चतुर- प्रकाशचित्र समीक्षा

झकासराव's picture
झकासराव in काथ्याकूट
25 Sep 2008 - 8:53 pm
गाभा: 

मित्रहो,

मी मध्यंतरी कोल्हापुर सोलापुर असा दौरा करुन आलो. त्यावेळी सोलापुरात भरपुर चतुर दिसले होते. त्यांचे फोटो काढणे हे अम्मंळ कठीण काम.
ते एका जागी स्थिर नसतात. पण एक चतुर घराबाहेरच्या जास्वंदीच्या पानावर विश्रांती घेत असल्याचे दिसले. म्हणुन मी हा फोटो काढला.
मला फोकल लेन्थचा फन्डा अजुन कळालेला नाहिये. फोटो काढताना फोकल लेन्थ कशी कळेल???
त्यामुळे हा फोकसिन्गचा त्रास होतोय की मला अजुन माझ्या कॅमेर्‍यातील मॅन्युअल फोकसीन्गची
व्यवस्था कळाली नाही हेच समजत नाही. पण मला स्वःताला अस वाटतय की हा फोटो अजुन चांगल्या प्रकारे फोकस व्हायला हवा होता.
तुमच काय मत आहे???

हा फोटो मी पिकासामध्ये क्रॉप केला आहे. बाकी काही त्यात फेरफार केलेले नाहीत.
पण हा जालावर चढवताना ह्याची मेमरी साइझ कमी व्हावी म्हणुन पेन्ट मध्ये इमेज स्ट्रेच / स्क्यु असा ऑप्शन आहे त्यात जावुन ५० % ५०% कमी केला आहे.
त्यामुळे जरी ह्याची मेमरी साइझ कमी झाली असली तरी प्रत्यक्ष फोटोची देखील साइझ कमी झाली आहे.
म्हणुन परत कॅमेर्‍यात मुळ फोटो पहात होतो पण तो मी डिलीट केला होता.
असो.
ह्या फोटोची एक्जिफ इन्फॉ.

Camera: SONY
Model: DSC-H7
ISO: 400
Exposure: 1/20 sec
Aperture: f/3.2
Focal Length: 14.1mm
Flash Used: No
Latitude: n/a
Longitude: n/a
hand held

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 9:05 pm | प्रभाकर पेठकर

ISO: 400 कशाकरीता? एवढा अंधार होता? मला वाटते दिवसाच्या प्रकाशात १०० किंवा २०० ISO पुरेसा व्हावा. किंचित ओव्हर एक्स्पोज झाल्या सारखा वाटतोय. त्यामुळे पंखांची डिटेल्स गेली का?

फोकसिंगही मागच्या पानावर झाल्यासारखे वाटते आहे. चतुर जरा आउट ऑफ फोकस आहे का?

ही मॅक्रोची सेटींग्ज आहेत का? (त्यातलं आपल्याला काही कळत नाही बुवा!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2008 - 9:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एक्सपोजर १/२० आणि फ ३.२ असताना आय.एस.ओ. ४०० म्हणजे लख्ख उजेड तर नसणार!
आणि एक्सपोजर जास्त असल्यामुळे हात हललाय का नाही, मला नाही ठरवता येत आहे? झकासराव स्टँड वापरला का हो तुम्ही?

झकासराव's picture

25 Sep 2008 - 9:11 pm | झकासराव

स्टॅन्ड नाही वापरला. एवढा कुठे वेळ. तो चतुर उडुन जाइल म्हणून घाइ सगळी.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

धनंजय's picture

25 Sep 2008 - 10:07 pm | धनंजय

फोकस आणखी शार्प आवडला असता. माझा कॅमेराही ऑटोवर हमखास मागच्या पानावर वगैरे फोकस करतो. त्यामुळे मी फटाफट ३-४ फोटो काढतो - एखाद्यात तरी फोकस बरोबर येतो.

पण हा फोटो ऑटोवर काढूच नये. जास्तीतजास्त झूम करून ऍपर्चर सगळ्यात मोठे ठेवून (डेप्थ-ऑफ-फोकस कमीतकमी ठेवून) काढावा.

(या बाबतीत माझे "लोका सांगे ब्रह्मज्ञान" असे आहे.)

झकासराव's picture

25 Sep 2008 - 9:10 pm | झकासराव

कॅमेर्‍याच मॅक्रो ऑन होत. ( आता खर सांगायच म्हणजे मला देखील कॅमेर्‍यातील मॅक्रो ऑन केल्याने काय फरक पडतो हे कळालेल नाहिये.)
ISO: 400 कशाकरीता? एवढा अंधार होता? >>>
वातावरण ढगाळ होत. आणि बहुद्धा संध्याकाळची वेळच होती.
हे ISO मी सेट केलेले नाहिये. हा फोटो मी तो चतुर उडून जाइल ह्या गडबडीत ऑटो सेटिन्ग वर काढलेला आहे.
अवांतर : पेठकर काका तुमच्या प्रश्नांमुळे मी देखील नकळत शिकतोय हा. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 10:17 pm | विसोबा खेचर

चतुराचा फोटू क्लासच!

आपला,
(चतूर) तात्या.

लिखाळ's picture

25 Sep 2008 - 10:18 pm | लिखाळ

चतुराचा फोटो इतक्या जवळून काढणे अवघडच आहे.
फोटो आउट ऑफ फोकस आहे. आणि देफ्थ ऑफ फील्डसुद्धा योग्य राहिलेले नाही. मागच्या पानावर फोकस झाले आहे.

चतुराचा फोटो असा वरुन घेण्या ऐवजी थोडा कडेने खालून घेतला तर आकर्षक दिसतो.

ऑटो फोकस कॅमेरा माझा पण आहे. त्यामुळे असे फोटो काढणे आणि ते योग्य डेप्थ ऑफ फिल्डचे असणे अवघड आहे हे मला चांगलेच माहित आहे :(
--लिखाळ.

भाग्यश्री's picture

25 Sep 2008 - 10:21 pm | भाग्यश्री

मला फोटो आवडला! फोकस करणं मलाही कधी नीट जमत नाही.. त्यातून चतूर असेल तर संपलंच.. सेटींग्स करून होईस्तोवर चतूर उडून जाईल.. आणि मला फोटो सुद्धा नाही मिळणार .. :)
तुला पहील्या २ गोष्टी तर जमल्यात.. त्यामुळे बेस्टच! :)

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 10:44 pm | प्रभाकर पेठकर

त्याला फोटोग्राफी विषयात 'फास्ट-फिंगर' असे म्हणतात.

प्राण्यांचे, लहान मुलांचे (हे दोघेही फार चळवळे असतात) फोटो काढण्यासाठी 'फास्ट-फिंगर'ची प्रॅक्टीस करावी लागते.
मॅन्युअल सेटींग्ज मध्ये उपलब्ध प्रकाश, डेप्थ ऑफ फिल्ड ह्यांचा विचार करून हाय स्पीड वर सेटींग्ज ठेवायची आणि नुसत्या फोकसिंग रींगवर नियंत्रण ठेवीत पटापट ५-६ फोटो काढायचे. प्राण्यांना आणि लहान बाळांना पोज देता येत नाही. त्यांच्या नैसर्गीक हालचालीतून फोटोग्राफरला ५-६ एक्स्पोझर मधून चांगली पोझ आणि शार्प फोकसिंग मिळू शकते.

हल्ली कंटीन्यूअस मोड मध्ये मल्टीपल एक्स्पोझर मिळवता येतात. म्हणजे क्लीक ची कळ दाबून धरायची आणि फोकसिंग रींग फिरवत जायचे. कॅमेरा स्वतःहून मल्टीपल फोटो काढत जातो. कुठे तरी शार्प फोकसिंग मिळते. स्पोर्ट्स फोटोग्राफीतही 'ऍक्षन' पकडण्यासाठी हे तंत्र उपयोगी पडते.

शिवा जमदाडे's picture

26 Sep 2008 - 1:30 pm | शिवा जमदाडे

मस्त माहिती पेठकर शेठ...
आमच्या सोनी अल्फा मधे पण असे काहीतरी आहे, ते वापरून बघतो.....

- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

रवि's picture

25 Sep 2008 - 11:02 pm | रवि

DSC03855

एकदा भतकंतीला गेलो असता काढला होता...
बाकी........मॅक्रो ओन होता , एक्पोसर ओटोमॅटिक , फक्त फोकस कडे लक्श द्यावे लागले.....

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

धनंजय's picture

25 Sep 2008 - 11:18 pm | धनंजय

कदाचित कातरून वरचा झळकणारा भाग काढून टाकता येईल...

झकासराव's picture

25 Sep 2008 - 11:10 pm | झकासराव

पण हा फोटो ऑटोवर काढूच नये. जास्तीतजास्त झूम करून ऍपर्चर सगळ्यात मोठे ठेवून (डेप्थ-ऑफ-फोकस कमीतकमी ठेवून) काढावा. >>>>>>>>
हम्म हे अस करुन पहायला पाहिजे खर. आता अशी संधी कधी मिळते काय माहीत.
लिखाळ यानी दिलेली सुचना देखील मस्त. खरतर त्यावेळी कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. मेलं तेच जमत नाही.
त्यामुळे आता लक्षात येत राहत की अरे खरच की असा ऍन्गल घेतला असता तर?? :)
म्हणजे क्लीक ची कळ दाबून धरायची आणि फोकसिंग रींग फिरवत जायचे>>>>>>>>.
हम्म. चांगली आहे ही प्रॅक्टिस. पण माझ्या कॅमेर्‍याला फोकसिन्ग रिन्ग मॅन्युअली नाही फिरवता येत.
एस एल आर मध्ये बहुद्धा फाइन फोकसिन्ग साठी एक वेगळी रिन्ग असते. तुम्ही तीच म्हणताय ना??

अरे हो. सगळ्यानी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. चांगली माहिती मिळत आहे. :)

अवांतर : च्यामारी ते एस एल आर कधी आमच्या बजेट मध्ये येतील काय माहीत. तोवर ही दुधाची तहान ताकावर.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

घाटावरचे भट's picture

25 Sep 2008 - 11:24 pm | घाटावरचे भट

च्यामारी ते एस एल आर कधी आमच्या बजेट मध्ये येतील काय माहीत. तोवर ही दुधाची तहान ताकावर.

निकॉन डी-४० किंवा कॅनन डिजिटल रेबेल सारखे प्राथमिक डिजिटल एस एल आर फार महाग नाहीयेत (हाय एंड पॉईंट अँड शूट कॅमेर्‍याएवढीच किंमत आहे). खरं तर या २ मॉडेल्समुळे बर्‍याच हौशी छायाचित्रकारांना आता एस एल आर च्या सुविधांचा लाभ घेणं शक्य झालंय. या कॅमेरांमधे व्यावसायिक फोटोग्राफरना लागणार्‍या सर्व सुविधा कदाचित नसतीलही (खरं तर नाहीतच) पण तुमच्या आमच्या सारख्या हौशी लोकांसाठी जे आहे ते पण खूप जास्त आहे.

--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

ध्रुव's picture

26 Sep 2008 - 1:04 am | ध्रुव

सगळे म्हणले तसेच फोटो जास्त शार्प असता तरी चालले असते. शटर १/२० - फारच जास्त वेळ शटर उघडे असल्यामुळे हाताची कंपने पण आली असतील असे वाटते.
असे फोटो काढताना मात्र सगळे म्हणाले तसेच मॅन्युअल फोकस ची सोय असलेली भिंगे फारच उपयोगी पडतात.

हा बघा असाच एका चतुराचा फोटो.
Dragonfly

हे चित्र डि४० कॅमेर्‍याने काढले आहे. मॅन्युअल फोकस असूनही डेप्थ फारच कमी आहे त्यामुळे शार्पनेस चांगला आला नाही. पण मागील धुसर झालेली पार्श्वभुमी चांगली पकडता येते.

--
ध्रुव

गणा मास्तर's picture

26 Sep 2008 - 6:24 am | गणा मास्तर

झकासराव चांगला फोटो आहे.
फक्त कोन थोडा उजवीकडुन आनि खालुन हवा होता.
छायाचित्रकलेबाबत येथे वाचा
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

झकासराव,
चतूरचा फोटो आवडला.
:)
रवि आणि ध्रुव यांनी प्रतिक्रीयेत दिलेले चतूर चे फोटो ही एकदम सही..

झकासराव's picture

26 Sep 2008 - 5:52 pm | झकासराव

रवि तुम्ही दिलेला फोटो मस्त आहे. फोकसिन्ग अगदी जबरा चाहे.
धनंजन यानी दिलेल्या सुचनेला अनुमोदन. तो झळाळणारा भाग उगाचच लक्ष वेधुन घेतोय.
धृव तुझा फोटु देखील मस्त आहे.
गणामास्तर लिन्क बद्दल धन्यवाद. मी तिथले सगळे लेख वाचले आहेत.

निकॉन डी-४० किंवा कॅनन डिजिटल रेबेल सारखे प्राथमिक डिजिटल एस एल आर फार महाग नाहीयेत>>>>>>.
नाही हो. तरिही त्याची किमंत माझ्या कॅमेर्‍याच्या दुप्पट असेल की.
माझा कॅमेरा मला १७५०० रु च्या आसपास मिळाला होता.

सर्वानी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

अवांतर : धृवचे फोटोग्राफीमधले कौशल्य बघता त्याने मिसळपाववर एक लेखमाला सुरु करावी अस मला वाटत.
कमीत कमी फोकल लेन्थ कशी ऍडजस्ट करता येइल त्याने काय फरक पडेल ही माहिती तरी द्यावी. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

ध्रुव's picture

3 Oct 2008 - 2:55 pm | ध्रुव

नि़कॉन डि४० हल्ली १७५०० च्या आत मिळतो :)

असो,
बाकी तुम्हाला माझे फोटो आवडले हे ऐकुन बरे वाटले, पण लेखमालिका सुरु करण्याइतका अनुभव अजुन गाठीशी नाही. विचार करुन काही लिहायला जमले तर नक्की प्रयत्न करुन बघेन.

कमीत कमी फोकल लेन्थ कशी ऍडजस्ट करता येइल त्याने काय फरक पडेल
हे मात्र कळले नाही. फोकल लेन्ग्थ ही मिलीमिटर मध्ये मोजतात. लेन्सची फोकल लेन्थ जितकी जास्त तितकी छायाचित्र जवळुन काढण्याची सोय. त्यामुळे जास्त फोकल लेन्थ वाल्या लेन्स ने चित्र घेतले असत आपण चित्रातील सब्जेक्ट्च्या जास्त जवळ जातो.

--
ध्रुव

सर्वसाक्षी's picture

4 Oct 2008 - 12:48 am | सर्वसाक्षी

झकासराव,

अचूक किरण साधण्यासाठी प्रतिमा पटलावर न पाहता थेट दृश्यभिंगातून पाहा, बरे असते.
दुसरे असे की डिजीटल कॅमेर्‍याचा ठेका १-२-३ नसून १-३-२ आहे.
१ - दृश्य पहा २ - चौकट बांधा ३ - किरण साधा या ऐवजी १ - दृश्य पहा ३ - किरण साधा २ - चौकट बांधा .
म्हणजे काय टिपायचे ते ठरवा, मग किरण साधा आणि अर्धी दाबलेली कळ न सोडता तशीच दृश्यचौकट बदला व योग्य चौकट मिळताच कळ दाबा.

देवदत्त's picture

4 Oct 2008 - 8:23 am | देवदत्त

चांगले आहे प्रकाशचित्र.
वर मिळालेल्या माहितीवरून पुढील आणखी चांगली प्रकाशचित्रे काढण्याकरीता शुभेच्छा (तुम्हाला आणि मलाही ;) )
धृव आणि रवि ह्यांनी दिलेली चित्रेही छान आहेत.

(बाकी सोनीचा नवीन 'ऑटो क्लिक' की काहीतरी कॅमेरा येत आहे. त्यात चेहर्‍यावर हास्य दिसताच तो कॅमेरा आपोआप फोटो काढतो. ह्यात चतुर आणि इतर प्राणी पक्षी ही हसले की ऑटो क्लिक होईल का? ;) )