.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
नारळीपौर्णिमेनिमित्त घरात बरेच नारळ आलेले असतात. मग सर्वांच्या आवडत्या नारळाच्या वड्या केल्या जातात. भरपूर दूध घालून मऊसूत अशा 'फज'सारख्या वड्या आमच्याकडे खूप आवडतात. नेहमीसाठी वेलदोडा (इलायची) घातलेली असतेच. पण मी कधी बदल म्हणून केशर, जायफळ, आमरस घालूनही बनवते. एकदा एका लग्नात आईने गुलकंद घालून केलेली नारळाच्या वड्या पाहिल्या आणि घरी आल्यावर त्याची फारच स्तुती केली. गुलकंद आणि नारळ हे दोन्ही अगदीच आवडते असल्यामुळे त्या करून पाहायची इच्छा होतीच. तसेच मध्ये एकदा रुह-अफ्जा घालून केलेले नारळाचे लाडू याची पाककृती पाहिली होती. त्या पाककृतीत मिल्कमेड घातलेले होते. मी नेहमीप्रमाणेच दूध घालून केली आणि त्यात गुलकंदही घातले. चव तर छान लागलीच, तसंच दिसायलाही फारच आकर्षक!
साहित्य:
दोन वाट्या नारळाचा चव
दीड वाटी दूध
दीड वाटी साखर (आवडीनुसार कमी/जास्त घेऊ शकता.)
चार टे.स्पून रुह-अफ्जा / रोझ सिरप
दोन टे.स्पून तूप
गुलकंद
कृती:
सजावटीसाठी एक-दोन टे.स्पून नारळाचा चव वेगळा काढून घ्या.
तूप गरम करून त्यात उरलेला नारळाचा चव एक-दोन मिनिटे परतून घ्या.
त्यात दूध घालून मध्यम आचेवर अधूनमधून ढवळत राहा.
दूध आटत आले की साखर घाला.
आणखी थोडा वेळ मिश्रण हलवत राहा.
मिश्रण थोडे घट्ट होत आले की रुह-अफ्जा घालून नीट हलवून घ्या.
सगळ्या मिश्रणाला एकसारखा रंग आला की गॅस बंद करा.
आता या मिश्रणाच्या वड्या/ लाडू/ रोल्स जे आवडेल ते बनवा.
वड्या बनवण्यासाठी मिश्रण ताटात पसरवून वड्या पाडून घ्या.
लाडू:
लाडू बनवण्यासाठी मिश्रण थोडे गार होऊ द्या.
थोडेसे मिश्रण तळहातावर घ्या. छोट्याशा पारीसारखा आकार देऊन एक छोटासा गुलकंदाचा गोळा त्यात भरा. वरून आणखी नारळाचे मिश्रण लावून लाडू वळून घ्या.
असे सगळे लाडू वळून शेवटी वेगळ्या काढलेल्या चवामध्ये घोळवून घ्या.
रोल्स:
एका बटरपेपरवर / अॅल्यु. फॉईलवर साधारण दोन-अडीच इंच रुंदी होईल असे मिश्रण पसरवून एक थर बनवून घ्या.
त्या थरावर रुंदीच्या मधोमध बोटभर रुंदीचा गुलकंदाचा थर द्या.
रोल्स बनल्यावर गुलकंद मध्ये येईल अशा तर्हेने पेपर/ फॉईल एका बाजूने मिश्रणासहित अलगद उचलून दुसर्या बाजूकडे नेऊन हलकासा दाब देऊन बंद करा.
थोडा वेळ तसेच फ्रीजमध्ये ठेवा.
जरा घट्ट झाल्यावर बाहेर काढा. पेपर/ फॉईल पुन्हा अलगद उघडून साधारण बोटभर जाडीचे रोल्स कापा.
मागच्या वर्षीच्या कणकेचा शिरा या बाप्पाच्या नैवेद्यात "प्रशाद को दात नही लगाते" वाचले होते. हे रोल्स असेच जिभेवर ठेवले की विरघळतात.
प्रतिक्रिया
13 Sep 2016 - 8:54 am | पैसा
यमी! बाप्पा स्वतः येऊन फस्त करील नक्की!
13 Sep 2016 - 8:58 am | यशोधरा
भारी! नक्की करून बघणार हे!
13 Sep 2016 - 8:59 am | अजया
मस्त आहे पाकृ.फोटो बघून लाडू तोंडात टाकावासा वाटतोय!
13 Sep 2016 - 9:38 am | सपे-पुणे-३०
मस्त ! लाडू खरोखरच गोजिरवाणे झालेत.
13 Sep 2016 - 6:22 pm | पिलीयन रायडर
करेक्ट! "गोजिरवाणे" च झालेत अगदी!!
पटकन उचलुन तोंडात टाकावेत असे!!
13 Sep 2016 - 10:14 am | पियुशा
लैच्च भारी :)
13 Sep 2016 - 10:49 am | अनन्न्या
पटकन उचलून खावासा वाटतोय, पुढच्या गणपतीला नक्की करणार.
13 Sep 2016 - 11:58 am | पद्मावति
वाह! मस्तं लाडू. रंग किती सुंदर आहे.
13 Sep 2016 - 1:03 pm | अभ्या..
फिक्का अबोली कलर भारी आलाय (खरबुजी पण म्हणता येईल)
गुल्कंद बिल्कंद असलेने टेस्ट भारीच असणार.
13 Sep 2016 - 1:16 pm | स्मिता चौगुले
वाह! मस्तं
13 Sep 2016 - 1:55 pm | किसन शिंदे
फोटो दिसत नाहीत.
14 Sep 2016 - 6:12 am | रुपी
मागे कुठेतरी वाचले होते की गूगल फोटोज पब्लिक असले तरी आता दिसायला तुमच्या गूगल अकाऊंट मध्ये लॉग-इन करावे लागते. तसे मला लॉग-इन न करताही दिसत आहेत, पण एकदा तसा प्रयत्न करुन पहा.
13 Sep 2016 - 1:55 pm | स्वाती दिनेश
खूप छान दिसत आहेत हे लाडू. अगदी टेप्टिंग!
स्वाती
13 Sep 2016 - 2:37 pm | पूर्वाविवेक
वा, फारच सुरेख दिसतायेत. मी मागे असे गुलकंद वापरून गुलबहार रसगुल्ले बनवले होते.
13 Sep 2016 - 3:51 pm | Mrunalini
छान पाकृ. इथे गुलकंद मिळत नाही, पण माझ्याकडे रोझ सिरप आहे. ते वापरुन काहितरी ट्राय करते.
13 Sep 2016 - 4:47 pm | अभ्या..
ते मॅप्रोचे स्ट्रॉबेरी फलेरो असतात तसे आत ठेवले तर चालतील काय? जेली टैप.
14 Sep 2016 - 2:42 am | रुपी
लिचीचे फलेरो असतात का? मला वाटते लाडू गोड असल्यामुळे आत स्ट्रॉबेरी कदाचित आंबट लागेल, कदाचित लिचीचे जास्त छान असतील. पण पसंद अपनी अपनी :)
मृणालिनी, नुसतं रोज सिरप घालूनही नक्की करुन बघ, तसेही छान लागतात :)
13 Sep 2016 - 4:25 pm | नूतन सावंत
सुरेख दिसताहेत लाडू.रुहअफजाची कल्पना छानच आहे.
13 Sep 2016 - 4:37 pm | आदूबाळ
ठार वारलो!
नारळाचा चव म्हणजे ओलं की कोरडं खोबरं?
13 Sep 2016 - 8:52 pm | स्रुजा
ओलं खोबरं !!
बाकी वारले मी पण. कहर दिसतायेत लाडु. आणि ही कल्पनाच फार भारी आहे. नारळ + गुलकंद !!
13 Sep 2016 - 5:02 pm | रेवती
अगदीच गोंडस दिसणारा प्रसाद आहे.
13 Sep 2016 - 5:31 pm | इशा१२३
काय सुंदर रंग आलाय.मस्तच!
13 Sep 2016 - 5:31 pm | इशा१२३
काय सुंदर रंग आलाय.मस्तच!
13 Sep 2016 - 6:30 pm | कविता१९७८
मस्त
13 Sep 2016 - 6:41 pm | मनिष
किती मस्त दिसतायत हे गुलाबी लाडू!! लगेच फस्त होतील..... :-)
13 Sep 2016 - 8:48 pm | सानिकास्वप्निल
सुरेख रंग आलाय लाडवांना. पाककृती ही स्वादिष्ट.
14 Sep 2016 - 2:45 am | रुपी
सर्वांना धन्यवाद :)
मिपावर मी पहिल्यांदाच पाकृ दिली आहे, प्रोत्साहनासाठी धन्यवाद!
मी ओले खोबरे वापरले आहे. पण सुक्या खोबर्याचा कीस वापरूनपण करता येतील बहुतेक. तसे लवकरही होतील. इशाच्या पाकृमध्ये चॉकलेट आहे, त्याऐवजी रोज सिरप घालून बघू शकता.
14 Sep 2016 - 7:12 am | अत्रुप्त आत्मा
खाल्ला....
16 Sep 2016 - 1:09 pm | दिपक.कुवेत
खत्रा कलर आलाय लाडवांना....ओल्या पेक्षा सुख्या नारळ (डेसीकेटेड कोकोनट) घेतल तर लाडु जास्त चांगले टिकतील.
16 Sep 2016 - 3:59 pm | प्रीत-मोहर
__/\__
स्ल्र्प.
आता करुन पाहते
17 Sep 2016 - 4:23 pm | मनिमौ
वारल्या गेले आहे. राजस दिसतायत लाडु अगदी
17 Sep 2016 - 6:02 pm | पिंगू
सुरेख लाडू झाले आहेत. खाताना जबरी गुलकंदी चव लागेल..