गाभा:
पाकव्याप्त काश्मीरही भारताचेच आहे अशी डरकाळी फोडून नरेंद्र मोदींनी आपण एक कणखर पंतप्रधान असल्याचे सूचित केले, त्याच बरोबर गिलगिट बालटीस्थानात जनभावना उसळल्याने पाकिस्तानचे जरा कठीणच झाले आहे, भारतीय यंत्रणा योग्य काम करत असल्याचे हे चिन्ह समजावे काय?
प्रतिक्रिया
27 Oct 2016 - 9:38 pm | सही रे सई
27 Oct 2016 - 9:39 pm | सही रे सई
चिनी उत्पादनांवरील बंदीचा विपरित परिणाम होईल: चीन | सकाळ
http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5706026895517772952
27 Oct 2016 - 9:45 pm | गामा पैलवान
लोकहो,
रशिया अमेरिका युद्ध सीरिया वा पूर्व युरोप वा इतरत्र भडकू शकेल अशी शक्यता एका रशियन सेनानीने वर्तवली आहे.
स्रोत : http://www.express.co.uk/news/world/724252/Russia-US-West-Cold-War-Vladi...
वरील बातमीनुसार रशियाने अमेरिकेचा नवा नेता नोव्हेंबरात निवडला जाईपर्यंत सर्व राजनैतिक व्यवहार रोखून धरला आहे. तसेच रशियन शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या परदेशी शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक व्यत्ययाची तमा न बाळगता ताबडतोब घरी परतण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या आहेत. १४ ऑक्टोबरच्या सुमारास रशियाने ४ कोटी नागरिकांसमवेत अणुयुद्धबचावाचं सरावसंचालन केलं.
यापूर्वी इथे व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे काहीतरी घडामोडी होणार का? कुणाला तरी कसलीशी कुणकुण लागलीये का?
आ.न.,
-गा.पै.
27 Oct 2016 - 10:22 pm | शाम भागवत
रशियाचे विमान तुर्कस्तानने पाडल्यानंतर हळूहळू घटना वेग घेऊ लागल्या आहेत का?
28 Oct 2016 - 1:21 am | गामा पैलवान
शाम भागवत,
तुमचा कयास बरोबर दिसतोय. रशियन विमान तुर्कस्थानने पाडल्यावर घटनांनी वेग घेतला. मात्र त्यांची दिशा पार अनपेक्षित आहे.
आ.न.,
-गा.पै.
6 Nov 2016 - 1:19 pm | गामा पैलवान
लोकहो,
अमेरिकेचे अवकाश व क्षेपणास्त्र विभागाचे सर्वोच्च पदस्थ विद्यमान जनरल रोसी यांनी म्हणे आत्महत्या केली. बातमी : http://www.usatoday.com/story/news/politics/2016/10/28/army-generals-dea...
च्यायला, हे गृहस्थ मेले ३१ जुलै रोजी आणि आत्महत्या जाहीर केली गेली ती ऑक्टोबरात? जनरल रोसी यांचा खून झाला आहे हे रस्त्यावरचं शेंबडं पोरही सांगेल.
अनेक प्रश्न आहेत. युरोपातल्या युद्धात अमेरिकाही उतरू पाहतेय का? उत्तर होकारार्थी असेल तर ही वेळ योग्य आहे का? इतका महत्वाचा धोरणात्मक निर्णय कोण घेतो? कसा घेतो? या निर्णयाची वैधता काय? विद्यमान अध्यक्ष बाहेर जायच्या मार्गावर असतांना सांप्रत अत्युच्चपदस्थ सेनाधिकाऱ्याचा खून होतो. याचा अर्थ काय?
अर्थ स्पष्ट आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या मतास काडीइतकीही किंमत नाही. अमेरिकी निवडणूक म्हणजे एक सर्कस आहे आणि त्यातून फक्त विदूषकच निवडला जाऊ शकतो.
आ.न.,
-गा.पै.