अभियांत्रिकी पदविका नंतर कोणते कोर्सेस करावे ????

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in काथ्याकूट
22 Aug 2016 - 11:54 pm
गाभा: 

मेकॕनिकल इंजीनिअरींग डिप्लोमा पूर्ण केल्यानंतरच्या कोर्सेसची माहिती हवी आहे .
कृपया मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

23 Aug 2016 - 12:18 am | अभ्या..

http://www.misalpav.com/node/35967
ताई तुमची समस्यां इथे मांडा.
भाते दादा यायच्या आत बरंका ;)

श्रीगुरुजी's picture

23 Aug 2016 - 2:41 pm | श्रीगुरुजी

१) कोणत्यातरी महाविद्यालयातून बी.ई. च्या पदवीला प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करा.

२) मेकॅनिकल इंजिनिअरने सॅप चे प्रशिक्षण घेतल्यास फायदा होईल.

साठ टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास शॉपफ्लोरला काम स्वीकारावे. काम करत शिकता येते. चांगले टक्के असतील अन गणितात गती असेल तरच डिग्रीकडे जावे. बाकी कोर्सेस वगैरे काम करता-करता ( स्व- कमाईवर) करावेत. प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची सर कोर्सला नाही.

(अनुभवी पदविकाधारक) खेडूत.

पगला गजोधर's picture

23 Aug 2016 - 7:17 pm | पगला गजोधर

तुमचे ध्येय काय आहे जीवनात ?
तुम्हाला कशात रुची आहे ?
मोठ्या कंपनीत नोकरी करायची आहे ? स्वतःचा व्यवसाय / वर्कशॉप / कारखाना सुरु करायचा आहे ? किंवा लग्नानंतर किंवा माहेरच्यांचा एखादा व्यवसाय / वर्कशॉप / कारखाना यामध्ये वृद्धी आणायची आहे ? किंवा आहे तो पसारा सांभाळायचा आहे ?
तुम्हाला अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात काम करायचं आहे ? किंवा यंत्र अभियांत्रिकीत संशोधन करायला आवडेल ?
किंवा शॉप फ्लोर वर काम करायचंय ? किंवा रेल्वे / राज्य सेवा / संरक्षण दले यात प्रवेश परीक्षा द्यायच्यात ?

तुमचे ध्येय काय ? तुमचा कल काय ?

नितीनचंद्र's picture

14 Sep 2016 - 9:28 pm | नितीनचंद्र

पोस्ट डिप्लोमा इन टुल अ‍ॅड डाय डिझाईन - आय जी टी आर - औरंगाबाद नुकतीच जाहीरात येऊन गेली.

आय जी टी आर औरंगाबाद येथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

मी पण मुळचा डिप्लोमा होल्डर आहे. पण मुळातले गुण तपासुन प्रगती करता येते.

http://www.literacynet.org/mi/assessment/findyourstrengths.html ही लिंक ओपन करा आणि आपल्या मुळच्या इंटेलिजन्स बद्दलचा रिपोर्ट मला जर इमेल वर पाठवला तर मार्गदर्शन करणे सोपे होईल.

joglekar.nitin@gmail.com

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2016 - 11:17 pm | टवाळ कार्टा

डिप्लोमा नीट पूर्ण केला असेल तर सरळ डिग्री करावी, डिग्री नसेल तर नोकरी शोधायचे हाल होतील

स्वलिखित's picture

15 Sep 2016 - 10:20 am | स्वलिखित

जॅाब नाही म्हणतात ,खरच इंजीनिअरींगचे हाल चालु आहेत का हो

पगला गजोधर's picture

15 Sep 2016 - 11:36 am | पगला गजोधर

संधी आहेत
पण दुर्दैवाने,
१० पास आउट होणाऱ्या इंजिनिअरपैकी माझ्या मते १ हा इंडस्ट्रीमधे काम करण्यास सक्षम आहे (माझ्या वैयक्तिक मते.

एका क्ष हौसिंग सोसायटीत डझनावारी इंजिनीअर आहेत (ते सुद्धा मेरिटवाले),
पाण्याच्या पंपाने एअर पकडली, किंवा बिल्डिंग वरची टाकी अर्धीच भरल्यामुळे ३ ऱ्या, ४ थ्या मजल्याला, पुरेश्या दाबाने पाणी येत नाही. या/अश्या साध्या साध्या गोष्टी सुद्धा समजत नाही त्या ठोंब्यांना.... सोल्युशन देणे तर दूरच.
(परंतु मनमोहनसिंग यांनी कुठल्या प्रकारे इंडस्ट्री विकास करायाला हवा होता, म्हणजे जॉब उपलब्ध झाले असते, याबद्दल तासनतास गफ्फा हाणू शकतील.)

असो तर इंडस्ट्रीला तुम्ही पदविका धारक /पदवी धारक याच्याशी फारच कमी घेणं देणं असतं....
तुम्ही कॉलेजात भलेही हायड्रॉलिक्स चे युनिव्हर्सिटी टॉपर असाल हो, पण प्रॉडक्शन लाईन मधे प्रेशरगेज जास्त प्रेशर अचानक दाखवायला लागलं, तर नक्की काय तपासायचं (काय कारणं असू शकतात) हेच जर लक्षात येत नसेल... मग् काय एकूणच आनंद आहे...