नलेश पाटील गेले.....

उदय ४२'s picture
उदय ४२ in जनातलं, मनातलं
8 Sep 2016 - 8:45 am

मुसळधार गुंत्यातून सोडवून आणलेला
माझ्यापाशी आहे एक दोरा पावसाचा...

धुक्यातल्या दिवसाचा, आभाळाच्या नवसाचा
विणत राहीन म्हणतो, एक शेला झऱ्याचा...

घेईल जो अवतार कधी काळी नदीचा
आशय ज्याचा असेल कबीराच्या दोह्याचा...

- नलेश पाटील

कवी नलेश पाटील
कालवश झाले.
आदरांजली

कलासद्भावना

प्रतिक्रिया

कविता आवडली. कवी नलेश पाटील यांना श्रद्धांजली.

मितान's picture

8 Sep 2016 - 9:43 am | मितान

अरेरे ! पाऊस मुका झाला :(
श्रद्धांजली !!

कविता१९७८'s picture

8 Sep 2016 - 10:03 am | कविता१९७८

श्रद्धांजली !!

प्रभास's picture

8 Sep 2016 - 11:18 am | प्रभास

काय सुंदर कविता आहे...
नलेशजींना श्रद्धांजली...

अजया's picture

8 Sep 2016 - 11:22 am | अजया

_/\_
श्रध्दांजली

अशोक पतिल's picture

9 Sep 2016 - 10:45 pm | अशोक पतिल

भावपुर्ण श्रध्दांजली

लीना कनाटा's picture

11 Sep 2016 - 10:34 pm | लीना कनाटा

नलेश पाटील या कवीचे नाव ऐकले होते व त्यांच्या काही कविता वाचनात आल्या होत्या तेव्हा हा कवी ग्रामीण भागातील, शेतकरी वगैरे असावा असे वाटले होते. त्यांची कौटुंबिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी माहित नव्हती.

बालपणात निसर्गाशी जुळलेली नाळ पुढे इंग्रजी माध्यमातील शिक्षण, मुंबई सारख्या शहरातील वास्तव्य, जाहिराती सारख्या हुच्चभ्रू क्षेत्रात व्यवसाय असून देखील टिकून राहिली आणि इतकेच नव्हेतर कवितेच्या माध्यमातून तेही मराठी मध्ये अभिव्यक्त होत राहिली हे खरेच कौतुकास्पद आहे.

या कवीचा कविता संग्रह असल्यास कल्पना नाही परंतु त्यांच्या आणखी कविता वाचायला नक्कीच आवडतील.

त्यांच्या आत्म्यास मुक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

ओम शांती शांती शांतिः II