.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
साहित्य :
खवा अर्धा किलो.
भुरा साखर : अर्धी वाटी + थोडी वरून लावण्यासाठी.
वेलची पावडर : १ मोठा चमचा (टेबलस्पून)
साजूक तूप : १ मोठा चमचा (टेबलस्पून)
दूध : १ वाटी
भ्रुरा साखर बनविण्याची कृती :
एका कढईत दीड वाटी साखर घेऊन त्यात पाऊण वाटी पाणी घालावे आणि मध्यम आचेवर तापवून तीनतारी पाक बनवून घ्यावा. पाक तयार झाला की आच बंद करून सतत ढवळत राहावे. हळूहळू पाक घट्ट होत जातो. पांढरी साखर दिसू लागते. सतत ढवळत राहावे. जसजसा पाक थंड होईल, तसतशी साखर घट्ट होऊ लागेल. साखर संपूर्णपणे थंड आणि कोरडी झाली की मिक्सरमधून दळून ध्यावी. आवश्यकता वाटल्यास चाळूनही घ्यावी. ही झाली भुरा साखर.
पेढे बनविण्याची कृती:
पुन्हा एका कढईत खवा घालून मध्यम किंवा त्याहून कमी आचेवर तापवावा. परतत राहावे. हळूहळू खवा पातळ होत जातो. सतत परतत राहावे, म्हणजे तळाला लागून जळणार नाही. हळूहळू त्यातील पाणी आटून खवा मिळून यायला लागतो. खवा अशा प्रकारे कोरडा झाला की पाव वाटी दूध त्यात मिसळून ढवळावे. परतत राहावे. ही कृती दर थोड्या थोड्या वेळाने करत राहून (खवा कोरडा झाला की) सतत परतत राहावे. खव्याचा रंग बदलून तपकिरी होऊ लागतो. सर्व दूध संपल्यावर वेलची पावडर घालावी, एक मोठा चमचा (टेबलस्पून) साजूक तूप घालून सर्व मिसळावे. नीट मिसळले गेले की अर्धी वाटी (किंवा त्याहून कमी) भुरा साखर त्यात मिसळून घ्यावी.
आच बंद करून सर्व मिश्रण ताटात काढून घ्यावे आणि थंड होऊ द्यावे. (दोन ते तीन तास)
एका बशीत भुरा साखर घेऊन थंड झालेल्या खव्याचे पेढे बनवून साखरेत घोळवून एका ताटलीत नीट मांडून ठेवावेत. हे पेढे जरा मऊसर असतात, पण ते जसजसे थंड होत जातील (रात्रभरानंतर) तसतसे घट्ट होत जातील.
आकाराने ओबडधोबड असले तरी चवीला मस्त असतात.
हे पेढे बनविण्यासाठी संयमाची खूप गरज असते. मध्य किंवा मंद आचेवर खवा परतताना हात दुखून येतो, पण अंतिम पेढ्यांची चव चाखल्यावर सर्व त्रास सार्थकी लागल्याचा आनंद होतो.
हे पेढे शीतकपाटात १५ दिवस, पण नजरेसमोर २-३ दिवसच टिकतात.
शुभेच्छा...!
टीप :
धारवाडी पेढ्यांसाठी खवा भाजताना गडद तपकिरी रंगावर येईपर्यंत भाजावा लागतो. पण हलका रंग आल्यावर मिळून आलेल्या खव्यात दुधात खललेले केशर, साखर आणि वेलची पूड घालून गोल आणि जरा चपटे केशरी पेढे बनवितात. तसेच केशर न घालता पिवळा रंग आणि जायफळ पूड घालून (वेलची पूड ऐच्छिक) आकाराने लहान पिवळे पेढे बनवितात. दुधाऐवजी खव्यात ताजी साय (फ्रेश क्रीम) घालून मलई पेढे बनतात (खव्याचा रंग बदलू द्यायचा नाही). आपल्या कल्पकतेनुसार मँगो पेढे, बदाम पेढे वगैरे बनविता येतील.
प्रतिक्रिया
6 Sep 2016 - 7:42 am | पैसा
अ प्र ति म!
पेढे हा प्रकार करायला तसा सोपा दिसतोय, पण का कोणजाणे नेहमी विकत आणले जातात आणि मग त्यात साखर जास्त आहे म्हणून बोंब मारणे हेही नेहमीच!
6 Sep 2016 - 7:15 pm | पिलीयन रायडर
खरंच अप्रतिम!!!!!!!
6 Sep 2016 - 7:15 pm | पिलीयन रायडर
खरंच अप्रतिम!!!!!!!
18 Sep 2016 - 11:42 am | पियुशा
अहाहा !
6 Sep 2016 - 8:30 am | नाखु
बप्पा मोरया अगदी प्रसन्न होईल अश्या पेढ्यांनी.
6 Sep 2016 - 8:35 am | ज्ञानव
आमच्या धाकट्याच्या नजरेसमोर २-३ दिवसच राहतील हे मात्र निश्चित..
6 Sep 2016 - 8:35 am | यशोधरा
सुरेख पाककृती.
6 Sep 2016 - 8:41 am | अजया
विकतची भुरा साखर घेऊन प्रयोग केल्या जाईल.मस्त पाकृ आहे.
6 Sep 2016 - 8:42 am | अभ्या..
वर लावलेल्या साकरेने जास्त वेल नरम राहतात का?
6 Sep 2016 - 8:52 am | प्रचेतस
भारी.
6 Sep 2016 - 9:29 am | स्वाती दिनेश
धारवाडी पेढे अतिश्शयच आवडते. फोटोही मस्तच आणि पाकृ तर काय? भारीच.
स्वाती
6 Sep 2016 - 10:04 am | इशा१२३
फोटोच बघत बसले.पाकृहि मस्त.
6 Sep 2016 - 10:04 am | इशा१२३
फोटोच बघत बसले.पाकृहि मस्त.
6 Sep 2016 - 10:59 am | संत घोडेकर
मस्त!
तुम्ही मिश्रा पेढेवाल्यांच्या पोटावर पाय आणणार असे वाटते.
6 Sep 2016 - 11:06 am | कंजूस
हुब्बळीला मिश्राच आहे.
6 Sep 2016 - 11:04 am | कंजूस
मला असले खमंग पेढेच आवडतात.आजकाल ओले मऊ पेढे(अमदाबादी),कंदी (सातारा,वाइचे)मिळतात ते नुसढेच गोड लागतात.कंदीत तर खव्याच्या चवीऐवजी कणकेची चव येते.अलिबाग/चौल येथे फफेबंधुंकडे मिळतात.विजापुरात कृष्णा डेअरी.(बेळगावकडे कुंदा असतो)होस्पेट - नंदिनी डेअरी.गोरेगाव - सप्रे स्वीट्स.
पेढ्यांवर एक लेख लिहा सवडीने.
6 Sep 2016 - 11:18 am | अभ्या..
पुलंनी लिहिलेली असा मी असामी मधील मास्टर शंकरची मिस आठवली. लिपस्टीक लावून तिला मामा फफे हे बोलायला लावायची बेंबट्याईच्छा आठवली.
6 Sep 2016 - 11:46 am | अनन्न्या
आता प्रसादाला नक्की करून बघते.
6 Sep 2016 - 11:49 am | सस्नेह
दोनच महिन्यापूर्वी धारवाडला जाणे झाले होते..पण तिथले पेढे काही फोटोतल्याइतके देखणे दिसले नाही बरं !
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट..
6 Sep 2016 - 11:58 am | पद्मावति
वाह! अप्रतिम दिसताहेत पेढे.
6 Sep 2016 - 1:35 pm | Mrunalini
पेढे मस्तच दिसतायत काका.. घरात थोडा खवा आहेच. त्याचे करुन बघते आज हे पेढे.
6 Sep 2016 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्तं ! पेढे आवडता प्रकार आहे. खव्यात 'खोट' नसली तर साखरेला न घाबरता खूप खाल्ले जातात :)
6 Sep 2016 - 3:57 pm | रेवती
मस्त पाकृ व फोटो नेहमीप्रमाणेच आकर्षक आहे.
6 Sep 2016 - 5:03 pm | सूड
वाह!!
6 Sep 2016 - 7:09 pm | बोका-ए-आझम
असा तिहेरी योग आहे!
6 Sep 2016 - 7:30 pm | अभिजीत अवलिया
धारवाडी पेढे खूप मस्त लागतात.
6 Sep 2016 - 8:00 pm | संदीप डांगे
व्वा! आम्हा गोडघाशांना ही मेजवानी झकास!
सुरुवातीला चारच जिन्नस बघून मनात म्हटलं, अरेवा, सोपी आहे, फटक्यात करुन टाकू. नंतर पाकृ वाचता वाचता लक्षात आलं हे खरंच संयमाचं काम आहे. आपलं आणि संयमाचं वाकडं असल्याने बायकोला त्रास दिला जाईल! ;))
6 Sep 2016 - 8:58 pm | सई कोडोलीकर
पेढे खुपच छान दिसतायत काका. त्यामागच्या कौशल्याला आणि मेहनतीला सलाम!
6 Sep 2016 - 9:41 pm | नूतन सावंत
सुरेख फोटो नि पाककृतीही.
6 Sep 2016 - 11:11 pm | रुपी
सुंदर दिसत आहेत पेढे. छान पाकृ :)
खरंच फारच संयम लागत असणार हे बनवायला..
6 Sep 2016 - 11:31 pm | एस
सुंदर पाककृती. रच्याकने खवा ह्या प्रकारातल्या भेसळीमुळे खव्याचे पदार्थ शक्यतो टाळतोच. खव्यातली भेसळ कशी ओळखावी?
6 Sep 2016 - 11:32 pm | स्रुजा
क्या बात हे !!!
7 Sep 2016 - 1:00 am | विशाखा राऊत
वाह किती मस्त
7 Sep 2016 - 10:43 am | स्मिता चौगुले
वाह!! मस्त
7 Sep 2016 - 4:18 pm | स्मिता_१३
मस्त पाक्रु !!!
7 Sep 2016 - 6:03 pm | अनिता ठाकूर
सुंदर!
7 Sep 2016 - 7:37 pm | भुमी
वेळ काढून करून बघणार....
7 Sep 2016 - 7:59 pm | नीलमोहर
ही पाकॄ हवीच होती, धन्यवाद.
8 Sep 2016 - 3:16 am | कंजूस
एबीपी माझाच्या कार्यक्रमात आज(७)मथुरा पेढे दाखवले होते त्यात दुधात भाजलेला खवा टाकून नंतर हीच कृती दाखवली त्यामुळे बघता आले.
8 Sep 2016 - 7:59 am | सामान्य वाचक
पेढे खावे ते हेच
पुण्यातल्या पावडरच्या पेढ्याला हि चव नाही हो
8 Sep 2016 - 12:06 pm | पैसा
'पुणे तिथे काय उणे' असं म्हणतात बा!
8 Sep 2016 - 12:36 pm | सामान्य वाचक
पण खरे सांग, पेढे पावडर चे असतात कि नै
8 Sep 2016 - 1:08 pm | पैसा
नाहीतर कोणीतरी माझा लकडीपुलावर झाईर सत्कार करतील. =))
8 Sep 2016 - 3:43 pm | सानिकास्वप्निल
धारवाडी पेढ्यांची पाकृ फार फार आवडली, नक्की करणार मी.
फोटो +११११
11 Sep 2016 - 10:35 pm | शिव कन्या
मधुर गोड.
पण भुरा साखरेला काय पर्याय असेल तर सांगा ना!
13 Sep 2016 - 2:05 am | प्रभाकर पेठकर
भुरा साखर वापरलीच पाहिजे असे नाही. सतारी कंदी पेढे म्हणूनही चालतीलच की.
13 Sep 2016 - 12:07 pm | शिव कन्या
हो, हे बरे!
धन्स.
13 Sep 2016 - 2:40 pm | पूर्वाविवेक
पेढे-बर्फी यामध्ये आवडणारा हा एकमेव प्रकार. फारच रुचकर दिसतेयेत.
13 Sep 2016 - 6:26 pm | मनिष
मस्त!!!!
16 Sep 2016 - 9:17 pm | दिपक.कुवेत
खास पेठकरी पाकृ. नानकचा खवा वापरून होतील का?