.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
साहित्यः
दोन वाट्या खवा,
एक वाटी पिठी साखर,
एक टेबल स्पून कोको पावडर,
दोन तीन थेंब व्हॅनिला इसेन्स.
कृती:
एक वाटी खवा आणि अर्धी वाटी पिठी साखर कढईत एकत्र करावे. व्हॅनिला इसेन्स घालून मंद गॅसवर ढवळत रहावे. बटर पेपरला तूप लावून घ्यावे. खव्याचा गोळा झाला की बटर पेपरवर थापावे.
.
आता कढईत परत एक वाटी खवा, अर्धी वाटी पिठीसाखर, एक चमचा कोको पावडर घ्यावी. एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावे. त्याचा गोळा झाल्यावर पहिल्या थापलेल्या खव्यावर थापावे.
.
दहा मिनीटे गार होऊ द्यावे. आता बटर पेपरसह रोल करण्यास घ्यावा. गुंडाळी करून बटर पेपर सोडवत जावे.
.
रोल तयार झाल्यावर हाताने अलगद फिरवून घट्ट वळावा.
गार झाल्यावर कापावा. माझा पहिला थर थोडा पातळ थापला गेला. पण चवीला एकदम मस्त!
आणि बाहेरच्या मिठाईपेक्षा तर बाप्पाला नक्कीच आवडेल. याचा रोल नसेल जमत तर फक्त दोन थर देऊन बर्फी करा.
प्रतिक्रिया
14 Sep 2016 - 8:51 am | अजया
सुंदर सोपी पाकृ.
14 Sep 2016 - 9:58 am | प्रचेतस
भारी दिसताहेत रोल. पाकृ पण खूपच सोपी.
14 Sep 2016 - 9:59 am | पियुशा
वा मस्त लहान मुलाना प्रचन्ड आवडेल हा खाउ :)
14 Sep 2016 - 10:02 am | यशोधरा
वा! मस्त!
14 Sep 2016 - 10:29 am | सपे-पुणे-३०
छान दिसतोय. साहित्यही फार नाही आणि कृतीपण सोपी आहे. करून पाहीन.
14 Sep 2016 - 10:34 am | पैसा
फारच सुरेख!
14 Sep 2016 - 11:19 am | स्वाती दिनेश
रोल्स मस्तच आहेत. मस्तच!
स्वाती
14 Sep 2016 - 11:43 am | पूर्वाविवेक
फारच सुरेख. सणासुदीला बाहेरच्या मिठाईत होणारे भेसळीचे प्रमाण फार वाढले आहे. घरच्या घरी केलेली शुद्ध मिठाईचं बाप्पा आणि आपल्यासाठी योग्य आहे.
14 Sep 2016 - 11:57 am | अनन्न्या
म्हणूनच मी पटकन होणाय्रा पध्दती शोधत असते. झटपट आणि चविष्ट!
14 Sep 2016 - 1:37 pm | पद्मावति
खुप मस्त!
14 Sep 2016 - 1:40 pm | स्मिता चौगुले
मस्त आणि करुन बघण्यासाठी मस्ट
14 Sep 2016 - 2:47 pm | प्रभाकर पेठकर
पाककृती आवडली.
पण एक नाही कळलं. चॉकलेट रोल साठी व्हॅनिला एसेन्स का? चॉकलेट एसेन्स जास्त योग्य वाटतं. चॉकलेटची चव जास्त उभारून येईल. असो.
14 Sep 2016 - 3:11 pm | अनन्न्या
त्याऐवजी वेलची पावडरही चालेल पण दुसरा थर चॉकलेट आहे म्हणून मी व्हॅनिला घेतलय. चॉकलेटमध्ये नाही.
14 Sep 2016 - 2:55 pm | सूड
सुंदर!!
14 Sep 2016 - 4:07 pm | सस्नेह
छान सोपी पाकृ. दिसायला टेंप्टिंग !
14 Sep 2016 - 7:30 pm | विवेकपटाईत
सोपी आणि मस्त कृती. लहान मुलांना सोडा आमच्या सारख्या पांढरे केस वाल्यांनाही आवडेल.
14 Sep 2016 - 7:48 pm | त्रिवेणी
धन्य आहेस तू.मस्त दिसतायत रोल.
14 Sep 2016 - 8:25 pm | प्रीत-मोहर
स्लर्प रेसिपी!!
14 Sep 2016 - 8:31 pm | पिलीयन रायडर
कसलं काय काय सुचतं! ही पाकृ सुद्धा आवडली!
14 Sep 2016 - 8:53 pm | रेवती
रोल्स आवडले. खव्याचा थर जास्त आवडला. रंग चांगला आलाय.
14 Sep 2016 - 10:02 pm | रुपी
वा! मस्त आणि सोपी वाटत आहे रेसिपी.
लहानपणी आमचा एक मित्र "राजमलाई" नावाची टॉफी आणायचा - एकदम भारी लागायची. ती अशीच असावी बहुतेक!
14 Sep 2016 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा
आवल्लं..
मी एकदोन खाल्ल्यापन
14 Sep 2016 - 10:22 pm | सही रे सई
मस्त पाकृ.. आणि सादरीकरण पण उत्तम.शेवटच्या फोटोवरून बाकरवडीची आठवण झाली. पाकृ आहे का कोणाकडे बाकरवडीची.
14 Sep 2016 - 10:45 pm | यशोधरा
बहुतेक आहे, उद्या देईन असली तर.
15 Sep 2016 - 3:34 am | रुपी
मिपावर आधी येऊन गेली आहे - http://www.misalpav.com/node/3882
15 Sep 2016 - 3:56 am | सानिकास्वप्निल
चविष्ट पाकृ. रोल्स देखणे दिसत आहेत.
15 Sep 2016 - 3:27 pm | इशा१२३
छान पाकृ.!
16 Sep 2016 - 12:39 pm | दिपक.कुवेत
खव्याचा हा असा उपयोग पहिल्यांदा पाहिला. खाल्लाक्षणी रोल्स तोंडात विरघळतील ह्यात शंकाच नाहि.
17 Sep 2016 - 12:48 am | विशाखा राऊत
खुप मस्त दिसत आहेत. :) आवडली रेसेपी
17 Sep 2016 - 11:46 am | पिंगू
रोल्स उचलून तोंडात टाकावेसे वाटताहेत..
17 Sep 2016 - 4:28 pm | मनिमौ
कसले सही आहेत रोल. करायला पण खुप सोपे आहे
घरात एखाद्या कार्यक्रमाला पटकन करता येईल