गाभा:
इंग्लिश माध्यमातल्या मुलासाठी भारतीय characters असलेली इंग्लिश novels उपलब्ध आहेत का?
माझा मुलगा (इयत्ता ७ वी ) "हार्डी boys , gernimo stilton , wimpy kid " अश्या typical अमेरिकन characters असलेल्या " chain series " पुस्तकांचा भक्त आहे.
आपल्या लहानपणी वाचलेल्या "गोट्या , फास्टर फेणे " टाईप भारतीय वातावरणात वावरणारे characters असलेली इंग्लिश पुस्तकं मी शोधतोय .मला नेटवर शोधल्यावर फक्त " रामायण , महाभारत , पंचतंत्र किंवा "moral stories " टाईपची पुस्तकं सापडताहेत ...
"मालगुडी स्कुल डेज " सारखी अजून काही एका भागात किंवा अनेक भागांत उपलब्ध असलेली मुलांसाठीची भारतीय इंग्लिश पुस्तकं सुचवावीत . मदतीत तत्पर "मिपाकरांना " आगाऊ धन्यवाद...
प्रतिक्रिया
9 Aug 2016 - 2:56 pm | आदूबाळ
सातवीत असेल आणि हार्डी बॉईज वाचत असेल तर त्याला मोठ्या माणसांची पुस्तकं वाचायला द्या.
9 Aug 2016 - 3:00 pm | गंम्बा
माझ्या मते तुम्ही भारतात नाहीये. तुमचा मुलगा तो ज्याला रीलेट करु शकतो आणि त्याच्या आजुबाजुला जे बघतो त्या प्रमाणे वाचत असेल तर तेच वाचु द्याना. तुम्ही तुमच्या लहानपणचे गोट्या आणि फास्टर फेणे का लादताय त्याच्यावर. उगाच संस्कृतीरक्षक बनायला जाल आणि मुलगा चांगली वाचायची आवड जोपासतोय ती बंद करेल.
---------
हा माझा सल्ला आहे. राग मानु नका.
9 Aug 2016 - 3:43 pm | मुक्त विहारि
"तुमचा मुलगा तो ज्याला रीलेट करु शकतो आणि त्याच्या आजुबाजुला जे बघतो त्या प्रमाणे वाचत असेल तर तेच वाचु द्याना. "
प्रचंड सहमत.
9 Aug 2016 - 3:58 pm | पद्मावति
थोडं असहमत. मुलांचा मेंदू अतिशय तल्लख असतो. त्याला जितकं या वयात वेगळ्या गोष्टी, निराळ्या सामाजिक, भौगोलिक सेट अप असलेल्या गोष्टी वाचायला, अनुभवायला द्याल तितकाच मुलांचा सर्वांगीण विकास होतो. हेच वय आहे त्यांचं की त्यांची मते, विचार, संकल्पना आकार घेत असतात. नवीन गोष्टी मुलं पटकन आत्मसात करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या confort level च्या बाहेर थोडा धक्का द्यावाच माझ्या मते.
9 Aug 2016 - 6:08 pm | मुक्त विहारि
+ १
"त्याला जितकं या वयात वेगळ्या गोष्टी, निराळ्या सामाजिक, भौगोलिक सेट अप असलेल्या गोष्टी वाचायला, अनुभवायला द्याल तितकाच मुलांचा सर्वांगीण विकास होतो. हेच वय आहे त्यांचं की त्यांची मते, विचार, संकल्पना आकार घेत असतात. नवीन गोष्टी मुलं पटकन आत्मसात करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या confort level च्या बाहेर थोडा धक्का द्यावाच माझ्या मते."
+ १
पण प्रत्येक मुलाची आवड-निवड वेगवेगळी असते.
त्यामुळे घरात विविध विषयाची पुस्तके ठेवली.एकाला यांत्रिकी विषयात तर दुसर्याला हॉटेलच्या धंद्यात रस.त्यामुळे एक जण "हाऊ दे डू इट" बघायचा तर दुसरा "फूड-फूड".साहजिकच त्यामुळे ते गूगल बाबाकडून आपापल्या विषयाची माहिती घेवून वाचतात.
मुले ज्ञान मिळवत आहेत ना? मग झाले. माध्यम महत्वाचे नाही, असे माझे मत.
9 Aug 2016 - 4:42 pm | IT hamal
अहो गंबाभौ , जे वाचतोय ते बंद नाही करणार मी.. परंतु भारतात " hardy boys , gernimo stilton " सारखे पॉप्युलर बुक सिरीज निघतच नाहीत हा त्याचा समाज ( किंवा गैरसमज ) दूर करावासा वाटतो.. .. शिवाय शरीराने भारतात पण मनाने अमेरिकेत असे ह्या वयापासून तरी होऊ द्यायचे नाहीय मला...मोठा झाल्यावर तो कुठे राहील ते आपल्या हातात नसणारच...
9 Aug 2016 - 4:52 pm | गंम्बा
ओह्ह, मला माहीती नव्हते तुम्ही भारतातच आहात. मला वाटलेले तुम्ही पश्चिमी देशात आहात. मग ठीकये.
तरी पण आताच्या मुलांना गोट्या आणि फास्टरफेणे वगैरे वाचायला नका लाऊ. तुम्ही नॉस्टॅल्जिक होताय असे वाटते मुलाच्या थ्रु.
सध्याची काही कॅरेक्टर असतील भारतीय तर माहीती नाही.
9 Aug 2016 - 3:25 pm | पद्मावति
आजकाल बाल हनुमान, बाल गणेश किंवा ऐतिहासिक व्यक्तींच्या गोष्टी खूप छान मिळतात. मुलांना समजतील, आवडतील अशा कहाण्या, चित्रं असतात.
9 Aug 2016 - 3:29 pm | पद्मावति
सॉरी हे चुकुन माझ्या लक्षात आलं नाही.
तुम्ही म्हणताय तशी मालगुडी डेझ सारखी पुस्तकं मला माहीत नाहीयेत:(
9 Aug 2016 - 3:52 pm | कंजूस
इकडची भारतातील मुलं मालगुडी वगैरे वाचतात?
9 Aug 2016 - 4:34 pm | IT hamal
मालगुडी डेज नाही...."मालगुडी स्कुल डेज" ...खूप आवडले त्याला..
9 Aug 2016 - 4:59 pm | युफोरिक
Amazon.in वर "Customers Who Bought This Item Also Bought " सेकशन मध्ये सापडतील मालगुडी स्कूल days सारख्या पुस्तका.
लिंक - http://www.amazon.in/Malgudi-Schooldays-Puffin-Classics-Narayan/dp/01433...
try it .
Apologies for अगदी वाईट मराठी :)
9 Aug 2016 - 5:26 pm | उन्मीर
तुम्ही त्याला सत्यजीत रे यांचे फेलुदा देउ शकता.
लिंक
http://www.amazon.in/Complete-Adventures-Feluda-Vol/dp/014342503X?ie=UTF...
9 Aug 2016 - 9:41 pm | IT hamal
छान आहे फेलूदा....धन्यवाद...
9 Aug 2016 - 5:49 pm | राजाभाउ
माझा मुलगा (इ. ६वी) हा पण gernimo stilton , wimpy kid चा भयंकर चाहता. मध्यंतरी कधीतरी बोलताना मी त्याला "पाडस" बद्दल सांगीतले, त्याला इंटरेस्ट वाटला म्हणुन एक दोन दिवस त्यातली काही पाने वाचुन दा़खवली त्याला ते फारच आवडल आता सध्या तरी तो रोज पाडस मधील काही पान वाचतोय .
तुम्ही म्हणताय तशी देशी व्यक्तीरेखा असलेली पुस्तकांची सेरिज जास्त कुठली नाहीत, माधुरी पुरंदरेंची काही आहेत पण कदाचीत ती जरा जास्त लहान मुलांची (७वी च्या मानाने) असावीत. पण खर सांगू का ते wimpy kid वगैरे लईच इटरेश्टींग हाय त्यामुळे ते पोरांना फारच आवडतय.
9 Aug 2016 - 9:45 pm | IT hamal
खरंं आहे...मी ही वाचतो ते.....तशीच "addicting" देशी इंंग्लीश पुस्तके शोधतोय मी
10 Aug 2016 - 12:52 am | मयुरा गुप्ते
आय.टी.हमाल साहेब,
चांंदोबाचे जुने अंक कुठे मिळतात का ते बघा.
ह्या खाली दिलेल्या दुव्यावर चांदोबाचे ईंग्लिश अंक आहेत...(लिंक उघडता येते का ते कळवा.)
https://archive.org/details/chandamama_magazine
अकबर-बिरबलाच्या गोष्टींचा संच,
ईसापनितीच्या मराठी गोष्टी
जयंत नारळीकरांची अनेक पुस्तके
अशी आठवतील तशी नावे देत राहिन. आणि सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे तुमच्या लेकाला तो केवळ ईंग्रजी भाषेची पुस्तके वाचतो म्हणुन वाचनापासुन परावृत करु नका.
--मयुरा
10 Aug 2016 - 11:54 am | IT hamal
धन्यवाद...छान लिंक मिळाली.. मी download ही करू शकतोय..
मी मुलाला इंग्रजी पुस्तकं वाचायला बंदी घालणार नाहीये !!!... तर अमेरिकन culture / characters वर आधारित पुस्तकांच्या बरोबरच भारतीय व्यक्तिरेखा व भारतीय पार्श्वभूमीवर आधारित " इंग्लिश" पुस्तकांचा शोध घेतोय मी... तुम्ही खूपच चांगली लिंक दिलीय ..
10 Aug 2016 - 4:04 pm | वेदांत
लिंक बद्दल धन्यवाद ..
10 Aug 2016 - 5:06 pm | सिरुसेरि
अमर चित्र कथा , तेनाली रामन , मर्यादा रमण , चाचा चौधरि , बिल्लु ( डायमंड कॉमिक्स ) , प्रोफेसर शंकु , मुल्ला नसीरुद्दीन , बहादुर ( इन्द्रजाल कॉमिक्स), रस्कीन बाँड लिखित रस्टीच्या कथा , जंगल बुक . फास्टरफेणेचीही भाषांतरीत पुस्तके निघाली आहेत
10 Aug 2016 - 6:30 pm | शलभ
छान धागा. वाखू साठवत आहे. अजून पुस्तके येऊ द्या.
11 Aug 2016 - 12:42 pm | कलंत्री
शेरलॉक होम्स आणि ज्युल वर्न च्या गोष्टी या १५ वयोगटातील मुलांनी वाचायलाच हव्या.