते कि ज्या वाळू प्रमाणे असतात त्याचा उपयोग लोक पशुखाद्यात त्याची किंमत कमी करण्यासाठी म्हणून ( फिलर ) वापरतात . यामुळे दुधाचे फॅट पण कमी होते व जनावरांना निकृष्ट प्रतीचा व विषारी खुराक मिळतो . उरलेल्या बियांत प्रथिने शिल्लकच राहतात आणि ती जनावरांना खुराक म्हणून वापरतात ती मुळीच निकृष्ट दर्जाची नाहीत. उदा. शेंगदाण्याची पेंड हि मानवी बालकांना पौष्टिक आहार म्हणून वापरली जाते मग जनावरांना का नाही? यात ४१% प्रथिने असतात शिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. http://www.medindia.net/calories-in-indian-food/common_foods/nuts_and_oi...

बाकी कोणतीही वस्तू ऑरगॅनिक म्हणजे चांगली असे समजणाऱ्या लोकांना आपले उत्पादन विकण्यासाठी बाबा रामदेव यांनी "कच्ची घानी का तेल" विकायला सुरुवात केलेली आहे. त्याला हा मुलामा आहे. कोणीही स्वस्त आणि खतरनाक सॉल्व्हंट वापरत नाही. असे सिद्ध करून दाखवा.कारण असा स्वस्त आणि खतरनाक सॉल्व्हंट वापरला तर तेल लवकर खराब होईल आणि त्याला वास लागेल. यांनतर कोणीही त्या कंपनीचे तेल कधीही विकत घेणार नाही. हे सर्व बाबा रामदेव यांनी केलेला अपप्रचार आहे.
आपले प्रतिसाद हे द्वेषमूलक आणि अज्ञानजन्य आहेत असे वाटते.

सुबोध खरे's picture

12 Sep 2016 - 10:25 am | सुबोध खरे

http://articles.economictimes.indiatimes.com/2016-06-02/news/73493160_1_...
दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले उत्पादन विकण्याची हि वृत्ती पतंजलीने सोडून द्यावी आणि स्वतःच्या उत्पादनांच्या दर्जावर बाजारपेठ मिळवावी. अन्यथा दूरगामी परिणाम चांगले होणार नाहीत.

डोळ्यातून घळा घळा पाणी आले हे पोत्यातील एक्स.प्लाट मधुन आलेल्या बिया संदर्भात लिहिलेले आहे . रसायन संदर्भात नाही,

Baba Ramdev’s Patanjali to set up food park at MIHAN
http://indianexpress.com/article/india/india-news-india/baba-ramdevs-pat...

Yoga guru Ramdev sets up mega food park in Nagpur
http://gulfnews.com/news/asia/india/yoga-guru-ramdev-sets-up-mega-food-p...

विकासने दिलेले आकडे बरोबरच आहेत !!

आता खरा विकास होणार. सुझलाम सुफलाम.

३ लाख शेतकरी आत्महत्या करताना काँग्रेसच्या लोकांनी जे दहा वर्ष उग्र चिंतन केलेल होत त्या पुढे ह्या सरकारचे, रामदेव बाबाचे हे प्रयत्न म्हणजे पर्वतासमोर तिळ !!

३ लाख शेतकरी बंधु आत्महत्या करताना सुद्धा ज्यांच्या पापण्या ओलावत नाहीत त्यांच्याकडुन आणी काय अपेक्षा करणार !!

विवेक पटाईत यांचे नाव नजरचुकीने विकास असे लिहीले गेले त्याबद्दल क्षमस्व !!

श्रीगुरुजी's picture

11 Sep 2016 - 8:24 pm | श्रीगुरुजी

रामदेवबाबा बहुराष्ट्रीय कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहेत. टूथपेस्ट, बिस्किटे, नूडल्स, शांपू इ. रोजच्या ग्राहकोपयोगी वस्तू स्वतः तयार केल्यामुळे या कंपन्यांच्या स्वतःच्या उत्पादनाच्या विक्रीवर नक्कीच परीणाम होणार. काहीतरी खुसपटे काढून नेस्ले, युनिलिव्हर इ. बहुराष्ट्रीय कंपन्या रामदेवबाबा किंवा ते सुरू करीत असलेले किंवा सुरू असलेले उद्योगधंदे गोत्यात आणण्याचा प्रयत्न करणार हे नक्की.

संदीप डांगे's picture

11 Sep 2016 - 8:44 pm | संदीप डांगे

काही गोत्यात येणार नाही,

क्षमस्व's picture

11 Sep 2016 - 8:51 pm | क्षमस्व

इतकाच प्रतिसाद?
डांगे सर तब्येत बरी नाही का तुमची।।

कुणाचा का असेना, नवीन रोजगार व शेतकरी यांच्या साठी एक स्तुत्य प्रकल्प, चायनीज मालाला देखिल असाच कांहीतरी पर्याय निघायला हवा.

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 5:50 pm | विवेकपटाईत

बहु राष्ट्रीय कंपन्याचे टमाटो प्युरी सोडून कुठल्या हि देशी कंपनीची घ्या. निदान चायनीज टमाटो प्युरी तरी बाजारातून दूर होईल.

चंपाबाई's picture

12 Sep 2016 - 7:35 am | चंपाबाई

कालची रात्र २०११ .... बाबा सलवार घालून पळाले होते. ( असं व्हाट्सपवर आलं)

एकीकडे "मैंने ख़ुदको आत्मा के रूप में देखा है" अशा गोष्टी अन दुसरीकडे असं असा प्रकार !

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 5:53 pm | विवेकपटाईत

चंपा ताई शिवाजी सुद्धा वेश बदलून पळाले होते. देशात होणारी नवीन कृषी क्रांती व ग्रामीण जनतेचा विकास तुम्हाला दिसत नाही फक्त एवढेच. आपल्या बंजर भूमीत ओलेविरा लाऊन राजस्थानचा एक शेतकरी कोट्याधीश झाला हि बातमी कदाचित ऐकली असेल.

पगला गजोधर's picture

13 Sep 2016 - 6:15 pm | पगला गजोधर

देशात होणारी नवीन कृषी क्रांती व ग्रामीण जनतेचा विकास तुम्हाला दिसत नाही फक्त एवढेच. आपल्या बंजर भूमीत ओलेविरा लाऊन राजस्थानचा एक शेतकरी कोट्याधीश झाला हि बातमी कदाचित ऐकली असेल.

याचा आणि बाबा रामदेव यान्चा काय सम्बध ??

आत रामदेव बाबा ''परीधान'' या नावाने स्वदेशी जीन्स पॅन्ट बाजारात आणणार आहेत,भारतीय महिला सलवारी ऐवजी जीन्स वापरणार.

पगला गजोधर's picture

12 Sep 2016 - 9:30 am | पगला गजोधर

acd

जेपी's picture

12 Sep 2016 - 10:37 am | जेपी

=)) पहिला फोटो लै भारी

पगला गजोधर's picture

12 Sep 2016 - 9:19 am | पगला गजोधर

AD

पण त्याला एखाद्या योग्याच्या दयाबुद्धीचा मुलामा देण्याची काहिच गरज नाहि. तसंही शेतकर्‍यांची समस्या दयाबुद्धीने सोडवण्याचा आटापिटा करण्यामुळेच जास्त चिघळली आहे.

डँबिस००७'s picture

12 Sep 2016 - 12:25 pm | डँबिस००७

ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते ७०% दुध हे युरीया व साबणापासुन बनवलेल असत त्या देशात तेल बियांपासुन तेल काढायला चांगले व महाग सॉल्व्हेंटस वापरले जातील ? बर तेल ईथे भारतात ईतक्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणीत पॅकेज मध्ये न विकता लुज मध्ये विकल जात त्यावर क्वॉलिटीचा कोणता मार्क असतो ?

ईतक करुन जर रामदेव बाबा कच्चे घानी का तेल हे संपुर्ण तेल बियातुन काढलेल्या तेला पेक्षा स्व स्त विकत असेल तर ते जनतेच्या फायद्याच आहे. शिवाय जर पतंजली तेलात सॉल्व्हेंटसचा अंश ही नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे
ना ?

१९६० सालाच्या दरम्यान भारतात डालडा नावाच्या वनस्पती तुपाची सुरुवात झाली, गाईच्या साजुक तुपाला स्वस्त
पर्याय म्हणुन ह्या हॅड्रोजनेटेड तुपाची योजना होती. वनस्पती तेलालाच प्रोसेस करुन तुप सदृष्य स्वरुप दिलेल होत. गरीब लोक जे तुप वापरु शकत नव्हते ते ह्या नविन तुपाचा आस्वाद घेऊ लागले. भारताची तिन चार पिढी ह्या तेलामुळे बिमार झाली.

संदीप डांगे's picture

12 Sep 2016 - 12:30 pm | संदीप डांगे

देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते ७०% दुध हे युरीया व साबणापासुन बनवलेल असत त्या देशात तेल बियांपासुन तेल काढायला चांगले व महाग सॉल्व्हेंटस वापरले जातील

^^^

वरील दोन्ही विधानास सिद्ध करणारे पुरावे आपल्याकडे आहेत का?

विशुमित's picture

12 Sep 2016 - 12:41 pm | विशुमित

सर,

व्हॅलिड पुरावे नक्कीच नसणार...!!
हा गो पालकांचा अपमान आहे.,,,

संदीप डांगे's picture

12 Sep 2016 - 12:53 pm | संदीप डांगे

पुरावे कशाला पाहिजेत, ;)

Nddb च्या मते 2014-15 चे दूध उत्पादन सुमारे दीडशे करोड टन आहे, ह्यातले 60 टक्के दूध म्हणजे 90 करोड टन साबण व युरिया पासून बनवतात, इथल्या शंभर मिपाकरांपैकी 60 जणांच्या घरी साबण-युरिया चे दूध येते, किंवा 1 लिटर दुधात 600 एमेल साबण-युरिया असतो, पेढे-खवा, गुलाबजाम सगळे साबण युरियापासून बनते. ;)

विवेकपटाईत's picture

13 Sep 2016 - 5:59 pm | विवेकपटाईत

डांगे साहेब हे जरा जास्त झाले. दुधात २-३ टक्के युरियाची मात्रा निर्धारित आहे. त्याहून जास्त असेल तरी अमूल, मदर डेरी इत्यादी विकत घेणार नाही. (बाजारात मिळणार्या खुल्या दुधा बाबत काही सांगता येत नाही) एवढे मात्र आहे, पशु खाद्यात १% युरिया खाद्य बनविणाऱ्या कंपन्या टाकू शकतात. शिवाय आपल्या देशात पशु चारा इत्यादीचे जास्त उत्पन्न घेण्यासाठी युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या शिवाय आपल्या हि खाद्य पदार्थात युरिया हा जास्त असतोच. इथेही पतंजली युरिया रहित पशु चारा बाजारात आणते आहे. बहुतेक सुरुवात होऊन हि गेली असेल.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 7:30 pm | संदीप डांगे

पटाईतसाहेब, नक्की काय जास्त झाले ते सांगाल काय?

१. डँबिसराव म्हणतायत ह्या देशात ६०-७० टक्के दूध युरिया-साबणापासून बनवतात.
२. तुम्ही म्हणताय दुधात २-३ टक्के युरिया निर्धारित आहे.

नक्की कोण खरं बोलतंय व त्याला आधार आहे का?

सुबोध खरे's picture

17 Sep 2016 - 8:36 pm | सुबोध खरे

प्राण्यांच्या( आणि मानवी ) रक्तात युरिया हा उत्सर्जनाचा पदार्थ( waste product) असतो तो काही प्रमाणात दुधात नैसर्गिक उतरतो.
हि मात्रा ७० ppm किंवा ७० मिग्रॅ/ १०० मिली पेक्षा जास्त नसावी. यापेक्षा जास्त मात्रा असेल तर ती दुधातील भेसळ समजावी.
Urea is a natural constituent of milk and it forms a major part of the non-protein
nitrogen of milk. Urea concentration in milk is variable within herd. Urea content in
natural milk varies from 20 mg/100 ml to 70 mg/100 ml. However, urea content above
70 mg/100 ml in milk indicates milk containing ‘added urea’.
http://www.fssai.gov.in/Portals/0/Pdf/Draft_Manuals/MILK_AND_MILK_PRODUC...

एक correction डॉक्टर साहेब :70 ppm म्हणजे 70 mg per लिटर , 100 ml नाही. बाकी तुम्ही म्हणताय त्याच्याशी सहमतच आहे.

अमितदादा's picture

17 Sep 2016 - 9:15 pm | अमितदादा

मला वाटत डॉक्टरांची typing mistake झालीय, ७० ppm नाहीये तर ७०० ppm प्रमाण आहे, म्हणजे 70 mg per 100 ml.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 9:21 pm | संदीप डांगे

डॉक्टरांनी दिलेल्या एफएसएसआय च्या रिपोर्टमधे 70 mg/100 ml असेच आहे.

A.N.Bapat's picture

17 Sep 2016 - 9:30 pm | A.N.Bapat

जर ते 70 mg/ 100 ml असले तर त्याचा अर्थ ते 700 ppm आहे मग.

सुबोध खरे's picture

17 Sep 2016 - 11:53 pm | सुबोध खरे

टंकन दोषाबद्दल क्षमस्व
७०० ppm,

अहो पटाईत काकांचा तांत्रिक अभ्यास नसावा . खाली डॉक्टर साहेबांचा प्रतिसाद वाचा . पटाईत म्हणत आहेत ते 2 -3 टक्के युरिया म्हणजे 20000 ते 30000 ppm. याच्या एक दशांश जरी युरिया दुधात असेल तरी कुठली डेरी उभी करणार नाही. Animal फीड मधला युरिया व दुधातला युरिया या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. फार तांत्रिक होईल म्हणून इथे जास्त लिहित नाही.

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 9:26 pm | संदीप डांगे

वर दोन विधाने आहेत, एक डँबिस यांचे दुसरे पटाईत यांचे, दोन पैकी कोणतेही एक खरे असणार की नाही? डॉक्टरांनी दिलेल्या लिन्कनुसार काही वेगळेच सत्य पुढे येत आहे.

अशात डँबिस यांचे "६५-७० टक्के युरिया-साबण पासून बनवलेले दूध" ह्यावर मी आक्षेप घेतोय तर पटाईतसाहेब हे जरा जास्त झाले असे मलाच म्हणत आहेत. इ का हो रहा है भैय्या?

अमितदादा's picture

17 Sep 2016 - 9:37 pm | अमितदादा

ज्या देशात उपलब्ध दुधा पैकी ६५ ते ७०% दुध हे युरीया व साबणापासुन बनवलेल असत

मला वाटतंय ह्या विधानाचा अर्थ दुधात ७०% युरिया असा नसून, ६५ ते ७०% दुधामध्ये काहीना काही भेसळ असते असा होतो. खालील बातमी पहा सरकार ने संसदेमध्ये हे कबुल केलाय कि ६८% दुध हे सरकार ने ठरवून दिलेली standard पाळत नाहीत. बातमी

संदीप डांगे's picture

17 Sep 2016 - 9:44 pm | संदीप डांगे

मग खालील वाक्याचा अर्थ कसा लावावा?
दुधात २-३ टक्के युरियाची मात्रा निर्धारित आहे. त्याहून जास्त असेल तरी अमूल, मदर डेरी इत्यादी विकत घेणार नाही

हा विषय नाजूक आणि महत्त्वाचा आहे. असे असेल तर मुलांना दूध देणे बंद करायला लागेल.

अमितदादा's picture

17 Sep 2016 - 9:59 pm | अमितदादा

मला वाटत ह्या वाक्याचा अर्थ लावायची गरज नाही कारण पूर्ण चुकीच वाक्य आहे ते. वर दिलेल्या माहितीनुसार निर्धारित मात्रा ७०० ppm आहे, या पेक्षा जास्त उरिया हि भेसळ आहे. अमूल किंवा इतर नावाजलेल्या कंपन्या हि मानांकने पाळत असतील असा माझा विश्वास/अंदाज आहे.

अवांतर> युरिया, रंग व इतर गोष्टींची भेसळ ऐकली होती. पण हि चित्रफित पहा दुधात फेविकॉल (किंवा त्या पध्दतीच केमिकल) ची भेसळ आहे,

अहो डांगे साहेब , टेन्शन घेऊ नका . याचा अर्थ एवढाच कि पटाईत याना दुधातील युरिया , टक्केवारी , या विषयी फारशी माहिती नाहीये ( तरीही ते बिनधास्त आकडे लिहित आहेत याच मात्र टेन्शन येतं , मला )

Sanjay Uwach's picture

18 Sep 2016 - 11:02 pm | Sanjay Uwach

डागें साहेब,
सोसायटीत दुधाला डिग्री लागाया पाई काय काय पाप करतील कुणास ठाउक ??? युरिया घालत्यात, साकर्‍या घालत्यात, परवा तर एक पट्या सनला पुट्टी घालताना सापडला नव्ह, लई चोपला तेला,म्हनतोय कसा ''माझी डिग्री (snf) लागली नाही तर गरीबाच दुध जप्त करतासा ,अन तेच दुध मागल्या दारान बाजारात इकता. मग कुनी कुनि सागत्यात युरिया घाला, निरमा घाला. परवा तर गावात हीच चर्चा आता दुध धंद्यात म्हसराची गरज नाही. फकस्त पाम तेल, यूरिया, साबुन झाला की दुध तयार,अन कधी नासत बी नाही म्हन, असल दुद पिऊन पैलवान कुस्तीचे अदुगरच फडात चक्कर येऊन पडायचा की हो ? आपलाच जॅकेट फुटका अन कॅन गळका , त्येला कोन काय करनार,जाता जाता ह्या अडान्याच एवढ शबुद ध्येनात ठेवा की 1ग्रॅम लीटर=1000 पिपिएम

संदीप डांगे's picture

18 Sep 2016 - 11:09 pm | संदीप डांगे

घरचं दूध भेसळमुक्त आहे हे शोधायचे काही उपाय आहेत काय?

हाय हाय, जगात देव हाय,आता नवीन पद्धत येणार आहे. यात दुधच काय दुधाचे भांडे ,दुध काढणार्‍या चे हात किती स्वच्छ आहेत हे देखील कळणार .फक्त ते कसे वापरले जाते या वर अवलंबून आहे. नाहीतर तलाठ्याच्या लॅपटॉप सारखी गत होणार,

संदीप डांगे's picture

18 Sep 2016 - 11:40 pm | संदीप डांगे

अहो, मला म्हणायचे होते की सामान्य ग्राहकाला घरी येत असलेले दुध तपासून पाहण्यासाठी काही उपाय आहेत काय?

विशुमित's picture

27 Sep 2017 - 4:24 pm | विशुमित

मा. राष्ट्रपतींच्या हस्ते दुधाची भेसळ तपासण्याच्या उपकरणाचं अनावरण झाले आहे.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/president-ram-nath-kovind-unvei...

चंपाबाई's picture

18 Sep 2016 - 1:02 am | चंपाबाई

बाजारात उपलब्ध असलेले ७०% दूध साबण , तेल , युरिया इ इ काहीतरी घालून तयार केलेले असते , असे पटाइत साहेबाना म्हणायचे आहे.

माझा एक मित्रही असेच बोलत होता.

सुबोध खरे's picture

12 Sep 2016 - 12:47 pm | सुबोध खरे

साहेब
हे सॉल्व्हंट्स परत परत वापरले जातात. तेल काढले आणि ते थोडेसे तापवले तरी या सॉल्व्हंट्सचे उर्ध्वपातन होते (६०-६५ अंश सेल्सियसला) याची वाफ थंड केली कि ती परत सॉल्व्हंट् म्हणून वापरता येते. त्यामुळे स्वस्त आणि महाग यात एवढा फरक येणार नाही.
आणि आपण मी लिहिलेले शब्द नीट वाचले नाही का?
असा स्वस्त आणि खतरनाक सॉल्व्हंट वापरला तर तेल लवकर खराब होईल आणि त्याला वास लागेल. यांनतर कोणीही त्या कंपनीचे तेल कधीही विकत घेणार नाही. हे सर्व बाबा रामदेव यांनी केलेला अपप्रचार आहे.
दुसऱ्यावर शिंतोडे उडवून आपले उत्पादन विकण्याची हि वृत्ती पतंजलीने सोडून द्यावी आणि स्वतःच्या उत्पादनांच्या दर्जावर बाजारपेठ मिळवावी. अन्यथा दूरगामी परिणाम चांगले होणार नाहीत.

एनडीडीबी पशुखाद्य कारखान्यात इलीवेटरने एक्स.मधील तेल बियांचा ग्रायडींग केलेला चुरा वर चढवताना आत गॅसचे स्फोट झाले आहेत़,विषेश करुन काॅटन सिड एक्सट्र्यकशनला. आमचे तिन कामगार गंभीर जखमी झाले होते. मग हा गॅस कुठून आला ?
सर्व गोष्टी लिहणे कठीण आहे. मी स्वतः केमिकल इंजिनियरीगचा पदवीधर आहे. लहान वासराना जी पेंड देतात तो बायपास प्रोटीन तो कॉन्सेप्ट वेगळा आहे, एक्स प्लांट मधील शेगपेंड हातात घेऊन तरी पहा, मग काय ते ठरवा.

विशुमित's picture

12 Sep 2016 - 1:57 pm | विशुमित

संजय जी ,
आणखी इस्कुटून सांगाल का ? सगळं डोक्यावरून गेलं.

थोडक्यात सांगायचे झाले तर ,शेतकऱ्या कडून आलेल्या तेल बिया ,मग त्या शेंगदाणा ,सोयाबीन करडी ,सरकी ,भाताचा कोंडा याचे पहिल्यांदा दाब देऊन तेल घाण्या द्वारे तेल काढले जाते .याची शुद्धता चांगली असते . तेल काढल्या नंतर उरलेला धान्याचा चोथ्या मध्ये देखील १० ते १६% तेल शिल्लक राहत असे .ते जनावरांना खाद्य म्हणून दिले जात होते . आता माणसाचे लक्ष या १० ते १६% शिल्लक असणाऱ्या तेलावर पडली .हे तेल काढण्या साठी त्याने एक रासायनिक प्रक्रिया शोधून काढली . या चोथ्यातून कांही रसायने पास केल्यास हे उर्वरित १० ते १६% तेल मिळू शकेल . आता हे किती योग्य प्रकारे हि पद्धत वापरली जाते यावर त्याची योग्यता ठरते . मी ज्या ठिकाणी काम करीत होतो त्या ठिकाणी हा रासायनिक पद्धतीने तेल काढलेले बिया हाताळताना डोळ्यातून पाणी येते किव्हा उपकरणात आग लागत असे . म्हणजेच या रसायनाचा कांही भाग या चोथ्यात निश्चितच शिल्लक राहत असणार . कांहींच्या मते असे कांही होत नाही . त्यातील सर्व रसायने बाहेर काढली जातात व उरलेली चोथ्यात देखील ४५% प्रथिने असतात . हे निव्वळ आमचे अज्ञान आहे . राहता राहिला प्रश्न रामदेव बाबाचा , साधी गणपती जवळ लावण्या साठी असणारी पन्नास रुपयाची समई देखील मेड इन चायना असेल , व सगळ्यांना याचा अभिमान वाटत असेल तर मी काय बोलणार . साध्या साध्य गोष्टी तयार करणारे रामदेव बाबा असूदेत किव्हा लक्ष्मण राव असुदे कोणीतरी भारतीय आहे एवढंच त्यातला घेणे. नाहीतर चेष्टा आवडे टवाळा.

डँबिस००७'s picture

12 Sep 2016 - 5:41 pm | डँबिस००७

संजय राव,

प्रतिसाद पटला !

तेलाच्या उत्पादनातले बारकावे हे त्या विषयातील तज्ञच सांगु शकतात.
१०% ते १६% तेल काढण्यासाठी कंपनी किती खर्च करणार ? ह्यावर पुढच सर्व अवलंबुन असतय!

आमच्या ईथे अजुनही घाण्यावरुनच नारळाच तेल आणल जात ! त्या शिवाय नारळाच वर्जिन ऑईल उपलब्ध आहे जे काही शेकडो वर्ष केरळात बनवल जात. सुक्या नारळापासुन काढलेल्या नारळाच्या तेला पेक्षा हे वर्जिन ऑईल वेगळ व उपयुक्त असत. त्याचे औषधीय वापरही आहेत.
हे वर्जिन ऑईल नारळाच्या चोथ्यापासुन निघालेल्या दुधाला कढवत ठेवुन केल जात! तुपासारख हे वर्जिन ऑईल शरिराला खुप उपयुक्त असत !

म्हणजेच या रसायनाचा कांही भाग या चोथ्यात निश्चितच शिल्लक राहत असणार . कांहींच्या मते असे कांही होत नाही . त्यातील सर्व रसायने बाहेर काढली जातात व उरलेली चोथ्यात देखील ४५% प्रथिने असतात . हे निव्वळ आमचे अज्ञान आहे

आपण केमिकल इंजिनियर आहात असे म्हणता मग हेक्झेन चा उत्कलन बिंदू हा कमी असतो आणि ते पेट्रोलपेक्षा( पेट्रोल हे ऑक्टेन आहे एन आणि आयसोचे मिश्रण) जास्त सहज उडून जाईल हे आपणास ठाऊक असेलच
तरीही ते चोथ्यात शिल्लक राहील हा आपला दावा कसा मानायचा?
ऊरलेल्या बियांत प्रथिने शिल्लकच राहतात आणि ती जनावरांना खुराक म्हणून वापरतात ती मुळीच निकृष्ट दर्जाची नाहीत. उदा. शेंगदाण्याची पेंड हि मानवी बालकांना पौष्टिक आहार म्हणून वापरली जाते मग जनावरांना का नाही? यात ४१% प्रथिने असतात शिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. http://www.medindia.net/calories-in-indian-food/common_foods/nuts_and_oi...

शेंगदाण्याच्या पेंडीत ४१ % प्रथिने असतात हे मी वर दुव्यासह तुम्हाला दिले आहे. डॉ सुबोध खरे यांचे संशोधन म्हणून केलेला दावा नाही.
मूळ शेंगदाण्यात ४८ टक्के तेल असते आणि २५ टक्के प्रथिने असतात.https://en.wikipedia.org/wiki/Peanut त्याचे तेल काढले कि आपोआप उरलेल्या पेंडीत त्यातील प्रथिनाचे प्रमाण वाढलेले असते. यात आमचे अज्ञान आहे म्हणून तुमचा अहं दुखावला जातो याला कोण काय करणार?
एखाद्या गोष्टीस विरोध करायचा म्हणून करू नका. त्याच्या मागे सज्जड पुरावा असावा. तुम्ही आणि मी शास्त्राचे विद्यार्थी आहोत.
रामदेव बाबांची/ पतंजली उत्पादने स्वस्त आहेत कारण जाहिरातीवर होणारा ४० % खर्च त्यांनी वाचविलेला आहे.
त्यांचे "कच्ची घाणी का तेल" हा त्यांचा कोल्ड प्रेस्ड आहे कि एक्सपेलर चा आहे हे मला कुठे सापडलेले नाही. माझ्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे कोल्ड प्रेस मध्ये फक्त तीळ आणि ऑलिव्ह तेल काढले जाते.( म्हणून त्याला एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल म्हणतात). बाकी इतर तेलबियांमधून तेल काढण्यासाठी घाणीत एकतर गरम पाणी वापरतात किंवा घाणीच्या डिझाईन मुळे होणाऱ्या घर्षणामुळे तेल बियाच्या पेशी फुटून बाहेर येते. ( इतर तेलबिया मध्ये कोल्ड प्रेसने तेल फार कमी प्रमाणात बाहेर येते)
आपल्याला याबद्दल काही माहिती देता आली तर कृपया द्या.
असो.

Sanjay Uwach's picture

13 Sep 2016 - 9:05 pm | Sanjay Uwach

डॉ .खरे साहेब ,
अतिशय विनम्र पणे व आपला आदर राखून कांही गोष्टी बद्दल मी आपले मत मांडू इच्छितो . आपण जे ४१% प्रथिने एक्सट्रेक्शन नंतर तेल बियांत राहतात असे वारंवार सांगता ,हे सत्य आहे .पण याचा व्यवसायिक दृष्टीकोन पाहिलात तर , तेल बियांतील तेल या आधीच आपण काढलेले आहे, बरोबर आहे .राहिलेला चोथा मी ज्याला फिलर किंवा वाळू म्हणालो ,तो घेऊन मी कुण्या शेतकऱ्या कडे गेलो व यात ४१% प्रथिने आहेत तुझ्या जनावरांना हे घाल असे म्हटलो तर तो नाही म्हणेल कारण मला दुधाचा दर हा फॅट (सिंग्धांश ) वर मिळतो , प्रथिनावर नाही असे कदाचित तो सांगेल .पशुखाद्य मध्ये दुभत्या जनावर साठी साधारण पणे ( ब्रीडिंग पिरियड मध्ये ) २५% प्रोटीन पुरी आहेत .आतातर कांही नामांकित कंपन्यांनी प्रोटीन १८% सुद्धा चालेल असे ठरवले आहे व ७% किंमत फॅट वाढवण्या साठी वापरीत आहेत . साधारण पणे मीठ + डाय कॅलसियम फॉस्पेट +१.५% युरिया व इतर धान्यातून हि गरज भागवली जाते .कि जी फार खर्चिक नाही . एक्सट्रेक्शन प्लांट मधील बाहेर येणाऱ्या मालातून सॉल्व्हन्ट पूर्ण पणे बाहेर काढला जातो .फक्त कधी कधी ड्रायर ठीक नसल्यास ,किंवा गरम केक पोत्यात भरल्यास ज्या वेळी बंद सिस्टीम मधून हॅमर मिल ( चक्की ) मध्ये येतो त्यावेळी घर्षण मुळे तयार होणाऱ्या उष्णेतून डोळ्यातून पाणी येणे ,वास येणे ,असे प्रकार घडू शकतात .हा मानव निर्मित दुर्लक्षित प्रकार असल्याने याचे समर्थन होऊ शकत नाही . सॉल्व्हन्ट १००% बाहेर काढला जातो .लहान मुलांना सप्लिमेंटरी फूड म्हणून नाचणी पेंड , शेंगदाणा पेंड , याचा उपयोग केला जातो हे सत्य आहे मात्र बाळाचं आई आधी त्याला दिवस भरात लिटरभर दूध पाजते हे हि खरे आहे .एक्सट्रेक्शन चे रसायन पोत्यातून आणले जाते किंवा "आमचे अज्ञान आहे ' हे शब्द आमचे नसून आपणच व्यक्त केलेले (अज्ञानजन्य) हे विशुमित यांनी सविस्तर सांगा असे सांगितल्या वर ते मी उध्द्रुत केले आहेत . गैर समजातून असे घडू शकते .
मत मतांतर असू शकते पण विरोधाला विरोध ,द्वेषमूलक आणि अज्ञानजन्य सारखे शब्द मनाला कुठेतरी खिन्न करतात .कांही गोष्टी सोप्या भाषेत सांगताना थोड्या चुका होऊ शकतात पण हि शास्त्रीय माहिती असून हि हा अमुक पक्षाचा ,अमुक महाराजांचा समर्थक असा रबर स्टॅम्प विनाकारण मारला जातो . हि माहिती फक्त अभ्यासाने किंवा अनुभवाने आपण सांगू शकतो . श्री खरे साहेब आपल्या माहिती व समर्पक विषय मांडणी बद्दल पुन्हा एकदा आदर व्यक्त करून विराम देतो ..

सॉलव्हन्ट एकस्ट्रक्शन प्लांट मध्ये तेल बियांतील तेल काढण्या साठी जे केमीकल वापरण्यात येतात ती प्राणिमात्रा साठी फारच घातक असतात . कार्बन टेट्रा क्लोराईड या सारखी ती केमिकल्स असतात . याचेच पुढचे व्हर्जीन क्लोरोफॉर्म जे माणसास ऑपरेशनच्या वेळी दिले जाते
त्याचा उपयोग लोक पशुखाद्यात त्याची किंमत कमी करण्यासाठी म्हणून ( फिलर ) वापरतात
म्हणजेच या रसायनाचा कांही भाग या चोथ्यात निश्चितच शिल्लक राहत असणार .

दुधाचे फॅट पण कमी होते व जनावरांना निकृष्ट प्रतीचा व विषारी खुराक मिळतो
हि सर्व आपलीच विधाने आहेत. ती मी पुराव्यानिशी खोडून काढली आहेत.
द्रावक म्हणून कार्बन टेट्राक्लोराइड वापरले जाते ( ते विषारी आहे हे मान्य) हे आपण कोणत्या आधारावर लिहिले आहे.
उरलेली पेंड विषारी असते हेही आपण कोणत्या आधारावर बोलत आहात.

Groundnut cake is a livestock feed, mostly used by cattle as protein supplements.[36] It is one of the most important and valuable feed for all types of livestocks and one of the most active ingredient for poultry rations. स्रोत विकिपीडिया
भारतातील शेतकरी शेकडो वर्षांपासून ही शेंगदाणे, सरकी इ ची पेंड जनावरांना उत्तम पशुखाद्य म्हणून देत आलेले आहेत.

तेंव्हा ते निकृष्ट किंवा विषारी असण्याचे आपले विधान चूक आहे.
हान मुलांना सप्लिमेंटरी फूड म्हणून नाचणी पेंड , शेंगदाणा पेंड , याचा उपयोग केला जातो हे सत्य आहे मात्र बाळाचं आई आधी त्याला दिवस भरात लिटरभर दूध पाजते हे हि खरे आहे.
सहा महिन्यापर्यंतच मुलाला आईचे दूध पोषणासाठी पुरेसे असते. यानंतर त्याला इतर घाण आहार देण्याची गरज असते येथेच गरिबीमुलांचे कुपोषण होते. आईने एक लिटर दूध पाजले ( ही अर्थातंच अतिशयोक्ती आहे) तरी त्यात ९८ टक्के पाणी असते आणि १.१% प्रथिने असतात. यामुळेच आदिवासी भागात मुलांचे कुपोषण होते. यासाठीच आहार तज्ज्ञांनी स्वस्त आणि अतिशय पोषक असलेली शेंगदाण्याची पेंड वापरून आहार तयार केले आहेत.
साधा हिशेब केलात तर आपल्याला लक्षात येईल कि एक लिटर आईच्या दुधात फक्त ११ ग्राम प्रथिने असतात.(स्रोत विकी) एक वर्षाच्या बाळाला( १० किलो वजन) रोज २० ग्रॅम प्रथिने लागतात. हि प्रथिने पुरवण्यासाठी सहा महिन्यांनी ठोस( घाण आहार देण्याची गरज पडते) १०० रुपये किलोची डाळ देण्यापेक्षा (२५ % प्रथिने) स्वस्तात उपलब्ध असली पेंड २५-३० रुपये किलो ( ४१ % प्रथिने) हि नक्कीच चांगली आहे.
राहिली गोष्ट कच्ची घानी का तेल हे काही रामदेव बाबानी काढलेले नवीन उत्पादन नाही. कमीत कमी १५ उत्पादक तरी ते तेल तयार करत आहेत अगदी "अडानी" यांचा उद्योग फॉर्च्युन यांचे हे उत्पादन कित्येक वर्षे उपलब्ध आहे. आणि याची किंमत १३० रुपये लिटर आहे तर रामदेव बाबांचे तेल कमीत कमी किंमत १२५ रुपये लिटर ला आहे. http://www.fortunefoods.com/products/cooking-oil/fortune-kachi-ghani-mus...
ज्या तर्हेने त्यांनी आपले विपणन/जाहिरात केलेली आहे त्याने शहरी लोकांना असे वाटते बाबा रामदेवांनी काही तरी जादुई उत्पादन शोधून काढले आहे.
माझे म्हणणे एवढेच आहे कि एखाद्या गोष्टीची भलामण करण्यासाठी सज्जड पुरावा असायला हवा. बाबा रामदेव केवळ मोठ्या उद्योगपतींना किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देतात म्हणून त्यांचे विपर्यस्त दावे मान्य करता येणार नाहीत. आपली रेषा मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेषा लहान करने हि गोष्ट चूक आहे.
खाली धर्मराज मुटके यांनी अतिशय योग्य असा प्रतिसाद दिला आहे. त्यात मी अधिक काही लिहू शकत नाही.

फेदरवेट साहेब's picture

14 Sep 2016 - 10:13 am | फेदरवेट साहेब

त्याला इतर घाण आहार देण्याची गरज

अरे रे!

बाकी विकिपीडिया बद्दल आमच्या श्रद्धास्थानाचे मत खालीलप्रमाणे

.

सुबोध खरे's picture

14 Sep 2016 - 10:16 am | सुबोध खरे

अर्रर्र
आय माय स्वारी
ते ठोस बरोबर घन लिहिले होते पण प्रत्यक्ष घाण आले.
स्वारी बरं का ?

आई एक लिटर दूध बाळाला पाजते'' जरूरी नाही ते सर्व आईचे असेल इतर स्त्रोत म्हणजे गाईचे कींवा म्हशीचे असा घ्यावा.

विवेकपटाईत's picture

18 Sep 2016 - 6:49 pm | विवेकपटाईत

आस्था चेनेल वर तेल काढण्याची विधी कित्येकदा दाखविली आहे. ती पाहून निष्कर्ष काढू शकतात. बाकी मला पद्धत जुन्या काळातली वाटली. अनेक घाणे फिरताना दिसत होते. (अश्या घाण्या मी जुन्या दिल्लीत तेलवाल्या गल्लीत बघितल्या होत्या)/. अधिक काही सांगू शकत नाही.