बाप्पाचा नैवेद्य - खव्याची पोळी

पूर्वाविवेक's picture
पूर्वाविवेक in लेखमाला
14 Sep 2016 - 8:14 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

खव्याची पोळी
.

गोड, खुसखुशीत, तोंडात विरघळणारी खव्याची पोळी चवीला अप्रतिम लागते. करायलाही खूप सोप्पी.
साहित्य :
तांदूळ पीठ किंवा मैदा - आवश्यकतेनुसार लाटण्यासाठी
साजूक तूप- आवश्यकतेनुसार भाजण्यासाठी
पोळीसाठी :
गहू पीठ (कणीक)- १ कप
मैदा- १/२ कप
बारीक रवा- १/४ कप
तेल (मोहन)- १/४ कप
मीठ- १/४ टीस्पून
पाणी - अंदाजे ३/४ कप ते १ कप
सारणासाठी :
खवा- १ कप (२०० ग्रॅम )
खसखस- १ टेबलस्पून
पिठीसाखर - ३/४ कप ते १ कप
जायफळ किंवा वेलची पूड - १ टीस्पून
कणीक- १/४ कप
साजूक तूप- १ टीस्पून
दूध- १ चमचा (जर आवश्यकता वाटली तरच )

कृती :
कणीक, मैदा, रवा व मीठ एकत्र करावे, मग कडकडीत मोहन घालून कणीक दोन तास भिजवून ठेवावी. कणीक नेहमीपेक्षा घट्ट असायला हवी नाहीतर पोळी चिवट होते.
खसखस खमंग भाजून जाडसर कुटून घ्यावी.
पिठीसाखरेतील गुठळ्या मोडून घ्याव्यात.
कणीक १ टीस्पून तुपावर खमंग भाजावी. दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवावी.
खवा मंद आचेवर गुलाबीसर भाजून घ्यावा आणि तो खवा कोमट असतानाच गाठी मोडून मळून घ्यावा.
खवा, भाजलेली कणीक, पिठीसाखर, खसखस कूट, वेलची पूड एकत्र करून सारण छान मऊसर मळून घ्यावे. सारण खूप कोरडे वाटल्यास दुधाच्या हाताने मळून घ्यावे. गुठळ्या अजिबात असू नयेत.
सारणाचे लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करावेत.
कणकेचेसुद्धा लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करावेत.
हाताला तूप लावून कणकेचा एक गोळा घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करून त्यात सारणाचा गोळा भरून (पुरण पोळी प्रमाणे) तोंड बंद करावे.
तांदळाच्या पिठावर नेहमीप्रमाणे हलक्या हाताने पोळी लाटावी. खव्याचे सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी.
पोळी मंद ते मध्यम आचेवर तव्यावर गुलाबी रंगावर भाजावी. भाजताना बाजूने थोडे थोडे तूप सोडून भाजावी. अशा प्रकारे सर्व पोळ्या करून घ्याव्यात.
गरमागरम असतानाच दुधासोबत वरून तुपाची धार सोडून खायला द्यावी.
टीप:
तुमच्याकडे खव्याचे पेढे-बर्फी काही उरले असेल तर त्यापासूनही करता येईल. फूड-प्रोसेसर मध्ये पेढे-बर्फी, अगदी थोडेसे दूध आणि चवीप्रमाणे पिठीसाखर टाकून छान मळून घ्या. सारण तयार. बाकी कृती वरील प्रमाणेच.

प्रतिक्रिया

पोळ्यांचं आणि माझं वाकडं आहे! पण तुझ्या फोटोतल्या पोळ्या बघून तोंपासु वाटतंय.तुझ्याकडे येऊन खाईन म्हणते ;)

पियुशा's picture

14 Sep 2016 - 9:56 am | पियुशा

सु प्प र डु प्प र !!!!!

सुबोध खरे's picture

14 Sep 2016 - 10:14 am | सुबोध खरे

तोंपासू

कविता१९७८'s picture

14 Sep 2016 - 10:45 am | कविता१९७८

मस्त

स्वाती दिनेश's picture

14 Sep 2016 - 11:05 am | स्वाती दिनेश

फारच सुरेख दिसत आहेत खव्याच्या पोळ्या,
स्वाती

अनन्न्या's picture

14 Sep 2016 - 12:00 pm | अनन्न्या

मी खव्यात खसखस नाही घालत, आता बघेन अशा करून!

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2016 - 12:42 pm | दिपक.कुवेत

माझी आजी मस्त करायची अश्या पोळ्या....अजूनहि आठवतात. पण तीने सुद्धा कधी खसखस घातल्याचं आठवत नाहिये. पण ह्या पोळ्या माझ्या ऑल टाईम फेवेरेट. फोटो आणि पाकृ दोन्हि लाजवाब.

पैसा's picture

14 Sep 2016 - 12:09 pm | पैसा

सुपर्ब!

पद्मावति's picture

14 Sep 2016 - 12:14 pm | पद्मावति

आहाहा!!!

प्रभास's picture

14 Sep 2016 - 12:36 pm | प्रभास

सोपी पण चविष्ट... बासुंदीबरोबर मस्तच!

पैसा's picture

14 Sep 2016 - 2:11 pm | पैसा

बासुंदीबरोबर खव्याची पोळी? चौदा पंधरा तास बेशुद्ध पडल्यासारखे झोपाल!

प्रभास's picture

14 Sep 2016 - 5:16 pm | प्रभास

:)

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2016 - 12:44 pm | दिपक.कुवेत

छ्या हा दोन्ही पदर्थांचा स्वतंत्ररित्या केलेला अपमान आहे......

स्मिता चौगुले's picture

14 Sep 2016 - 1:37 pm | स्मिता चौगुले

सोपी अन चविष्ट

यशोधरा's picture

14 Sep 2016 - 1:41 pm | यशोधरा

छान पाककृती!

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2016 - 2:54 pm | प्रभाकर पेठकर

अगदी चित्ताकर्षक पाककृती आहे. करून पाहिलीच पाहिजे. पण आमच्या इथे (मस्कतात) खसखस वर बंदी आहे. त्यामुळे विनाखसखस करून पाहेनच.

फोटो आवडले. खव्याच्या पोळ्या मी कधी केल्या नाहीयेत पण खायला आवडल्यात. करतानाही पाहिल्यात खव्याचे सारण बाहेर येईल काय असे वाटत राहते.

पुंबा's picture

14 Sep 2016 - 6:16 pm | पुंबा

तोंपासु...

पिलीयन रायडर's picture

14 Sep 2016 - 8:30 pm | पिलीयन रायडर

नेहमीप्रमाणेच उत्तम पाकृ!

खव्याची पोळी अतिशय आवडते.
तू लिहिलं आहेस तसं माझी आई घरात पेढे भरपूर आले की बनवते. खरं तर आईच्या हातच्या पुरणपोळीपेक्षाही खव्याची जास्त आवडते, मात्र एखादीच खाल्ली जाते.

सानिकास्वप्निल's picture

15 Sep 2016 - 4:00 am | सानिकास्वप्निल

मला खूप आवडते खव्याची पोळी पण मीसुद्धा विनाखसखशीची खाल्लीये, आता तुझ्या पद्धतीने एकदा करेन.
फोटो टेंप्टिंग.