.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
साहित्यः
मैदा - १ वाटी
साखर - १ वाटी
खवा - १ वाटी
ओल्या खोबर्याचा कीस - २ वाटी
गूळ - १ वाटी
वेलची पावडर - १/२ चमचा
केशर
पाणी
तूप - १ चमचा
तेल तळण्यासाठी
मीठ
कृती:
१. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात ओले खोबरे, गूळ व खवा टाकून नीट परतून घ्यावे. गूळ पूर्ण विघळून सारण परत घट्ट होईपर्यंत परतावे. सारणामध्ये वेलची पावडर व केशर टाकून मिक्स करावे. सारण एका ताटात काढून गार करण्यासाठी ठेवावे.
२. एका भांड्यामधे मैदा व थोडे पाणी घेऊन फोटोत दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे.
३. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
४. दुसर्या पातेल्यात साखरेचा दोन तारी पाक करून घ्यावा.
५. सारणाचे छोटे छोटे चपटे गोळे करून घ्यावेत.
६. भिजवलेल्या पिठामध्ये सारणाचा गोळा कव्हर करून घ्यावा व तेलामध्ये सोडावा.
७. पीठे सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
८. तळलेले पीठे पाकामध्ये १० मिनिटे बुडवून ठेवावेत.
९. पीठे बाहेर काढून बदामाच्या कापांनी सजवावेत. गोकोल पीठे खाण्यासाठी तयार आहेत.
प्रतिक्रिया
8 Sep 2016 - 7:39 am | अजया
मस्तच पाकृ मृ! आवडली.
8 Sep 2016 - 7:50 am | पिलीयन रायडर
अत्यंत वेगळीच पाकृ! कधीच ऐकलेली नाही.
सादरीकरण नेहमीप्रमाणेच उत्तम!
8 Sep 2016 - 11:34 am | सस्नेह
अगदी वेगळी पाकृ.
8 Sep 2016 - 12:25 pm | सुबक ठेंगणी
कधीच न ऐकलेली अनवट पा.कृ.
8 Sep 2016 - 7:55 am | सामान्य वाचक
भारी लागत असणार
फुटू दिसत नाही
कसे भिजवायचे पीठ? भज्या इतपत का ?
8 Sep 2016 - 2:17 pm | Mrunalini
फोटो मलाही दिसत नव्हते. पण मोबाईल वरुन चेक केले तर दिसत आहेत.
हो.. पीठ भज्यांसारखेच भिजवायचे.
8 Sep 2016 - 8:13 am | अत्रुप्त आत्मा
ह्हाहहहहहहहह! लाळेलाळ झालं तोंड.. शेवटचे २/३ फोटू बगून!
8 Sep 2016 - 8:16 am | बोका-ए-आझम
खमंग वास इथपर्यंत आलेला आहे!
8 Sep 2016 - 8:57 am | यशोधरा
सुरेख पाककृती!
8 Sep 2016 - 9:20 am | केडी
एक नंबर! आवडेश....
8 Sep 2016 - 10:54 am | नूतन सावंत
वेगळीच पाककृती,करून पहिली पाहिजे.मृ,झकास.
8 Sep 2016 - 11:05 am | किसन शिंदे
फोटो दिसेनात.
8 Sep 2016 - 12:02 pm | कंजूस
भारी.
8 Sep 2016 - 1:00 pm | Mrunalini
सगळ्यांचे धन्यवाद.
मलापण फोटो दिसत नाहियेत.
8 Sep 2016 - 1:41 pm | स्वाती दिनेश
वेगळीच पाकृ, आवडली.
बाप्पा खूष ह्या वर्षीचे प्रसाद बघून.
स्वाती
8 Sep 2016 - 1:44 pm | पद्मावति
वाह, मस्तं अनोखी पाककृती.
8 Sep 2016 - 1:44 pm | अभ्या..
कानडी किंवा तूळू पाककॄती आहे का?
जी काही असेल ती जब्बरदस्त. प्रेझेंटेशन खंग्री जमलेय. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फोटोग्रीडचा वापर आवडला. मिपासाठी असे काही केले पाहिजे.
8 Sep 2016 - 2:20 pm | Mrunalini
बंगाली पाकॄ आहे.
पाकृ आणि फोटो आवडल्याबद्दल धन्यवाद. फोटोग्रीड अजया ताईने केले आहे.
8 Sep 2016 - 2:09 pm | एस
चविष्ट दिसतेय! जमल्यास करून पाहतो.
8 Sep 2016 - 2:40 pm | प्रभास
एकदम सुंदर आहे पाकृ... थोडी बालुशाही सारखी दिसते आहे... अर्थात चव अगदीच वेगळी असणार म्हणा..
8 Sep 2016 - 2:42 pm | बाबा योगिराज
आमच्यावर "गणेशा"ची कृपा झालीये.
बर झालं फोटू दिसत नाहीत ते, उघच दिवसभर जीव जळत राहतो.
बाबा योगीराज.
8 Sep 2016 - 3:46 pm | सानिकास्वप्निल
वाह!! पिठे भारी दिसतायेत.
वेगळीच, स्वादिष्ट पाकृ मृ, फोटो नेहमीप्रमाणे देखणे आलेत :)
8 Sep 2016 - 6:07 pm | Mrunalini
थँक्स सानि.. :) :*
8 Sep 2016 - 9:10 pm | रेवती
मस्त दिसतोय खाद्यप्रकार. आधी कधी हे नाव ऐकले नव्हते. बंगाली पाकृ आहे का?
9 Sep 2016 - 2:29 pm | Mrunalini
हो ताई. थँक्स. ही बंगाली पाकृ आहे.
8 Sep 2016 - 11:12 pm | रुपी
मस्त वेगळीच पाकृ!
9 Sep 2016 - 12:14 am | स्रुजा
सुरेख आणि अगदी वेगळाच प्रकार!
9 Sep 2016 - 6:43 am | तुषार काळभोर
(सर्वांनी हेलियम इतकं हलकं घ्या!)
इथे बंगाली अनवट पदार्थ इतके झक्कास केले जातात आणि काही लोकांना मराठी उकडीचे मोदक पण जमत नाहीत!
वुई शुड ब्लेम व्होल पश्चिम बंगाल!
9 Sep 2016 - 6:57 am | अभिजीत अवलिया
सादरीकरण आवडले ...
9 Sep 2016 - 4:18 pm | विशाखा राऊत
हटके रेसेपी
12 Sep 2016 - 2:10 am | Mrunalini
पाकृ आणि फोटो आवडल्याबद्दल धन्यवाद.:)
12 Sep 2016 - 8:51 am | सपे-पुणे-३०
+१
नवीन पदार्थ. पहिल्यांदाच नाव ऐकलं. छान दिसतोय.
13 Sep 2016 - 3:06 pm | पूर्वाविवेक
मस्त ...मी प्रथमच पाहत आणि ऐकत आहे. फारच रुचकर.
13 Sep 2016 - 3:31 pm | सविता००१
झकास फोटो
14 Sep 2016 - 1:30 pm | Mrunalini
Thank you all. :)