४० वर्षाच्या मुलीचा हट्टीपणा कसा कमी करु?

भम्पक's picture
भम्पक in काथ्याकूट
8 Aug 2016 - 12:02 pm
गाभा: 

माझी ४० वर्षाची बायको प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. ती कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती तिला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
तिला म्हणे मी रागावतो आणि शाब्दिक फटके देतो याची भिती वाटते.हे अस बोलून ती माझ्या आई-बाबांची सहानुभूती मिळवते आणि शेवटी सगळं तिच्या मनासारखे करते , आणि मलाच काही कळत नाही ह्या निष्कर्षाप्रत सगळेच येतात.
मला वाटते माझी बायको खरंच भयंकर नाटकी आहे.तिला खरच भिती वाटली असती तर ती चांगल्या (दुसऱ्यांच्या ; ))बायकोसारखी वागली असती .
१.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
२. तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल?

आपला नम्र
शोधिशी पुण्यात गंगा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Aug 2016 - 12:29 pm | मुक्त विहारि

१.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?

तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही फरक पडणार नाही.

स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राजहट्टा पुढे कुणाचेही काही चालत नाही.

=====
२. तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल?

बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य.

========

वरील प्रतिसाद हा निव्वळ टाइमपास म्हणून दिला आहे.

बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य.

+१११११११........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Aug 2016 - 5:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> बायका सजूतदारच असतात पण आपली बायको त्यात नसते, हेच सत्य.

चक्क, मूवीशी सहमत व्हावं लागतंय. छ्या. ;)

-दिलीप बिरुटे

योगी९००'s picture

8 Aug 2016 - 12:30 pm | योगी९००

हॅ हॅ हॅ

शोधिशी पुण्यात गंगा ...लोल..!!

१.मी नक्की काय करावं की ज्यानी तिचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
दुर्लक्ष करा.... त्याने तिच्यात व तुमच्यात फरक पडेल.

तिच्या वागण्यात काय बदल घडवून आणू

आयडी सार्थ करताहात हं अगदी. ;)

उडन खटोला's picture

8 Aug 2016 - 12:46 pm | उडन खटोला

मस्त जोक. अजून एक अजून एक.
(विडंबन म्हणूनही असला काही विचार करणं शक्य होत नाहीये. भम्पक आयडी घेऊन च असं काही शक्य होत असावं.)

नावातकायआहे's picture

8 Aug 2016 - 1:01 pm | नावातकायआहे

आवरा...

पोकळ बांबुचा उपयोग अजिबात करु नका.बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या. आठव्यातून एकदा सासुरवाडीला स्वत:हून फोन करा(जरी मनात नसले तरी).केलेल्या स्वयंपाकाची खुप तारीफ करा.बघा जिवन कसे स्वर्गापेक्षा सुंदर होते ते.

बायकोच्या मैत्रिणींकडे ज्या प्रकारचे कपडे आणि दागिने आहेत तसेच घेऊन द्या.

अग्दी जसे आहेत तसे बरका. बारकाईने निरिक्षण केले तरी चालेल.

वामन देशमुख's picture

8 Aug 2016 - 9:57 pm | वामन देशमुख

>> पोकळ बांबुचा उपयोग अजिबात करु नका

"पोकळ बांबु" म्हणजे काय?

अभ्या..'s picture

8 Aug 2016 - 10:07 pm | अभ्या..

40 प्लस बायकोच्या 50प्लस नवऱ्यासाठी असतो तो. काही खास नसते. काहीही होत नाही.

त्रिवेणी's picture

8 Aug 2016 - 1:39 pm | त्रिवेणी

ते कधी बघायचे याचेही काही नियम आहेत बर. नै तर लेने के देने पडायचे.

महासंग्राम's picture

8 Aug 2016 - 1:44 pm | महासंग्राम

फारच जास्त वैयक्तिक होतंय काय?बाळी चं वय 40
आहे हे आपण विसरला आहात काय?

मौनम् सर्वार्थ साधनम्!

अभ्या..'s picture

8 Aug 2016 - 1:49 pm | अभ्या..

गायछाप काय?

महासंग्राम's picture

8 Aug 2016 - 2:01 pm | महासंग्राम

नाय ओ अभ्या भौ हा १२०-३०० ठंडाई किवाम विथ इलायची टाकलेला नागपुरी खर्रा दिसते.

व्हॉटेव्हर किक्स. ;-)

अनुप ढेरे's picture

8 Aug 2016 - 3:47 pm | अनुप ढेरे

हा हा हा, भारी!

संत घोडेकर's picture

8 Aug 2016 - 1:52 pm | संत घोडेकर

बायकोचे वय "४०" आहे असे जाहीर केल्यामुळे तुम्हालाच पोकळ बांबूचे फटके पडण्याची शक्यता आहे.

अभ्या..'s picture

8 Aug 2016 - 1:56 pm | अभ्या..

हम्म.
जसे लाईफ तसे फटके. पोकळ पोकळ. चालायचेच.

आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे. कधी पु ना गाडगीळ ज्वेलरी अँड जेम्स शाॅपिंग ट्राय केलंय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय.
माॅल्स पण फार फायदेशीर या त्रासाला.

नूतन सावंत's picture

8 Aug 2016 - 5:19 pm | नूतन सावंत

माझा ऐकाल तर रागाला तोंड द्यायची तयारी ठेवा,वय जाहीर केल्याबद्दल.आणि बायको कितीही वाईट असली तरी चार चौघात जाहीर केल्याबद्दल.त्रिवेणीतै आणि अजयतैचा सल्ला लगेच अंमलात आणा.

बाबा योगिराज's picture

8 Aug 2016 - 5:32 pm | बाबा योगिराज

लोळवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Aug 2016 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> की ज्यामुळे ती इतर बायकांच्या प्रमाणे समजुतदार होईल ?

स्वतःवर कंट्रोल ठेवा.

मन की बाते : मिपाकरांना एखाद्या गोष्टीचं कनेक्शन लागलं, सॉरी वेड लागलं की ते निघतच नै. वेड्याने मारलेली मीठी आहे, नाव सूटत नाही.

-दिलीप बिरुटे
(मिपावर वेडा झालेला मिपाकर) ;)

गामा पैलवान's picture

8 Aug 2016 - 7:04 pm | गामा पैलवान

भम्पक,

सवत आणायची धमकी देऊन पहा. जालीम उपाय आहे. प्रत्यक्ष सवत आणायची गरज नाही. केवळ धमकी पुरेशी ठरावी.

आ.न.,
-गा.पै.

हा उपाय अजिबात करू नका.

सध्याचे एकदम पोकळ अस्त्र आहे हे.

सवत राहिली बाजूला एखादा सवत्या आला तर काय घ्या?

(वरील प्रतिसाद अत्यंत बाष्कळ आहे, ह्याची कल्पना आहे.)

गामा पैलवान's picture

8 Aug 2016 - 7:25 pm | गामा पैलवान

मुवि, .... तर सुंठीवाचून खोकला गेला म्हणायचा ! ;-)
आ.न.,
-गा.पै.

असे असेल तर ठीकच आहे.

अनन्त अवधुत's picture

9 Aug 2016 - 12:06 am | अनन्त अवधुत

.

विवेकपटाईत's picture

8 Aug 2016 - 7:25 pm | विवेकपटाईत

तुम्ही तिला नेहमीच रागवता असे दिसते त्या मुळे ती आत्मविश्वास हरवून बसली आहे. रागावणे कमी करा. तिला तिच्या हिशोबाने कामे करू द्या. मी घरातले व्यवहाराचे सर्व कामे सौ. वर सौपवून टंकायला फ्री आहे.

हायला, बायका नवर्‍यांच एकतात हे ऐकून मौज वाटली...
कुटं भेटतात असल्या बायका ??

का? माहिती घेऊन काय उपयोग? तुमचं लग्न झालय ना?

आयतर मायतर हायेत ना टका सारखे, त्यांणा सांगता येइल...पुढच्यास ठेच मागचा शहाणा

पैसा's picture

8 Aug 2016 - 10:46 pm | पैसा

जय मल्हार बघा आणि खंडोबाचा आदर्श ठेवा.

हेच हेच मी सांगत असतो बायकोला. जर काही घेण्यासारखे असेल तर त्या मालिकेतून तर हेच...

अभ्या..'s picture

8 Aug 2016 - 10:57 pm | अभ्या..

बायसेप्स पाह्यलं का त्या देवदत्ताचे?
निघाले भंडारा उधळायला... ;)

खटपट्या's picture

8 Aug 2016 - 11:01 pm | खटपट्या

बायसेप्स पाह्यलं का त्या देवदत्ताचे?

करावे लागतील...:)

रच्याकने बायसेप्सवर अवलंबून असतं का त्ये ???

टवाळ कार्टा's picture

8 Aug 2016 - 11:58 pm | टवाळ कार्टा

रच्याकने बायसेप्सवर अवलंबून असतं का त्ये ???

स्वतंत्र हजारी धाग्याचे पोटेंशिअल आहे या प्रश्नात ;)

खटपट्या's picture

9 Aug 2016 - 12:18 am | खटपट्या

खिक्क !!

बाजीगर's picture

9 Aug 2016 - 5:07 am | बाजीगर

भं.राव तुमचं बॅडलक खराब असल्याबद्दल वाईट वाटतय.काहीं चांगलं व्व्हायचं असतं तर या आधीचं झालं असतं. 40 इज टू लेट.मडकं पक्क्कं झालयं आता आकार देता येणार नाही.एक करु शकता.....नाटक. चांगलं वागण्याचं,प्रेम असल्याचं ब्लाहब्लाहब्लाह पण त्याची किंमत चुकवावी लागेल.आत केमीस्ट्री हलेल,बॅड कोलॅस्टॅरोल साचत जाईल.

त्यापेक्षा खरं वागा, बायकोच्या (विचित्र)वागण्यात आनंद घेऊन खरे मनमुराद खळखळून हसा.
गम न कर जिंदगी यू गुजर जायेगी,
रात जैसे गुजर गयी सोते हूये.

भम्पक's picture

9 Aug 2016 - 8:35 am | भम्पक

अभ्या , आय डी बद्दल बोलायचे काम नाही बरका......
माझ्या स्वभावानुरूप आहे मान्य.....पण बोलायचे नाही हां.....;).....
हलकं घे रे...
बाकी (बड )सल्ले आवडले

लालगरूड's picture

9 Aug 2016 - 8:41 am | लालगरूड

आमचे काही मिपाकर प्रचंड विडंबक आहे.
ते एका धाग्याचे एवढे विडंबन करतात की
शेवटी सगळ्यांना कंटाळा येतो आणि
त्याची
परिणिती लेख फाट्यावर मारण्यात होते
आणि ज्याचे मला फार वाईट वाटते.
त्यांना फाट्यावर मारल्यावर वाईट
वाटते. हे असं बोलून ते
काही कंपूबाज मिपाकरांची
सहानुभूती मिळवतात,आणि शेवटी सगळं
त्यांच्या मनासारखे प्रतिसाद पडतात
मला वाटते की हे विडंबनकार भयंकर
नाटकी आहे. त्यांना खरचं फाट्यावर
मारण्याची भीती वाटत
असती तर त्यांनी धागा वर आणण्याची
पुनुरावृत्ती
नसती केली.
१. मी नक्की काय करावं की ज्यामुळे
माझ्या लेखाचे विडंबन पडणार नाही?
२. माझ्या लेखन शैलीत काय बदल करू
पुण्यात दंगा करून पस्तावलेले :-(

पण जरा थांबा....

मध्यंतरी मुवी आणि मी मुवींच्या "बाबांकडे (वडील नव्हे गुरु महाराज) सदीच्छा भेटीसाठी गेलो होतो. आम्च्या समोर एक जण असाच कौटुंबीक कटकटीवर ऊपाय मागायला आला होता. त्यांच्यातील संवाद येन प्रकारे..

बाबा: बोल वत्सा काय अडचण आहे?
कौ.का.भ.:घरच्या कटकटींना वैतागलो आहे विशेषतः बायकोच्या शीघ्र+दिर्घ हट्टीपणाला,................................................................................................................................................!!

(....मध्ये बर्याच तक्रारी/आडचणी/समस्या होत्या चाणाक्ष वाचकांनी आपल्या मगदूरानुसार (स्वजबाब्दारीवर भरून घ्याव्यात)

बाबा:एक किस्सा सांगतो, त्यात तुला त्याचे शंका समाधान नक्की मिळेल.

हिमालयात निबीड जंगल पार केल्यावर अगदी निर्मनुष्य जागेवर एक साधु महाराज तपस्येला बसले होते. उच्चासनावर ते बाजूला सहा आसनांवर त्यांचे अनुयायी बसले होते.भगवी कफनी ई नेहमीचा पारंपरीक वेष होताच.
तिथे एक दु:ख्खी कष्टी ईसम आला तुझ्यासारखाच "बायकोच्या कटकटींना वैतागलो आहे काही उपाय सांगा " असा घोषा करीत बसला, पुढे अगतिकतेने म्हणा की आणखी कशाने तो असेही म्हणाला की" अता ऊपाय मिळाल्याशिवाय मी घरी जाणार नाही"

ते सिद्ध साधु महाराज आपल्या शिष्याकडे वळून म्हणाले "बाळ विश्वंभर आठवे आसन दे याला बसायला आणि कफनीपण दे"

यानंतर तो कौ.का.भ. एक क्षणही न थांबता निघून गेला. बाबांनी मुवींकडे पाहून स्मित केले आणि मुवींनी मला अता निघाले पाहिजे अशी खूण केली.

बाबांचा परात्पर शिष्य नाखु

मुक्त विहारि's picture

9 Aug 2016 - 11:21 am | मुक्त विहारि

+ १

कमवू's picture

9 Aug 2016 - 1:51 pm | कमवू