काही तोंडी लावणी

औरंगजेब's picture
औरंगजेब in पाककृती
30 Aug 2016 - 10:45 pm

जर घरात पोळी आणि भाताशी काहीही खायला नसेल तर खालील पदार्थ करता येतील.
स्वतःच्या जबाबदारीवर हे पदार्थ करावेत. मी केले तेव्हा मला आवडले. ते तुम्हाला आवडतीलाच अस काही नाही.

लोणचे+दाणे
भाताबरोबर खायला उत्तम. साधे शेंगदाणे भाजून घ्यायचे मग त्यावर लोणच्या चे तेल घालायचे. सगळे एकदम मिक्स करा. मग आनंदाने खाणे.

दाणेकूट+ तूप + साखर
ह्याचे प्रमाण २:१:१ असे आहे. दोन चमचा दाणे कूटला १ चमचा तूप आणि एक चमचा पिठी साखर. मिक्स करा आणि मस्त खा पोळी बरोबर

अजून काही ऑपशनल तोंडी लावणी दिली आहेत त्याची कृती मला माहित नाही.

१- पोहा डांगर
२- सांडगी मिरची [ दही भातात बरोबर कोथिंबीर घालून खावी]
३- कॉर्न फ्लेक्स
४- बटाटा भरीत [ दही + उकडलेले बटाटे + तिखट + दाणे कुटं + मीठ + साखर]

बाकी मिपाकर अनाहिता सुगरणी आहेत त्या अजून सुचवू शकतील.

पाककृती सदरात टाकलेले हे माझे पहिलेच पाऊल आहे जरा सांभाळून घ्या :-)

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

30 Aug 2016 - 11:18 pm | पद्मावति

तिखट, मीठ आणि गोडा मसाला यावर तेल. जमलं तर त्यात कांदा, कोथिंबीर चिरून टाका. भाजलेला पापड चुरून टाका. हे अगदी बेर बोन्स तोंडी लावणं. अजुन सुचेल तसं लिहीन.
पोळी असल्यास तिचे बारीक तुकडे करा. त्यामधे लिंबाच्या लोणच्याचा खार टाका. लोणचे नसल्यास कच्चं तेल, मीठ, तीखट, कोथिंबीर.

च्यायला मला वाटले लावणीचे ऑडिओ रेकॉर्डिंग वगैरे टाकलंय कि काय?
जल्ला ह्या ता काय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2016 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाबी वाटलं लावणी आहे, बरं पाककृती त्यात फोटू नै, अन त्यात सध्या वाचायचा जाम कंटाळा आलाय. :(

-दिलीप बिरुटे

सप्तरंगी's picture

5 Sep 2016 - 2:07 pm | सप्तरंगी

भुरका, घट्ट वरण फोडणी टाकुन, घोळणा असे हि काही ३-४ मिनिटात करता येईल

मुगडाळ/उडिदडाळ/चणाडाळ भिजवून थोडी वाटून त्यात मिरची फोडणी आणि कांदा चिरून टाकले की डांगर होते.

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2016 - 5:30 pm | प्रभाकर पेठकर

शेंगदाणा तेल + तिखट + मीठ किंवा
वरणाचा गोळा + तिखट + मीठ + शेंगदाणा तेल वगैरे सुद्धा मस्त लागते.
शिवाय चटण्या, कोशिंबीर + विविध लोणची हे सर्व आहेच.

गौरी कुलकर्णी २३'s picture

3 Nov 2016 - 1:32 pm | गौरी कुलकर्णी २३

भूर्का....अहाहा...हा एक फर्मास प्रकार आहे . गावरान लसूण बारिक चिरुन , गावरान तिळ , कढिपत्ता हे सर्व नेहमीची फोडणी करुन खरपूस फ्राय करुन घ्यावे. नंतर हवे तेव्हढे तिखट , अंमळ जास्तच अन् मीठ टाकून मिक्स करावे. जिभेवर खमंग चव लागते. आम्हाला हा भूर्का आवडतो . तूम्हीही करु शकता !