शेंगोळ्याचे लाडू

विप्लव's picture
विप्लव in पाककृती
5 Aug 2016 - 4:48 pm

नमस्कार
मी मिपावर नवखि आहे. कृपया काही चुक झाली तर सांभाळून घ्यावे.
शेंगोळ्याचे लाडू हा माझा जिव की प्राण आहे. मी कोल्हापूरची आहे.हा प्रकार फक्त कोल्हापूर, सांगली जिल्हातील फक्त जैन लोकच बनवतात. मी हॉस्टेलला असताना माझी आई हे लाडू करुन द्याची. पोरी अक्षरशः तुटून पडायच्या डब्ब्यावर आणि फडशा पाडायच्या माझ्या हाती एकादा लाडू लागायचा. दिवाळीला फक्त हाच लाडु बनतो आमच्या घरी. आता बाप्पांचे आगमन होणार आहे. नवनविन खाद्य पदार्थ आणि प्रसादांची रेलचेल असेल. म्हणुन आपणही एक नविन पदार्थ सर्वाना सांगावा असे मला वाटले.
मी अजून हे लाडू नाही बनवले माझी आई किंवा सासुबाई बनवतात. त्यामुळे फोटो अर्थात नाहित.

साहित्य- मला १ किलोचे प्रमाण माहित आहे त्यानुसार साहित्य सांगते.
१ किलो हरभरा डाळ दळून घेणे.
१ किलो साखर (मी आईला पाऊण किलो घ्यायला सांगते मला जास्त गोड नाही आवडत).
पाऊण लिटर आकडी न तापवलेले दूध
१/४ किलो तूप
७-८ वेलदोडे.
हवे असल्यास ड्रायफ्रुट.
पाकृ- हा पदार्थ तूपाने युक्त असल्याने हृदय विकार असणार्यांच्या छातीत जळजळ होण्याची शक्यता आहे. कृपया त्यांनी दूरच रहावे.
प्रथम डाळीचे पिठ एका पराती मध्ये चाळून घ्या.मग त्यात ३ चमचे तुप घालून फक्त दुधामध्ये मळून घ्या. घट्ट मळा एकदम. २-३ तास झाकुन ठेवा.
२-३ तासाने मळलेल्या पिठाचे पोळपाटावर हाताच्या सहायाने शेंगोळे वळून घ्या. मला नाही आवडत हे काम. खुप हात दुखतो. शेजारच्या बर्नर वर एका कढईत थोडे तूप गरम करायला ठेवा. जसजसे शेंगोळे वळतील तसतसे पटकन खरपूस chocolaty रंगावर मंद आचेवर तळून घ्या. आतून अजिबात कच्चे राहणार नाहीत याची दक्षता घ्या. हे सर्व करायला खुप पेशन्स हवा कारण खुप वेळ खाऊ पण स्वादिष्ट लाडू आहेत.
सर्व शेंगोळे तळून झाले की ते मोडून मिक्सरला बारिक दळून घ्या. अगदी बारिक रव्यासारख झाल पाहिजे पिठ. हे काम मला जास्त आवडत कारण शेंगोळे मोडता मोडता हळूच तोंडात टाकायच अहाहा काय भारी लागत म्हणुन सांगू त्यामुळे हे काम मी विना तक्रार करते
आता इथून पुढची पाकृ रव्याच्या लाडू सारखीच आहे जवळपास. तर हे चाळलेल पिठ कम रवा एका पातेल्यात घ्या व परत थोड्या तुपावर मंद आचेवर भाजून घ्या. काय झाल जळजळल ना छातीत काय करु खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी हा बाणा त्यावेळेस सर्वानी घेतलेला असतो. मग माझा नाईलाज आहे.
तर पुढे, पिठ भाजत असताना शेजारी साखरेच्या पाकाचीही तयारी करावी. १ किलो साखर एका पातेल्यात घ्या व त्यात साखर बुडून थोडवप राहिल ईतक पाणी घाला व शेगडी वर ठेवा. पिठ भाजुन झाल की ते उतरवा. आणि पाकाकडे लक्ष द्या. थोडा कच्चाच पाक धरा. रव्याच्या लाडुला धरतो तसा. मग ३ चमचे तुप घाला पाकात आणि हळुहळू पिठ पाकात पेरा व सतत ढवळत रहा गाठी राहणार ऩाहीत याची दक्षता घ्या. ह्यावेळी आच मंद ठेवा नाहीतर करपेल पिठ.
पातळ पिठल्यासारख होईल मिश्रण मग आच बंद करा व वरुन वेलची पूड ड्रायफ्रुट घालून हलवा. व मिश्रण झाकुन ठेवा. लाडु वळता येण्या इतपत घट्ट झाल की मग हाताने सर्व गाठी ढेकुळ फोडुन लाडू वळायला घ्या.

हुश्श तर अशी आहे ही लाडवाची कहाणी. आता लक्षात आलेलच असेल तुमच्या की मी हे लाडू स्वतः का नाही बनवत.
पण तुम्ही एकदातरी तुमच्याकडे भरपुर वेळ असेल अन करायला काय नसेल दुसर तेव्हा ही रेसिपी ट्राय करा अन कसे झाले ते मला कळवा.
काही चुका असतील किंबहुना असणारच तर क्षमस्व
धन्यवाद
आपली विप्लव

प्रतिक्रिया

बेसनाच्या भाजणीचेही लाडू असे असतात. त्यात फक्त शेंगोळ्या बनवण्याऐवजी जाड-जाड पुऱ्या बनवतात. नंतर हाताने बारीक चुरून (आजकाल मिक्सरमध्ये) भरड बनवतात. नंतर पाकात मिसळून लाडू बनवतात.

फोटो नाय तर पाकृ नाय हे ऱ्हायलं! ;-)

नेक्श्ट टाईमच्या पाकृला नक्की टाकेन फोटो. धन्यवाद

स्मिता.'s picture

5 Aug 2016 - 5:55 pm | स्मिता.

पाकृ वाचतांना अगदी याच प्रकारच्या लाडूंची आठवण आली. माझी आई/सासुबाईसुद्धा अश्याचप्रकारे म्हणजे बेसनाच्या पुर्‍या बनवून त्यांना बारीक चुरून रवासारखे करतात आणि मग पुन्हा पाकात मिसळून लाडू वळतात. हे लाडू अत्यंत चविष्ट पण तेवढेच कष्टप्रद असल्याने मी कधीच बनवत नाही ;-)

पद्मावति's picture

5 Aug 2016 - 4:54 pm | पद्मावति

छान आहे पाककृती. लेखनशैली पण खूप आवडली.

विप्लव's picture

5 Aug 2016 - 4:59 pm | विप्लव

थँक्यू

संजय पाटिल's picture

5 Aug 2016 - 5:02 pm | संजय पाटिल

२-३ तासाने मळलेल्या पिठाचे पोळपाटावर हाताच्या सहायाने शेंगोळे वळून घ्या>>
शेंगोळे म्हणजे काय?

विप्लव's picture

5 Aug 2016 - 5:08 pm | विप्लव

शेंगोळे म्हणजे थोडक्यात नुडल्स सारखे पण ५-६ सेंमी लांबीचे

चंपाबाई's picture

5 Aug 2016 - 6:33 pm | चंपाबाई

जाड वात वळुन घेणे.

नंतर दोन्ही टोके जुळवुन कडी तयार करणे. त्याला शेंगोळे म्हणतात

संजय पाटिल's picture

10 Aug 2016 - 10:25 am | संजय पाटिल

व्वोखे.. समजलं.. थ्यांन्कू.

आदूबाळ's picture

5 Aug 2016 - 5:22 pm | आदूबाळ

फोटो टाकलात तर बरं होईल.

हॅरी पॉटरच्या "गिलीवीड" सारखा दिसेल हा पदार्थ असा अंदाज आहे.

पैसा's picture

5 Aug 2016 - 10:25 pm | पैसा

गिलीवीड??? यक्क्क्क्क

बरखा's picture

5 Aug 2016 - 5:27 pm | बरखा

बनवलेल्या पदार्थाच्या गोल(@) अथवा सरळ रेषा (______________ ,_________) या आकाराला शेंगोळे असे आम्ही म्हणतो. खरं तर शेंगोळे हे हुलग्याचे पिठ असते त्याच्या बनवलेल्या पदार्थाला म्हणतो.

विप्लव's picture

5 Aug 2016 - 6:11 pm | विप्लव

दर मैलाला भाषा बदलते अस म्हणतात ना तस आहे हे तुम्ही हुलग्याच्या पिठाला शेंगोळे म्हणता आमच्याकडे डाळीच्या पिठापासून बनललणार्या पदार्थाला शेंगोळे म्हणतो

किसन शिंदे's picture

5 Aug 2016 - 6:44 pm | किसन शिंदे

हेच सांगायला आलो होतो. हुलग्याच्या पीठाचे शेंगोळे बनवतात, पद्धत अगदी सारखीच. फक्त या शेंगोळ्याची भाजी बनवतात.

अगदी अशाच पद्धतीने आम्ही शेवलाडू बनवतो. पद्धत हीच, फक्त शेंगोळ्यांऎवजी शेवेचा घाणा तळून घेतो मग तो हातांनी कुस्करून, त्या कुस्करलेल्या बारीक शेवेत पाक घालून त्याचे लाडू वळतो.

वेगळा पदार्थ आहे. चुरम्याच्या लाडवाची आठवण आली.

चुरम्याच्या लाडवाची आठवण आली.

+१

बाकी फोटु नसल्याने पाकृ फाऊल धरण्यात आली आहे.

विप्लव's picture

5 Aug 2016 - 6:49 pm | विप्लव

नका ओ सूड उगवू नविन आहे पहिलेच लेखन सांभाळून घेणे

चुरम्याच्या लाडवाची आठवण आली.

+१

बाकी फोटु नसल्याने पाकृ फाऊल धरण्यात आली आहे.

हुलग्याचे पीठ नाही का वापरत त्याला एक वेगळीच चव असते

हुलगा खात नाहीत आमच्याकडे तो फक्त दुभत्या जनावरांचे खाद्य म्हणुन वापरतात.

छान लिहिलीये पाकृ.पुढच्या वेळी फोटोसकट टाका!

हो अगदी नक्की. आणि हो तुम्ही देलेल्या सल्लया बद्दल धन्यवाद त्यामुळेच मी हे प्रकाशित करु शकले

फोटो नसल्यामुळे आवंढा गिळता आला नाही..

नीलमोहर's picture

5 Aug 2016 - 10:20 pm | नीलमोहर

बरीच किचकट वाटतेय पण मस्त लागत असतील लाडू,
पुढील लेखनास शुभेच्छा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Aug 2016 - 6:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो शिवाय पुढची पाककृती नै चालणार हं.
वर्गाच्या बाहेर उभा करीन. :)

-दिलीप बिरुटे

विप्लव's picture

7 Aug 2016 - 9:55 pm | विप्लव

:( फोटो कसे टाकायचे. टाकता येत नाहियेत

पैसा's picture

7 Aug 2016 - 7:00 pm | पैसा

वेगळी पाकृ. शेवखंडाच्या लाडूसारखे होत असणार.

स्मिता चौगुले's picture

8 Aug 2016 - 2:13 pm | स्मिता चौगुले

शेवेच्या लाडू सारखेच आहे ..छान पाक्रु

माझी आजी अशीच बेसन बर्फी बनवायची. फक्त शेंगोळे बनवण्याऐवजी त्याचे मुटके बनवून तळून घ्यायची. आणि मग शेवटी मिश्रण ताटात घालून वाळल्यावर वड्या कापून घ्यायची. पण ड्रायफ्रुट वगैरे काही नाही.. तरीही सुंदर चव असायची त्या बर्फीची.

एकदा तर ऐन वेळी मिक्सर बिघडला होता तेव्हा उखळात कुटून/ चाळून घेतले होते.

माझ्याकडे वेळ नाही, आणि इतका संयम तर नक्कीच नाही ;) त्यामुळे मीही कधी हे बनवण्याच्या वाटेला गेले नाही :)