आत्मा की आवाज

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
30 Aug 2016 - 7:19 pm
गाभा: 

कालच एका अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांची भेट झाली .हे सद्गॄहस्थ बाबा किंवा बुवा यांच्या नादी लागणारे नसून स्वतन्त्र विचारांचे आहेत आणि एक छन्द म्हणून अध्यात्माचा अभ्यास करतात

तर त्यांच्या चर्चेचा रोख असा होता की आजकाल विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट इत्यादी सर्वच गोष्टींमुळे भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा एस क्यु ( स्पिरिच्युअल कोशंट ) कमी होत आहे . त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.

हे सर्व बदलणे अग्रक्रमाने क्रमप्राप्त असून त्यासाठी धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारे आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे.

हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल .

आगावू धन्यवाद

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

30 Aug 2016 - 7:25 pm | अभ्या..

पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत

गेले उडत. नका येवू म्हणाव.
आमचे आम्ही तयार करु.

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

30 Aug 2016 - 7:29 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

गेले उडत. नका येवू म्हणाव.
आमचे आम्ही तयार करु.

एवढं सोप्पं नसतंय राव ते

नायतर आय वी एफ साठी फर्टिलिटी सेन्टर समोर रांगा नसत्या लागल्या

राजाभाउ's picture

30 Aug 2016 - 8:13 pm | राजाभाउ

अहो फर्टिलिटी सेन्टर मध्ये आत्मे मिळतात काय ? फातफा उच्च कोटीच्या आत्म्यांचे शुक्राणु मिळतील

अभ्या..'s picture

30 Aug 2016 - 11:19 pm | अभ्या..

ते कशाला जातेत तडफडायला फर्टिलिटी सेंटरला? ;)

अभिजीत अवलिया's picture

30 Aug 2016 - 7:29 pm | अभिजीत अवलिया

जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत .

--- जन्म नाही घेतील तितके बरे आहे. आमचे आम्ही बघू घेऊ.

कोण बरे हे गृहस्थ ?

संन्यस्त खड्ग's picture

30 Aug 2016 - 7:33 pm | संन्यस्त खड्ग

अतिशय योग्य मुद्दा मांडलाय

हे मिपा वर लिहिण्याचे धाडस दाखवल्या बद्दल झपा फिपॉ यांचे हबिणन्दण

आता त्सुनामी येईल तयार रहा म्हणजे झाले

तूर्तास पॉपकॉर्न घेवून बसत आहे

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

30 Aug 2016 - 7:44 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

धन्यवाद सन्न्यस्थ खड्ग महोदय

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 7:42 pm | संदीप डांगे

अम्मम्म्म, वय काय म्हणालात ह्या गृहस्थांचे?

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

30 Aug 2016 - 7:44 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

वय सुमारे ५० असावे

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 7:49 pm | संदीप डांगे

ओह्ह! या वयात होतं कधी कधी असं.. सांभाळून घ्यायचे.

पगला गजोधर's picture

30 Aug 2016 - 9:33 pm | पगला गजोधर

झपाटलेला शिक्षक : गण्या सांग पाहू, "विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट"
इज इनडायरेकटली प्रपोर्शनल टू, "भारतीय हिन्दु स्पिरिच्युअल कोशंट" . अँड डेरफोर अफ़ेकटस, लिनिअर रेट ऑफ चेंज इन, मास क्वाटींटी इंफ्लॅक्स ऑफ "पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर" आत्माज डिसायर,
टू इन्स्टानशीएट ऑन धिस डाटम.... तर माझं वय काय ?

गण्या: सर ५० वर्ष ....

शिक्षक: अरे वा बरोबर, कसं ओळखलं गण्या ?

गण्या: सर आमच्या आळीत एकजण आहे त्याचं वय २५ आहे....

सुज्ञ मिपाकरांना समजलेच असेल की तो २५ वर्षीय हाल्फ** होता म्हणून.

nanaba's picture

1 Sep 2016 - 2:32 pm | nanaba

ha dhagach bhari majesheer ahe! :)

त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत .

असे असेल तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् याला काय अर्थ आहे

संदीप डांगे's picture

30 Aug 2016 - 8:39 pm | संदीप डांगे

अचूक पकडलं _/\_

पुण्यात्मे जन्म घ्यायचे थांबले, म्हणुन भगवंताना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 11:08 am | संदीप डांगे

मग समस्या कोठे आहे? भगवंताने जन्म घ्यावा अशीच व्यवस्था निर्माण होत आहे ना? डोन्ट यु वान्ट टू सी हिम हीअर?

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 11:12 am | अभ्या..

अरे हेच खरंय राव, रावण,हिरण्यकपबशी सारखी विरोधभक्ती हाय आपली. भगवंतरावांना आपणच आणतो.

नेत्रेश's picture

31 Aug 2016 - 11:12 am | नेत्रेश

भगवंतांचा अवतार या जन्मी पहायला मिळायची शक्यता कमी आहे.
आणी पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची गॅरेंटी नाही :) :)

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 11:20 am | संदीप डांगे

काय अशक्य आहे त्यात, ते वरचे स्वतंत्र विचारवाले बुवा जो विचार करतायत त्याच्या बरोब्बर उलटा विचार करायचा. अगदी नालायक, हरामी पिढी घडवायची, अनागोंदी माजवायची, मग भगवंतांनी कबूल केल्याप्रमाणे त्यांना यायला लागेलच.

आणि हो, वाईटाचा प्रसार चांगल्यापेक्षा कैक पटीने होतो म्हणतात, ट्राय करायला हरकत नै...

राजाभाउ's picture

31 Aug 2016 - 12:46 pm | राजाभाउ

हा हा हा. हे भारीय , आणि सोपं सुध्दा (डोळा मारलेली स्मायली) :)
म्हणजे तिकड अफगाणीस्तान, पाकीस्तानात लवकरच भगवंत अवतार घेण्याची शक्यता निर्माण होइल.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 1:11 pm | संदीप डांगे

नै हो, ते भगवंताला अवतार घ्यायला 'कंडिशन अप्लाय' आहे. "यदा यदा हि धर्म्य ग्लानिर्भवति भारत" बोलेतो फकस्त भारत, बाकी कुठेही काहीही झाले तर आमच्या भगोंताला अवतार घ्यायची पावर नाय.

चंपाबाई's picture

31 Aug 2016 - 3:17 pm | चंपाबाई

नाय हो . ते भारत हे अर्जुनाला उद्देशून वापरलेले संबोधन आहे.

विशुमित's picture

31 Aug 2016 - 4:04 pm | विशुमित

तुम्ही भारी हुशार आहेत...!! मी खरंच पंखा झालो आहे तुमचा

भगवंतराव पुण्यात्मा नसतात काय?

नेत्रेश's picture

31 Aug 2016 - 11:15 am | नेत्रेश

भगवंत म्हणजे सर्व आत्म्यांचे उगम आणी अंत सुध्द्दा.

गणामास्तर's picture

31 Aug 2016 - 11:26 am | गणामास्तर

भगवंत म्हणजे ज्यांचे बार्शीला मंदिर आहे तेच ना रे अभ्या ;)

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 11:37 am | अभ्या..

हो हो तेच.
अंबरीशवरद श्री भगवंत.

शुद्ध उदात्त हेतूने, कळकळीने भारतमातेच्या सुपुत्रांच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी कटिबद्ध असलेल्या, धर्म-संस्कार अन इतिहासाचा आदर करणारी आणि उच्चतम जीवनमूल्ये बाळगणारी नवीन पिढी घडविणे हेच जिच्या पवित्रतम जीवनाचे इतिकर्तव्य आहे, अश्या खर्‍या अध्यात्मिक वृत्तीच्या थोर व्यक्तीबद्दल मिपाकरांचे औदासिन्य हा अतिशय चिंतेचा विषय आहे.
धागाकर्त्याने "हे कसे घडविता येइल ? याबद्दल आपली मते जाणून घेण्यास आवडेल" अशी जी पृच्छा केली आहे, त्याचे उत्तर खरेतर अगदी सोपे आहे, ते असे:

एकादा आत्मा त्याच्या आधीच्या देहाच्या समाप्तीनंतर दुसरा एकादा देह गर्भावस्थेत असताना त्यात प्रवेश करतो, त्यानंतर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व, विचार, ज्ञान, धर्मप्रेम इ.इ. प्रकट व्हायला सुमारे वीस-पंचवीस वर्षांचा तरी कालावधि लागतो. आपल्या प्रिय मातृभूमीस असा कालापव्यय करणे कदापि परवडण्यासारखे नाही, आपल्या लोकांचा एस क्यू झपाट्याने वाढणे अत्यंत तातडीचे आहे, त्यामुळे हा वेळकाढू मार्ग आपल्या कामाचा नाही.

त्याऐवजी जे पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांनी आता निराश न होता ताबडतोब कोंबडी, बकरे, मासे, बैल वगैरेचे जन्म घ्यावेत. असे झाले की ते आत्मे चिकन, फिश, बीफ, मटन वगैरे खाणार्‍या हिंसक, असूरी प्रवृत्तीच्या मनुष्यांमधे आपसूकच प्रवेश करतील आणि त्यांना अल्पावधीत पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी बनवतील.

इकडे चिकन, बीफ, फिश, मटन शिजत आहे, तोवर ताबडतोब त्या आत्म्यांनी पुन्हा पुन्हा असेच जन्म घेत रहायचे. या युक्तीद्वारे बघता बघता भारतातील सर्व मासाहारी दुष्ट प्रवृत्तीच्या पिढ्याच्या पिढ्या परिवर्तित होतील, भ्रष्टाचार विलयास जाऊन खरोखर अच्छे दिन येतील आणि आपली प्रिय मातृभूमि पुन्हा एकदा कोटि कोटि प्रणिपाताच्या लायक होईल.

धागाकर्त्यास सादर विनंती की त्यांनी ही मंत्रणा त्यांच्या अध्यात्मिक मार्गातील सद्गॄहस्थांना सत्वर द्यावी, जेणेकरून ते सद्गॄहस्थ भूतलावर जन्म घेवू इच्छिणार्‍या पुण्यवान / ज्ञानी/ धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्म्यांना ही मंत्रणा देतील आणि त्या आत्म्यांना ती तातडीने कार्यान्वित करता येईल.
जय भारत.

चौकटराजा's picture

31 Aug 2016 - 8:13 am | चौकटराजा

पण हे तरी कसे घडायचे ...? यात बायोलॉजी जेनेटिक्स याचा आधार घ्यावा लागेल. मग त्यासाठी मार्गदर्शक म्हणून डोक्टर लोक्स लागतील. सबब डॉ खरे, आनंदी गोपाळ, अजया, डो म्हात्रे याना पाचरण करावे... तसेच त्या आत्म्याना कोंबडी चा जन्म घेण्यात पुण्य कसे आहे हे पटविण्यासाठी संक्षी ना संधी मिळण्याची गरज आहे .सबब कोणताही आय्डी घेऊन या पण या असे पाचारण करावे लागेल..... पण हे घडेल का...... ?

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2016 - 1:22 pm | प्रभाकर पेठकर

त्याऐवजी जे पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांनी आता निराश न होता ताबडतोब कोंबडी, बकरे, मासे, बैल वगैरेचे जन्म घ्यावेत. असे झाले की ते आत्मे चिकन, फिश, बीफ, मटन वगैरे खाणार्‍या हिंसक, असूरी प्रवृत्तीच्या मनुष्यांमधे आपसूकच प्रवेश करतील आणि त्यांना अल्पावधीत पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी बनवतील.

पण चित्रगुप्त साहेब, ती चिकन, बकरे, मासे, बैल मेल्याशिवाय त्यांना शिजवत नाहीत. मग त्यात आत्मा असणार कुठून? ती नुसतीच निर्जीव शररीरे असणार. तीच आपण शिजवून खात असतो. मग, ज्यात आत्मा नाही त्या शरीराद्वारे आपल्या शरीरात आत्मे प्रवेश कसे करणार?

यांचं नाव मकरंद आहे का? कारण घेई छंद मकरंद!

अभ्या..'s picture

30 Aug 2016 - 11:43 pm | अभ्या..

प्रिय हा मिलिंद असल्याने आत्मे येणारच न्हाईत. बसा तसेच गेइ छंद करत. ;)

अजया's picture

31 Aug 2016 - 8:49 am | अजया

=))))))

अभिजीत अवलिया's picture

30 Aug 2016 - 11:53 pm | अभिजीत अवलिया

उच्चतम जीवनमूल्ये म्हणजे कसली जीवनमूल्ये ?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2016 - 7:35 am | अत्रुप्त आत्मा

एष धर्म: टन्ना टन्न: वादी परिपूर्ण टनाटनी धागा.

नाखु's picture

31 Aug 2016 - 9:03 am | नाखु

शांती किंवा यज्ञात याला ऊपाय आहे का ते सांगा?

बिचारे ते पन्नाशीचे ग्रूहस्थ आपले ऋणी राहतील.

नेमस्त नाखु

धागा विनोदी आहे असं माझंही मत आहे.
पण ओढूनताणून दरवेळी 'सनातन धर्म' या संकल्पनेची टिंगलटवाळी करण्यामागचा तुमचा उद्देश समजला नाही.

धर्मावर, त्यातल्या चुकीच्या संकल्पनांवर टीकाटिप्पणी अवश्य करावी. धर्म प्रवाही असायला हवा, त्याने नवी मू्ल्ये, संकल्पना स्वीकारायला हव्यात, तो समतेचं मूल्य मानणारा हवा, तो सर्वसमावेशक हवा ... हे आहेच. जगातला कोणताही संघटित धर्म या अशी निकषांवर उतरत नाही. हे अर्थातच एखाद्या धर्मातल्या उणिवांचं समर्थन नाही. काहाी लोक मिपावर काय वाट्टेल ते लिहितात म्हणून संपूर्ण मिपालाच धारेवर धरण्यासारखं आहे हे.

किंबहुना धर्म या संकल्पनेची गरज आहे का नाही - अशीही चर्चा होऊ शकते. सनातन धर्म या संकल्पनेचं विश्लेषण करणारा, त्यातले दोष दाखवणारा, सुधारणेचे मुद्दे सुचवणारा लेख अवश्य लिहा. मी तो नक्की वाचेन. त्यातून काही शिकण्याजोगं असेल ते अमलात आणेन.

पण उगाच नुसती टिंगल करून काही कोणी धर्मसुधारक होत नाही हे विसरून काही लोक पुन्हापुन्हा त्याच प्रकारचे विनोद करतात तुमचा प्रतिसाद वाचून जाणवलं म्हणून लिहिलं.

नाखु's picture

31 Aug 2016 - 9:08 am | नाखु

अतीवास तै हा
प्रतिसाद मला आहे काय?

आतिवास's picture

31 Aug 2016 - 9:17 am | आतिवास

प्रतिसाद तुम्हाला नाही, आत्मबंध यांच्या प्रतिसादाला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2016 - 9:11 am | अत्रुप्त आत्मा

मुद्दाम विरोधी मताला उकळी देणारा धागा आहे हा! म्हणून तसा उप रोधिक प्रतिसाद दिलाय.. एव्हढच.

बोका-ए-आझम's picture

31 Aug 2016 - 9:40 am | बोका-ए-आझम

पण जगातील अनेक शोकांतिका - दंगली, युद्धं, honour killings - ह्या लोकांनी धर्माकडे गांभीर्याने आणि नको तितक्या गांभीर्याने पाहिलं म्हणून झालेल्या आहेत. माझ्या मते it's high time we stop taking religion seriously.

प्रभाकर पेठकर's picture

1 Sep 2016 - 1:33 pm | प्रभाकर पेठकर

धर्म आणि त्याच्या चुकीच्या आशयांतराने (Interpretation) प्रभावित व्यक्ती चुकीच्या मार्गावर जातात आणि समस्या निर्माण होतात. धर्माला व्यावहारीक आणि तार्किक जोड असेल आणि भल्याबुर्‍याची जाण असेल तर दंगली, युद्धं, सन्मानासाठीच्या हत्या होणार नाहीत.

त्यातल्या बरोबर आणि चूक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष होणार यात काही आश्चर्य नाही. कुठल्याही गोष्टीचं महत्व हे त्याच्या अभावामुळे जे परिणाम होतात त्यावरून मोजतात. जर धर्म नसेल तर आपल्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान याएवढा धर्म आवश्यक अजिबात नाही. मग तो गांभीर्याने घ्यायचा कशाला?

गामा पैलवान's picture

3 Sep 2016 - 1:20 pm | गामा पैलवान

बोका-ए-आझम,

धर्म नसेल तर आयुष्यात काय फरक पडणार आहे? मोठा खोल प्रश्न आहे.

एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर धर्माशिवाय माणूस म्हणजे जनावर असतो.

लांबलचक उत्तरही देतो. धर्म म्हणजे कर्तव्य आणि मर्यादांचा सुसंगत संगम. कुठल्या प्रसंगात काय कर्तव्य आहे याचा विचार म्हणजे धर्मविचार. जर कर्तव्ये पार पडायची नसतील तर माणूस आणि जनावर यांत फरक उरलाच कुठे? म्हणूनच धर्म हवाय. माझं कर्तव्य काय आहे आणि काय नाही याची सुस्पष्ट जाण हवी. आता परिस्थिती अशी आहे की कर्तव्यासंबंधी सर्वत्र पराकोटीचा गोंधळ दिसून येत आहे. हा वैचारिक गोंधळ निस्तरण्यासाठी अध्यात्मिक साधना करावी लागते. त्यामुळे विचार सुस्पष्ट होतात. हे झालं लांबलचक उत्तर.

अर्थात, साधनेविना तुमचे विचार स्पष्ट असतील तर तुम्हाला साधनेची गरज नाही. तुम्ही बुद्धीजीवी आहात. मात्र बहुतांश लोकांना गरज पडते. म्हणून वैयक्तिक धर्मासोबत सामायिक धर्मही असावा लागतो.

आ.न.,
-गा.पै.

यशोधरा's picture

31 Aug 2016 - 1:44 pm | यशोधरा

+1

चिनार's picture

31 Aug 2016 - 11:38 am | चिनार

नै नै थे जाऊ द्या..
पण ते आत्मे पृथीतलावरच्या कुठल्यातरी भूमीवर जन्म घेत असतीलच की..त्या भूमीचे नाव सांगा..आम्ही तिकडे स्थलांतरीत होतो..मिपावर पुण्यातून लॉगिन झाले काय किंवा उझबेकिस्तान वरून झाले काय आपल्या बापाचं काय जातं? कोणाच्याही बापाचं काय जातं म्हणतो मी..

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 12:11 pm | संदीप डांगे

चिनारभौ, ते फकस्त भारतात जन्म घेतेत, इतर ठिकाणी जन्म नै घेत. कारण ही भूमी पवित्र इत्यादी इत्यादी काय काय असते म्हणतात.

चिनार's picture

31 Aug 2016 - 12:21 pm | चिनार

म्हंजे भारतात जन्म घेण्यासारखी परिस्थिती नसन तर काय भटकत र्ह्यायतेत का थे आत्मे ?
माय काय म्हणणं हाय...का थे आत्मे असो का माणसं असो..त्याईनं ह्या दृष्ट लोकांचा नायनाट कराले काय हरकत हाय ?? आत्म्याच्या फॉरमॅट मध्ये राहून तर जास्त सोपं जाईन त्यांले..

त्यांना पवित्र बॉड्या मिळत नसतील सध्या.

चिनार's picture

31 Aug 2016 - 12:33 pm | चिनार

नाही मिळत तर जाऊ दे ना...आत्मा बनूनच लोकांना वठणीवर आणायचं..
कालांतराने सगळं व्यवस्थित होईल

वटणीवर आणायच म्हणजे काय करायच

चोरया,मारया , खुन, भ्रष्टाचार, बलात्कार .... वगैरे असत तर ठीक हाय पण त्यांचा (पुण्यात्म्यांचा) हा प्रॉब्लेम हाय

विवाहपूर्व शरीरसम्बन्ध / नको त्या वयात सेक्स शी ओळख होणे / लफडी / आन्तरजातीय -धर्मीय विवाह / घटस्फोट

याला कस वटणीवर आणायच.

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 1:14 pm | अभ्या..

याला कस वटणीवर आणायच.

शादी के पैले जै हनुमान
शादी के बाद जै श्रीराम

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 12:44 pm | संदीप डांगे

अवं त्याइच्याबी काई अडचणी असतील, आपलाले का मालूम, आपण का पवित्र आत्मे हावो?

चिनार's picture

31 Aug 2016 - 12:52 pm | चिनार

हे बी खरंय राजा...
माय जौदे..पण थुम्ही अकोल्यात राहून बी अपवित्र कसं काय ऱ्हायले? राजेश्वराच्या मंदिरात जात न्हवते काय ??

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 1:18 pm | संदीप डांगे

सब्बन पवित्र आत्मे आकोल्यात जन्माले येतात मंग ते जगाचा उद्धार कराले बाहेर पडतात हे आमचं शिक्रेट हाये. आमि का सांगावं? "they are among us"

थेच म्हनो मी..मले मालूम हाय ना थुमच शिक्रेट..पन साऱ्यासमोर आनायाचं व्हतं..

बाकी माये अकोल्यातले तीन वर्ष लयच गजब होते..त्याच्यावर लिहीन म्हंतो कधीतरी..

संन्यस्त खड्ग's picture

31 Aug 2016 - 1:10 pm | संन्यस्त खड्ग

माझ्या गुरूंच्या मतानुसार आजकाल केवळ संभोगसुख हेच खरे मानून त्यातूनच अपत्ये जन्माला घातली जातात... अशा आईबापाच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबा जन्मास येणे कधी तरी शक्य आहे का? मी कामसुखास मुळीच कमी लेखत नाही... ते पण आयुष्यातील एक सर्वोच्च सुख आहे... पण केवळ अनैतिक संबंधातून जन्मणारी संतती, की जिच्या जन्माने आईबाप दोघेही चिंतीत व दुःखी होतात, अशी संतती समाजमित्र होईल की समाजशत्रु? ज्या अपत्याचे आईबाप त्याचे parenting नाकारतात तो व्यक्ती काय संस्कार घेऊन मोठा होईल? समाजाविषयी किती प्रेम आपुलकी असेल ?
असा समाज भलेही सामाजिक आर्थिक प्रगती साध्य करूही शकेल पण...
पण...
पण...

एकं सत् विप्र बहुधा वदन्ति

सारखे स्वानुभवी तत्वज्ञान तो मांडू शकेल का?

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 1:19 pm | संदीप डांगे

भाई, आपका लॉजिक भोत भोत गंडेला है!

अभ्या..'s picture

31 Aug 2016 - 1:22 pm | अभ्या..

गंडेला म्हणजे काय पारच गंडेलाय
मला पण ते लाघवी बिघवि बरच काय काय आठवतंय.
जौ दे. उगी कशाला त्या आठवणी.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 1:34 pm | संदीप डांगे

नंतर परत विचार केला तर साहेबांना पाश्चात्त्य जीवनशैलीवर निशाना साधायचा तर नाहीना असं वाटून गेलं...

गणामास्तर's picture

31 Aug 2016 - 2:04 pm | गणामास्तर

तुमच्या गुरूंना म्हणावं उर्ध्वरेतन पद्धतीचा प्रसार करा. साला ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी.

गणामास्तर's picture

31 Aug 2016 - 2:04 pm | गणामास्तर

तुमच्या गुरूंना म्हणावं उर्ध्वरेतन पद्धतीचा प्रसार करा. साला ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी.

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 2:07 pm | संदीप डांगे

उर्ध्वरेतन पद्धती >> काय अस्ते ओ ते?

ते नदीपात्रातील रेती उचलायची पध्दत असते. मग नदीपात्रात खड्डे पडतात. पात्र बदलते. एकूणच प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. सध्या बंदीय सरकारकडून. तरीही काही लोक करतात. ;)

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 2:20 pm | संदीप डांगे

झालं का? आता प्रतिसाद परत कळफलकात घ्या. म्हणजे तुम्ही कसे बुद्धीमान, तेजपुंज वगैरे राहाल.

पगला गजोधर's picture

31 Aug 2016 - 4:48 pm | पगला गजोधर

माझ्या गुरूंच्या मतानुसार आजकाल केवळ संभोगसुख हेच खरे मानून त्यातूनच अपत्ये जन्माला घातली जातात... अशा आईबापाच्या पोटी ज्ञानोबा, तुकोबा जन्मास येणे कधी तरी शक्य आहे का? मी कामसुखास मुळीच कमी लेखत नाही... ते पण आयुष्यातील एक सर्वोच्च सुख आहे... पण केवळ अनैतिक संबंधातून जन्मणारी संतती, की जिच्या जन्माने आईबाप दोघेही चिंतीत व दुःखी होतात, अशी संतती समाजमित्र होईल की समाजशत्रु?

अरेरे शकुंतलेच्या पोटचा भरत, कुंतीच्या पोटचे धर्म/अर्जुन/भीम .... सर्व संभोगसुखाच्या पोटी जन्मलेले लोकं समाजमित्र की समाजशत्रु ???

हे संभोगातूनच जन्मलेले आहेत. आजकाल या शब्दांना काय अर्थ आहे? पूर्वीच्या काळी asexual reproduction व्हायचं की काय माणसांमध्ये?

nanaba's picture

1 Sep 2016 - 2:37 pm | nanaba

brahmadnyani jabal - tyanchi katha vachali ahe?
Nasel tar vaacha!

मराठी_माणूस's picture

31 Aug 2016 - 2:41 pm | मराठी_माणूस

भारतीय / हिन्दु / मराठी समाजाचा......

मराठी समाज हा हिन्दु / भारतीय पेक्षा वेगळा आहे का ?

नीलमोहर's picture

31 Aug 2016 - 3:10 pm | नीलमोहर

गंभीरपणे काही विचार लिहायचे होते, पण इथले प्रतिसाद वाचून अशक्य हसायला येतंय,
काय लिहायचं होतं तेही इसरलंय,

आपण कसे घडलोत, म्हणजे ते पुण्यवान, ज्ञानी इ. असे आपण आहोत का, असल्यास नवीन पिढीला तसेच घडवायचे,
तसे नसल्यास आपण जसे घडलो त्याच्या बरोबर उलटया पद्धतीने घडवायचे, सिंपल !!

चित्रगुप्त's picture

31 Aug 2016 - 5:12 pm | चित्रगुप्त

आता अध्यात्म, धर्म, पुनर्जन्म वगैरे विषय निघालाच आहे, तर हा धागाही वाचून घ्या म्हणतो:
http://www.misalpav.com/node/23698

गामा पैलवान's picture

1 Sep 2016 - 1:25 am | गामा पैलवान

आतिवास,

>> पण ओढूनताणून दरवेळी 'सनातन धर्म' या संकल्पनेची टिंगलटवाळी करण्यामागचा तुमचा उद्देश समजला नाही.

तुमच्याशी याबाबत सहमत आहे. लेखात पुण्यवान / ज्ञानी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी / कणखर वगैरे जन्म घेणारे आत्म्यांच्या जागी राजकारणेच्छुक नेतेमंडळी टाका. स्पिरिच्युअल कोशंटच्या जागी नीतिमत्तेची पातळी टाका. बघा आजच्या समाजाचं मूर्तिमंत वर्णन उभं राहतं की नाही ते.

वर अभ्या.. म्हणतात की गेले उडंत .... आमचे आम्ही तयार करु. तर आता भ्रष्ट नेतेमंडळींच्या गराड्यात चारित्र्यवान माणसे अभ्या.. कशी निर्माण करणार आहेत ते समजून घ्यावयास आवडेल.

आ.न.,
-गा.पै.

आतिवास's picture

1 Sep 2016 - 9:10 am | आतिवास

धन्यवाद सहमतीसाठी.
पण तुम्ही जे म्हणताय ते मी म्हणत नाहीये.
माझा रोख वेगळा आहे.
असो.

गामा पैलवान's picture

1 Sep 2016 - 11:59 am | गामा पैलवान

आतिवास,

तुमचा रोख वेगळा असला तरी चालेल. तुम्ही म्हणता की धर्म प्रवाही असायला हवा, त्याने नवी मू्ल्ये, संकल्पना स्वीकारायला हव्यात, तो समतेचं मूल्य मानणारा हवा, तो सर्वसमावेशक हवा ... इत्यादि, इत्यादि. तर माझा प्रतिसाद हे त्या दिशेने उचललेलं छोटंसं पाऊल म्हणून समजा. अर्थात, ते तुम्हाला शंभर टक्के पटायलाच हवं असा आग्रह मी धरू शकंत नाही. :-) चर्चा व्हावी पण मतैक्याची अपेक्षा नाही.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

1 Sep 2016 - 1:27 am | गामा पैलवान

बोका-ए-आझम,

>> माझ्या मते it's high time we stop taking religion seriously.

साफ चूक. आयसिस आपल्या दाराशी येऊन ठेपली आहे. म्हणूनंच माझ्या मते it's high time we start taking religion seriously.

आ.न.,
-गा.पै.

त्यामुळे जे पुण्यवान / ज्ञाबी / धर्मप्रेमी / राष्ट्रप्रेमी कणखर आत्मे भूतलावर जन्म घेवू इच्छितात , त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत .

नका येऊ म्हणावं , तसंही येऊन काही होईल त्यांच्या हातून असं नाही वाटत असले येडछाप विचार असतील तर.
स्वतःच्या हातून काही झालं नाही कि प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या नावावर , आणि त्यातही "आजकाल ची पिढी ना " म्हणत आपलं वाढलेलं पोट खाजवत आंबट ढेकरा द्यायची घाणेरडी सवय असते बऱ्याच लोकांना.

त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे

आणि हे कोण ठरवलं ? या गृहस्थांनी काय मिळवलाय आयुष्यात ? किती लोकांना अन्नाला लावलं ? किती लोकांचं भलं केलं ? (अध्यात्मिक नका सांगू. पोटापाण्याचा प्रश्न किती लोकांचा मिटवला ते सांगा).

मागच्या पिढ्या सगळ्या चांगल्याच होत्या का ?
काही विदा आहे का ?

श्रीगुरुजी's picture

1 Sep 2016 - 2:39 pm | श्रीगुरुजी

झपाटलेला फिलॉसॉफर म्हणजे नानासाहेब नेफळे असावेत का?

त्यांची निराशा होत असून ते अशा परिस्थितीत जन्म घेण्यास नकार देत आहेत . त्यामुळेच आज सर्वत्र संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेला समाज आणि नविन पिढी पहावयास मिळत आहे.

जगाचं माहिती नाही, पण मिपावर अनेक पुण्यवान आयडी फिरूनफिरून नव्याने जन्म घेत असतात व त्यामुळे संस्कारहीन / उच्छॄन्खल / भरकटलेले धागे व प्रतिसाद अजिबात पहायला मिळत नाहीत.

करून जातो गाव, ***ला मात्र नानांचे नाव !

मेणबत्ती विझली की विझली. मग एका मेणबत्तीने दुसर्‍या मेणबत्तीत प्रवेश केला असे कधी होत नाही. माणसाचे पण तसेच आहे. एकदा मेला की मेला. मग त्याचा आत्मा या शरीरातून दुसर्‍या शरीरात गेला अस कधी होत नाही. ज्ञानी माणसाचा आत्मा तो मेला की संपला. मग तो आत्मा दुसर्‍या ज्ञानी माणसाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी वाट बघतो व त्याला योग्य जागा सापडत नाही हे सर्व हास्यास्पद आहे.

चित्रगुप्त's picture

2 Sep 2016 - 2:06 am | चित्रगुप्त

हा धागा वाचल्यापासून त्या अध्यात्मिक सद्गृहस्थांच्या चरणकमलांचे दर्शन व्हावे, अशी आस मनी लागली आहे. पुनर्जन्म घ्यायला अगदी तयार असलेल्या, परंतु निराशेपोटी तुंबून राहिलेल्या आत्म्यांच्या भावना जाणून घेण्याची विद्या ज्यास अवगत आहे, त्या असामान्य विभूतीच्या दर्शनमात्रे मनःकामना पूर्‍या होत असतील यदर्थी संशय नाही. समस्त मिपाकरांनी हा लाभ घेतला पाहिजे, आणि त्यांना सत्वर मिपाचे सन्मानित सदस्यत्व बहाल केले पाहिजे.

चित्रगुप्त's picture

2 Sep 2016 - 2:06 am | चित्रगुप्त

हा धागा वाचल्यापासून त्या अध्यात्मिक सद्गृहस्थांच्या चरणकमलांचे दर्शन व्हावे, अशी आस मनी लागली आहे. पुनर्जन्म घ्यायला अगदी तयार असलेल्या, परंतु निराशेपोटी तुंबून राहिलेल्या आत्म्यांच्या भावना जाणून घेण्याची विद्या ज्यास अवगत आहे, त्या असामान्य विभूतीच्या दर्शनमात्रे मनःकामना पूर्‍या होत असतील यदर्थी संशय नाही. समस्त मिपाकरांनी हा लाभ घेतला पाहिजे, आणि त्यांना सत्वर मिपाचे सन्मानित सदस्यत्व बहाल केले पाहिजे.