सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
24 Sep 2008 - 12:30 am | विसोबा खेचर
क्लास फोटू...! :)
अवांतर - एखाद्या माणसाची बायको दिसायला सुंदर असली की "साल्याने गेल्या जन्मी बहुतेक एका पायावर पाण्यात उभं राहून तपश्चर्या केली असावी!" असं आम्ही मनातल्या मनात म्हणतो! :)
असो, साक्षिदेवा, येऊ द्यात अजूनही फोटू..
तात्या.
24 Sep 2008 - 12:31 am | यशोधरा
अहा! काय मस्त फोटो!
24 Sep 2008 - 12:36 am | प्राजु
एकदम सह्ही आहे फोटो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Sep 2008 - 12:50 am | चतुरंग
ध्यानमग्न रोहित पक्षी एकदम छान टिपलेत!
(दोघांच्या पायातली तांब्याची कडीसुद्धा स्पष्ट आलीत!)
(थोडी टीका - मधली गवताची पाती थोडा रसभंग करताहेत पण ती बहुधा हाताच्या अंतरावर नसणार त्यामुले नाइलाज असावा. आणखी एक, चित्र थोडंसं ओव्हर एक्सपोज झाल्यासारखं वाटतंय कारण पंखांवरुन परावर्तित होणारा प्रकाश थोडा कमी असता तर पक्षी जास्त खुलून दिसले असते असं वाटतं.)
चतुरंग
24 Sep 2008 - 1:00 am | धनंजय
टिप्पणीशीही सहमत.
फोटो कातरून फक्त ध्यानमग्न पक्षीच ठेवायला हवा होता. पाठीमागचे दोघे तितकी मस्त पोझ देत नाही आहेत. गवताची पाती, तांब्याची कडी यांचीसुद्धा सोय कातरल्यामुळे झाली असती.
24 Sep 2008 - 1:08 am | चतुरंग
चतुरंग
24 Sep 2008 - 1:18 am | भाग्यश्री
काय क्लास फोटो आहे हा!! तुमचा तिसरा डोळा अशक्य आहे साक्षीजी!
आणि नशीब.. अशा पोझेस मिळतात तुम्हाला मॉडेल्सकडून!
24 Sep 2008 - 3:32 am | बेसनलाडू
सौजन्यः सी वर्ल्ड, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया मधील भ्रमंतीसमयी मी टिपलेले एक छायाचित्र
(पार्टनर)बेसनलाडू
24 Sep 2008 - 10:27 am | प्रभाकर पेठकर
ही - आणखिन एक तपश्चर्या - जोडीने.
ही तपश्चर्या नाही वाटत. '***** समाधीकडे जाण्याची पूर्वतयारी वाटते आहे.' (अर्थात त्यालाही तपश्चर्या लागतेच.)
24 Sep 2008 - 10:18 am | मदनबाण
व्वा.. साक्षी महाराज आपण तर अगदी जोरदार फोटो देण्याचा सपाटाच लावला आहे !!
फोटो फार आवडला..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
24 Sep 2008 - 10:23 am | प्रभाकर पेठकर
तुम्ही सुद्धा नं सर्वसाक्षी... असे फोटो घ्यायला अगदी एका पायावर तयार असता.
अभिनंदन.