.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
Pyrography (पायरोग्राफी) - To draw with fire..
शब्दशः 'जाळ अन् धूर संगटच' असेच या कलेचे वर्णन करता येईल. पायरोग्राफी 'wood burning art' म्हणूनदेखील परिचित आहे. आगीच्या मदतीने किंवा आगीवर तापवता येईल अशा पेनाने केलेले रेखाटन. फार प्राचीन काळापासून ही कला अस्तित्वात आहे. काळानुसार वापरायची साधने बदलत वा सुधारत जाऊन, आता user friendly तयार पायरोग्राफी पेन बाजारात मिळते. दिसायला अगदी सोल्डरिंग पेनासारखे, पण याला टाक, कॅलिग्राफी पेनाप्रमाणे पुढे जोडायला वेगवेगळ्या जाडीची, आकाराची, टोकदार किंवा सपाट attachments लावता येतात. विजेच्या मदतीने या attachments तापतात. पेनाला तापमान नियंत्रित करायची सोय असते. ज्या वस्तूवर रेखाटन करायचे त्याप्रमाणे तापमान कमी-जास्त करावे लागते. लाकूड, लेदर, कागदावर आपण जाळून लिहू शकतो, चित्रे काढू शकतो. काही हौशी लोक तर हाडेदेखील वापरतात. माझी धाव अजून लाकडापर्यंतच आहे.
दोन वर्षापूर्वी, माझ्या वाढदिवसाला नवीन कला शिकायची, म्हणून आम्ही दोघे येथील क्राफ्ट शॉपमध्ये गेलो. अनिल अवचटांच्या लाकडी कोरीवकामाबद्दल जाणून होतो, उत्सुकतेपोटी सहज आम्ही त्या भागात गेलो. वेगवेगळ्या लाकडी वस्तू, त्याच्या संबंधित असलेल्या कलेची पुस्तके व लागणारी साधने तिथे आजूबाजूला ठेवलेली होती. कोरताना घरात कचरा होईल आणि साफसफाई कोण करत बसणार... म्हणून पुढे वळलो. एका पुस्तकावर 'पायरोग्राफी' लिहिलेले दिसले. जाळपोळ करून चित्रकला करता येईल या उत्सुकतेने जरा चाळले. नवीन काहीतरी दिसते आहे म्हणून नवर्याने हेच भेट दिले. पेन व काही फळकुटे सरावाकरिता उचलून आणली. सोबत पेन बनवणारी संस्था यू ट्यूबवर त्याबद्दल माहिती सांगणारे व्हिडिओ टाकते असे पत्रकावर लिहिले होते. त्याचबरोबर इतर कलाकारांनी त्यांचे अपलोड केलेले काही व्हिडिओ तिकडे सापडले. थोडे गुगलून हळूहळू मी शिकायला सुरवात केली.
यात पहिला टप्पा होता तो म्हणजे जमेल तितक्या कमी वेगाने, अगदी कासवाच्या गतीने हे पेन वापरणे. आपल्या हाताला इतक्या वर्षांची लिहायची सवय असते, त्याच्या चार ते पाच पट संथ वेगाने पायरोग्राफी पेन वापरावे लागते. घाई केल्यास लाकूड एकसारखे जळत नाही. पेन/पेन्सिलीने लिहिताना आपल्याला थोडा दाब देऊन लिहायची सवय असते. इकडे मात्र उलटे आहे. जेवढा कमी दाब देता येईल तेवढा चांगला, नाहीतर लाकडावर खड्डे पडून पृष्ठभाग खडबडीत दिसतो. तापमान कमी-जास्त करून वेगवेगळ्या छटा साकारता येतात. जास्त ठेवल्यास जर्द काळा, तर जसजसे कमी करू तशा तपकिरी छटा उमटत जातात.
लाकूड कोणत्या प्रकारचे असले पाहिजे हा या कलेमध्ये फार महत्त्वाचा भाग आहे. शक्यतो फिकट, भुरकट असल्यास जाळल्यावर चित्र उठून यायला मदत होते. घट्ट तंतू व गोलाकार वलय एकमेकांच्या जवळजवळ असतील तर जळताना धूर होतो. कधीकधी राळ वर येऊन खूप वेळ लागतो. जर सुटसुटीत तंतू असतील तर कमी वेळात, चांगल्या प्रकारच्या छटा साधता येतात. राळ वर न आल्यामुळे एकसारख्या रेषा उमटत असल्याने सारखे पेनाने त्याच जागेवर गिरवायला लागत नाही. या कलेसाठी नुकतेच कापलेले लाकूड अथवा शक्यतो वार्निश न मारलेले लाकूड वापरत असल्याने सर्व संपल्यावर तेल किंवा polyurethaneचे वरून एक-दोन थर द्यावे लागतात. कालांतराने पायरोग्राफी फिकी पडत जाते. तेल वापरल्यास लाकूड आणि पायरोग्राफीच्या छटा राजस दिसतात व चांगल्या टिकतात.
नकळत भाजू नये किंवा इतर काही अपघात होऊ नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते. लाकडातून निघणारा धूर हा त्रासदायक असू शकतो. यासाठी एका बाजूने टेबलावरील छोटा पंखा चालू ठेवावा लागतो. खिडकीजवळ बसल्यास उत्तम, कारण पंख्याच्या मदतीने धूर बाहेर जातो. काही कलाकार मास्क लावूनदेखील काम करतात. सुरुवातीला नकळत पटकन हात गरम पेनास लागू नये म्हणून हातमोजा घालणे बरे किंवा फर्स्ट-एड किट जवळ ठेवायला लागते. डोळ्यांच्या बचावासाठी तसा चश्मा घातल्यास धुरामुळे डोळे चुरचुरत नाहीत व अपघातदेखील टळतो.
व्यवसायाने मी वास्तुविशारद, मात्र हस्तकलेची आवड.. यातूनच माझ्या पायरोग्राफीची सुरुवात झाली. सराव वाढला तशी आवड वाढली. रोज नवीन काहीतरी करावे वाटू लागे. वास्तुकला शिकताना कोणतीही रचना कशी असावी, त्यासाठी कोणकोणते मुद्दे लक्षात घावे यावर पहिली दोन वर्षे फार भर असतो. सध्या कोणाही व्यक्तीसाठी जेव्हा एखादी वस्तू करायला घेतली, तर ती फक्त त्या व्यक्तीसाठी आगळीवेगळी करायला शिक्षणाची साथ होते. आजूबाजूला मित्रमंडळी भरपूर असल्याने हळूहळू प्रत्येकाचे वाढदिवस, लग्न, गृहप्रवेश, बारसे असे एकही कार्यक्रम मी सोडले नाहीत, जेव्हा त्यांना आम्ही स्पेशल पायरोग्राफी भेटवस्तू दिल्या नाहीत.
ही पहिली वाढदिवसाची भेट, जेव्हा माझी अगदी सुरुवात होती. पानाच्या आकाराच्या attachmentने उलटा ठसा उमटवून ही फुले केली. नंतर टोकदार attachmentने नक्षी काढली.
चहा, कॉफी, वाईन वगैरेसाठी टेबलवर पेला/कप ठेवायला हे कोस्टर्स केले. यावरचे नक्षीकाम मेंदीसारखे केले. आमच्या एका मैत्रिणीने तिच्या देवघरात ठेवायला एक छोटे टेबल मला आणून दिले. त्यावर आपली शुभचिन्हे मिळून देवघरास साजेसे असे मंडला बनवले आहे.
माझी नणंद स्वतः एक कलाकारच आहे आणि अलादीनची जास्मिन तिची आवडती राजकन्या. तेव्हा तिच्यासाठी स्पेशल, जवळजवळ ५० तास बसून ही पेटी बनवली.
अशाच माझ्या एका मैत्रिणीबरोबर कलेची देवाणघेवाण केली. ही नावाची पाटी तिच्या नवीन घरासाठी पाठवली. तिने माझ्या नावाचा बॉक्स तिच्या decoupage (कागद चिकटवून कला)ने बनवून पाठवला.
झिम्बाब्वेची माझी एक मैत्रीण, रुफारो, तिला छोटासा भारत तिच्या घरी असावा या उद्देशाने तिच्यासाठी ताजमहाल असलेला दागिन्यांचा डबा बनवला.
एका जवळच्या मैत्रिणीने तिच्या आजोळी रशियाला जाताना काही भेटवस्तू बनवून घेतल्या.
एका काकूंनी नेदरलँड्सला जाताना भारतीय नक्षीकाम असलेल्या वस्तू बनवून नेल्या.
लग्नात माझ्या नणंदेच्या सासरी लोकांना आम्ही स्वतःहून छोट्या डब्या भेट केल्या.
साहजिकच याने वेगवेगळ्या विषयांवर काम करता आले आणि आपण फक्त त्यांच्यासाठी मेहनत करून बनवलेल्या वस्तूंचे त्यांना अप्रूपही वाटे. त्यातच काही मित्रमंडळींनी social mediaवरती प्रतिक्रिया जाणून घेण्यास सुचवले, त्यातून फेसबुक आणि इंस्ताग्रामवर 'कोयरी' या नावाने कलादालन सुरू केले. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. इंस्ताग्राममुळे तर जगातून वेगवेगळ्या राष्ट्राच्या कालकारांकडून हळूहळू प्रतिक्रिया यायला आरंभ झाला. नवीन दिग्गज कारागीर कळले, त्यांच्याकडून आणखी जास्त शिकता आले. भारतीय कलेत पायरोग्राफी थोडी त्यांच्यासाठी वेगळी असल्याने काहींनी स्वतःहून देवाणघेवाणीस प्रवृत्त केले. एकदा वार्निशबरोबर झालेल्या गोंधळात या लोकांशी संपर्क साधला. एका बाईंनी, ना ओळख ना पाळख, पण स्वतःहून त्यांची गौप्य तेलाची कृती व त्याचा डबीभर नमुनादेखील माझ्या घरी पाठवून दिला. सगळ्यांचा हा असा प्रतिसाद मिळतो आहे, तो खरच बहुमूल्य आहे.
नवरा त्याच्या शिक्षणात दिवसेंदिवस जास्त गढून जात असल्याने, तो घरी नसतानाचा वेळ मी या छंदाकडे दिला. तसेच एखादा दिवस मी अगदीच जास्त वेळ काम करणार असेन तरी त्याची काही हरकत नव्हती. तरी मी स्वतःहून घर आणि छंद या दोघांना समान प्राधान्य दिले. आता हा फक्त छंद ठेवायचा की त्याचा व्यवसाय करायचा, याचा पूर्ण निर्णय त्याने माझ्यावर सोडला आहे. छंदाचा व्यवसाय व्यावहारिकतेने सांभाळताना आवड जोपासली गेली पाहिजे असा प्रयत्न राहील.
सोशल नेटवर्किंगमुळे या कलेतल्या दिग्गजांचे काम घरबसल्या बघता येते. त्यांनी स्वतःहून त्यांची वेगळी निर्माण केलेली रचनाशैली अभ्यासता येते. सुरुवातीला तयार रेखाटने सरावासाठी उपयोगी ठरली. मात्र आता छंद आणि व्यावसायिक शिक्षण यांचा मेळ घालून, पुढे आपली वेगळी अशी शैली विकसित करायचा साध्या प्रयत्न सुरू आहे. यातून थोडी मिळकत झाली तर हरकत नाही, मात्र एक दिवस छोटे का होईना, एखादे प्रदर्शन भरवावे असा मानस आहे.
सहज मिळालेल्या वाढदिवसाच्या भेटीबरोबर नवीन काहीतरी शिकताना, जोपासताना, एका वेगळ्या कलेमध्ये हरवताना .. असाच जाळ अन् धूर संगटच ... सैराट...
इतर कलाकृती बघण्यास कलादालन:
www.facebook.com/koyripyrofolio
www.instagram.com/koyri_pyrography
प्रतिक्रिया
10 Sep 2016 - 9:31 am | पैसा
अप्रतिम आहे हे!
10 Sep 2016 - 10:45 am | मूनशाईन
या लेखाने सुरवात झाली, आता पुढे अजून लिहायचा प्रयत्न करीन.
10 Sep 2016 - 9:38 am | नाखु
एकदम भारी..
स्वगतः १४१ वाचने आणि एक प्रतिसाद ! लोक अजूनही कुणी लिहिलयं हेच पाहतात की काय ? काय लिहिलय्म ते सोडून.
अगदी मानमोडे काम दिसत्यं हे (साधी मेहंदीसाठी किमान तासभर बसणार्या भगैनी पाहिल्यावर याला किमान ५ पेक्षा जास्त तास लागत असावेत आणि खाडाखोडीला वाव नाही.
10 Sep 2016 - 9:54 am | यशोधरा
आजच, आत्ताच तर धागा आलाय, थांबा की जरा. नक्की येतील प्रतिसाद.
13 Sep 2016 - 3:53 pm | शाम भागवत
१००
10 Sep 2016 - 10:58 am | मूनशाईन
हो अगदी. मी दिवसाला ५-६ तास या कलेला देते. मात्र त्यात दर अर्ध्या तासाने ५-१० मिनिटे ब्रेक घेते. नाहीतर मान, पाठीचा दुखून चुराडा होतो.
जाळपोळ सुरु करण्याआधी पूर्ण ठरवून घ्यायला लागते कुठे किती जाळायचे. एखाद मिलीमीटर दुरुस्ती करता येते, पण काळ्या छटा म्हणजे fullstop!
10 Sep 2016 - 9:48 am | सामान्य वाचक
काय कला आहे तुमच्या हातात, अ प्र ती म
फुटू दिसत नाहीत म्हणून तुमच्या fb वर जाऊन पहिले
सैराट तर शब्दांच्या पलीकडे सुंदर आहे
10 Sep 2016 - 11:07 am | मूनशाईन
fb वर जाऊन बघितल्याबद्दल धन्यवाद.
सैराटचे फळकुट १८x१० इंच एवढे मोठे आहे. संपूर्ण १०-१२ तास, असे २ दिवसात केले.
11 Sep 2016 - 11:30 am | नमकिन
उत्कृष्ट
10 Sep 2016 - 9:48 am | इशा१२३
फारच सुंदर कला!अतिशय सुबक आणि देखण्या वस्तु.छान लेख.
10 Sep 2016 - 9:53 am | यशोधरा
एकदम अनवट छंद! फारच आवडले!
10 Sep 2016 - 9:54 am | माम्लेदारचा पन्खा
सुंदर कलाकार आहात तुम्ही....
10 Sep 2016 - 10:02 am | अभ्या..
मस्तच, कोयरी लोगो जब्बरदस्त.
सगले कामच जह्बरी, तोड नाही.
10 Sep 2016 - 6:30 pm | मूनशाईन
फेसबूकवर जेव्हा फोटो टाकायची सुरवात केली तेव्हा लोगो बनवला होता. नावाचे अक्षर 'S' आणि कोयरी हे दोन्ही एकत्र करून नणंदेच्या मदतीने आत्ताचा ठरवला. ती स्वतः उजर इंटरफेस डिजायनर आहे.
10 Sep 2016 - 10:06 am | मोदक
सुंदर लेख, फोटो दिसत नाहीयेत.
10 Sep 2016 - 11:14 am | मूनशाईन
फोटोबाबत संपादक मंडळाशी बोलते आहे, ते लक्ष घालत आहेत.
10 Sep 2016 - 10:06 am | मोदक
सुंदर लेख, फोटो दिसत नाहीयेत.
10 Sep 2016 - 10:18 am | Ujjwal
10 Sep 2016 - 10:18 am | Ujjwal
10 Sep 2016 - 10:36 am | इरसाल
अतिशय उत्तम आणी अप्रतिम.
10 Sep 2016 - 10:56 am | टवाळ कार्टा
बाब्बो, लय भारी
10 Sep 2016 - 11:06 am | जव्हेरगंज
10 Sep 2016 - 11:11 am | मितान
अप्रतिम !!!!!!
10 Sep 2016 - 11:11 am | मितान
अप्रतिम !!!!!!
10 Sep 2016 - 11:27 am | जेपी
जबरदस्त...!!!!१
10 Sep 2016 - 11:28 am | बोका-ए-आझम
Fire in the fingers पहिल्यांदाच पाहातोय. जबरदस्त! यासाठी काही खास प्रकारचं लाकूड लागतं का? म्हणजे काही विशिष्ट लाकडांवर ही कला जास्त छान होते असं काही आहे का?
10 Sep 2016 - 6:47 pm | मूनशाईन
शक्यतो फिकट रंगाचे, मऊ लाकूड वापरतात. त्यावर रेखाटने उठून दिसतात व कमी तापमानावर जाळता येते. काही जणांना कडक लाकडे पण वापरताना पाहिले आहे, त्यासाठी खूप जास्त तापमान ठेवायला लागते शिवाय धूर जास्त निघतो. चित्रानुसार प्रत्येकजण ठरवतो. मला कॉनट्रास्ट मध्ये खेळायला आवडते, म्हणून मी भुरकट लाकूड(पाईन, बासवूड) आणते.
10 Sep 2016 - 11:30 am | सस्नेह
अशी कलाकुसर अलिकडे लुप्त होत चाललीय. तुम्ही जपून ठेवा..
10 Sep 2016 - 6:50 pm | मूनशाईन
हो नक्कीच.
10 Sep 2016 - 11:30 am | ए ए वाघमारे
केवळ अप्रतिम
शुभेच्छा!
10 Sep 2016 - 11:31 am | रातराणी
जबरदस्त!! भयंकर आवडलं आहे हे! _/\_
10 Sep 2016 - 11:33 am | महासंग्राम
वाह... तुफान कला आहे हि.. पण तितकाच निखळ आनंद देणारी.. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा ...
10 Sep 2016 - 11:45 am | स्मिता_१३
अप्रतिम !!
10 Sep 2016 - 11:47 am | मुक्त विहारि
ह्या कलेबद्दल काहीच माहीत न्हवते.
10 Sep 2016 - 11:55 am | अजया
अप्रतिम अप्रतिम _/\_
10 Sep 2016 - 11:55 am | वरुण मोहिते
प्रचंड आवडला आहे
10 Sep 2016 - 12:01 pm | अजया
पायरोग्राफी कशी करतात? म्हणजे या डब्या वगैरे रेडिमेड आणल्या का? मग त्यावर डिझाइन प्रिंट करुन कोरता का?
त्यात शेडिंग कसे दाखवता?
10 Sep 2016 - 7:02 pm | मूनशाईन
होय या डब्या, चमचे दुकानातून आणल्या. चित्रे पेन्सिलीने काढता येतात, किंवा प्रिंट करून ट्रान्स्फर टीप असते तिच्या मदतीने लाकडावर उतारता येतात.
वरील चित्रे मी पेन्सिलीने काढली आहे. जिथे समानता लागते तिकडे ऑटोकॅडची मदत घेऊन प्रिंट ट्रान्स्फर करते.
शेडींग टीप हि थोडी बोथट दिसणारी असते. कमी-जास्त तापमानावर गोल गोल गिरवून, हळू हळू शेडींग करता येते.
याबद्दल पुढे चित्रांसकट लेख टाकेनच.
13 Sep 2016 - 10:08 am | रुस्तम
लेखाची वाट पाहतो आहे.
10 Sep 2016 - 12:13 pm | स्वाती दिनेश
सगळीच कारागिरी अप्रतिम आहे.
ह्या कलेबद्दल नवीनच समजले. तुमचा छंद तुम्ही फारच निगुतीने पाठपुरावा करून जपला आहे आणि त्याचे स्वरुप व्यापक केले आहे. फार सुरेख!
स्वाती
10 Sep 2016 - 7:06 pm | मूनशाईन
सहज सुरु केले होते पण सगळ्यांनी वेळोवेळी प्रतिक्रिया देऊन उत्साहित केले. आज २ वर्षांनी हे सगळे मांडताना फार मस्त वाटते आहे.
10 Sep 2016 - 1:09 pm | स्मिता.
काय काय सुरेख कला आहेत जगात! लेख आणि तुमच्या कलाकृती फारच आवडल्या आहेत.
10 Sep 2016 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम हा शब्द तोकडा पडतो आहे अशी कला आहे ही ! कल्पनाशक्ती इतकीच चिकाटी महत्वाची आहे !!
तुमच्या कलाकृती अत्यंत सुंदर आहेत !
10 Sep 2016 - 7:17 pm | मूनशाईन
खूप खूप धन्यवाद.
भारतीय कला पायरोग्राफीतून सर्वांपुढे मांडता येते आहे याचा आनंद आहे. गुगलून कळले कि हे करणारे फारच थोडे लोक आहेत, त्यात भारतीय तर फारच कमी. सर्वांच्या प्रतिसादामुळे अजून नवीन करायचा उत्साह आला आहे.
10 Sep 2016 - 7:39 pm | अभ्या..
आपल्याकडे हे खूप पूर्वापार चालू आहे. फक्त हे करणारे बरेचसे जुने आर्टिस्ट्स इंटरनेट वगैरे गोष्टींशी जास्त परिचित नव्हते. आताही खूप जण छंद म्हणून करतात. काही जण पूर्ण व्यवसाय म्हणून करतात. पण नेटवर कामे पब्लिश करणे अजूनही फारसे आर्टिस्ट लोकांच्या अंगवळणी पडलेले नाही. त्यामागे बर्याचशा गोष्टी असतात. मीही थोडेसे काम केलेले. बारीक बारीक डीटेल्ड लाईन वर्क ने इलस्ट्रेशन करायला आवडायचे म्हणून केले. नंतर मात्र लेसर बर्नर आले. आणि स्वस्त रिप्रोडक्शनच्या मागे लागणार्या आपल्या जनतेला अशा गोष्टी परवडेनाशा होतात म्हणून सोडूनही दिले.
थोडासा वेळ मिळाला तर पुन्हा फायर रायटर घेऊन बैठक मारावी म्हणतो. तुम्ही ती प्रेरणा दिली हेच खूप आहे.
10 Sep 2016 - 7:53 pm | यशोधरा
हे ब्येष्ट! कुठे शिकता वगैरे येईल का?
10 Sep 2016 - 7:56 pm | अभ्या..
आमच्याइथे एकजणाने वूड बर्निंग आर्ट म्हणून क्लास काढलेला. क्राफ्टशी संबधित इतरही बरेच काही शिकवले जायचे. सध्यस्थिती माहीत नाही.
10 Sep 2016 - 8:33 pm | यशोधरा
शोधते इथे.
11 Sep 2016 - 9:00 am | मूनशाईन
नवीन लेखात तपशीलवार कल्पना येईल असे लिहिणार आहे.
11 Sep 2016 - 8:43 am | मूनशाईन
नक्की चालू करा म्हणजे आम्हाला पण तुमच्या कलेचा आस्वाद घेता येईल.